नवे सिम कार्ड कोणते घ्यावे? एअर्टेल व्होडाफोन का जिओ?

Submitted by अश्विनीमामी on 14 July, 2022 - 06:39

नवा फोन घेतला आहे. त्यात नवे सिम कार्ड घ्यायचे आहे. जिओ चांगले आहे असे ऐकले आहे. स्वस्त पडते का? प्लॅन्स कसे आहेत.

का व्होडा फोन? सध्याचे तेच आहे. सर्विस बरी आहे. एक नंबर आहे तो कंपनीचा आहे. नवा नंबर त्याचाच घ्यावा का कसे? ह्यांचे प्लान्स कसे आहेत.

एअर्टेल अजून बरे चालते का? तुमचा काय अनुभव?

जिओ चे सिम कार्ड कुठे मिळेल. व काय कागद पत्रे लागतात सिम कार्ड साठी!! नवा नंबर घेतला की तो पूर्ण पणे वैयक्तिक होईल व सध्याचा कंपनीचा कामा पुरता मामा. मग सर्व रेफरन्सेस नव्या नंबरला शिफ्ट करणे व आधार कार्ड ला मॅप करणे हे ही एक काम आहे. तुमचा अनुभव व माहिती सांगा. धन्यवाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणत्या कंपनीचा प्लॅन परवडण्यासारखा आहे हा एक अभ्यासाचा विषय आहे, पण माझ्या मते जीओ किंवा एअरटेल चे नेटवर्क चांगले आहे. विशेषतः (विदर्भातील) गावखेड्यांमध्येही जीओचे नेटवर्क बऱ्यापैकी असते.

मला जिओचा अनुभव नाही ती माहिती मिळावी म्हणूनच बाफ काढला आहे. व्होडाफोनच सध्या चालू आहे. पण जिओ स्वस्त पडत असेल तर बरे . आता बिले स्वतः भरावी लागतील रिटायर झाल्या वर.

तुमच्या घरात ज्या फोन ची रेंज येते तो घ्या. प्लॅन सर्वाचा जवळपास एकच आहे. आमच्या घरात जिओ ची रेंज येते म्हणुन तो चांगला.

घरी वाय्फाय असेल आणि बाहेर डेटा कमी वापरत असल्यास ३३६ दिवसाचा जिओ चा १७९९ रुपयात प्लॅन आहे. ३३६ दिवसाकरता ६ जिबी डेटा. आजुन डेटा पाहिजे असल्यास १२१ रुपयात १२ जिबी.

रोज डेटा पाहिजे असेल तर ३६५ दिवस २८७९ रुपयात, रोजचा डेटा २ जिबी

डिझनी हॉटस्टार मोबाईल वर पाहिजे असल्यास ३६५ दिवसाचा २९९९ रुपयात. रोजचा डेटा २.५ जिबी. हा प्लॅन घेतल्यावर आजुन ४०१ रुपये भरल्यास एका लॅपटॉप किंवा टिवी वर डिझनी हॉटस्टार बघण्यासाठी अपग्रेड प्लॅन आहे.

रिटायर झाल्या वर बिल भरायचे नसल्यास MTNL चा २३५ रुपयाचा ३६५ दिवसाचा प्लॅन आहे. त्यात फक्त incoming free. भारतात कुठेही चालते. Outgoing फक्त घरच्या ईटरनेट वरुन whats app call . वडलानी रिटायर झाल्यावर फक्त हाच प्लॅन ठेवायचा ठरवले आहे. (सध्या जिओ पण आहे , dual sim फोन आहे) मागच्या ४५ वर्षात एवढा त्रास देउन पण MTNL/सरकारी फोन कंपनीशी संबध तोडवत नाहीत. फोन , नेट आणि मोबाईल सगळे MTNL चे .

जिओचे नेटवर्क खरच चांगले आहे. जिथे बाकी कुठलेच नेटवर्क उपलब्ध नाही तिथे सुद्धा जिओ व्यवस्थित चालते.
एअरटेल अगदी याउलट. त्यांच्या अॅडमध्ये फक्त दाखवतात सगळीकडे उत्तम नेटवर्क पण प्रत्यक्षात गंडलेलं नेटवर्क आहे. मी एअरटेलचे सिम घेऊन पस्तावले मग पोर्टेबिलिटी करुन आयडियाला कन्व्हर्ट करुन घेतले.
प्लॅन सगळ्यांचे बरेचसे सारखेच असतात.
VI ला रात्री 12 ते सकाळी 6 अनलिमिटेड डाटा वापरता येतो. शिवाय आठवडाभरात जर रोजचा शिल्लक डाटा उरला तर तो शनिवार-रविवार दोन दिवस वापरता येतो. (माझा असाच फुकट जातो. Sad )

Jio घ्या. फक्त तुमच्या नेहमीच्या वावराच्या ठिकाणी नेटवर्क येतंय ना हे विचारून घ्या आजूबाजूच्या लोकांना

Jio

जिओ चे नेटवर्क आता सगळीकडे मिळते. पण चार्जेस वाढवत चालले आहेत.
एलॉन मस्कचे कधी येणार तेव्हां येणार. तोपर्यंत तरी हेच चालवावे असे वाटते. जिओसिनेमा, जिओटीव्ही फ्री मिळतात सेवा. जिओटीव्ही वर आवडते टीव्ही कार्यक्रम टीव्हीवर सुद्धा पाहता येतात. केबल / डिटीएच काढून टाकली तर त्याचे पैसे इकडे वापरता येतात.

बी एस ण ळ
सर्वात स्वस्त

वी आय

रात् अन लिमिटेड

जीओ

२ वर्ष रीचार्ज नाही केला तर्री इन कमिन्ग चालु

जिओ दणदणादण !
आम्ही वोडाफोन कडून जिओ ला गेलो

प्लॅन सर्व कंपन्यांचे सारखेच आहेत जवळपास .
Suggestions : VI च SIM घेतल तर एक फायदा असा आहे, रात्री १२ ते सकाळी ६ मोफत इंटरनेट असतय किती पण वापरा आणि जर एखाद दिवशी उरल तर weekend la पुन्हा भेटत वाया जायचा विषय नाही

Hii. Jio ghete. Shop is opposite my favourite breakfast place.

VI च SIM घेतल तर एक फायदा असा आहे, रात्री १२ ते सकाळी ६ मोफत इंटरनेट असतय किती पण वापरा आणि जर एखाद दिवशी उरल तर weekend la पुन्हा भेटत वाया जायचा विषय नाही >> ही सोय प्रीपेडला असेल ना?

ईटरनेटसाठी घरात वायफाय घेणे उत्तम असे मला वाटते. किमान १०० एमबीपीएस स्पीड अनलिमिटेड प्लान वगैरे घेतला सात-आठशे रुपयात तर सोय होऊन जाते सर्व टॅब मोबाईल कम्प्युटर लॅपटॉपची...

हा धागा सिम कुठले घ्यावे असा आहे पण, ज्यावेळी ब्रॉडबॅण्डबद्दल बोलताना ७००-८०० चा प्लॅन चांगला आहे असे म्हणतो, त्यावेळी त्या प्लॅनच्या किमतीवरचा सर्विस चार्जेस पण लक्षात घ्या. १८% काही कमी होत नाही. त्यामुळे तोच प्लॅन ८२४-९४३ चा होतॊ .

हो ते पकडूनच खिशातून किती जातात त्याचे लिहिले होते.
i-on वापरतो आम्ही
अर्थात आता कंपनीनेच घेउन दिलेय त्याचे मात्र जास्त आहेत. प्लानही गरजेपेक्षा बराच जास्त आणि सुपर्रफास्ट आहे.

कोणतेही सिम कार्ड घ्या भारतात.
1) कॉल ड्रॉप.
२) कॉल लगेच न लागणे.
३) ४G ची जाहिरात करून आणि तसेच पैसे घेवुन.
Practically २G network चे स्पीड मिळणे
ही खासियत सर्व कंपन्या मध्ये आहे.

MTNL चा २३५ रुपयाचा ३६५ दिवसाचा प्लॅन आहे. त्यात फक्त incoming free. भारतात कुठेही चालते.....
Submitted by साहिल शहा on 14 July, 2022 - 17:20

@साहिल शहा, MTNL चा हा plan सध्या सुरु आहे का?

मला माझ्या गाडीच्या GPS Tracker साठी नवीन सिम घ्यायचे आहे.
त्यासाठीचे निकष खालीलप्रमाणे:
१. नेटवर्क सर्व ठिकाणी (अगदी गावा-खेड्यातसुद्धा) हवे . ते अगदी high speed internet पुरवणारे नसले तरी चालेल पण GPS tracker आपल्या location चा मेसेज पाठवू शकेल इतके तरी हवे.
२. वार्षिक plan कमीतकमी रकमेचा किंवा lifetime incoming free प्रकारातील हवा.
३. plan मध्ये दररोज १/१.५/२ GB data नसला तरी चालेल. कारण घरगुती गाडी आहे, त्यामुळे काही दररोज / दर मिनिटाला कोणी tracking करणार नाही. (देव न करो पण) कधी गाडी चोरीला वगैरे गेलीच तर त्या वेळी तेव्हढ्यापुरता balance टाकून किंवा sms pack टाकून काम झाले पाहिजे. (सध्या सगळ्या कंपन्यांचे bundle pack - unlimited calling, daily 100 sms, daily 1/1.5/2 GB data असेच दिसत आहेत.)

* मी जो GPS tracker वापरत आहे तो 2G / 3G वर चालतो. 4G support करत नाही, त्यामुळे जिओ आधीच बाद झालेले आहे!
*जिओ चे नवीन आलेले JioMotive हे device वा तत्सम OBD port मध्ये बसवायचा GPS tracker सुचवू नये. कारण मला OBD port वाला GPS tracker सुरक्षित वाटत नाही. कारण एखाद्या गाडीत OBD port कोठे आहे याची माहिती गुगलवर सहज मिळते. चोराने गाडी चोरली तर तो आधी OBD port चेक करेल आणि तिथे tracker दिसला तर तोच आधी काढून फेकून देईल! त्यामुळे मी जो tracker घेतला आहे तो dashboard च्या खाली कोणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने लपवला आहे.

MTNL ने तीन महिन्यापुर्वी हा प्लान काढुन टाकला आहे.

मागच्या काही दिवसात मुंब ईं बाहेर ( roaming) त्याचे फोन लागत नाही तसेच OTP SMS 10 मिनिटानंतर येतात म्हणुन जियो वर नंबर पोर्ट केला

वडिल phone वर data वापरत न्हवतें त्यामुळे त्याचे माहित नाही . ३G MTNL DATA ONLY प्लॅन १४९९ रुपये वार्षिक आहे.

विमु, तुम्हाला असं ऑल इन्क्लुझिव सिम सहज मिळेल की. पण ते लाईफटाम फ्री वगैरे नक्कीच नसेल; कमीतकमी वार्शिक रीचार्ज तरी लागेलच त्याला जगवायला. एअर्टेल त्यातल्यात्यात बरे असा माझा कयास. जिओ तर एज-२-३ जी देत नसल्यानी बादच होइल. वोडाफोन कधीही भारतातले सिमं बंद करेल इतकी वाइट सर्वीस आहे.

वोडाफोन कधीही भारतातले सिमं बंद करेल इतकी वाइट सर्वीस आहे. >> सध्या खुप मनस्ताप आहे Sad वोडाचे ग्राहक एअरटेल कडे वळले तर तिथेही ताण येईलच

एरटेल मध्ये नंबर पोर्ट करायला गेल्यास चार महिने पोस्टपेड(बिलींग) घ्यायला लावतात. जिओ मध्ये पोर्ट सहज होतं . तेव्हा हे वोडाफोनचं लवकर पोर्ट करणे.

वोडाफोन कधीही भारतातले सिमं बंद करेल इतकी वाइट सर्वीस आहे>>>
सध्या airtel ही ह्याच मार्गावर आहे. एवढ्यात सर्व्हिस खूप खालावली आहे. बऱ्याच वेळेला नेटवर्क मिळत नाही. कंपलेंट केली तर परस्पर क्लोज केली जाते. कस्टमर केर तर सगळ्यात मोठा विनोद आहे.
मला वाटते सरकारच्या मदतीने सगळ्यांना मारून शेवटी फक्त जिओ जिवंत राहील.

MTNL ने तीन महिन्यापुर्वी हा प्लान काढुन टाकला आहे.>>> My Bad Luck! प्रश्न विचारायला उशीर केला!

विमु, तुम्हाला असं ऑल इन्क्लुझिव सिम सहज मिळेल की.. अहो, असे ऑल इन्क्लुझिव सिम नको आहे; कारण तो पैशांचा अपव्यय ठरेल.
कारण,
Unlimited calls - GPS tracker वरुन कोणाला आणि कसा कॉल करणार?
100 SMS/day - दिवसभरात काय उगाच GPS location चेक करू? Family car आहे जी क्वचितच बाहेर निघते.
Daily 1-2 GB data - Tracking अभावी हा सुद्धा वाया जाणार, कारण GPS tracker Wi-Fi hotspot बनवत नाही, त्यामुळे तो data मोबाईलवर वगैरे वापरता येणार नाही!

थोडक्यात मला balance (which can be used to send sms) with 6/12 months validity असे पाहिजे. (म्हणजे दर महिन्याला आठवणीने रिचार्ज करत राहायला नको, एकदाच केले की वर्षभर डोक्याला ताप नाही.)

बाय द वे, या कामवाल्या बायका / सिक्युरिटी गार्ड वगैरे जे keypad वाले साधे फोन वापरतात त्यांचा कोणता plan असतो?

Data only plans नाहीत आता.
Airtel चा एक प्लॅन आहे वर्षाला १७९९, त्यात वर्षभरात २४ gb डेटा मिळतो, आणि व्हॉइस कॉल्स वर्षभर.
त्यात डेटा संपला तर फक्त डेटा प्लॅन घेता येतो existing validity पर्यन्त १२ gb ला ११८ रुपये.

जिओने सर्वात अगोदर जे keypad वाले साधे फोन आणले त्यांनी दुनिया करो मुठ्ठी में शक्य झालं. त्या फोनमध्ये फक्त जिओचं सिम कार्ड चालतं. Hotspot नाही. यांचा प्लान थोडा स्वस्त असतो. ( जिओचे नंतरचे टचस्क्रीन फोन बाद आहेत. Value for money नाहीत.
..........
माझ्या एका जुन्या फोनात एरटेल 4g lte speedयेणे जानेवारीत बंद झालं. रिपेरवाल्याकडे नेला. तो म्हणाला की जिओ सिम टाका,फोन ठीक आहे. त्याने त्याचं जिओ सिम टाकून दाखवलं. ओके.
[ Jio :access point>>edit>> MNC= 874 आहे. एरटेल access point >>edit>>MNC= फक्त 92 ]
... .... ...
बाकी जुन्या गाडीला हाइटेक करायची खटपट समजली नाही.

बाकी जुन्या गाडीला हाइटेक करायची खटपट समजली नाही...
हायटेक वगैरे नाही ओ, फक्त GPS Tracker लावतो आहे, यदाकदाचित गाडी चोरीला गेलीच तर track करता यावी यासाठी.
GPS Tracker हे खाली चित्रात दाखविले आहे तसे device आहे, जे dashboard मध्ये लपवले आहे. यात सिमकार्ड घालून ठेवायचे आणि 12 V DC supply द्यायचा. हा supply चावी काढल्यावर, गाडी lock केल्यानंतरही सुरु राहिला पाहिजे. जेव्हा कधी आपल्याला आपल्या गाडीचे location जाणून घ्यायचे असेल तेव्हा या device ला call करायचा म्हणजे त्यात जे सिम कार्ड आहे तो नंबर आपल्या मोबाईलवरुन dial करायचा. call लागला की १-२ रिंगनंतर GPS Tracker call disconnect करतो आणि त्या नंबरवर एक sms पाठवतो ज्यात गाडी सध्या कोठे आहे त्या location ची लिंक आणि किती वेगाने धावते आहे तो current speed याची माहिती असते.
GPS Tracker.JPG

१)गाडी (जुनी) चोरणारे त्याला मोडून सुटे भाग विकत असत. पण आता १५ वर्षांनी भंगार नियमांमुळे या उद्योगात कुणी पडेल का? २)आहे तशीच वापरून नंतर सोडून देणारे तरूण चोर जुन्या गाडी मागे का लागतील? ३)नव्या गाडीबद्दल प्रश्न बरोबर.४) असं कोणतं स्वस्त सिम मिळत असेलच आणि ते गाडीत कुठे लपवायचे म्हटल्यास लोखंडी पत्र्याच्या मागून त्यास ( खुल्या आकाशाची)जीपीएस रेंज मिळणे कठीणच दिसतंय.

Pages