हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol Lol

हैदराबादी अब्बा : बेटा लस्सी पीता क्या रे? बेटा : नक्को मेरे कू >> हे जॉनी जॉनी येस पप्पाचं हैदराबादी व्हर्जन वाटतं.

…. जॉनी जॉनी येस पप्पाचं हैदराबादी व्हर्जन ….

हो, फक्त इथे यस अम्मी हवे, अम्मा बेगम जोरात हैत ! Lol

अम्मा बेगम जोरात हैत ! >> द अम्मा बेगमः किस्मत से घर में बैठके मिल रा सो तेरेकु नखरे हो रे इफ्लास. अगली बार गाय को पूच. और मार्किटसे गन्ना लेके खा.

इफ्लास Happy

इनके नखरे देखरै ? केला खाते तो गालॉं छिलरै कैते ये लोगॉं Lol

केला खाते तो गालॉं छिलरै कैते ये लोगॉं >>> Lol
आंबट गोड, म्हणजे मऊ केळ खातानाही गाल सोलवटले म्हणून किरकिर करतील इतके नखरे यांचे. Happy

नजाकतीचे दुसरे उदाहरण :

बेगम सासॉं लेते तो नाक के बालाँ जल जारै उनके Proud

( म्हणजे इतके नाजूक की श्वास घेण्याच्या उष्णतेने नाकाचे केस जळतात म्हणे)

गालाँ : gaalOM
बालाँ : baalOM

अम्मी बेगमकू पसंद कियेवास्ते सबकू थँक्यू है. अब और एक किस्सा सुनाताऊं :

फजलू : अम्मी ये लव मैरिज करे तो घरवाले नाराज़ होते क्या जी ?

अम्मी : लव मैरिज ? तू कर रा ? क्या सुनरई क्या की मैं. कौन सी चुडैल के चक्कर में फँस गया रे हौले ? जरुर वोईच डायन तेरे कू बोली हुंगी ऐसी बातॉं… ये आजकल की लड़कियॉं ज़हर की पुड़िया रैते देखो. इनों बस अच्छा लडका देख को फँसा देते फजलू. … बच के रैना तुम. इनों अव्वल दर्जे के मक्कार लड़कीयां रैते. न तहज़ीब ना ख़ानदान का पता रैता … बोलो उत्ता कमीच है

फजलू : पर अम्मी, अब्बू बताए के तुम दोनों वालिदैन की नाफ़रमानी करको लव मैरिज किए बोल के Lol

(वालिदैन = आईवडील, नाफ़रमानी करके = आदेश न जुमानता)

Rofl

लव्ह मॅरेज संवाद Lol

अम्मी बेगमकू पसंद कियेवास्ते >>> इथे पसंद म्हणजे किस्से पसंद असा खुलासा अम्मी ला करा. नाहीतर मेरी शादी रचा रै क्या रे हौले टाइप अम्मी अ‍ॅटॅक व्हायचा आमच्यावरच Happy

स्वाती - गालाँ, बालाँ चे स्पेलिंग वाचून ही एक टेक ब्लॉग/रिसर्च वाली साइट सुद्धा हैदराबादीच वाटेल आता Happy

मेरी शादी रचा रै क्या रे

Lol

गालाँ, बालाँ चे स्पेलिंग …

हे नीट लिहिता येत नव्हते इथे, स्वाती यांनी नसते सांगितले तर मजा कमती हो जाता देखो Happy

वाचकांना लक्षात आले असेलच, इतक्या छोट्या संभाषणात अम्मी बेगमने नाव सुद्धा माहित नसलेल्या किंबहुना अस्तित्वच डाउटफुल असलेल्या मुलीला खालील विशेषणांनी गौरवले आहे :

चुडैल

डायन

ज़हर की पुड़िया

अव्वल दर्जे की मक्कार

तहज़ीब (Manners ) नसलेली


ख़ानदान का पता नसलेली !

हैदराबादी शाब्दिक मार फार जोरात असतो Lol

दो हैदराबादी दोस्तॉं की चुहल-चुगली:

फजलू : मेरे कू कोई ऐसा सवाल पूछ के सर से तशरीफ़ तक हिल जाता मैं

जुम्मन : हौ. अब बता तू के

- वो ऐसी चीज़ के जो खुद बनाए उनों इस्तेमाल नै कर के दुसरेकू बेच देते हमेशा

- ख़रीदते उनों खुद के वास्ते इस्तेमाल नै करते कब्बीच

- जो इस्तेमाल करते उनकू कुछ नै मालूम कब लाए, कौन खरीदे, कित्ते में लिए बोल के

फजलू : लाजवाब कर दिए तुम जुम्मन मियाँ. सुईपटक सन्नाटा कर दिए ना…..नैमालूम क्या है तो ये. तुमीच बताव अब…

जुम्मन: “कफ़न” है ! हिल गए ना सर से तशरीफ़ तलक ? Lol Lol

मस्त कोडे
सिर से पांव्तक हिल जाना Happy

Pages