Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58
आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गेल्या वर्षात ओटीटीवर
गेल्या वर्षात ओटीटीवर पंधराच्या आतच सिनेमे पाहिले.
या वर्षी ७३० पहायचा संकल्प आहे. पैसे वाया जातात.
रआ क्वांटीटी वर नाही क्वालिटी
रआ क्वांटीटी वर नाही क्वालिटी वर भर द्या आणि पिसं काढत रहा
दस्वि चान्ग्ला आहे
दस्वि चान्ग्ला आहे
र.आ. एक दिवस ब्रेक घेणार का?
र.आ. एक दिवस ब्रेक घेणार का?
हे लीप इयर आहे 
दोन सिनेमांच्या मधे ब्रेक .
दोन सिनेमांच्या मधे ब्रेक . एकूण २४ तास !
नेफ्लिवर जोकर बघितला.
नेफ्लिवर जोकर बघितला. काहीतरीच सॅड, डिस्टर्बिंग वाटला. वाईट पण वाटलं त्या कॅरेक्टरचं. नाव माहित नाही पण त्याने काम जबरी च केलंय.
हॉटस्टारवर केट विन्स्लेटचा mountain between us बघितला. प्रेडिक्टेबल लव स्टोरी, थोडे अ त र्क्य वाटणारे सिन्स पण आहेत. तरी बघितला.
अख्खा पिक्चरभर नुसता बर्फच बर्फ आणि थंडी.
प्राईमवर Ben is back बघितला ज्युलिया रॉबर्ट्सचा. एक आई आणि ड्रग अॅडिक्शन मधून नुकत्याच बाहेर आलेल्या मुलाचे भावबंध, खूप सुरेख काम केलंय ज्युलिया रॉबर्ट्स ने.
हर्पा, सजनी शिंदे इथं आणा नं,
अंजली, तू 'गुड पर्सन'वर फार छान लिहिले होतेस. तो नोंदवला आहे.
कॉमी, 'मिडसॉमर' (एकदाचा) बघितला, फारच जबरदस्त आहे. काम अप्रतिम आहे फ्लॉरेन्सचं. अंगावर येतं.
अंजली, तू 'गुड पर्सन'वर फार
हर्पा, सजनी शिंदे वर मला बरोबर खाली हसायचं होतं.
आता हसताच येत नाहीये. मस्त पोस्ट . सुभानल्ला फारच धमाल. 
सिनेमा विशेष नाही पण अगदीच पॅ नाही.
सुभा तुपारेतल्या सारखा वाटला. निम्रत कौरला झेंडे सारखं बोलत होता आणि व्याहीविहिणीला इशा सारखं. सजनी नाव मलाही झेपलं नाही आणि स्पष्टिकरण तर एकदम लेम वाटलं. सुभा राजकारणात असल्यासारखं वागत होता पण प्रत्यक्षात नट होता. कोण विचारतं मराठी नाटकात काम करणाऱ्या नटाला..पण उगाच रुबाब. भाग्यश्री मेणचट आहे, दिसतेही मेणचट आणि काम तर यूट्यूबवर रेसिपी दाखवणाऱ्या बाईपेक्षाही साधारण. हिलाच गच्चीवरून ढकलून द्यायला हवे होते. रहस्य आणि उकल फारच बोअर. सजनी तर बोलण्यापेक्षा रडली जास्त. कायम वॅ वॅ केल्यानं तिचं दुःख पराकोटीचं वगैरे कधीच झालं नाही किंवा मला वाटलं नाही. मला सिनेमात कोण आहे वगैरे काही माहिती नव्हते, एकदम मराठी सिनेमा बघितल्यासारखं झालं. निम्रत आणि चिन्मय एका हॉटेलात जेवतात तेव्हा मेनू वर 'सूपशास्त्र' लिहिलेलं वाचून माबोकर 'चिनूक्स' यांची आठवण झाली.
निम्रत कौरला झेंडे सारखं बोलत
निम्रत कौरला झेंडे सारखं बोलत होता >>
जेवतात तेव्हा मेनू वर 'सूपशास्त्र' लिहिलेलं वाचून माबोकर 'चिनूक्स' यांची आठवण झाली. >> हो हो, अगदी! हे डोक्यात आलं होतं आणि नंतर निसटून गेलं
नेफ्लिवर जोकर बघितला.
नेफ्लिवर जोकर बघितला. काहीतरीच सॅड, डिस्टर्बिंग वाटला. वाईट पण वाटलं त्या कॅरेक्टरचं. नाव माहित नाही पण त्याने काम जबरी च केलंय.
>>
अक्शय कुमार
हिंदी नाही हो.. इंग्लिश जोकर
हिंदी नाही हो.. इंग्लिश जोकर
नेटफ्लिक्सवर leave the world behind बघितला. सस्पेन्स चांगला ठेवलाय पण संथ वाटला फार. बर्याचदा बोला बाबा आता एकदाचे लवकर काय ते असं वाटलं. सायबर अॅटेक्स, हॅकिंग विषय जरा डोक्यावरून जातात माझ्या.
सजनी शिंदे अज्जिबात आव्वडला नाही. ती सजनीच किती एकसूरी आणि तोंडाची विचित्र हालचाल करून इरिटेटींग बोलते. काहीच्या काही विषय, काहीच्या काही मांडणी. सगळे चांगले मराठी कलाकार वाया घालवलेत.
वरती परफेक्ट लिहिलंय सुभा राजकारणी जास्त नट कमी वाटतोय. नक्की काय करायचंय त्याचाच घोळ झालाय. निम्रतचं काम आवडलं फक्त.
नेटफ्लिक्सवर leave the world
नेटफ्लिक्सवर leave the world behind बघितला. सस्पेन्स चांगला ठेवलाय पण संथ वाटला फार. बर्याचदा बोला बाबा आता एकदाचे लवकर काय ते असं वाटलं.>>>>> +100
मी पण बघितला पण काय लिहावा रिव्ह्यू कळलं नाही..
सुभाचा "मी काय भारी काम करतो
सुभाचा "मी काय भारी काम करतो ते बघा" हा आवेश सगळिकडे दिसुन येतो..जे इरिटेटिन्ग आहे.
सुभाव्यतिरिक्त अन्य कलाकार पण
सुभाव्यतिरिक्त अन्य कलाकार पण आहेत कि ..
सजनी बद्दल पूर्ण सहमत. हल्ली
सजनी बद्दल पूर्ण सहमत. हल्ली सुभाच्या सगळ्या भूमिकांमध्ये एकतर लोकमान्य टिळकांचा किंवा विक्रांत सरंजामेचा आवेश असतो.
सजनीच्या नटीत आणि गोष्टीत काही दम नाही, हे लक्षात आल्यामुळे कदाचित ह्या सगळया फौजेला घेतले असावे. निदान त्या नावांमुळे मुळे का होईना आपल्यासारख्या थोड्या लोकांनी सिनेमा पाहिला. मांडलेकरला पण वाया घालवले आहे. निमरत कौरला का घेतले असावे, ते ही कळले नाही. उलट तिच्या हिंदी मुळे ह्यांची पुणेरी हिंदी ठळक उठून दिसली.
मला जरा हलके फुलके comedy
मला जरा हलके फुलके comedy विनोदी सिनेमे सुचवा बरं.
इन्वेजन ऑफ बॉडी स्नॅचर्स
इन्वेजन ऑफ बॉडी स्नॅचर्स बघितला. हा १९७८ सालचा सिनेमा आहे, मूळ १९५६ सालच्या ह्याच नावाच्या सिनेमाचा रिमेक. हेल्थ डिपार्टमेंट मध्ये काम करणाऱ्या एका बाईंना अचानक आपला नवरा वेगळाच वागतो आहे असे वाटू लागते. इतका वेगळा की हा आपला नवरा नाहीच ह्याची तिला खात्री पटते. ती हेल्थ डिपार्टमेंट मधल्या तिच्या मित्राला ह्याबद्दल सांगते, आणि तो तिला एका सायकॉलॉजिस्टकडे घेऊन जातो. तिथे तिला समजते की अशी इतरही लोकं असतात ज्यांना आपल्या जवळचे एकदम विचित्र झालेत असे वाटत असते. आणि ही सगळी "वेगळी" लोकं अगदी संशयास्पद असतात. ही खरेतर अनोळखी असलेली लोकं एकमेकांशी बोलत असतात, त्यांचे काहीतरी संगनमत चालले असते. प्राईम व्हिडिओ वर आहे.
भारी सिनेमा आहे. सुरुवातीच्या भागात पॅरानॉइया मस्त दाखवला आहे. रोजमेरिज बेबी हा सुद्धा असाच सिनेमा होता ज्यात मुख्य पात्राला काहीतरी भयंकर कट चालला आहे असा सुगावा लागला असतो पण इतरांच्या वागणुकीमुळे ते पात्र आणि प्रेक्षक म्हणून आपणही शेवटपर्यंत शंकाग्रस्त राहतो की हा अतार्किक पॅरानॉइया आहे की खरेच काही गंभीर कारस्थान आहे.
@किल्ली, कोणत्या भाषेतले
@किल्ली, कोणत्या भाषेतले सुचवू, म्हणजे सबटायटल्स वाले चालतील का? कि हिंदीच?
कोणतेही चालतील? Subtitles
कोणतेही चालतील? Subtitles हवेत फक्त
Dirty Rotten Scoundrals त्या
Dirty Rotten Scoundrals त्या वेळी विनोदी वाटला होता. बघितला नसेल तर हा आहे.
Minal murali मल्याळम हिंदीत
Minal murali मल्याळम हिंदीत उपलब्ध नेटफ्लिक्स वर..मस्त सिनेमा..चार वेळा बघितला..
Maaviran तमिळ हिंदीत उपलब्ध प्राईम.. दोन वेळा पाहिला..
Trishanku मल्याळम सबटायटल्स नेटफ्लिक्स.. मस्त आहे हा पण..
Njan prakashan मल्याळम नेटफ्लिक्स सबटायटल्स
अजून देते थांब
नेटफ्लिक्स नाहीये, hotstar
नेटफ्लिक्स नाहीये, hotstar आणि आणि youtube.. जुने सुद्धा चालतील
किल्ली
किल्ली
मुलांसोबत बघायचे असतील तर खूप अनिमेटेड आहेत.
स्टुअर्ट लिटल 2 ते 3 असतील,
कुत्रा मांजर ह्यावर आधारित देखील खूप पण आता नावं आठवत नाहीयेत.
हिंदीत डब असतात, आणि फंनी डायलॉग, जरा हिरोगीरी , थोडे फॅमिली बॉंडिंग वै
मजा येते
स्टुअर्ट लिटल आम्हा मोठ्यानाही आवडलेला
आताच एक पाहिला.जुन्या
आताच एक पाहिला.जुन्या खजिन्यातला.
ह्या प्रकारातले सगळे आवडलेले आहेत.. गोलमाल पासून छोटी सी बात पर्यंत.
...
किसी से ना कहना
नितांत सुंदर चित्रपट
किसी से ना कहना >> आवड
किसी से ना कहना >> आवड कळल्याशिवाय चित्रपट सुचवता येत नाही.
हा जॉनर आवडत असेल तर खाली काही सुचवत आहे. पाहिलेले नसतील तर ..
१. झूठी
२. खूबसूरत (रेखा)
३. बीवी और मकान
४. दामाद
५. छोटीसी बात
६. पती , पत्नी और वो
७. नौकर
८. कथा
९. चष्मेबद्दूर
१०. रंगबिरंगी
११. शौकीन
१२. नर्म गरम
१३. खेल
बालिका बधू,
आचार्यांच्या यादीत भर - गोलमाल
-------------------------
बालिका बधू,
जिस देशमे गंगा बहती है,
मुझे जीने दो
आन
गाईड
आचार्यांच्या लिस्टीला +1
आचार्यांच्या लिस्टीला +1 त्यात अजून बातों बातों मे, अंगूर आणि प्यार किये जा पण घाला
चमेली कि शादी
चमेली कि शादी
वरचे सगळे मस्त आहेत पाहिले
वरचे सगळे मस्त आहेत पाहिले आहेत, repeat value आहे ह्या list ला.
कथा नाही पाहिला फक्त.
गोविंदा चे सिनेमे पण आवडतात मला. No १ वाले, तेही खूप वेळा पाहिले
भेजा फ्राय (पहिला) आणि खोसला
भेजा फ्राय (पहिला) आणि खोसला का घोसला
Pages