नवे सिम कार्ड कोणते घ्यावे? एअर्टेल व्होडाफोन का जिओ?

Submitted by अश्विनीमामी on 14 July, 2022 - 06:39

नवा फोन घेतला आहे. त्यात नवे सिम कार्ड घ्यायचे आहे. जिओ चांगले आहे असे ऐकले आहे. स्वस्त पडते का? प्लॅन्स कसे आहेत.

का व्होडा फोन? सध्याचे तेच आहे. सर्विस बरी आहे. एक नंबर आहे तो कंपनीचा आहे. नवा नंबर त्याचाच घ्यावा का कसे? ह्यांचे प्लान्स कसे आहेत.

एअर्टेल अजून बरे चालते का? तुमचा काय अनुभव?

जिओ चे सिम कार्ड कुठे मिळेल. व काय कागद पत्रे लागतात सिम कार्ड साठी!! नवा नंबर घेतला की तो पूर्ण पणे वैयक्तिक होईल व सध्याचा कंपनीचा कामा पुरता मामा. मग सर्व रेफरन्सेस नव्या नंबरला शिफ्ट करणे व आधार कार्ड ला मॅप करणे हे ही एक काम आहे. तुमचा अनुभव व माहिती सांगा. धन्यवाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>स्टोअरमध्ये खरेदीचे बिल बनवतांना ग्राहकास मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक आहे
असे नाहीय. मी आत्तापर्यन्त कोणत्याही स्टोर मध्ये माझा नंबर दिलेला नाही. अ‍ॅलन सोली मध्ये डिस्काउंट आय्ट्म साठी नंबर देणे बंधनकारक आहे असे सांगत होते. तेव्हा फायनलाईज केलेला जवळपास ८००० चा माल नको म्हणून सांगितला आणि चालता पडलो. जवळपास तसेच टी शर्ट्स कॉट्न किंग मधून त्याच्या अर्ध्या किमतीत घेतले ते देखील नंबर न देता. म्हणजे जो फायदा अ‍ॅलन सोली ला झाल असता तो झाला नाही वर ते कपडे त्यांना पुन्हा घडी करून रचावे लागले ते वेगळे.

बंधनकारक आहे असे मी म्हटले नाही. काही स्टोअर्स मध्ये (स्पेन्सर्स, मोअर आणि काही इकडली काही लोकल चेन्स) यामध्ये मोबाईल नंबर दिल्या शिवाय बिल प्रिंट होत नाही. ते ग्राहकाला नंबर विचारतात. आपण देतच नाही जा म्हटले तर मग ते त्यांचाच (स्टोअरचा की अजुन जो काय असेल तो) नंबर देउन बिल प्रिंट करतात. यातील दोन माझ्या नेहमीच्या आणि भरवश्याच्या स्टोअर्समध्ये मात्र मी नंबर दिलाय, प्रिंटेड बिल मागत नाही. महिन्याला ते स्टेट्मेंट पाठवतात व्हॉट्सएप इमेलवर. महिन्याचा हिशेब ठेवायला बरे.

या धाग्याने प्रभावित होऊन आताच एका होम डेकोर मध्ये नंबर देणं नाकारलं आहे.मालाची किंमत 399 बिल करून आणि 1 रु चॅरिटी ला डोनेट करणार का यालाही मख्खपणे नाही म्हटलं.तिथेही नंबर द्यावा लागणार होता. काउंटरवरच्या पोरीने 'what a bixxx' असे भाव चेहऱ्यावर आणून बिल केलं Happy

शाब्बास्स mi_anu Happy तो एक रुपया खरच एखाद्या चॅरिटी ला जात असेल यावर माझा विश्वास नाही. ऑन्लाईनला बुक माय शो देखील घेतं आणि ते ऑप्शन बाय डिफॉल्ट सिलेक्ट केलेलं असतं. एवढीच चॅरिटी करायची हौस असेल तर आमच्याकडून कन्विनिअन्स फी च्या नावाखाली जे ५-१० रुपये घेता त्यातून द्या ना

हा हा हा
बुकमायशो चा पण आम्ही तो 3 रु वाला ऑप्शन अनचेक करतो.चॅरिटी एरवी स्वतः एखाद्या संस्थेच्या पानावर जाऊन अनामिक केलेली बरी.

या धाग्याने प्रभावित होऊन आताच एका होम डेकोर मध्ये नंबर देणं नाकारलं आहे>>>>
अभिनंदन आणि धन्यवादसुद्धा!!!
हे लोण सगळीकडे पसरले पाहिजे. प्रत्येकाने नंबर देणार नाही असा पवित्रा घेऊन कटाक्षाने त्याचे पालन केले की पुढील काही वर्षात या फालतू telemarketing ला काही प्रमाणात तरी आळा बसेल!

काल सहज एक कल्पना सुचली. WhatsApp वा तत्सम सर्वच ठिकाणी periodic (म्हणजे दर ४-६ महिन्याने) mobile number verification सक्तीचे असावे. म्हणजे WA चालू करून ४ महिने झाले की पुन्हा एकदा OTP or call वेरीफिकेशन यायला पाहिजे, वाटल्यास घाईगडबडीच्या वेळी त्रास नको म्हणून त्याला 'Skip for now' करून ३ दिवसांसाठी स्किप करण्याचा पर्याय असू देत, मात्र ३ दिवसानंतरही जे पुन्हा OTP द्वारे mobile number verify करणार नाहीत, त्यांचे WA स्थगित व्हायला हवे. (निदान त्यांच्या WA वरुन outgoing traffic तरी बंद व्हायला हवे, number verify करेपर्यंत) हे अशासाठी कारण, मी मला promotional call / sms आला तर DND violation ची तक्रार तर करतो. त्या तक्रारीची दखल घेऊन संबंधितांवर warning दिली जाणे, १ महिन्यासाठी / ६ महिन्यासाठी निर्बंध (restrictions) लागू होणे आणि तरीही नाही सुधारले तर शेवटी तो क्रमांक बंद होणे अशी कारवाई होते. परंतु अशा प्रकारे नंबर बंद झाला तरी त्या नंबरने सुरु केलेले WA मात्र चालू राहते. Periodic number verification असेल तर सिम बंद झाल्यावर WA सुद्धा काही काळाने बंद होईल. अर्थात WA मधील change phone number या पर्यायात सुद्धा बदल करावे लागतील. आधी जुन्या क्रमांकावर आलेला OTP टाकून मग नवीन नंबर टाकायचा, असे काहीतरी बदल करावे लागतील.
.
.
.
हे एक उदाहरण. Adani Builders कडून कोणी एक जण त्यांच्या प्रोजेक्टची माहिती देण्यासाठी कॉल करायचा. त्याची तक्रार करून त्याचा क्रमांक बंद पाडायला लावला!!!
Number Disconnected.JPG

पूर्वी मला असे telemarketing चे कॉल आले की मी खूप चिडायचो. त्यांना बरेच काही सुनवायचो, नियम वगैरे सांगत बसायचो आणि मग DND violation ची तक्रार दाखल करायचो. पण नंतर लक्षात आले, यात आपलाच वेळ जातो आणि BP पण वाढतो! शिवाय एका telecaller ची एकदाच तक्रार नोंदवता येते. म्हणून हल्ली मी pattern बदलला! हल्ली असा कोणाचा कॉल आला की फक्त 'आप कल कॉल करेंगे? आज मे थोडा बिझी हू|' एवढेच म्हणून कॉल बंद करतो. दुसऱ्या दिवशी कॉल आला तरीही पुन्हा तेच! समोरचा मात्र मला दरदिवशी फोन करत राहतो आणि मी देखील प्रत्येक दिवसाची एक-एक तक्रार नोंदवत राहतो!! शेवटी मग अनेक तक्रारी गेल्या की त्याचा नंबर असा कायमचा बंद होतो!!! समोरचा जर माझ्या DND registered number वर promotional call करण्याचा हलकटपणा करत असेल तर मीही त्याच्यासोबत असाच हलकटपणा करणार!!!

मी TrueCaller वर आलेला लाल कॉल कट करत नाही. रिन्गर म्युट करून पुर्ण वेळ डायल होऊ देतो. तेवढ्या वेळात तो नंबर इतर लोकांना फोन करू शकणार नाही. तेवढीच आपली कम्युनिटी सर्विस Happy नंतर TrueCaller चा पॉप अप वापरून ब्लॉक करून टाकतो.

मी TrueCaller वर आलेला लाल कॉल कट करत नाही. रिन्गर म्युट करून पुर्ण वेळ डायल होऊ देतो. तेवढ्या वेळात तो नंबर इतर लोकांना फोन करू शकणार नाही. तेवढीच आपली कम्युनिटी सर्विस >>>>
असे करून तुम्ही त्यांचे कितीसे सेकंद वाया जाऊ देता? जास्तीतजास्त ३०-४० सेकंद! शिवाय TrueCaller वर लाल रंगात दिसणारा कॉल हा manmade कॉल असेलच असे नाही. आजकाल sim box का काहीतरी device येते ज्यात ५-६ सिम कार्ड घालून ठेवतात आणि USB port च्या सहाय्याने त्यात recording ची mp3 file आणि ज्यांना कॉल करायचे अशांच्या numbers चा database लोड करून ठेवतात. मग ते deviceच database मधील numbers ला कॉल करून ती recorded file ऐकवते! त्यामुळे तुम्ही जे 'कम्युनिटी सर्विस' चे समाधान मिळवत आहात ते फसवे आहे!!!

त्यापेक्षा खऱ्या अर्थाने 'कम्युनिटी सर्विस' करायची असेल तर तुमचा क्रमांक DND मध्ये नोंदवा. म्हणजे एकदा का नोंदणी झाली की ७ दिवसांनी १४० वरुन सुरु होणाऱ्या क्रमांकाचे कॉल्स असेही बंद होतीलच. शिवाय इतर normal 10 digit number वरुन मार्केटिंग कॉल आला तर तो उचलून बाजूला ठेवून द्या (ringer mute करण्यासाठी volume button दाबण्याऐवजी कॉल उचला - no extra मेहनत!) आणि मग तुमच्या सवडीने (तीन दिवसांच्या कालावधीत) त्या कॉलची तक्रार नोंदवा! (एक तक्रार नोंदवण्यासाठी जास्तीतजास्त ३० सेकंद लागतात) अशाने ते नंबर बंद तरी होतील!!! ही खऱ्या अर्थाने 'कम्युनिटी सर्विस' आहे!!!

(DND violation ची तक्रार नोंदवण्यासाठी कॉल उचलला जाणे गरजेचे आहे. कॉल missed call / rejected category मध्ये गेला तर त्याची तक्रार होत नाही, कॉल received category मध्ये असणे गरजेचे आहे.)

ओ विक्षिप्त मुलगा घेऊ द्या कि समाधान. कमीत कमी मॅन्युअली डायल करणारे तरी लगेच दुसरा कॉल नाही करणार. माझा नंबर ऑल रेडी डी एन डी ला गेली य वर्षे रजिस्टर्ड आहे आणि मी देखील एस एम एस करून कंप्लेन्ट नोंदवायचो. पण काही फरक नाही पडत. तेव्हा ते बंद केले. दिवसाला अजुनही डी एन डी अ‍ॅक्टीव असूनही २-३ कॉल येतातच. आणि हो, मला ते डी एन डी अ‍ॅक्टीव आहे की नाही ते चेक करता येते Happy जो पर्यंत असे कॉल करण्यासाठी खोर्‍याने नवीन नंबर वाटणे बंद होणार नाही तोवर हे कॉल्स येतच राहणार.
खरं तर असले कॉल्स डी एन डी वाल्यांना कॉल करतात असे सिद्ध झाले तर त्या कंपन्याना एक भला मोठा फाईन लावावा आणि ज्या लोकांनी तो डी एन डी कॉल रीपोर्ट केला असेल त्या लोकांमध्ये Gpay करून वाटून टाकावा. मग सगळे लोक डी एन डी कॉल्स रिपोर्ट करतील

जो पर्यंत असे कॉल करण्यासाठी खोर्‍याने नवीन नंबर वाटणे बंद होणार नाही>> सध्या जी एस एम गेटवे लावुन त्यात अनेक कार्ड टाकुन कॉल केले जातात. एखादा महिना वापरुन नंतर पुन्हा नवीन कार्डस! आयपी EPABX आल्यापासुन analog lines कोणीही घेत नाही,

Pages