(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)
भाग 3 : https://www.maayboli.com/node/65552
****************************
वयोगट १९-४९ : संसारामधी ऐस आपुला......
या भागात दोन उपविभाग पडतील – वय १९-२९ आणि ३०-४९. यांमध्ये सुचविलेली प्रत्येक चाचणी सर्वांसाठी करण्याची गरज नसते. गरजेनुसार अधिक जोखीम असलेल्या लोकांमध्ये संबंधित चाचणी केली जाते. प्रथम या दोन्ही उपविभागांना समान असणाऱ्या चाचण्यांची माहिती घेऊ.
खालील ४ आजारांसाठी चाचण्यांची शिफारस केली जाते. त्यापैकी पहिल्या २ अर्थातच स्त्रियांसाठी आहेत:
१. स्तनांचा कर्करोग
२. गर्भाशयाच्या cervix चा कर्करोग
३. उच्च कोलेस्टेरॉल पातळी आणि
४. HIV संसर्ग
स्तनांच्या कर्करोगाच्या चाचण्या:
१. स्त्रियांनी त्यांच्या विशीत असताना स्वतःच त्यांच्या स्तनांची तपासणी घरी नियमित करावी. त्यामध्ये पुढील गोष्टींकडे लक्ष द्यावे – तेथील त्वचेवर खळ व सुरकुती पडणे, फुगवटा येणे, एखादा भाग लाल होणे इ. काही संकेतस्थळांवर हा विषय सचित्र समजावून सांगितलेला आहे.
२. दर ३ वर्षांतून एकदा अशीच तपासणी योग्य त्या डॉक्टरकडून करून घ्यावी.
३. चाळीशीच्या पुढे वर्षातून एकदा mammography ही क्ष-किरणतंत्र चाचणी करावी. आता ही सर्वांसाठी का फक्त जोखीम असणाऱ्यांसाठी यावर तसे एकमत नाही.
४. आता या रोगाची अधिक जोखीम असणाऱ्या स्त्रिया अशा आहेत:
अ) आई किंवा बहिणींना स्तनांचा किंवा अंडाशयाचा कर्करोग असणे आणि त्यांच्यात संबंधित जनुकीय बिघाड असणे.
आ) लठ्ठपणा
इ) स्वतःची मासिक पाळी वयाच्या १३ व्या वर्षाआधी सुरु होणे
ई) स्तन दाट (dense) असणे
उ) अतिरिक्त मद्यपान
ऊ) १० ते ३० या वयात छातीची क्ष-किरण तपासणी बऱ्याचदा होणे.
ऋ) नेहमी रात्रपाळीत काम करणाऱ्या स्त्रिया
५. आता वरीलपैकी कोणताही मुद्दा लागू असल्यास डॉ च्या सल्ल्याने जनुकीय चाचण्यांची शिफारस केली जाते. ती चाचणी रक्त वा थुंकीवर करता येते. त्यात BRCA1 or BRCA2 या जनुकांमध्ये बिघाड (mutation) आहे की नाही ते पाहतात.
Cervix च्या कर्करोगाच्या चाचण्या:
या रोगाची वाढ खूप हळू असते. येथे चाळणी चाचण्यांचे महत्व खूप आहे. त्यामुळे कर्करोगाच्या पूर्वस्थितीतच त्याचे निदान शक्य होते. अशा स्थितीत त्यावर प्रभावी उपचार करता येतात. चाचणीच्या शिफारशी अशा आहेत:
१. २१-२९ या वयांत Pap Smear चाचणी दर ३ वर्षांतून एकदा करावी. यासाठी Cervix च्या भागात विशिष्ट ब्रशच्या सहाय्याने हलकेच स्त्राव घेतला जातो आणि मग त्यातील पेशींचे प्रयोगशाळेत निरीक्षण करतात.
२. या रोगाची अधिक जोखीम असणाऱ्या स्त्रिया अशा:
अ) HPV या विषाणूंचा संसर्ग होणे. हा संसर्ग लैंगिक संबंधातून होतो.
आ) लैंगिक संबंध लवकरच्या वयात चालू करणाऱ्या स्त्रिया
इ) अनेक जोडीदारांशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या
ई) एड्स-बाधित आणि
उ) धूम्रपान करणाऱ्या.
अशा स्त्रियांसाठी Pap चाचणी दरवर्षी सुचवण्यात येते.
३. जेव्हा Pap चाचणीचे निष्कर्ष ‘नॉर्मल’ पेक्षा वेगळे असतात तेव्हा HPV DNA test ही पुढची चाचणी करण्यात येते. या विषाणूच्या अनेक प्रजाती असून त्यातील काहींमुळे हा कर्करोग होतो.
• उच्च कोलेस्टेरॉल पातळी आणि HIV संसर्ग याबद्दलच्या चाचण्यांचे विवेचन या लेखमालेच्या तिसऱ्या भागात आलेले आहे. आता रक्तातील एकूण सर्व मेद-पदार्थांचा अंदाज घ्यावा. त्या चाचणीला Lipid Profile म्हणतात. त्यात एकूण कोलेस्टेरॉल व त्याचे LDL-c, व HDL-c हे दोन प्रकार आणि TG यांचा समावेश असतो.
या विषयाचे अधिक विवेचन माझ्या ‘कोलेस्टेरॉल’ वरील लेखात वाचता येईल :
(https://www.maayboli.com/node/64397)
• ३०-४९ या वयोगटासाठी लठ्ठपणाच्या चाचणीची शिफारस केलेली आहे. बऱ्याच लोकांचे बाबतीत तारुण्यात वजन योग्य असते पण चाळीशीच्या आसपास ते अतिरीक्त होऊ लागते. अशांनी आता नियमित वजन करून स्वतःच्या BMI वर लक्ष ठेवणे हितावह असते. याचबरोबर वर्षातून एकदा रक्तदाब बघणे हेही फायद्याचे असते.
लठ्ठपणा, उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह, उच्चरक्तदाब आणि करोनरी हृदयविकार हे सर्व एकत्र नांदणारे आजार आहेत याची दखल घेतली पाहिजे.
• चाळीशी ओलांडलेल्या स्त्रिया जर अनिश्चित(non-specific) स्वरूपाच्या तक्रारी घेऊन डॉक्टरकडे वारंवार जात असतील तर त्यांची थायरॉइडची TSH चाचणी करणे हितावह असते.
** ** **
पुढील वयोगटाकडे जाण्यापूर्वी मला दोन मूलभूत चाळणी चाचण्यांबद्द्ल लिहावे वाटते. या दोन्ही तशा ‘वयोगट-विरहीत’ आहेत. जेव्हा आपल्याला एखाद्या कारणास्तव शारीरिक तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र सादर करायचे असते तेव्हा या कराव्या लागतात. त्या अशा आहेत:
१. Hemogram: यामध्ये रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी, लाल व पांढऱ्या पेशींची संख्या आणि संबंधित माहिती मिळते.
२. लघवीची सामान्य (Routine) तपासणी: यात लघवीत ग्लुकोज, प्रथिन, स्फटिकासारखे पदार्थ आणि जंतूसंसर्ग दर्शवणारे दोष आहेत का ते पहिले जाते.
शारीरिक तपासणी बरोबर या दोन्हीचे रिपोर्ट्स व्यवस्थित असतील तर ‘साधारणपणे व्यक्ती तंदुरुस्त आहे’ असा शेरा देता येतो. पण त्यात काही दोष निघाल्यास पुढील चाचण्या करण्याची दिशा मिळते.
या चाचण्यांची गरज प्रामुख्याने खालील प्रसंगी असते:
१. एखाद्याला संस्थेत नोकरीत रुजू करून घेण्यापूर्वी
२. खेळाडू आणि गिर्यारोहक जेव्हा मोठ्या स्पर्धा/ मोहिमांवर निघतात तेव्हा
३. काही ‘जीवन विमापत्र’ (policy) इ. काढताना आणि
४. कोणत्याही शस्त्रक्रियेपूर्वी.
सध्या बऱ्याच संस्थांमध्ये नोकरीत रुजू करून घेण्यापूर्वी वरील चाचण्यांव्यतिरिक्त ग्लुकोज-पातळीचाही आग्रह धरला जातो. ************************************
भाग ५ : https://www.maayboli.com/node/65663
(क्रमशः )
• अर्थात अशा एकूण
• अर्थात अशा एकूण जंतुसंसर्गापैकी फक्त पाच टक्के स्त्रियांना तो कर्करोग होतो. काही जनुकीय घटकांचा अप्रत्यक्ष संबंध आहे.
प्रमाण खूप मोठे आहे मग.
संसर्ग झालेल्या 100 पैकी पाच स्त्रियांना असा त्या 5% च अर्थ आहे का?
कधी ह्या टक्केवारी चा अर्थ वेगळा असतो म्हणून विचारले
आमच्या नातेवाईकांना यातल्या
आमच्या नातेवाईकांना यातल्या कोणत्याही शक्यता(प्रोसेस फूड/ओबेसिटी/मल्टिपल पार्टनर/डायबिटीस बीपी) नसतानाही सरव्हायकल कँसर झाला.आनुवंशिक नव्हता.(सदर व्यक्ती खूप प्रवास करायची आणि बरेच पब्लिक टॉयलेट वापरले जायचे.याचा काही संबंध असेल का?)
संसर्ग झालेल्या 100 पैकी पाच
संसर्ग झालेल्या 100 पैकी पाच स्त्रियांना असा त्या 5% च अर्थ आहे का
होय बरोबर.
साधारण चित्र :
1. १०० जणींना एचपीव्हीने संसर्ग
2. त्यातील 5ना पुढील तीन वर्षात कर्करोगपूर्व इजा
3. वरील (2) पैकी 20 टक्क्यांना पुढच्या पाच वर्षात प्रत्यक्ष हा कर्करोग.
4. वरील (3) पैकी 40% यांना पुढील 30 वर्षांमध्ये फोफावलेला कर्करोग.
(म्हणजे, ज्यांना रोग झाला असेल परंतु त्यांची कोणतीही तपासणी रोगनिदान आणि उपचार केले गेले नाहीत ,असे गृहीत धरून वरील क्रम)
पुढचे उत्तर उद्या ..
पुढचे उत्तर उद्या ..
माझी वेळ संपली
>>>>माझी वेळ संपली Happy
>>>>माझी वेळ संपली Happy
हाहाहा गुड नाईट!! विविध भारती टाईम आता
@ अनु
@ अनु
१. सदर व्यक्ती खूप प्रवास करायची आणि बरेच पब्लिक टॉयलेट वापरले जायचे.याचा काही संबंध असेल का?
>>
फक्त याच कारणामुळे हा जंतुसंसर्ग होतो असे नाही म्हणता येणार. तो जंतू सर्वव्यापी आहे. आपले हात, नखाखालची जागा, तोंड, त्वचा इथे सुद्धा तो आहे. शरीरावर कुठलीही बारीकशी जखम (abrasion) सापडली की त्यातून तो शिरणार.
नियमित लैंगिक जीवन जगणाऱ्या 80 टक्के स्त्रियांना या विषाणूच्या कुठल्या ना कुठल्या प्रकाराचा संसर्ग झालेलाच असतो. त्यातून हा जंतू चिवट स्वरूपाचा असून सामान्य जंतुनाशकांना दाद देत नाही. तो काही वैद्यकीय उपकरणांवर देखील टिकून राहतो.
हे वाक्य पहा ( https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7579832/) :
Routine hygiene measures are proven to be inefficient in preventing HPV transmission.
2. आमच्या नातेवाईकांना
2. आमच्या नातेवाईकांना यातल्या कोणत्याही शक्यता(प्रोसेस फूड/ओबेसिटी/मल्टिपल पार्टनर/डायबिटीस बीपी) नसतानाही सरव्हायकल कँसर झाला.
>>>
चांगला प्रश्न.
आता याव्यतिरिक्त या आजाराचा धोका वाढवणारे खालील घटक पण विचारात घ्यावे लागतात :
1. काही जीवनसत्त्वांचा दीर्घकालीन अभाव
2. आयुष्यातील पहिला लैंगिक संबंध अतिलवकरच्या वयात
3. गर्भनिरोधक गोळ्या सलग पाच वर्षाहून जास्त काळ घेणे
4. 21 वय ओलांडल्यानंतर दर तीन वर्षांनी नियमित cytology / HPV DNA test ची चाळणी चाचणी न करणे हे सुद्धा दखलपात्र.
5. याव्यतिरिक्त HLA genes असे काही घटक असतात
सविस्तर उत्तराबद्दल धन्यवाद
सविस्तर उत्तराबद्दल धन्यवाद डॉ.
क्र. 2 असू शकेल जुन्या काळी लवकरच लग्न व्हायची हे लक्षात घेता.
https://www.mskcc.org/news/5
https://www.mskcc.org/news/5-reasons-boys-and-young-men-need-hpv-vaccine...
धन्यवाद भरत. उपयुक्त दुवा.
धन्यवाद भरत. उपयुक्त दुवा.
......
जगभरात जानेवारी हा गर्भाशयमुख कर्करोग जागृती महिना म्हणून पाळला जातो. याचे यंदाचे बोधवाक्य असे आहे :
“Learn. Prevent. Screen”
आपण अशा काळात जन्माला आलो की
आपण अशा काळात जन्माला आलो की आज विज्ञान नी प्रचंड प्रगती केली आहे त्याचा फायदा सर्वांनी घेतला पाहिजे .
लसीकरण करून घेतले पाहिजे .
पण लस घेतली म्हणजे मी कसे पण वागायला मोकळा हा दुराचार सोडला पाहिजे .
वर उल्लेख केलेली लस
वर उल्लेख केलेली लस (CERVAVAC-HPV) भारतातील ‘सीरम’ कंपनीने उत्पादित केली असून बाजारात उपलब्ध झालेली आहे. येत्या सहा महिन्यात तिचा सरकारी लसीकरण मोहिमेमध्ये समावेश होणार आहे. .
(बातमी बहुतेक सर्वत्र प्रसिद्ध झालेली आहे)
BI rads 4b as रिपोर्ट आलाय
BI rads 4b as रिपोर्ट आलाय याचा अर्थ काय आहे
BI rads 4b
BI rads 4b
याचा अर्थ, संबंधित ठिकाणी कर्करोग असण्याची शक्यता मध्यम (10 ते 50 टक्के) असते.
यानंतर बायोप्सी करून निदान करण्यात येते.
1 kac veli 2ni Brest mde गाठ
1 kac veli 2ni Brest mde गाठ असू शकते का
असू.शकते.
असू.शकते.
कॅन्सर ची ?????
कॅन्सर ची ?????
कॅन्सर अथवा अन्य कारणे पण
कॅन्सर अथवा अन्य कारणे पण असतात.
रुग्ण तपासणीविना याहून अधिक लिहिता येणार नाही.
संबंधित डॉक्टरांचे मत महत्त्वाचे.
Pages