चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेफी वर Society of the snow पाहिला , सत्यकथेवर आधारित आहे .
उरुग्वे च्या रग्बी टीम चे ४५ जण असलेले विमान Andy's पर्वत रांगेत कोसळते . अपघातात बरेचसे जण मरतात, शिल्लक राहिलेले जगण्यासाठी काय काय दिव्य पार पाडतात , जास्त सांगत नाहीं, एकदा पाहण्यासारखा सिनेमा आहे ....

ही सत्यकथा आहे त्यावरच ना
Alive नावाचे पुस्तक आहे त्याचा रवींद्र गुर्जर यांनी ते सत्तर दिवस नावाने अनुवाद केलेला

फार भारी आहे ते पुस्तक
बघायला हवा हा सिनेमा आता

Alive नावाचे पुस्तक आहे त्याचा रवींद्र गुर्जर यांनी ते सत्तर दिवस नावाने अनुवाद केलेला >> त्या वेळी त्यांची बरीच पुस्तके आलेली होती अनुवादित. छान आहे पुस्तक. गाजलेल्या हेरकथांवरचे पुस्तक त्यांचेच होते का ?

Asmita practically dazzling. Do take up serious writing.
Wonderful discussion on the movie
+786

पार्किंग बघायला हवा..
इतरत्र देखील चांगले ऐकले आहे त्याबद्दल.

नेफी वर Society of the snow पाहिला>>>>> मी पण कालच पाहिला हा सिनेमा...
सत्तर दिवस वाचलेले..डिस्टर्बिंग आहे पुस्तक.. सगळं माहीत असल्याने सिनेमा डिस्टर्बिंग वाटला नाही पण नवर्याने डायरेक्ट सिनेमा पाहिला आणि खूपच डिस्टर्बिंग वाटला त्याला...

Asmita practically dazzling. Do take up serious writing. >>> +१

Alive नावाचे पुस्तक आहे त्याचा रवींद्र गुर्जर यांनी ते सत्तर दिवस नावाने अनुवाद केलेला >>> याच नावाने आलेला पिक्चरही होता.
https://en.wikipedia.org/wiki/Alive_(1993_film)

सत्तर दिवस वाचलेले..डिस्टर्बिंग आहे पुस्तक..
>>>>>
मी सुद्धा वाचलेले हे.. सातवी आठवीत असताना.. वाचन तेव्हाच व्हायचे. ज्या मित्राने सुचवलेले आणि दिलेले त्यानेही असेच म्हटलेले. पण का माहीत मला नव्हते डिस्टर्बिंग वाटले.. मात्र रोचक वाटलेले. फार आवडलेले.

सत्तर दिवस वाचलेले..डिस्टर्बिंग आहे पुस्तक.. सगळं माहीत असल्याने सिनेमा डिस्टर्बिंग वाटला नाही पण नवर्याने डायरेक्ट सिनेमा पाहिला आणि खूपच डिस्टर्बिंग वाटला त्याला...>>>>>>
म्हणूनच मी एकदा पाहण्यासारखा म्हणालो Happy
का कोणास ठाऊक सिनेमा पकड घेत नाही हे नक्की .
बऱ्याचशा दृश्यात अंधार दाखवला आहे , पीडितांचे एकमेकाशी संवाद जास्तच दाखवलेत .
हा सिनेमा येण्या अगोदर थोडेसे वाचले होते , म्हणून पाहायला घेतला होता .
या पेक्षा नेफिवरील against the ice बरा वाटला होता .
डेन्मार्क आणि उसगाव त्या greenland वर दावा करण्यासाठी आपापल्या शोध टीमला त्या बर्फाळ प्रदेशात पाठवतात , टीम च्या खडतर प्रयत्न , स्लेज गाडी च्या कुत्र्यांचे हाल , रानटी अस्वले !
जबरदस्त परिणामकारक चित्रण , नक्की सर्वांनी पाहा Happy

Hi Papa बघितला.
सुरुवातीला एक आजारी मुलगी , ,single dad , मुलीला कोण्या अनोळखी बाई सोबत मैत्री करावीशी वाटणं , त्या बाईला ह्या चिमणीबद्दल प्रेम उफाळून येणं. असा typical cinema वाटत होता.
पण इथे छोटासा twist आहे.
Overall ok ok वाटला.

Hotstar वर falimy नावाचा चित्रपट पाहिला.
मल्याळम आहे, हिंदी डब पाहिला.
एका फॅमिलीत आई वडील2 मुले आणि एक आजोबा आहेत.
आजोबांना काशीला जायचं वेड आहे.
फॅमिली एकट्याला जाउ देणार नाही म्हणून वेळोवेळी संधी मिळेल तसे पळून जाउन रेल्वेत बसतात आणि कोण ना कोण त्यांना परत आणतंय.
फॅमिली मधील वडील काही काम न करता सिगारेटी ओढणे, दिवसभर TV वर TP करणे, जमेल तसे टोमणे मारणे ऐकणे भांडण करणे , मित्र चाको ला जमेल तसे बोलवून बाहेर दारू आणि नॉनव्हेज खाऊन पार्टी करणे हे सुरू ठेवत आहेत
धाकटा मुलगा कॉलेज गोइंग आहे आणि फार जबाबदारी जाणीव नसलेला
थोरला सगळ्या ओढताणीत डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करून पैसे कमवत आहे आणि परिस्थिती ची जाणीव ठेवून जबाबदारी उचलण्याचा प्रयत्न करतोय.
आई देखील जबाबदारीची जाणीव ठेवून बाहेर काम करून पैसे कमवत रगाडा ओढायची कसरत करत आहे.
ह्यांच्यावर कर्ज आहे ते थकलं आहे.
थोरल्याला लग्नासाठी मागे लागलेत.
तर अश्या ह्या अतरंगी फॅमिली ची कथा , त्यात शेजारी , त्यांचे मित्र पुढे घडत गेलेले घटनाक्रम, त्यांची काशी यात्रा , त्यात आलेली विघ्ने वै वै
सिम्पल चित्रपट. काहीवेळा खळाळून हसवतो.
One time watch वाटला मला. विशेषतः टिपिकल साऊथ सारखा भडकपणा नाहीये. Acting सर्वच छान.

कथानक हे सहसा आयुष्यातल्या शिखरावर किंवा गर्तेत असणाऱ्या बिंदूच्या आसपासचे असते, मधली 'फ्लॅट लाईन' नसते.
अपूर्णतेची गोडी !
>>>> अस्मिता पटलंच.

पण जी लाखो मुलेमुली आयुष्यातली अनेक वर्षे या मृगजळामागे धावतात व वय निघून गेल्यावर धोबी का कुत्ता बनतात त्यांच्यावर सिनेमे निघत नाहीत.
>>> मुळात किती मुलांनी स्वतःची बलस्थानं/मर्यादा/ऍप्टिट्यूड समजून हे केलेले असते का? किती जणांकडे आवश्यक तो शैक्षणिक संय्यम व शिस्त नी आर्थिक/सामाजिक पार्शवभूमी असते? बाकीच्यांसाठी बऱ्याचदा हा आफ्टर थॉट असतो. युपी बिहार मध्ये सरकारी नोकरी बेस्ट हा विचार पुढे आला. मग त्याची तयारी करणे यालाही वलय प्राप्त झाले. बरं पोरगं अभ्यासाचं करू म्हणतंय, वाया तर नाही गेलंय ना शिवाय झालंच यूपीएससी पास तर घरातल्यांचाही रौब वाढतो. त्यामुळे पालकही मज्जाव करत नाहीत.
आता याचा उत्कर्षबिंदू म्हणजे अखेर पोरगं ती परीक्षा पास होणे. त्यावरच निघणार चित्रपट. याविरुद्ध टोकाचा बिंदू एखाद्याच्या आयुष्यात येऊच शकतो. पण ते तो किंवा कोणीतरी सांगायला जात नाही (त्याच्याकडे आता तेवढा वेळ/एनर्जी राहिलेली नसते आणि स्वतःच्या फैल्युअरची जाहीर कबुली द्यायची मानसिकता किती जणात असते) तोवर त्यावर कथा/चित्रपट/बातम्या कश्या येणार?

असो, चिकवा सोडून मी बाकिचंच दळण घातलंय. पाहिला नाही अजून पण एवढी रेको मिळाल्यावर नक्कीच पाहणार.
कुठे तरी का होईना काहीतरी चांगले घडतंय आणि ते लोकांना आवडतंय हेच किती मोलाचे आहे.

काही जुने गाजलेले किंवा ऑफबीट वाटलेले पण पहायचे राहिलेले असे 2 चित्रपट पाहिले.

Dirty picture विद्या बालन
जुना असल्याने storyline माहितीच असेल सर्वांना.
सिल्क स्मिताच्या आयुष्यावर आधारित चित्रपट.
विद्या बालन , नसिरुद्दीन शहा, आणि सर्वांची acting छानच.

अय्यारी
नीरज पांडे दिग्दर्शक
मनोज वाजपेयी सिद्धार्थ मल्होत्रा अनुपम खेर वै
सुरवात ते मध्यंतर पर्यत ग्राफ चांगला उंचावलाय. शेवटाकडे येताना फुस्स झाला.
बरेच लूज एन्ड आणि लूप होल्स.

'बाकी शून्य ' वाचले होते त्यामध्ये लिहिले होते जे स्पर्धा परीक्ष्यांमध्ये पास होत नाहीत
आयुष्यात काही ना काही तरी करतातच जर प्रयत्न प्रामाणिक पने केले असतील तर

१२ वी फेल. पाहु शकले नाही. अनदर रॅगज टू रिचेस कहाणी असे वाटले. एकंदर कळकटपणा, स्ट्रगल पहावत नाही, ॲलर्जी आहे. माझ्या मर्यादा.

इथे का कुठे\वाचून थ्री ऑफ अस पाहिला. अतिशय रटाळ आणि कंटाळवाणा वाटला.. खूप म्हणजे खूपच संथ घेतलाय.
शेफाली चा वन्स अगेन २०१८ चा चित्रपट खूप सुंदर होता, अ‍ॅडल्ट रीलेशनशिप वर भाष्य करणारा होता आणि त्यात शेफाली नितांत सुंदर दिसली आहे.
थ्री ऑफ अस कडून जरा तश्या अपेक्षा होत्या केमिस्ट्री च्या, कारण मेल लीड जबरदस्त अ‍ॅक्टर आहे (जयदीप अहलुवालिया)
मला मधेच डुलकी पण लागली होती Lol

हे सिनामिका पाहिला युट्युब वर, मस्त आहे. मला जरा शी साथिया ची वाईब आली.
सगळे स्टार्स मस्त नॅचरल काम करतात. सलमान डुलकर (हे नाव घेताना आम्ही डोलकरं डोलकरं ह्या प्रसिद्ध कोळी गीताची आठवण होते;) ) खूप हँड्सम दिसतो आणि कन्विंसिंग काम करतो. त्याचा बडबडा आणि तरी भाऊक हळवा स्वभाव खूप छान पोहोचतो दर्शकांपर्यंत Happy वेगळीच स्टोरी आहे, जरा साउथ बटबटीत पणा कडे काणाडोळा करा आणि बघा. मला आदिती राव, काजल, सलमान सर्वांची कामं आवडली..

१२ फेल पाहिला हुलू वर. मस्त आहे. खूप आवडला. विक्रांत मेसी मिर्झापूरपासूनच आवडत आहे. इथेही त्याचे काम मस्त आहे.

ज्या परिस्थितीत त्याने एवढी मोठी महत्त्वाकांक्षा ठेवली व जिद्दीने आणि निष्ठेने ती पूर्ण केली हे कुठल्याही क्षेत्रात असणाऱ्यांसाठी प्रेरणादायीच ठरते. >>> +१

हा पिक्चर आवडणार्‍यांना युपीएससी सिस्टीमबद्दल काहीतरी अप्रूप वाटून ते हरखून गेले व म्हणून तो पिक्चर आवडला असे अजिबात नाही. नायकाचा स्ट्रगल व एकदा हरल्यावर पुन्हा जिद्दीने उठून "रिस्टार्ट" करणे (पिक्चरमधलाच शब्द) याचे चित्रीकरण फार सुरेख आहे. म्हणून तो बघायला मस्त वाटतो. युपीएससी सिस्टीमबद्दल सर्वांगीण भाष्य करणे हा या पिक्चरचा विषय नसावा. हीच प्रोसेस आयआयटी किंवा आयआयएम मधल्या यशाबद्दल दाखवली असती (व नायकाच्या/नायिकेच्या आयुष्यातील एखाद्या वैयक्तिक अपमानाचा संबंध बरोबर जोडला असता) तरी तितकीच आवडली असती.

पिक्चरमधे नंतर पुढे बॅकग्राउण्डला एक गाणे कोणीतरी गुणगुणत असते किंवा त्याची ट्यून वाजते. ही चाल कोठेतरी ऐकलेली आहे असे सारखे वाटत होते. नंतर लक्षात आले की ती चाल "कुछ ना कहो" गाण्यातील "बस एक मै हूँ, बस एक तुम हो" ओळीची चाल आहे.

नायकाचा स्ट्रगल व एकदा हरल्यावर पुन्हा जिद्दीने उठून "रिस्टार्ट" करणे >>> करेक्ट. असेच असावे असे वाटले होते. पण जोवर चित्रपट बघत नाही तोपर्यंत तोंडावर बोट.

मी काल बघीतला.
एकंदरीत आवडला.
ईथे या चित्रपटाबद्दल आधी वाचले नसते आणि सहज सुरु केला असता तर पहिल्या दहा मिनिटात मी सोडुन दिला असता. "चिटींग करना छोड दे" या वाक्यापासुन पुढे एंगेजिंग वाटला मला. पुढे सगळेच लोक (बॅग चोरणारी, क्लासेस चालवणारी एक लबाड वगळुन) चांगले दाखवलेत हे जरा खटकले. आजी त्याला साठवलेले पैसे दाखवते तो प्रसंग (तिचे हावभाव) विशेष आवडलेल्या प्रसंगांपैकी एक.

<<नंतर लक्षात आले की ती चाल "कुछ ना कहो" गाण्यातील "बस एक मै हूँ, बस एक तुम हो" ओळीची चाल आहे.>> हो, आठवले. माझ्या लक्षात आले होते बघताना.

फा आणि माझेमन छान पोस्टी. ते गाणं तेव्हा आवडलं होतं पण चाल आठवली नव्हती.

युपीएससी सिस्टीमबद्दल सर्वांगीण भाष्य करणे हा या पिक्चरचा विषय नसावा.>>>+१
Happy ही मनोजची गोष्ट आहे, युपीएससीची नव्हे.

माझेमन, विपू केली आहे. Happy

टायगर ३ धमाल विनोदी (दुसर्‍या प्रकारात) आहे. एव्हढे खतरनाक मनोरंजन सोडून 12 वी नापास काय बघणार.

एक गडी हेलिकॉप्टर पकडायला घरांच्या गच्चीवरून मोटरसायकल चालवतो. तिथून डोंगरावर. शिखरावरून खाली डाईव्ह आणि चॉपरच्या ब्लेडसमधून अलगद खालच्या बारला लटकतोय...

दांडक्याने मारल्याचा राग येत नाही पण चेहऱ्यावरचे ना सी फडके हटवल्याने माथे सरकते आणि सगळे तालिबानी खलास.

स्पॉयलर अलर्ट
तो सलमान दगडी खान असतो.

युपीएससी सिस्टीमबद्दल सर्वांगीण भाष्य करणे हा या पिक्चरचा विषय नसावा. >> करेक्ट , मलाही तसेच वाटले. मला सिनेमा यूपिएससीबद्दल वाटला नाही. यूपीएससी हीच एक यशाची व्याख्या किम्वा अल्टिमेट मोठी अचीव्हमेन्ट आहे असेही म्हणायचे असावेसे वाटले नाही. मला सिनेमा आवडला तो त्याचा स्ट्रगल आणि दुर्दम्य आशावाद बघून. इतकी प्रचंड प्रतिकूल परिस्थिती, वारंवार अपयश येऊनही गिव्ह अप न करता पुन्हा नेटाने उभे राहण्याची जिद्द, ती पॉझिटिविटी मला फार इन्स्पायरिंग वाटली. नाहीतर कित्येक जण याहून कितीतरी जास्त प्रिविलेज्ड असतात ( त्यात मी, माझ्या आसपासचे लोकही आले ) पण थोडासा स्ट्रगल किंवा अपयश येताच परिस्थिती, सिस्टिम, नशीब इ. ला दोष देऊन मोकळे होतात.
बाकी संप्रति यांचा मुद्दाही बरोबर आहे की आयएएस किंवा आयपीएस झाल्यानंतर काय, त्यानंतरचा स्ट्रगल , कसे सिस्टीम बदलायचा प्रयत्न केला याच्या स्टोरीज फार येत नाहीत. पण त्या मुद्द्याने या सिनेमाचे कौतुक कमी झाले नाही Happy

चेहऱ्यावरचे ना सी फडके >>> Lol "ना सी" फडके म्हणजे त्याचे डोळे झाकलेले असतात का? Happy

बाकी संप्रति यांचा मुद्दाही बरोबर आहे की आयएएस किंवा आयपीएस झाल्यानंतर काय, त्यानंतरचा स्ट्रगल , कसे सिस्टीम बदलायचा प्रयत्न केला याच्या स्टोरीज फार येत नाहीत. >> >हो ते खरे आहे. पुण्यात सदाशिव पेठेत गेल्या काही वर्षांत यामुळे खूप फरक पडला आहे वगैरे फेबुवर वाचले. पण याबद्दल, किंवा इतर शहरातील अशाच एरियाज बद्दल डेफिनिटिव्ह वर्णन करणारे लेख किंवा शॉर्ट फिल्म्स वगैरे नाहीत.

Pages