अनेक वर्षांपूर्वी माझं कोणाशीही पटत नसे. आख्ख्या जगाबरोबर माझे वैर होते. रीडींग बिटवीन द लाइन्स - मधे माझ्याइतके निष्णात अन्य कोणी नव्हते. रीडींग बिटवीन द लाइन्स - आपले विचार, आपले गुणावगुण आणि आपला त्या त्या क्षणीचा मूड अन्य व्यक्तीवरती आरोपित करणे. मी अमक्याला १०० वॅटेज स्मितहास्य दिले व तिने मला, ५० च वॅटेज स्मित परत केले म्हणजे सरळ सरळ अर्थ आहे की तिला मी आवडत नाही. सासूबाईंनी गणपती घराच्या अमक्या कोपर्यात ठेवला कारण तो उजव्या सोंडेचा आहे. बरोबर मुद्दाम ठेवला त्यांनी. त्यांना काय पडलीये माझं भलं करण्याची चिंता. अमकीने माझ्याकडे रोखून पाहीलं कारण सरळ आहे मत्सरी आहे ती. हे आणि असेच मोनोलॉग माझे स्वतःशी होत.
पुढे मूडस संतुलित झाले, एक छानसा पॉझ जीवनात आला. मेंदूत नवीनच न्युरॉन्स कदाचित तयार झाले (?) कदाचित पुनर्जिवीत झाले. आय हॅव्ह नो आयडिया काय झाले पण औषधांमुळे, माझी वृत्ती १८० कोनातून फिरली.
आणि मला कळू लागले - अरे तिची टक लावून पहाण्याची पद्धत तशी असेल, तिचे चेहरा रिलॅक्स असलेला तसाच दिसत असेल. तुला त्रासलेला वाटतो पण तसे नसेलही. ती वेगळी- तो वेगळा-तू वेगळी. तुमचं नाक सेम टू सेम आहे का नाही तर मग तुमचे सर्व विचार, आचार कसे अनुकूलच असतील? प्रत्येक व्यक्ती खरे तर एक, विविध रसायनांनी बनलेले मिश्रण असते. वी आर नथिंग बट अ बन्च ऑफ केमिकल्स. हे सर्व स्वभाव, षडरिपु, आवडी-निवडी हे आपल्या हातात फार थोड्या प्रमाणात आहेत. लहानपणापासून आपले एके प्रोग्रॅमिंग झालेले आहे. आपल्या संप्रेरकांची मोगलाई आहे. टायरनी आहे हार्मोन्स्ची.
आपण १००% परिपूर्ण आहोत का नाही पण आपण अन्य व्यक्तीकडून मात्र परिपूर्णतेची अपेक्षा ठेवतो. आपण स्वतः इव्हॉल्व्ह होतोय असे आपण मानतो & वी कट अ स्लॅक टु अवरसेल्वज. परंतु जेव्हा समोरच्या व्यक्तीची वेळ येते तेव्हा आपण समजतो की ती व्यक्ती फिनिश्ड प्रॉडक्ट आहे आणि पुढे इव्हॉल्व्ह ती होतच नाहीये. ती त्या क्षणी एक संपूर्ण आणि परिपूर्ण व्यक्तीमत्व आहे मात्र आपल्याशी ती व्यक्ती मुद्दाम खुनशीपणे वागते आहे. मत्सरयुक्त वागते आहे वगैरे वगैरे. पण तसे नसते ना. प्रतिक्षण, ती व्यक्तीही प्रगल्भ होत असते, शिकत असते, उत्क्रांतीच्या फूटपट्टीवरती पुढे सरकत असते.
साधी सकाळची कॉफी उशीरा झाली, झोप निट लागली नाही, कोणीतरी आपल्याशी वाईट वागले तर आपला दिवस खराब जाऊ शकतो नव्हे जातोच. झोप निट लागली नाही की मी खूप खाते, खूप खर्चही होतो त्या दिवशी - हे माझे नीरीक्षण आहे. पुढे एका संशोधनात ही बाजू वाचलेलीही आहे. मग अन्य व्यक्तींचे ही तसेच नसेल का? नसेल आज त्यांचा मूड. तब्येत बरी नसेल, त्यांच्या डोक्यावर काळजीची तलवार असेल, व्हाय नॉट कट अ स्लॅक टु देम? आपण का नाही समजाउन घेउ शकत?
माफ करा, हे बालिश वाटले असेल. पण मला माझ्या स्वभावात पडलेला हा मोठा फरक याबद्दल लिहायचे होते. कटिंग स्लॅक ज्याला मराठीत काय म्हणु आपण - समोरच्या व्यक्तीला सांभाळून घेणे. अगदी आपण स्वतःला सांभाळतो तितके हे मला महत्वाचे वाटते. अर्थात त्याचा अर्थ माझे खटके उडत नाहीत असे नाही. पण खटके उडले की वाईट वाटते खरे.
कटिंग स्लॅक
Submitted by सामो on 8 January, 2024 - 13:56
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>>>समोरचा व्यक्ती आपल्याला
>>>>>समोरचा व्यक्ती आपल्याला आवडणारी आहे का न आवडणारी आहे याप्रमाणेच आपण त्याच्या सर्व कृतीकडे त्या चष्म्यातूनच बघत राहतो.
होय नावडत्या व्यक्तीबद्दल मनात अकारण अढी ठेवुन वागतो. नावडतीचे मीठ अळणी.
>>>>>आणि अजून एक बायस असतो, तो म्हणजे जेव्हा आपण खूप घाबरलेलो असतो तेव्हा आपण आपल्याला हवा असलेला अर्थही बराच वेळा लावत असतो, मग कधी कधी आपल्या नावडत्या माणसाच्या वाईट कृतीचा सुद्धा आपल्या उपयोगाचा अर्थ आपण लावत असतो.
अर्रे हे माहीत नव्हते. उदाहरण आठवल्यास व शेर करण्याची इच्छा असल्यास प्लीज शेअर करावे.
अगदी भीतोच्याच सिच्युएशन
अगदी भीतीच्याच सिच्युएशन मध्ये असं नाही, पण आपल्याकडून चुकीची, अप्रिय गोष्ट घडलेली असताना ते मान्य करण्याची मानसिकता नसते, अशा वेळेला आपल्याला पाण्यात पाहणारा एखादा माणूस आपलं कौतुक करून जातो आणि तू केलंस ते अगदी बरोबर केलंस अशी भलावण करतो आणि अशा वेळेला आपण आपली सर्व सद् असद् विवेक गहाण ठेवून तो म्हणतो ते ग्राह्य धरून आपणच बरोबर असल्याचे धरून पुढे जातो..
होय पटले. अगदी अगदी. आप्ण
होय पटले. अगदी अगदी. आपण शॉर्ट कट घेतो. ईझी वे आऊट.
छान आणि प्रांजळ लेख सामो.
छान आणि प्रांजळ लेख सामो. ऋन्मे§ष चा प्रतिसादही पटला. आपल्या भारतीय तत्त्वज्ञानात ज्याला निरपेक्ष कर्म म्हणतात, तसेच तुला निरपेक्ष अभिव्यक्ती अपेक्षित आहे ना. इंटर्नलायझिंग मुळे अधिक त्रास होतो हे खरं आहे. विशेष म्हणजे त्याचा उपयोगही होत नाही.
प्राचीन प्रतिसादाबद्दल
प्राचीन प्रतिसादाबद्दल धन्यवाद. 'निरपेक्ष' पेक्षा प्रगल्भ गं. समोरच्याला समजून घेता आलं पाहीजे ना. दर वेळी शक्य नसतं पण प्रयत्न तरी झालाच पाहीजे.
स्वैर चिंतन आवडले.
स्वैर चिंतन आवडले.
एक आवडते वाक्य इथे लिहिण्याचा मोह आवरत नाहीय :
When you can be anything you want, choose to be “Kind” - to the world and to yourself.
आदर्शवादी आणि छान वाक्य
आदर्शवादी आणि छान वाक्य अनिंद्य. इथे दिल्याबद्दल आभार.
वाक्य म्हणून छान आहे, अनिंद्य
वाक्य म्हणून छान आहे, अनिंद्य.
पण कधीकधी, being kind to the world and to yourself... यांत परस्पर विरोध असू शकतो.
कधीकधी ? नेहेमीच
कधीकधी ?
नेहेमीच
(No subject)
प्रांजळ लेख...!
प्रांजळ लेख...!
प्रतिसादही छान..!
रुपाली आभारी आहे.
रुपाली आभारी आहे.
लेख आवडला सामो.वर/ मागच्या
लेख आवडला सामो. वर/ मागच्या पानावर कोणीतरी म्हंटल्याप्रमाणे ओव्हरथिंकींग फार वाईट. जे घडलंच नाही ते "जर -तर" च्या खतपाण्याने असं काही वाढतं कि त्यात आपणच गुरफटतो लटकतो,अडकतो. विसरूनच जातो कि हे आपल्या " जर असं घडलं तर.... " वर सूरू झालंय. मी स्वतः थोडं ओव्हरथिंकींग करते. माझा लेक मला यावरून ओरडत असतो. कुठल्याही गोष्टीची पहिली रिॲक्शन भितीच कशी असते तूझी ? असं म्हणतो मला. तो अतिशयोक्ती करतो जरा. पण मी करते overthinking. आता कमी झालंय.
हाहाहा.
हाहाहा.
धनुडी, मी सुद्धा महाघाबरट आहे. 'मी हादरलेच" - हे माझे आवडीचे वाक्य. उदा - "अमुक अमुक झले होय मग ठीक आहे मला वाटले, तमुक झाले व मी हादरलेच."
नवरा म्हणतो - "आपण हादरायचा चान्स कधी सोडायचा नाही."
If overthinkinging was a
If overthinkinging was a sport
I would be champion
@किल्ली
@किल्ली
किल्ली... सेम पिंच गं
किल्ली... सेम पिंच गं
मलाच कधीकधी माझ्या मनाचा कंटाळा येतो इतकं विचार करून बेणं थकत कसं नाही
overthinking.>>> बर्याच जणी
overthinking.>>> बर्याच जणी स्वार आहेत ह्या घोड्या वर मी पण असते बरेच वेळा. ज्या किंचित ओळखी वाल्या लोकांना माझे नाव आठवायला एखादा सेकंद जास्त लागेल, अशांबद्दल ही मी कित्तेक मिनिटे ऑफिस कम्युट करत असताना विचार करण्यात वाया घालवली आहेत, हे सांगताना लाज पण वाटत नाही कारण मन आणि विचार कन्ट्रोल मधे कुठे असतात ते स्वैर पणे येतात, जातात.
पण थिंक अलाऊड केले की नवरा बोलून दाखवतो, ह्याच्या पाव पट पण ती/तो तुझ्या/आपल्या बद्दल विचार करत नसेल..ऐकून खरोखर किती वेळ वाया घालवला आपण असा फील येतो .
ऐकून खरोखर किती वेळ वाया
ऐकून खरोखर किती वेळ वाया घालवला आपण असा फील येतो ...... +१.
If overthinkinging was a
If overthinkinging was a sport
I would be champion
किल्ली
Pages