मोहम्मद रफी !
भारतीय चित्रपटसंगीतात आधुनिक पार्श्वसंगीताचे शास्त्र विकसित करण्यात महत्वाचे योगदान असलेले आणि आता दंतकथा बनत चाललेले व्यक्तिमत्व. येत्या २४ डिसेंबरला रफीसाहेब ९९ वर्षे पूर्ण करून १०० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. केलं असतं असं म्हणायला पाहिजे खरं तर. पण रफीचा आवाज अद्याप जिवंत आहे, एक तत्त्व जिवंत आहे तर रफी आपल्यात नाही असे कसे म्हणता येईल ? देह नाहीसा झाला. पण रफी म्हटल्यावर जी ओळख आहे तो आवाज मानवजात असेतो कधीच नष्ट होणार नाही.
किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांना पुरूष गायकात अफाट लोकप्रियता लाभली. मुकेश हे तिसरे नाव. त्यांचीही जन्मशताब्दी आहे. दुर्दैवाने तिघेही साठीच्या आतच गेले. मोहम्मद रफी यांची आराधना नंतरची काही वर्षे खडतर गेली. पण धर्मेंद्रने पसंती दिल्याने असेल "आज मौसम" या गाण्याने रफी आणि धर्मेंद्र परतले. धर्मेंद्रने त्या वर्षी नऊ हिट सिनेमे दिले ज्यात चार चित्रपटात धर्मेंद्राने चोराची भूमिका केली होती. असे म्हणतात कि अमिताभ बच्चन स्टार बनण्यापूर्वी लोफर , जुगनू मुळे राजेश खन्नाचे स्टारडम धोक्यात आले. आणि जंजीरने त्यावर शिक्कामोर्तब केले.
याच दरम्यान लैला मजनू सुपरहीट झाला, गाणी सुपरहीट झाली आणि लोफरने परतलेल्या रफींची सेकंड इनिंग सुरू झाली. ती नंतर बहरतच चालली होती. पर्दा है पर्दा, शिर्डी वाले साईबाबा अशी आधुनिक हिरोंना साजेलशी गाणी मोहम्मद रफी देऊ लागले.
पूर्वीची मोहम्मद रफीची गाणी आणि आताच्या काळातली गाणी पाहिली तर एकूणच संगीतालाच आव्हानात्मक दिवस सुरू झाले होते. हाणामारीच्या सिनेमातल्या देमार हिरोंना किशोर कुमार हा मॅनली आवाज वाटू लागला होता. यातूनच हाथ कि सफाईच्या वेळी विनोद खन्नाला किशोरचा आवाज त्याला न देता रणधीर कपूरला दिल्याचा राग आला होता. विनोद खन्ना सीनीअर असला तरी रणधीर कपूर हिरो म्हणून सिनीअर होता. त्याच्या नावावर जवानी दिवानी सारखे बरेच हिट होते. राज कपूरचा मुलगा होता. साहजिक त्याची स्टार व्हॅल्यू त्या वेळी विनोद खन्ना पेक्षा जास्त होती. विनोद खन्ना नुकताच काळे धंदे सोडून सभ्य व्यवसाय करायला लागला होता. अर्थातच पडद्यावर. त्यामुळे त्या वेळचा स्टार गायक किशोर कुमार रणधीरच्या वाटेला गेला. रणधीर आरडी बर्मन मैत्री जगजाहीर होती आणि आरडी किशोरकुमार मैत्रीही. त्यामुळे रणधीर कपूर किशोर कुमार हे काँबो बनलेलं होतं.
विनोद खन्नाची समजूत स्वतः प्रकाश मेहरांनी काढली. जर गाणंं आवडलं नाही तर पुन्हा रेकॉर्डिंग करूयात असं आश्वासन पण दिलं. विनोद खन्नाने नाईलाजाने होकार दिला. रेकॉर्डिंगला रफीला बोलवलं. रफीसाहेबांनी विनोद खन्नाशी गप्पा मारल्या. त्याचं व्यक्तीमत्व लक्षात आलं आणि त्याला अनुसरून त्यांनी आपल्या आवाजाचा टोन निश्चित केला. ते गाणं रेकॉर्ड झाल्यावर प्रकाश मेहरा यांनी ऐकलं मात्र, विनोद खन्नाला ते बोलावून घेऊन आले. त्याला गाणं ऐकवलं . विनोद खन्नाचा रूसवा कुठल्या कुठे पळून गेला. चाणाक्ष वाचकांनी बरोब्बर ओळखलं. ते गाणं म्हणजे "वादा कर ले साजना". प्रकाश मेहारांच्या हाथ कि सफाई या सुपरहीट चित्रपटाचे सर्वात हिट गाणे.
या काळात रफीने ऋषीकपूरसाठी पण हिट गाणी दिली.
कुर्बानी मधे पुन्हा विनोद खन्ना साठी कुणाचा आवाज द्यायचा हा प्रश्न आला. कारण दुसरा हिरो खुद्द फिरोज खान. फिरोज खानने यापूर्वी किशोर कुमार आणि मुकेश असे दोन्ही आवाज वापरले होते. पण या चित्रपटात संगीतकाराने ठरवलं कि फिरोज खानला रफीचा आवाज वापरायचा."क्या देखते हो, सूरत तुम्हारी " हे गाणं होतं.
ज्या माणसाने आधुनिक पार्श्वगायनात लटके झटके, निसरडे स्वर आणले, आळोखे पिळोखे आणले तो स्वतः असताना कलाकारी आशा भोसलेने केली पण रफीने गाणे एकदम शिस्तीत म्हटले. कुठेच वरचे सूर नाहीत, व्हेरीएशन्स नाहीत, झटके नाहीत. संगीतकाराला कळेना. तेव्हां रफीसाहेबांनी सांगितलं कि शूटींग होऊन जाऊ दे, मग बोलू.
फिरोज खानवर गाणं चित्रीत झालं आणि मग सर्वांच्याच लक्षात आलं.
फिरोज खानची सवय होती कि तो हॉलिवूडच्या नायकांप्रमाणे तोंडातल्या तोंडात पुटपुटायचा. तो क्वचितच जबडा पूर्ण उघडायचा. गाण्यासाठी लिपसिंगिंग करतानाही त्याची हीच सवय होती. त्यामुळे गायकाने त्याप्रमाणे गाणं गायलं. झीनत अमान सुद्धा फार काही वेगळं करत नव्हती. पण किमान चेहरा बोलका असल्याने आशाने त्यात माफक कलाकारी केली.
अर्थात या गाण्यात झीनूबेबीचा त्या वेळचा पेहराव ( आता त्या ड्रेसला हॉट म्हणतात हे सांगितलं तर हसतील लोक. आताच्या पिढीला तर वाटेल "एव्हढे" कपडे घातलेल्या बाईला तुम्ही असे बोलायचा ? ) बघून क्या देखते हो या प्रश्नाला फिरोज खान जे उत्तर देतो, त्यावर झू ठा अशी एक ओळ हवी होती असे नेहमी वाटते. हा जोक इतक्यातच अन्यत्र मारलेला आहे, माजोफुगे वाटल्याने रिसायकल केला.
असे किस्से हजारो आहेत. रफींचा जीवनप्रवास मायबोलीवर येऊन गेलेला आहे.
कमेण्ट मधे आपण रफीची आवडती गाणी, त्यातली वैशिष्ट्ये, किस्से शेअर करत त्यांना अभिवादनही करू आणि हे जन्मशत्बादी वर्ष साजरे करूयात. असेच आणखी किस्से, संदर्भ कमेण्ट बॉक्स मधे येत जातील.
या वर्षात रफीसाहेबांच्या नातवाच्या रफी फाऊंडेशन तर्फे "सौ साल पहले" हा कार्यक्रम वर्षभर राबवला जाणार आहे.
https://www.google.com/search?q=rafi+centenanry+year+%2C+sau+saal+pehle+...
याबद्दलची अधिक माहिती.
https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/c...
या निमित्ताने षण्मुखानंद सभा, भारत सरकार, पोस्ट खाते यांच्या तर्फे जन्मशताब्दी वर्षाचा उद्घाटनाचा कार्यक्रम षण्मुखानंद हॉल मधे होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल या वेळी उपस्थित असणार आहेत. या प्रसंगी डाक खात्यातर्फे रफी यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट प्रकाशित केला जाणार आहे. तसेच पद्मविभूषण श्रीमती आशा भोसले यांना मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
https://allevents.in/mumbai/grand-inauguration-mohammed-rafi-birth-cente...
षण्मुखानंद हॉल मधे असा एक कार्यक्रम केल्याचे ऐकिवत आहे. सदर कार्यक्रमाला जमल्यास उपस्थित राहणार आहे. ही त्यांची अधिकृत वेबसाईट.
https://raficentenary.com/index.php/contact-us/
दास्तान ए रफी या नावाने रजनी आचार्य यांनी एक मेहनत घेऊन एक माहितीपट बनवला आहे. यात मोहम्मद रफी यांची दुर्मिळ माहिती आहे. रफी साहेब आणि सूफी फकीर यांचा नेमका किस्सा त्यांच्या भावाकडून ऐकायला मिळतो. अमृतसर जिल्ह्यातले त्या वेळच्या भारतात असलेले आता पाकिस्तानात असलेले सुलतान कोटला हे जन्मगाव, शाळा पहायला मिळते. शक्य झाले तर हा व्हिडीओ पहावा ही विनंती.
https://www.youtube.com/watch?v=akM5Ir1xamc
छान इण्ट्रो आणि किस्से.
छान इण्ट्रो आणि किस्से.
माझ्यासारख्या अनेकांची चित्रपटसंगीताची ओळख ही किशोर-सेण्ट्रिक होती. ८०ज व थोडी ७०ज मधल्या गाण्यांतून झालेली. तेव्हा "जुनी" गाणी म्हणून जी एकू येत ती बहुतांश रफीचीच असत पण ती आवडायला जी मॅच्युरिटी आवश्यक होती ती तोपर्यंत आलेली नव्हती. मग नंतर कधीतरी तो डोक्यातील स्विच ऑन झाला आणि मग खरा रफी भेटला. म्हणजे एखाद्याने राहुल द्रविडला वन डे मधे बघावे व त्यावरून आधी मत बनवावे आणि नंतर कसोटीतील द्रविड सापडावा तसे झाले.
अनेक गाण्यांबद्दल वाचायला आवडेल येथील जाणकारांकडून. काही सुचले तर लिहीनही.
फारएण्ड , तंतोतंत हेच लागू
फारएण्ड , तंतोतंत हेच लागू होतंय. अगदी लहान असताना किशोरकुमारचीच गाणी कानावर पडलीत. आराधना बाजूला राहूद्या, जंजीर सुद्धा माहिती नव्हता. शोलेची गाणी ऐकूनच संगीत माहिती झालेले. रफी समजायला, आकळायला आणि आवडायला सहस्त्रक संपता संपता गाठ पडली. त्या वेळी "जुनी" गाणी ही काळाच्या ओघात फार जुनी नसून दहा वीस वर्षेच मागे असतील आपण दुनियेत यायच्या असं वाटलं.
लहान असताना किशोरकुमारचीच
लहान असताना किशोरकुमारचीच गाणी कानावर पडलीत. >> +१
शिवाय किशोरकुमार १ नट म्हणूनही प्रसिद्ध होता आणि संगीताचे शिक्षण न घेताही इतका उत्तम गायचा, त्यामुळे त्याला थोडे जास्तच प्रेम मिळाले माझ्याकडून. कदाचित त्यामुळे असेल, पण रफीसाहेब थोडे दुर्लक्षित राहिले माझ्याकडून. नंतर नंतर त्यांची गाणी पण आवडू लागली. त्यांची दानशूरता, साधा स्वभाव याबद्दल वाचून मात्र त्यांच्याबद्दल खूपच आदर मनात आहे.
<< दास्तान ए रफी या नावाने रजनी आचार्य यांनी एक मेहनत घेऊन एक माहितीपट बनवला आहे. >> तुमचे कुणी नातलग आहेत का किंवा तुमचा डू आयडी?
दिल जो ना केह सका अतिशय
दिल जो ना केह सका अतिशय आवडीचे गाणे. समोर प्रदीपकुमार चा भावशून्य चेहेरा असून देखील रफी चा बुलंद आवाज गाण्यातल्या सगळ्या भावभावना पोहचवतो.
आपली प्रेयसी दुसर्याची झाली आहे याच दुःख सागर ऊठा लो दिल का किस को गम है ! आज दिल की किमत जाम से भी कम है म्हणत जो आवाज येतो.. आहाहा
तेव्हा "जुनी" गाणी म्हणून जी
रआ >>> चांगली माहिती.
तेव्हा "जुनी" गाणी म्हणून जी एकू येत ती बहुतांश रफीचीच असत पण ती आवडायला जी मॅच्युरिटी आवश्यक होती ती तोपर्यंत आलेली नव्हती. मग नंतर कधीतरी तो डोक्यातील स्विच ऑन झाला आणि मग खरा रफी भेटला.
>>>>> १००%
मनावर रफीचं गारूड व्हायला थोडा वेळ लागतो. पण एकदा ते झालं की तुमची सुटका नाहीच…
प्राजक्ता >>> अगदी अगदी.
भाभु, प्रकु वगैरे ठोकळ्यांच्या कारकिर्दीत रफी नसता तर ते कधीच घरी बसले असते.
मलाही लहानपणापासून
मलाही लहानपणापासून किशोरकुमारच आवडायचा आणि अजूनही रफीपेक्षा किशोरच कणभर जास्त 'आवडतो'. पण आवाज मात्र रफीचाच सर्वोत्तम आहे असं माझं मत आहे. किशोरकुमारचा आवाज जास्त जवळचा वाटतो, रफीचा स्वर्गीय आहे.
'गाईड'ची गाणी, शम्मी कपूरची असंख्य गाणी, 'अभी ना जाओ छोडकर' सारखं दैवी गाणं आणि अशी किती तरी गाणी रफीनेच गावी आणि आपण ऐकावी.
भारत भूषण, विश्वजित, जॉय मुखर्जी, प्रदीपकुमार आणि तत्सम लोकांनी घरात रफीचा पुतळा उभारून त्याची पूजा केली पाहिजे अशा अर्थाचं ( फारएण्डचं?) वाक्य मागे मायबोलीवरच वाचलं होतं ते मला १०१% पटतं.
छान किस्से!
छान किस्से!
लहानपणी गाण्यांमागचा गायक आणि संगीतकार ओळखायची किंवा शोधायची अक्कल नुकतीच येऊ लागते त्या वयात आयुष्यातला पहिला आवडीचा गायक सोनू निगम झाला आणि पुढे अमुक तमुक गाणी मोहम्मद रफींची हे सुद्धा सोनू निगममुळे माहीत झाले
कॉलेज चे दिवस आठवले. किशोर
कॉलेज चे दिवस आठवले. किशोर फॅन्स आणि रफी फॅन्स असे दोन गट असायचे. मग लेक्चर नसताना एखाद्या कोपऱ्यात जमून किशोरच्या अमुक गाण्याला जबाब म्हणून रफीचे तमुक गाणे किती श्रेष्ठ अशी चर्चा व्हायची. त्या काळात रफी खूप ऐकला. त्याच्या गाण्यांची सूची बनवली होती. निःसंशय पार्श्वगायकातील अढळ तारा म्हणजे रफी. मग त्याचे किस्से वाचताना तो माणूस म्हणून किती महान होता हे समजले. फार लवकर गेला. त्याला स्वतःच्या भ्रष्ट नकला (शब्बीर/मुन्ना/अन्वर) ऐकायला लागल्या नाहीत हे त्याचे भाग्य
बऱ्याच वेगवेगळ्या गायकांची
बऱ्याच वेगवेगळ्या गायकांची गाणी आवडतात पण रफी सर्वोच्च स्थानावर आहे ! नुसता एक स्वर्गीय गळ्याचा गायक म्हणून नाही, तर एक उत्तम व्यक्ती म्हणून सुद्धा!!
प्यासा, बैजू बावरा, गूंज उठी शहनाई... अशा कित्येक चित्रपटगीतांना क्वचितच कोणी गायक न्याय देऊ शकला असता!
राजेंद्र कुमार, प्रदीप कुमार, भारत भूषण (हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे म्हणा) सारख्या ठोकळेबाज नटांचं करिअर रफिमुळे फळफळलं.
राजेंद्र कुमार, प्रदीप कुमार,
राजेंद्र कुमार, प्रदीप कुमार, भारत भूषण > ह्या सर्वांसाठी कणेकरांनी समर्पक उपमा वापरली आहे ... माठ!
वावे - ते वाक्य समर्पक आहे पण
वावे - ते वाक्य समर्पक आहे पण माझे नाही
किशोरकुमारचा आवाज जास्त जवळचा वाटतो, रफीचा स्वर्गीय आहे. >> +१
किशोरकुमारचा आवाज जास्त जवळचा
किशोरकुमारचा आवाज जास्त जवळचा वाटतो, रफीचा स्वर्गीय आहे. >> +१
सुंदर परिचय आचार्य. रफीला मी मींडेचा बादशाह म्हणतो. एका स्वरावरून दुसर्या स्वरावर घसरगुंडीसारखं हळुवार घसरत जाणे याला शास्त्रीय संगीतात मींड म्हणतात. रफीच्या इतकी सफाईदार, नजाकतभरी, लोभस मींड मी कुणाचीच ऐकली नाही, अगदी भल्या भल्या शास्त्रीय गायकांचीही नाही. 'ता---रीफ करूं क्या उसकी'तल्या ता--- वरची मींड तर कुणालाही सहज आठवेल आणि भुरळ पाडेल. ओ मेरे शाह-ए-खुबा गाण्यात ओ मेरी जा---नेजाना - इथे त्या जा--- वरची मींड पहा. इशारों इशारों गाण्यात रफी निगाहों निगाहों---- हे जितक्या सुंदर प्रकारे म्हणतो, त्यातल्या हों--- वरच्या मींडेसकट, ते बाकी कुणाला जमेलसं वाटत नाही. ह्याच गाण्यात, किंवा आशा-रफीच्या कुठल्याही युगलगीतात नीट ऐकून बघा. आशाने अनेक भावभावना आणल्या आहेत, हे खरंच, पण त्यात बर्याच ठिकाणी गायकी दिसते (ती बोजड न वाटता सहज वाटते हे आशाचं वैशिष्ट्य); या उलट रफीने खटके, मुरक्या वगैरे न घेता केवळ मींडेच्या जोरावर ती गाणी उचलून धरली आहेत. तीही इतक्या सशक्तपणे, की आपल्याला ऐकताना दोघांपैकी कुणी एक वरचढ आहे असं अजिबात जाणवणार नाही.
आ---पके हसी---न रुख पे आज नया नूर है, मेरा दि---ल मचल गया तो मे----रा क्या--- कसूर है -> इथे --- असलेल्या सगळ्या ठिकाणी जी जादू केली आहे, ती अफलातून आहे. अभी ना जाओ छोडकर हे वावे म्हणतात तसं दैवी आहेच, पण ह्यात मींड भरभरून वापरली आहे. ती चांगली जमली नाही, तर त्या गाण्याची मजा निघून जाते. किंबहुना, रफीच्या ही सगळी गाणी मींड न वापरता गाऊन बघा (जिन्यातून उतरणे आणि घसरगुंडीवरून उतरणे - हा जो फरक आहे, तो), ती अजिबात रफीची वाटणार नाहीत. मींड हा रफीचा केवळ यूएस्पी नाही; उलट मी म्हणेन की मींड कशी घ्यावी हे रफीने जगाला शिकवले.
रफीचा आवाज लाभलेला शेवटचा
रफीचा आवाज लाभलेला शेवटचा हीरो कोण असावा? त्याचे शेवटचे गाणे हे "आसपास" मधले आहे हे वाचले आहे. पण शेवटचा हीरो म्हणजे - त्यानंतर पदार्पण केलेल्या कोणालाही रफीचा आवाज नाही - असा कोण असेल? अनेक नवोदित हीरोज आणि स्टारपुत्र यांचे पदार्पण साधारण १९८१ पासून पुढे झाले (संजय दत्त, कुमार गौरव, नंतर सनी ई). यातील कोणालाच रफीचा आवाज नसावा.
मिड-७०ज मधे मिथुन आला. त्याला आहे. त्यानंतर कोणी होता का बघायला पाहिजे. हम किसीसे कम नही मधे तारिक आहे (क्या हुवा तेरा वादा) पण तो त्या आधी यादोंकी बारात मधेही होता. साधारण १९७७-१९८० च्या दरम्यान कोणी नवोदित आला असेल तर शक्य आहे.
रफी गेल्यानंतर दहा वर्षांनी
हपा, सुंदर प्रतिसाद.
सर्वांचे प्रतिसाद वाचले. छान भर घालत आहात सगळे जण.
फारएण्ड,
रफीचे एक गाणे मनासारखे न झाल्याने रफीने आपण नंतर पुन्हा रेकॉर्ड करू म्हणून ठेवून दिले होते. पण नियतीने पुन्हा संधीच दिली नाही. हे गाणे दहा वर्षांनी गोविंदा नीलमवर फर्क कि जंग या चित्रपटात वापरले.
गाण्याचे बोल - फूल का शबाब क्या,
त्या आधी चार वर्षांपूर्वी एक गाणे रिलीज झाले होते ( मृत्यूनंतर सहा वर्षांनी) तेव्हा त्याची जाहीरात झालेली होती. मृत्यूनंतर चार पाच गाणी पाच सहा महिन्यात रिलीज झाली होती. प्रत्येकाने हे रफीचे शेवटचे गाणे असा दावा केला होता.
जिन्यातून उतरणे आणि
जिन्यातून उतरणे आणि घसरगुंडीवरून उतरणे
@हपा >>> सुंदर वर्णन. रफीची गाणी ऐकायला सोपी वाटतात आणि म्हणायला गेले कि कळते 'ये अपने बस कि बात नाही'. 'हैं दुनिया उसी की' गाण्यात पण मींड वापरली आहे का?
एखादी स्वतंत्र पोस्ट करा ना तुम्हाला उमजलेल्या गाण्यांची.
मिंड प्रत्येक गाण्यात असते.
मिंड प्रत्येक गाण्यात असते. दोन डॉट्सना जोडणारा ग्लाईडर सारखा आवाजाचा पूल म्हणजे मिंड. तो जितका वळणदार तितके ऐकायला छान वाटते. याच्या पेक्षा जास्त माहिती नाही याबद्दल.
>>>>>>एखादी स्वतंत्र पोस्ट
>>>>>>एखादी स्वतंत्र पोस्ट करा ना तुम्हाला उमजलेल्या गाण्यांची.
+१
थँक्यू आचार्य, MazeMan, आणि
थँक्यू आचार्य, MazeMan, आणि सामो. सवडीने नक्की लिहीन एक वेगळा धागा काढून. Actually मामींचा एक धागा आहे - चित्रपट गीतातील सौंदर्यस्थळे की तत्सम काहीतरी. तोही छान आहे धागा.
सोनू निगम रफीबद्दल..
सोनू निगम रफीबद्दल..
१. https://www.youtube.com/watch?v=-LmYWHnL4bw
२. https://www.youtube.com/watch?v=yrrrfPZYupo
दुसर्या लिंक मधे आर जे अनमोल श्रोता कसा नसावा याचा वस्तुपाठ देतोय. सोनू रफीबद्दल बोलणार आहे, गायकीबद्दल बोलणार आहे हे त्याला आधीपासून माहिती असेल तर कार्यक्रमात त्याला डिस्टर्ब न करण्याचे नियोजन त्या वाहिनीला करता आले असते. हे एक.
दुसरे दाद देताना ओवर रिअॅक्ट होणे, काहीच्या काही दाद देणे यामुळे सुद्धा सांगणार्याचा फ्लो खंडीत होतो. सोनूच्या मुलाखती पाहिल्या तर लोकांच्या वागणुकीवर इतक्या बारीक टिप्पण्या असतात कि आर जे अनमोलचे वागणे त्याला नक्कीच खटकले असेल.
“ प्रदीपकुमार, भारतभुषण,
“ प्रदीपकुमार, भारतभुषण, विश्वजीत, राजेंद्र कुमार, जॉय मुखर्जी ई. तमाम मंडळींनी त्यांच्या घरात एक रफी चा मोठ्ठा पुतळा उभारून त्याची रोज पूजा करायला हवी होती असं वाटतं. त्याच्या गात्या गळ्यावर ह्या कित्येकांची खाती पोटं भरली आणी सुटली. ” - वावे, ही घ्या, तुम्ही संदर्भ दिलेली पोस्ट.
फेफ यांची पोस्ट आहे ही.
फेफ यांची पोस्ट आहे ही. काहीच्या काही सीन वर ?
ते वाक्य जबरी आहे फा. संदर्भ
ते वाक्य जबरी आहे फा. संदर्भ दिल्याबद्दल वावे आणि शोधून काढल्याबद्दल फेफ यांचे आभार.
ओह सॉरी, फेफची आहे का?
>>>>>. रफीसाहेबांनी विनोद
>>>>>. रफीसाहेबांनी विनोद खन्नाशी गप्पा मारल्या. .................. विनोद खन्नाचा रूसवा कुठल्या कुठे पळून गेला.
वाह!! हे असे किस्से माहीत नसतात हो. प्लीज लिहीत जा ना.
लेख अगदी समयोचित व मस्त झालेला आहे.
नेहमी, पहील्यांदा मी कमेन्टस वाचते व नंतर लेख. त्यामुळे हपांना आधी कमेन्ट दिली गेली.
ह पा काय आठवण काढलीत आपके
ह पा काय आठवण काढलीत आपके हसीन रूख पे...खूप खूप आवडत गाण आहे
असच अजुन एक गाण आठवल रूख से जरा नकाब हटा दो मेरे हुजूर .. रूख से नंतर जो छोटासा पाॅज आहे नंतर एकदमच गाण आणी ठेका सुरू होतो
HappySubmitted by फेरफटका on
HappySubmitted by फेरफटका on 22 December, 2023 - 19:34 > येस, हीच ती पोस्ट. कुठल्या धाग्यावर आहे?
मस्त चर्चाप्रस्ताव आणि किस्से
मस्त चर्चाप्रस्ताव आणि किस्से.
हपा, नेहमीप्रमाणेच वाचनीय आणि माहितीपर पोस्ट.
>>> प्रदीपकुमार, भारतभुषण, विश्वजीत, राजेंद्र कुमार, जॉय मुखर्जी ई. तमाम मंडळींनी त्यांच्या घरात एक रफी चा मोठ्ठा पुतळा उभारून
मला वाटलं हे सगळे रफीचे पुतळे होते असं म्हणताय.
'हैं दुनिया उसी की' >> ह्याला
'हैं दुनिया उसी की' >> ह्याला उत्तर द्यायचं राहून गेलं. हो, या गाण्यातही आहेत. कडव्यांमध्ये जास्त दिसतात.
ब्रह्मचारी सिनेमातील रफीचे '
ब्रह्मचारी सिनेमातील रफीचे ' कोई प्यार हमेभी करता है, हमपर भी कोई मरता है' हे गाणे मला प्रचंड आवडतं. सुरवात मंद्र सप्तकात आहे आणि चौथ्या ओळीत 'मोहब्बत के खुदा हम है' ला सूर एकदम टिपेला जातो. विशेषतः 'खुदा' हा शब्द ३-४ वेळेला गाऊन ज्या हरकती घेतल्या आहेत त्या केवळ रफीच घेऊ जाणे!
तसंच 'दिल तेरा दीवाना है सनम' हे लताबरोबरचं गाणं. लता-रफी युगलगीतात रफी लतापेक्षा काकणभर जास्त सरस ठरतो हे माझं वैयक्तिक मत. या गीतात रफीने कमाल केली आहे. सुरवातीच्या बोलांपासून ते स्वरातील हरकतीतून त्याने लताला या गाण्यात पूर्ण झाकोळलं आहे. विशेषतः कडव्यांमधे जिथे सूर टिपेला जातो तिथे रफीचा आवाज कमालीचा सहज तर लताचा ताणलेला येतो.
रफी - आशा युगलगीतात दोघे समान वाटतात कारण आशाही स्वरातून बर्याच हरकती, लय, भाव यांची करामत दाखवते.
“ येस, हीच ती पोस्ट. कुठल्या
“ येस, हीच ती पोस्ट. कुठल्या धाग्यावर आहे?” -
वावे, https://www.maayboli.com/node/2242/by_subject
पान नं. ५७ वर आहे.
मन रे तू काहे ना धीर धरे -
मन रे तू काहे ना धीर धरे - स्वर्गीय गायन!
Pages