Submitted by अश्विनीमामी on 14 July, 2022 - 06:39
नवा फोन घेतला आहे. त्यात नवे सिम कार्ड घ्यायचे आहे. जिओ चांगले आहे असे ऐकले आहे. स्वस्त पडते का? प्लॅन्स कसे आहेत.
का व्होडा फोन? सध्याचे तेच आहे. सर्विस बरी आहे. एक नंबर आहे तो कंपनीचा आहे. नवा नंबर त्याचाच घ्यावा का कसे? ह्यांचे प्लान्स कसे आहेत.
एअर्टेल अजून बरे चालते का? तुमचा काय अनुभव?
जिओ चे सिम कार्ड कुठे मिळेल. व काय कागद पत्रे लागतात सिम कार्ड साठी!! नवा नंबर घेतला की तो पूर्ण पणे वैयक्तिक होईल व सध्याचा कंपनीचा कामा पुरता मामा. मग सर्व रेफरन्सेस नव्या नंबरला शिफ्ट करणे व आधार कार्ड ला मॅप करणे हे ही एक काम आहे. तुमचा अनुभव व माहिती सांगा. धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हल्ली कॉल ड्रॉप ही सर्वात
हल्ली कॉल ड्रॉप ही सर्वात मोठी समस्या आहे.
5g sim card, आणी 5 g network कोणत्याही कंपनी च असले तरी खरे स्पीड 3g च आहे.
. मोबाईल सेवा नेटवर्क चा भारतात दर्जा अगदी सुमार आहे.
एअरटेल मला बरी वाटते.
Jio वर बिलकुल विश्वास नाही.
Vodafone ल sarkar kamjor करत आहे.
. एअरटेल लाच पसंती देणे सध्या तरी खूप गरजेचं आहे.
आणि एअरटेल नी त्यांचा दर्जा सुधारणे गरजेचे आहे..jio च्या जाळ्यात अडकने धोकादायक आहे.
उद्या एअरटेल,Vodafone sarkar च्या मदतीने आणि jio च्या आमिषाने ,लबाडी.
नी बंद झाल्या तर .
फक्त पिळवणूक जनतेच्या नशिबात येईल.
>> एअरटेल मला बरी वाटते.
>> एअरटेल मला बरी वाटते.
>> Jio वर बिलकुल विश्वास नाही.
अगदी सहमत! एवढे दोनच प्लेअर्स सध्या जिवंत आहेत. २००० पासून जी सुंदोपसुंदी सुरू आहे त्यात डोकोमो, टोकोमो, नॉर, टॉर, एअरसेल वगैरे वगैरे येऊन गेले. आता वरील दोन सोबत बीएसनएल व्होडाफोन एमटीएनएल वगैरे प्लेअर्स धापा टाकत आहेत अशी परिस्थिती आहे. काय जादू झाली तर गोष्ट वेगळी अन्यथा जिओ एअरटेल यांच्यापैकीच कोणी एक टिकेल अशी सध्यातरी परिस्थिती आहे. त्यामुळे दोन्हींचा रिचार्ज मारणे इज द बेस्ट स्ट्रॅटेजी नाऊ डेज
१) Vodafone ल sarkar kamjor
१) Vodafone ल sarkar kamjor करत आहे.
हे कसं काय? अगदी सुरवातीला एस्सार कडून शेअर घेताना टॅक्सचा प्रश्न निर्माण झाला. त्यांच्या सल्लागार मंडळाला कायदे माहिती नव्हते?
२) AGR TAXया बाबतीत किंवा अशा देय करांबद्दल कोर्टात जाऊन निर्णय काहीही (विरुद्ध) लागू शकल्यास पैसै द्यावे लागतील ते वेगळ्या अकाऊंटमध्ये ठेवतात तरतूद (provisions). तो कज्जा बरेच वर्षे चालून शिखर न्यायालयात निवाडा विरुद्धच गेला.
- मग प्रश्न असा आहे की याबाबत इंटर्नल ऑडिटवाले आणि संचालक मंडळ काय करत होते? एवढा कर लागू होणार तर सभासदांना नवे वाढीव प्लान का लागू केले नाहीत?
३) २०१६ मध्ये स्पर्धेत राहण्यासाठी 4g lte technology टाकण्याचे अधिकचे भांडवल लागले.
----------------
जिओ बद्दल आगपाखड केल्याने कुणी ग्राहक ते कार्ड घेणार नाही असं नाही.ग्राहक आपला फायदा बघतात.
स्पर्धक च शिल्लक न ठेवणे हे
स्पर्धक च शिल्लक न ठेवणे हे धोकादायक आहे..
टीव्ही इंडस्ट्री एक दोन लोकांच्याच हातात आहे.
न्यूज चॅनेल पण एक दोन लोकांच्याच हातात आहे.
सहारा,colour, आणि अशा खूप कंपन्या बाद केल्या गेल्या.
टेलिकॉम मध्ये फक्त jio च राहिलं आणि बाकी बाद होतील असच चिन्ह दिसत आहे.
अशा गोष्टी नैसर्गिक रित्या होत नाहीत.
अनेक मार्ग त्या साठी वापरले जातात.
विरोधी पक्ष न मागे ed, CBI, च वापर करून नष्ट केले जात आहेत.
सत्तेचे विकेंद्रीकरण, हे आपले तत्व होते.
उद्योग ,व्यवसायात पण संधी च विकेंद्रीकरण च लोकांच्या फायद्याचे असते.
मोबाईलचा वापर करून होणारे
मोबाईलचा वापर करून होणारे fraud / scam रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या 'Department of Telecommunication' ने दिनांक ०१ डिसेंबर २०२३ पासून नवीन सिमकार्ड घेण्यासाठी लागू असलेल्या नियमांमध्ये बदल केले आहेत.
उदा. :
१. सिम कार्ड विकणाऱ्या सर्व लहान - मोठ्या दुकानदारांना नोंदणी करून त्यांची KYC करणे बंधनकारक केले आहे.
२. एखाद्या व्यक्तीला जास्तीतजास्त ९ सिमकार्ड मिळू शकतील. त्याहून अधिक सिम कार्ड individuals ला मिळणार नाहीत.
३. एखाद्या कंपनीला घाऊक सिमकार्ड हवी असतील तर ती मिळू शकतील, मात्र त्यांना त्या प्रत्येक सिमकार्डचे वेगवेगळे KYC करावे लागेल.
यांसारखे अनेक बदल केले असले तरी fraud / scam रोखण्यासाठी ते पुरेसे नाहीत असे मला वाटते. त्यामुळे मी Mr. Ashwini Vaishnav, Minister of Telecommunication यांना एक पत्र पाठवून काही सुधारणा सुचविण्याचे ठरविले आहे. त्या पत्रातील मुद्दे खाली देतो आहे, जर तुम्हालाही त्यात अजून काही मुद्दे हवेत असे वाटल्यास मला सुचवावे.
.
.
.
1. Limit of individual sim cards must be Max. 5 Sim Cards instead of 9. Even though a person is using a dual sim phone along with a portable router like JioFi & other devices like card swipe machine and /or GPS tracker in his/her bike/car etc. 5 sim cards are more than enough. So, this limit must be reduced.
2. Please make such a law that, ‘If any user misuses his/her existing sim card or broadband connection in any manner, his / her ALL current sim cards & broadband connections must be deactivated immediately & he / she must be BLACKLISTED in telecom sector means he / she should not get new sim card or broadband connection from any company in his / her whole lifetime (until last breath of life)’
Misuse of sim card /broadband connection can be as follows:
i. Commit of any type of scam / fraud
ii. Attempt to make any type of fraud (like calling to ask Credit / Debit card no., CVV no., OTP, bank account number / internet login details or sending messages like ‘Your bank account will be deactivated today at 12 am or Your Electricity supply will be disconnected today at 11:30 PM for not paying bill etc.)
iii. Any type of terror /Anti-national activity
iv. Any unlawful activity like giving life threats or extortion via call / SMS / WhatsApp
v. Unregistered telemarketing*
(*Unregistered telemarketing - According to TRAI rules, any company / person who wish to do telemarketing needs to register with TRAI, should get appropriate license & get 140 series number i.e. number starting with 140 to make promotional calls. But many people use ordinary 10-digit mobile number to make promotional calls & due to this such calls doesn’t get blocked by telecom operator’s server as server / system is unable to detect nature of call i.e. whether it is personal call or promotional call as call is made from ordinary number instead of 140 series number)
3. There are several websites which allow users to start WhatsApp with other country numbers like +1, +62, +86, +95, +225, +234, +852, +963 etc. To start a WhatsApp account with another country number using these websites, a physical sim card is not necessary.
I have given a few screenshots of such WhatsApp chats in Annexure ‘A’ which were initiated from such other country number accounts. There are several videos available on YouTube namely ‘How to start Fake WhatsApp number’. And these WhatsApp accounts are mainly used to make frauds as due to absence of physical sim & Indian number, tracing is difficult if VPN is used while creating WhatsApp. So such websites should be blocked throughout India as Torrent was blocked a few years ago.Few examples of videos which shows user to start WhatsApp with foreign country numbers without having physical sim card of other country.
https://www.youtube.com/watch?v=Qx9Ft_OFxdo
https://www.youtube.com/watch?v=qrMWVA4_m9k
4. WhatsApp should be instructed to introduce features like ‘Get messages from my contacts only’. If user wishes not to receive any message from any unknown number to get rid of a marketing / spam / fraud message, such a feature will be very helpful. If any user turns on this feature, all messages from unknown numbers should get blocked AUTOMATICALLY.
5. Also WhatsApp should be instructed to provide option ‘NOBODY’ in ‘Who can add me to groups.’ Such option was available back in 2018 but later WhatsApp removed it. Nobody option is a long term solution for those who doesn’t want to be part (member) of any WhatsApp group.
6. Also when if existing ‘Group Admin’ is trying to make another member Admin, WhatsApp should take that members consent first. Without user’s consent, existing Group Admin should not be able to make another person as Admin.
मुद्दा २ शी १००% असहमत.
मुद्दा २ शी १००% असहमत. कुणाच्या नकळत फोनचा गैरवापर झाला तर ती व्यक्ती आयुष्यभर मोबाईलला मुकेल हे फार धोकादायक आहे. Mobile phone is single point of failure. भारतात तर जिकडे तिकडे OTP मागतात. काही दिवसांनी संडासचे दार उघडायलापण OTP लागेल अशी परिस्थिती आहे.
भारतात WhatsApp हा प्रकार मेसेजिंगसाठी defacto standard बनला आहे आणि तो जास्त धोकादायक आहे.
<< 4. WhatsApp should be instructed to introduce features >>
<< 5. Also WhatsApp should be instructed to provide option >>
हे फारच विनोदी आहे. WhatsApp (Parent company Meta) ही खाजगी कंपनी आहे.
कुणाच्या नकळत फोनचा गैरवापर
कुणाच्या नकळत फोनचा गैरवापर झाला तर ती व्यक्ती आयुष्यभर मोबाईलला मुकेल हे फार धोकादायक आहे....
बरे, पण 'ज्या गुन्हेगारांचा गुन्हा (मग ते सायबर गुन्हेगार असोत किंवा इतर गुन्हेगार) कोर्टात सिद्ध झाला आहे त्यांचे सध्याचे सर्व सिम कार्ड्स /broadband बंद होतील आणि आयुष्यभर कोणत्याच कंपनीचे सिम / broadband मिळणार नाही' अशी मागणी केली तर???
मागणी काहीही करा, हरकत नाही.
मागणी काहीही करा, हरकत नाही. भारतातले हे चोर लोक 'जुगाड' करण्यात हुशार आहेत. आपण स्वतः सतर्क राहणे आणि इतरांनापण सावध करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. दुर्दैवाने परिस्थिती तशी बनली आहे.
2FA साठी authenticator app (Microsoft authenticator, Google Authenticator, Authy वगैरे) किंवा Yubikey सारखी hardware key याची मागणी करणे अधिक योग्य ठरेल.
उबोंच्या वरील दोन्ही
उबोंच्या वरील दोन्ही प्रतिसादांशी सहमत.
प्रश्न कायदे बनविण्याचा नव्हे तर त्यांची निष्पक्ष अंमलबजावणी करण्याचा आहे.
अन्यथा ड्रकोनियन कायद्यांचा मुख्यतः गैरवापरच होईल
भारतात तर जिकडे तिकडे OTP
भारतात तर जिकडे तिकडे OTP मागतात. काही दिवसांनी संडासचे दार उघडायलापण OTP लागेल अशी परिस्थिती आहे. >>>
विनोद बाजूला पण हा खूप मोठा प्रोब्लेम झालेला आहे. सगळीकडे ओटीपी कशाला हवाय?
उ बो +१
उ बो +१
>>कुणाच्या नकळत फोनचा गैरवापर
>>कुणाच्या नकळत फोनचा गैरवापर झाला तर ती व्यक्ती आयुष्यभर मोबाईलला मुकेल हे फार धोकादायक आहे<<
हम्म. भविष्यात मोबाइलवर संपर्का साठी फोन नंबरंच हवा हि अट गळुन पडु शकते. आजच्या तारखेला जगात कुठेहि फोन नंबरशिवाय संपर्क साधला जाउ शकतो..
वर सुचवलेल्या काहि सुविधा(?) अनरिझनेबल नसल्यास व्हॉट्सॅपकडे एन्हांस्मेंट रिक्वेस्ट म्हणुन पाठवु शकता. भारत सरकारने पाठवल्या तर वेटेज मिळु शकतं. बाय्दवे, #४ चा इशु आय्फोनमधे अॅटॉमॅटिकली "सायलेंस अन्नोन कॉलर्स" द्वारे अॅड्रेस होतो; अॅटलिस्ट कॉल करता. टेक्स्टच्या बाबतीत हे थोडं डायसी आहे कारण अन्नोन नंबर ग्रुप सेटिंग मधे ब्लॉक करणं डिफिट्स द पर्पज ऑफ ए लार्ज ग्रुप. शिवाय, किती जणांचे नंबर तुम्हि काँटॅक्टस मधे अॅड करत बसणार..
#६ हा मजबुरी का नाम गांधीजी या कॅटेगोरीत मोडतो, बहुदा.
काहि वर्षांपुर्वि, ग्रुपमधे काहि स्फोटक विधानं, चर्चा आढळुन आल्यास अॅडमिनला जबाबदार धरण्यात येइल अशी आवई उठली होती. त्याचा परीणाम म्हणुन ग्रुपमधल्या सगळ्या किंवा बर्याच मेंबर्सना अॅडमिनचा खिताब बहाल करण्यात आला होता. मी गेलो तर तुम्हालाहि घेउन जाईन, हा त्यामागचा उद्देश असावा. त्या जुगाडचा हँगओवर आजतोवर टिकुन आहे...
मंत्र्यांना पत्र कसे पाठवायचे
मंत्र्यांना पत्र कसे कुठे पाठवायचे? छोटीशी सूचना ट्विटर मार्फत अधिकृत अकाउंटला पाठवता येते.
नंबर स्पूफ करुन कॉल करणं फार
नंबर स्पूफ करुन कॉल करणं फार सोपं असावं. अमेरिका/ कॅनडामध्ये लोकल दिसणार्या नंबर वरुन काय वाट्टेल ते फोन येतात. जे नंबर अस्तित्वात असतात.
रशिअन न्यूज वाचत असाल तर तिकडे लोक फोन करुन तुमच्या आवाजात 'येस' इ. फ्रेजेस रेकॉर्ड करतात आणि व्हॉईस सिग्नेचर फेज पास करतात. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन असलं तरी एक चिरा डळमळीत होत जातो.
वरच्या अनेक ठिकाणी रेजिंग द बार काही प्रमाणात होत असला तरी आपली अक्कल वापरण्याशिवाय उपाय नाही.
इथे लोक अजुनही एफबीआय आणि आयआरएसला केस बंद करायला म्हणून स्टारबक्सची कार्ड द्या सारख्या वरवर महा बाळबोध वाटणा र्या फ्रॉडला रोज बळी पडत आहेत. किती हास्यास्पद वाटलं तरी हीच सत्यस्थिती आहे.
एका व्यक्तीला किती सिमकार्ड
एका व्यक्तीला किती सिमकार्ड लागतील यात ओटीपी ओन्ली सिमकार्ड पण धरा. अनेक वेबसाईट्सवर काही चेक करायला गेलं की ओटिपी ने नंबर व्हेरिफाय केल्या शिवाय (आणि डीएडी ओव्हरराईड करण्याची परवानगीही मागितली असते) मिळत नाही आणि मग आपला नंबर डझन भर कंपन्यांना आणी त्या कंपन्यांकडुन त्यांच्या डझनभर सेल्स पर्सन्सला वाटला जातो आणि सुरु होतात कॉल्सवर कॉल्स. असल्या ऑथेंटिकेशन्स साठी आणि दुकान मॉल्स इ. ठिकणी नंबर द्यायला वेगळे सिम ठेवण्याचा विचार आहे. तो नंबर कुणाला द्यायचाच नाही आणि त्यावर कधीच कॉल्स करायचे/घ्यायचे नाहीत
अनेक वेबसाईट्सवर काही चेक
अनेक वेबसाईट्सवर काही चेक करायला गेलं की ओटिपी ने नंबर व्हेरिफाय केल्या शिवाय ........
हॉटेलच्या साईट्स?
हॉटेल मूळ वेबसाईटवर नाही
हॉटेल मूळ वेबसाईटवर नाही विचारत पण बाकी सगळे agodar वगैरे. वेहीकल- हेल्थ इन्शुरन्स, जस्ट डायल, इंडियामार्ट इत्यादि.
पॉलिसी बाजार वाल्याना कधी कधी
पॉलिसी बाजार वाल्याना कधी कधी नंबर देऊ नका
ते इतकं पकवतील की 'विमा अभ्यास नको पण कॉल्स आवर' होईल.
बऱ्याच साईट्स 'I consent executives to call me about offers ' ला क्लिक केल्याशिवाय पुढे जाऊच देत नाहीत.खरं तर याच्यावर कायदेशीर कारवाई हवी.
काही साईट्स 'तुम्ही अनसबस्क्राईब करू शकता' म्हणतात आणि अनसबस्क्राईब करताना लॉगिन पासवर्ड विचारतात. मुळात लॉगिन पासवर्ड लक्षात ठेवण्याचे कष्ट न घ्यावे इतक्या भंपक त्या असतात म्हणून अनसबस्क्राईब करायचे असते.
अनेक वेबसाईट्सवर काही चेक
अनेक वेबसाईट्सवर काही चेक करायला गेलं की ओटिपी ने नंबर व्हेरिफाय केल्या शिवाय (आणि डीएडी ओव्हरराईड करण्याची परवानगीही मागितली असते) मिळत नाही....
मी मग असल्या वेबसाईट सरळ बंद करतो आणि जी माहिती हवी आहे त्यासंदर्भात कोणी YouTube वर व्हिडीओ टाकला आहे का ते पाहतो. थोडक्यात 'जर तुला तुझे product / service विकायची असेल तर माझा नंबर न घेता माहिती देता येत असेल तर दे, नाहीतर फूट' हा attitude!!!
काही दिवसांपूर्वी Star Bazaar मध्ये पण वाद घातला, बिलिंगसाठी नंबर का पाहिजे म्हणून??? मी सामानाचे पूर्ण पैसे देतो आहे ना? सामान उधारीवर तर नेत नाही ना? मग तुला माझा नंबर का पाहिजे? बिल बनव, पैसे घे आणि मला मोकळा कर. D-Mart वाले तर नाही विचारत customer number.
असल्या ऑथेंटिकेशन्स साठी आणि दुकान मॉल्स इ. ठिकणी नंबर द्यायला वेगळे सिम ठेवण्याचा विचार आहे. तो नंबर कुणाला द्यायचाच नाही आणि त्यावर कधीच कॉल्स करायचे/घ्यायचे नाहीत...
असे करायचे असेल तर इतर वेळी ते सिम settings मध्ये जाऊन बंद करून ठेवायचे आणि फक्त ज्यावेळेस OTP येणार असेल केवळ त्यावेळीच ते सुरु करायचे. (याकामी Jio उत्तम, रिचार्ज न करता पण चालू राहते! माझे एक Jio sim गेले जवळपास ३ वर्षे बिनारिचार्ज सुरु आहे!!!)
काही पर्यटक कंपन्यांचा सहल
काही पर्यटक कंपन्यांचा सहल आराखडा (tour itinerary) तपासावा वाटतो आणि त्या देतातही. तिथे फोन नं. ओटिपी भानगड ठेवत नाहीत हे बरं करतात.
याकामी Jio उत्तम, रिचार्ज न
याकामी Jio उत्तम, रिचार्ज न करता पण चालू राहते
सहमत.
याकामी Jio उत्तम, रिचार्ज न
याकामी Jio उत्तम, रिचार्ज न करता पण चालू राहते>> धन्यवाद.
पॉलिसी बझार वगैरे मी वापरत नाही कधी. पण इन्शुरन्स कंपन्यांच्या वेबसाईटवरही हाच प्रकार आहे. तिथे नंबर दिला फक्त त्यांचेच सेल्स पर्सन्स कॉल करतात, पाच सहा तरी.
बऱ्याच साईट्स 'I consent
बऱ्याच साईट्स 'I consent executives to call me about offers ' ला क्लिक केल्याशिवाय पुढे जाऊच देत नाहीत.खरं तर याच्यावर कायदेशीर कारवाई हवी.>>>
Exactly!!! DND ही TRAI या सरकारी संस्थेमार्फत पुरवली जाणारी सेवा आहे, त्यामुळे ती override करण्याचा अधिकार कोणत्याही खाजगी कंपनीला असू नये!
मंत्र्यांना पत्र कसे कुठे पाठवायचे? छोटीशी सूचना ट्विटर मार्फत अधिकृत अकाउंटला पाठवता येते.>>>
वर सुचवलेल्या काहि सुविधा(?) अनरिझनेबल नसल्यास व्हॉट्सॅपकडे एन्हांस्मेंट रिक्वेस्ट म्हणुन पाठवु शकता. भारत सरकारने पाठवल्या तर वेटेज मिळु शकतं. >>> तोच विचार आहे. मी आतापर्यंत tweeter च्या माध्यमातून WA ला अनेकदा सुचवून पाहिले, पण त्यांच्याकडून हवे ते फिचर सोडा, काहीच रिप्लाय येत नाही. सरकारने दबाव आणला की, अमुक एक दिवसात असे फिचर आणा नाहीतर भारतातून गाशा गुंडाळा तरच काहीतरी होईल.
बाय्दवे, #४ चा इशु आय्फोनमधे अॅटॉमॅटिकली "सायलेंस अन्नोन कॉलर्स" द्वारे अॅड्रेस होतो;>>> ते Android मध्ये पण आहे, पण ते पुरेसे नाही. असे एखादे सेटिंग हवे की unknown number वरचे मेसेज deliver होणारच नाहीत. पाठवणाऱ्याला दिसेल की, your messege could not be deliver as your number is not in recipient's address book. मग तू हवं तर call करून आधी तुझा नंबर सेव करायला सांग! (एकदा का त्याने normal call / sms केला की तो DND च्या कक्षेत आला! मग त्याची तक्रार करून वाट लावणे सोपे होते, दुर्दैवाने WA हे DND च्या कार्यकक्षेत येत नाही, त्याचाच फायदा घेतात हे ह** telemarketers /scammers)
स्टार बाझारला आणि बऱ्याच
स्टार बाझारला आणि बऱ्याच ठिकाणी मी माझा नंबर शेवटचे 4 अंक उलट सुलट करून सांगतो. म्हणजे समोरचा पण खुश आणि आपल्याला पण त्रास नाही.
स्टार बाझारला आणि बऱ्याच
स्टार बाझारला आणि बऱ्याच ठिकाणी मी माझा नंबर शेवटचे 4 अंक उलट सुलट करून सांगतो. म्हणजे समोरचा पण खुश आणि आपल्याला पण त्रास नाही.>>>
तुम्ही उलट सुलट केलेला क्रमांक दुसऱ्याचा कोणाचा असेल तर??? म्हणजे तुम्ही नकळतपणे त्याला त्रास देत आहात ना? उद्या मी पण हीच ट्रिक वापरली आणि माझ्या क्रमांकातील काही अंक बदलल्याने तयार झालेला नंबर नेमका तुमचा निघाला तर???
त्यापेक्षा नंबर द्यायचा नाही. 'बिल बनवायला नंबरची गरज नाही, जर ग्राहक उधारीवर सामान नेत नसेल तर नंबर घेण्याची काहीही गरज / अधिकार कोणत्याही स्टोअरला नाही' हा strong मेसेज जाऊ दे ना !!!!
नंबरची गरज नाही, पण बिलिंग
नंबरची गरज नाही, पण बिलिंग डिटेल्स मोबाईल नंबर युनिक आयडी वापरुन सेव्ह करतात बहुतेक. नेहमी जिथुन घेतो उदा. क्रोमा, पै इंटरनॅशनल तिथे मग पटकन बिलिंग होते. हेच मोबाईल नंबर ऐवजी इमेल आयडी युनिक आयडी वापरुन करता येईल खरं तर. पण होम डिलिव्हरी घेतली तर फोन नंबर द्यावा लागतो, डेलिवरी बॉयला पत्त्ता वगैरे सांगायला.
बाकी दुकान, रेस्टॉरंट्स वगैरे मध्ये, मी देत नाही. काही सुपर मार्कॅट्स मध्ये नंबर शिवाय बिलिंग होत नाही, त्यांना तुमचाच नंबर टाका सांगतो.
काही सुपर मार्कॅट्स मध्ये
काही सुपर मार्कॅट्स मध्ये नंबर शिवाय बिलिंग होत नाही>>>
यालाच तर माझा आक्षेप आहे. Right to Privacy नावाचा काही प्रकार आहे की नाही??? सरकारने यावर कायदेशीररित्या बंदी घातली पाहिजे. जर ग्राहक १००% payment करतो आहे, उधारीवर सामान नेत नाही तर नंबर मागायचा नाही. फारतर 'Would you like to register with us as our valuable customer' असे विचारून नंबर घेऊ देत, पण सक्ती नको!!! नाहीतर त्या सुपरमार्केटला त्यांच्या प्रवेशद्वाराजवळच लिहिणे बंधनकारक करावे की, या स्टोअरमध्ये खरेदीचे बिल बनवतांना ग्राहकास मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक आहे.
btw अशा सुपरमार्केट्स ची नावे सांगून ठेवा, चुकूनही पाय ठेवणार नाही, कितीही चांगल्या offers असल्या तरीही!!!
स्टोअरमध्ये खरेदीचे बिल
स्टोअरमध्ये खरेदीचे बिल बनवतांना ग्राहकास मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक आहे
हे फारच झाले.
Max मधे बिलाची सॉफ्ट कॉपी
Max मधे बिलाची सॉफ्ट कॉपी पाठवतात, त्याकरता फोन नंबर लागतो
BSNL ते कार्ड घेऊन घरामध्ये
BSNL ते कार्ड घेऊन घरामध्ये जिओचे वायफाय घ्या. खूप फिरत असाल तर बीएसएनएलची रेंज सर्वत्र आहे.
फोन सगळीकडे येतो .
स्मार्टफोन व गुगल वगैरे वापरायचे असेल तर घरी बसून वायफाय वापरावा.
रात्री बारा ते पहाटे पाच बीएसएनएल फ्री आहे. सरकारी आहे छुपे खर्च नाहीत.
स्क्रीन टाईम फिक्स आणि मर्यादित असेल तर बीएसएनएल चांगले.
Pages