हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ते 'पानी नहा के आराऊं' कुठून आलंय? सानिया मिर्झाच्या एका मुलाखतीत पाहिलं. तिला काही वाक्यांचा हैदराबादीत अनुवाद करायला सांगितला होता. आंघोळ करून येणेला 'पानी नहा के' असं ऐकून फार मजा वाटली. त्यात आंघोळ आणि हैदराबादी - दोन्ही तुमच्या आवडीचे विषय आहेत.

पानी नहा के आराऊं' कुठून आलंय? ….

नैमालूम मेरे कू Happy

हे बंजारा हिल पब्लिकचे असावे. ती दुनियाच अलग है. उनके बच्चे बिसलेरी से नहाते, शोफर वाली गाडीसे ईस्कूल कू जाते !

ये नया क़िस्सा सुनो फरेंड लोग :

हैदराबादी अम्मा छह बरस के बच्चे कू लेकर फ़ोटू खिंचवाने जुम्मन के फोटू ईस्टूडियो गए.

बच्चे का ध्यान फोटू पे लगाने के वास्ते जुम्मन तरकीब लगाए.

जुम्मन : बेटा, इधरकू देख. अभी इस क्यामेरे से कबूतर निकलेंगा

बच्चा : मामू, फोकस एडजेस्ट करो, जाहिलों के जैसे बातॉं नक्को बोलो. पोर्ट्रेट मोड़ रखना, मैक्रो के साथ. ISO 200 के अंदरिच रखना … और सुनो, हाय रिज़ोल्यूशन पिक आनेकू होना नैतो अम्मी पैसे नै देंगे तुम कू, समझे क्या?

और वो तुम्हारा कबूतर तुम्हारेकनेच रखो, हौलेपना पसंद नै मेरे कू

जुम्मन सदमे में है कल से Proud Proud

जाहिल म्हणजे शब्दशः अडाणी/अशिक्षित बहुतेक. अर्थात हैदराबाद स्लँग मधे त्याचा काय अर्थ निघेल सांगता येत नाही Happy बंजारा हिल्स मधे राहणारा मूर्ख असाही निघेल Happy

Lol विनोद.
'जाहिल अनपढ गवार' हे एकत्र नांदत असल्याने शिळी गवारीची भाजी डोळ्यासमोर येते.
बंजारा हिल्स मधे महेश बाबू रहात असेल तर मला राग येईल, पण तो ज्युबिली हिल्स मधे रहात असेल तर हसू. नक्की आठवत नाही पण सावध रहा. Wink

जाहिल अरबी शब्द. अनपढ़ और जाहिल असे जोडीने वापरतात आणि दोन्ही सुटेही वापरतात.

जाहिल = जो न तो पढ़ा-लिखा हो और न समझदार हो, निरक्षर, अशिक्षित

लाक्षणिक अर्थ = मूर्ख, नासमझ

महेश बाबू ज्युबिली हिल्स वाला आहे हो, अब कित्ता भी हँसो तुम लोगां Happy

बाबूची बाबी आपल्या शिरोडकरांची नम्रता आहे. अब वो हैदराबादी दक्कनी में हँसते और बातॉं करते के नै ये तो मालूम नै Lol

@फा, हैद्राबादी संतरा सोलके देरी तेरेकू -
ज्युबिली हिल्स अतिश्रीमंत लोकांची वस्ती आहे, बंजारा हिल्स तितकी नाही. मूर्ख लोक श्रीमंत कसे असतील, त्यामुळे आधीच लक्षात यायला हवं होतं. त्यामुळे बंजारा हिल्सवाल्यांना हसायचं ठरलं आहे. Happy

हो अनिंद्य, त्यांच्या लेकीचा फोटो इथे न्यूयॉर्क बिलबोर्ड वर दागिन्यांची जाहिरात करताना आला होता. क्रशवर लक्ष ठेवून असते मी. Lol

@फा, हैद्राबादी संतरा सोलके देरी तेरेकू - >>> थॅंक्यू थँक्यू. आणि हैदराबादी स्लँग मधेच सोलल्याबद्दल अजून एक थँक्यू

ज्युबिली हिल्स अतिश्रीमंत लोकांची वस्ती आहे, बंजारा हिल्स तितकी नाही. मूर्ख लोक श्रीमंत कसे असतील, त्यामुळे आधीच लक्षात यायला हवं होतं. >>>

मला वाटायचे इव्हन बंजारा हिल्स मधे श्रीमंत लोक राहतात (प्राचीन काळी अझर वगैरे तेथे राहात ना?). तसे गरीब लोक टेकड्यांवर झोपड्यांमधेही राहतात. फक्त वस्तीच्या नावात "हिल्स" नसते Happy

मूर्ख लोक श्रीमंत कसे असतील >>> याबद्दल मी साशंक आहे. खूप उदाहरणे पाहिली आहेत Happy

फक्त वस्तीच्या नावात "हिल्स" नसते >>> Happy
बंजारा हिल्स पण गरीब नाही, फक्त ज्युबिली इतकं श्रीमंत नाही.

याबद्दल मी साशंक आहे. खूप उदाहरणे पाहिली आहेत
>>> मग आपण त्यांनाही हसू, आपल्याला काय !

मूर्ख लोक श्रीमंत कसे असतील >>>

स्वत:ला (अजूनही) श्रीमंत होता न आल्याने हुशार आणि मूर्ख दोन्ही प्रकारच्या श्रीमंतांबद्दल आदर आहे, त्यांना मी नाही हसणार Happy हौ नै तो क्या तो बताराऊं तुमकू

BTW, अज़हर बंजारा हिल्स वाला आहे.

जॉल/ जहॉल- जॉहिल/ जाहिल - मजहूल X ( वि ) एल्म/इल्म् - ऑलम/ ॲलम - मालूम, थोडक्यात माहीत आहे X माहीत नाही. मराठीत ignorant.

BTW, अज़हर बंजारा हिल्स वाला आहे. >>> हो मी त्याच्याबद्दलच बंजारा हिल्स नाव ऐकले होते. नाहीतर पुण्यात आम्हाला बंजारा हे फक्त चांदणी चौकातील एका रेस्टॉ चे नाव इतकेच माहीत होते. आणि पिक्चर मधले बंजारे. कबिला वगैरे असणारे.

Pages