![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2023/12/22/1596173745Retroscope_-_Post_%281%29-853X543.jpg)
मोहम्मद रफी !
भारतीय चित्रपटसंगीतात आधुनिक पार्श्वसंगीताचे शास्त्र विकसित करण्यात महत्वाचे योगदान असलेले आणि आता दंतकथा बनत चाललेले व्यक्तिमत्व. येत्या २४ डिसेंबरला रफीसाहेब ९९ वर्षे पूर्ण करून १०० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. केलं असतं असं म्हणायला पाहिजे खरं तर. पण रफीचा आवाज अद्याप जिवंत आहे, एक तत्त्व जिवंत आहे तर रफी आपल्यात नाही असे कसे म्हणता येईल ? देह नाहीसा झाला. पण रफी म्हटल्यावर जी ओळख आहे तो आवाज मानवजात असेतो कधीच नष्ट होणार नाही.
किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांना पुरूष गायकात अफाट लोकप्रियता लाभली. मुकेश हे तिसरे नाव. त्यांचीही जन्मशताब्दी आहे. दुर्दैवाने तिघेही साठीच्या आतच गेले. मोहम्मद रफी यांची आराधना नंतरची काही वर्षे खडतर गेली. पण धर्मेंद्रने पसंती दिल्याने असेल "आज मौसम" या गाण्याने रफी आणि धर्मेंद्र परतले. धर्मेंद्रने त्या वर्षी नऊ हिट सिनेमे दिले ज्यात चार चित्रपटात धर्मेंद्राने चोराची भूमिका केली होती. असे म्हणतात कि अमिताभ बच्चन स्टार बनण्यापूर्वी लोफर , जुगनू मुळे राजेश खन्नाचे स्टारडम धोक्यात आले. आणि जंजीरने त्यावर शिक्कामोर्तब केले.
याच दरम्यान लैला मजनू सुपरहीट झाला, गाणी सुपरहीट झाली आणि लोफरने परतलेल्या रफींची सेकंड इनिंग सुरू झाली. ती नंतर बहरतच चालली होती. पर्दा है पर्दा, शिर्डी वाले साईबाबा अशी आधुनिक हिरोंना साजेलशी गाणी मोहम्मद रफी देऊ लागले.
पूर्वीची मोहम्मद रफीची गाणी आणि आताच्या काळातली गाणी पाहिली तर एकूणच संगीतालाच आव्हानात्मक दिवस सुरू झाले होते. हाणामारीच्या सिनेमातल्या देमार हिरोंना किशोर कुमार हा मॅनली आवाज वाटू लागला होता. यातूनच हाथ कि सफाईच्या वेळी विनोद खन्नाला किशोरचा आवाज त्याला न देता रणधीर कपूरला दिल्याचा राग आला होता. विनोद खन्ना सीनीअर असला तरी रणधीर कपूर हिरो म्हणून सिनीअर होता. त्याच्या नावावर जवानी दिवानी सारखे बरेच हिट होते. राज कपूरचा मुलगा होता. साहजिक त्याची स्टार व्हॅल्यू त्या वेळी विनोद खन्ना पेक्षा जास्त होती. विनोद खन्ना नुकताच काळे धंदे सोडून सभ्य व्यवसाय करायला लागला होता. अर्थातच पडद्यावर. त्यामुळे त्या वेळचा स्टार गायक किशोर कुमार रणधीरच्या वाटेला गेला. रणधीर आरडी बर्मन मैत्री जगजाहीर होती आणि आरडी किशोरकुमार मैत्रीही. त्यामुळे रणधीर कपूर किशोर कुमार हे काँबो बनलेलं होतं.
विनोद खन्नाची समजूत स्वतः प्रकाश मेहरांनी काढली. जर गाणंं आवडलं नाही तर पुन्हा रेकॉर्डिंग करूयात असं आश्वासन पण दिलं. विनोद खन्नाने नाईलाजाने होकार दिला. रेकॉर्डिंगला रफीला बोलवलं. रफीसाहेबांनी विनोद खन्नाशी गप्पा मारल्या. त्याचं व्यक्तीमत्व लक्षात आलं आणि त्याला अनुसरून त्यांनी आपल्या आवाजाचा टोन निश्चित केला. ते गाणं रेकॉर्ड झाल्यावर प्रकाश मेहरा यांनी ऐकलं मात्र, विनोद खन्नाला ते बोलावून घेऊन आले. त्याला गाणं ऐकवलं . विनोद खन्नाचा रूसवा कुठल्या कुठे पळून गेला. चाणाक्ष वाचकांनी बरोब्बर ओळखलं. ते गाणं म्हणजे "वादा कर ले साजना". प्रकाश मेहारांच्या हाथ कि सफाई या सुपरहीट चित्रपटाचे सर्वात हिट गाणे.
या काळात रफीने ऋषीकपूरसाठी पण हिट गाणी दिली.
कुर्बानी मधे पुन्हा विनोद खन्ना साठी कुणाचा आवाज द्यायचा हा प्रश्न आला. कारण दुसरा हिरो खुद्द फिरोज खान. फिरोज खानने यापूर्वी किशोर कुमार आणि मुकेश असे दोन्ही आवाज वापरले होते. पण या चित्रपटात संगीतकाराने ठरवलं कि फिरोज खानला रफीचा आवाज वापरायचा."क्या देखते हो, सूरत तुम्हारी " हे गाणं होतं.
ज्या माणसाने आधुनिक पार्श्वगायनात लटके झटके, निसरडे स्वर आणले, आळोखे पिळोखे आणले तो स्वतः असताना कलाकारी आशा भोसलेने केली पण रफीने गाणे एकदम शिस्तीत म्हटले. कुठेच वरचे सूर नाहीत, व्हेरीएशन्स नाहीत, झटके नाहीत. संगीतकाराला कळेना. तेव्हां रफीसाहेबांनी सांगितलं कि शूटींग होऊन जाऊ दे, मग बोलू.
फिरोज खानवर गाणं चित्रीत झालं आणि मग सर्वांच्याच लक्षात आलं.
फिरोज खानची सवय होती कि तो हॉलिवूडच्या नायकांप्रमाणे तोंडातल्या तोंडात पुटपुटायचा. तो क्वचितच जबडा पूर्ण उघडायचा. गाण्यासाठी लिपसिंगिंग करतानाही त्याची हीच सवय होती. त्यामुळे गायकाने त्याप्रमाणे गाणं गायलं. झीनत अमान सुद्धा फार काही वेगळं करत नव्हती. पण किमान चेहरा बोलका असल्याने आशाने त्यात माफक कलाकारी केली.
अर्थात या गाण्यात झीनूबेबीचा त्या वेळचा पेहराव ( आता त्या ड्रेसला हॉट म्हणतात हे सांगितलं तर हसतील लोक. आताच्या पिढीला तर वाटेल "एव्हढे" कपडे घातलेल्या बाईला तुम्ही असे बोलायचा ? ) बघून क्या देखते हो या प्रश्नाला फिरोज खान जे उत्तर देतो, त्यावर झू ठा अशी एक ओळ हवी होती असे नेहमी वाटते. हा जोक इतक्यातच अन्यत्र मारलेला आहे, माजोफुगे वाटल्याने रिसायकल केला.
असे किस्से हजारो आहेत. रफींचा जीवनप्रवास मायबोलीवर येऊन गेलेला आहे.
कमेण्ट मधे आपण रफीची आवडती गाणी, त्यातली वैशिष्ट्ये, किस्से शेअर करत त्यांना अभिवादनही करू आणि हे जन्मशत्बादी वर्ष साजरे करूयात. असेच आणखी किस्से, संदर्भ कमेण्ट बॉक्स मधे येत जातील.
या वर्षात रफीसाहेबांच्या नातवाच्या रफी फाऊंडेशन तर्फे "सौ साल पहले" हा कार्यक्रम वर्षभर राबवला जाणार आहे.
https://www.google.com/search?q=rafi+centenanry+year+%2C+sau+saal+pehle+...
याबद्दलची अधिक माहिती.
https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/c...
या निमित्ताने षण्मुखानंद सभा, भारत सरकार, पोस्ट खाते यांच्या तर्फे जन्मशताब्दी वर्षाचा उद्घाटनाचा कार्यक्रम षण्मुखानंद हॉल मधे होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल या वेळी उपस्थित असणार आहेत. या प्रसंगी डाक खात्यातर्फे रफी यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट प्रकाशित केला जाणार आहे. तसेच पद्मविभूषण श्रीमती आशा भोसले यांना मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
https://allevents.in/mumbai/grand-inauguration-mohammed-rafi-birth-cente...
षण्मुखानंद हॉल मधे असा एक कार्यक्रम केल्याचे ऐकिवत आहे. सदर कार्यक्रमाला जमल्यास उपस्थित राहणार आहे. ही त्यांची अधिकृत वेबसाईट.
https://raficentenary.com/index.php/contact-us/
दास्तान ए रफी या नावाने रजनी आचार्य यांनी एक मेहनत घेऊन एक माहितीपट बनवला आहे. यात मोहम्मद रफी यांची दुर्मिळ माहिती आहे. रफी साहेब आणि सूफी फकीर यांचा नेमका किस्सा त्यांच्या भावाकडून ऐकायला मिळतो. अमृतसर जिल्ह्यातले त्या वेळच्या भारतात असलेले आता पाकिस्तानात असलेले सुलतान कोटला हे जन्मगाव, शाळा पहायला मिळते. शक्य झाले तर हा व्हिडीओ पहावा ही विनंती.
https://www.youtube.com/watch?v=akM5Ir1xamc
मुकुंद तुमचं निरीक्षण मस्तच
मुकुंद तुमचं निरीक्षण मस्तच आहे आणि गाणीही.
लिलया वरच्या - खालच्या पट्टीत विहरणारं एक गाणं म्हणजे ‘है दुनिया उसी की, जमाना उसी का’
त्यात कडव्याच्या मधेच रफी उंच सूर लावतो आणि पुढच्याच शब्दावर परत खालच्या पट्टीत उदा. ‘है सज़दे के काबिल’ नॉर्मल सुरात, मग ‘के जो बन गया हो’ चढत्या पट्टीत ‘तसबिर ए’ उतरत्या सुरांत आणि ‘जाना’ चढत्या सुरात, ‘करो एहतराम उसकी दीवानगी का’ नॉर्मल पट्टीत आणि हे सगळच्या सगळं ड्रंक शम्मी गातोय अशा स्वरांत….
Submitted by मुकुंद on 9
Submitted by मुकुंद on 9 November, 2024 - 12:04 >> सुरेख प्रतिसाद.
किशोरकुमारचा आवाज भाभू साठी वापरला गेलाय आणि शशीसाठी रफीचा.
किकुचं गाणं ऐकताना समोर भाभू ज्या काही पद्धतीने मेंडोलिन वाजवत होता त्यावरून त्याला कुत्र्याच्या डोक्यात खाजवणे आणि मेंडोलिन किंवा कोणतेही तंतूवाद्य वाजवणे एकच असावे असे वाटत असावे. ते बघायला नको म्हणून चेहर्याकडे पहावे तर भाव असे दिव्य आहेत कि त्याला कुणीतरी सांगितले कि "अरे भाभू, तुझी बायको बघ मवाल्यासोबत पळून चाललीय" यावर त्याने फक्त " हो का ? छान" म्हणावं.. असे विरक्तीपूर्ण भाव असलेल्या नवर्याला सदासंकटीकनपटी असलेली निरूपा राय बायको म्हणून शोभते.
तिला पाहणे ही सुद्धा शिक्षाच असल्याने त्यातल्या त्यात दोन लहान मुलं दिसली. ती ओळखीची वाटली. बहुतेक एक आमीर खान किंवा त्याचा भाऊ असावा. यावरून सिनेमा नासीर हुसैनचा असेल तर गाणे म्हटल्यावर हे नक्की हरवणार ही खात्री पटली.
मुद्दा असा कि
किशोरच्या आवाजात जे रेकॉर्डिंग आहे त्यात इको किंचित जास्त आहे. रिव्हर्ब किंचित जास्त असावे. रफीच्या गाण्यात ते नॉर्मल आहे. तरीही आवाजाच्या जोरावर ते गाणं जास्त मधाळ झालं आहे. शशी कपूरच्या अभिनेत्री मधल्या गाण्यात किकुच योग्य, पण इथे रफीच योग्य.
दोन्हीकडे अचूक वापर झाला आहे असे मला तरी वाटते.
“किशोरकुमारचा आवाज भाभू साठी
“किशोरकुमारचा आवाज भाभू साठी वापरला गेलाय आणि शशीसाठी रफीचा.”
असय होय! माझी गफलत झाली. मला उलट वाटले.
“ किकुचं गाणं ऐकताना समोर भाभू ज्या काही पद्धतीने मेंडोलिन वाजवत होता त्यावरून त्याला कुत्र्याच्या डोक्यात खाजवणे आणि मेंडोलिन किंवा कोणतेही तंतूवाद्य वाजवणे एकच असावे असे वाटत असावे. ते बघायला नको म्हणून चेहर्याकडे पहावे तर भाव असे दिव्य आहेत कि त्याला कुणीतरी सांगितले कि "अरे भाभू, तुझी बायको बघ मवाल्यासोबत पळून चाललीय" यावर त्याने फक्त " हो का ? छान" म्हणावं.”
रघु आचार्य!एकदम अचुक निरिक्षण!
![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
वावे, दोन्ही व्हर्जन छानच आहेत. अग दोघेही गाणारे दिग्गजच होते!
माझेमन. हो ग. पण अग तश्या त्याच्या कितीतरी सुंदर सुंदर गाण्यांची उदाहरणे इथे देता येतील. म्हटले ना , जागा अपुरी पडेल.( बाय द वे.. तुझ्या प्रोफाइलमधे “ शालजोडीतली गाणी“ हे वाचण्यात आले. मस्तच खुशखुशीत लिहीले आहेस! त्यावर प्रतिसाद देण्यासारखे खुप मटेरियल आहे. सवडीत लिहीन
)
इथे हे लिहिणे म्हणजे महापातक
इथे हे लिहिणे म्हणजे महापातक म्हणता येईल पण दोन्ही ओरिजनल पेक्षा मला तुम बीन जाऊ कहा चे हरिहरन व्हर्जन जास्ती आवडते.
र आ… आशा रफीबद्दल जे बोलली ते
र आ… आशा रफीबद्दल जे बोलली ते मी इथेच पहिल्यांदा वाचले. मला त्यात रफीचाच गौरव दिसतोय. रफीचा आवाज इतका बुलंद की सगळ्यांना सुट होत होता, आशाला बदलावा लागत होता हे रफीच्या आवाजाची गुणवत्ता दाखवते.
तिसरी मंझीलची गाणी रफीला आवडली नव्हती, ती त्याच्याकडुन करामतीने गाऊन घेतली गेली. नंतर ऐकवल्यावर त्याची नाराजी कमी झाली हे याआधी इतरांच्या तोंडीही ऐकलेय.
त्या काळात नट नटी गाण्यांच्या रेकॉर्डिंगला हजर राहात हे विविधभारतीवरच्या विविध कलाकारांच्या मुलाखतींमधुन ऐकायला मिळते. शम्मी पडद्यावर गाताना चित्रविचित्र हरकती करत असे. गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस तो त्याबरहुकुम गाऊन घेतही असावा.. तेच आशाने सांगितले असावे.
रफी खुप मोठा गायक असला तरी त्याचे पाय कायम जमिनीवर होते. त्याने कायम इतरांची कदर केली, योग्य तो सन्मान दिला. कोणाचा अपमान केला नाही. गरज बघुन केवळ १ रुपया घेऊन गाणे गायले हे इतक्या जणांच्या मुलाखतीतुन ऐकलेय की या माणसाच्या स्वभावाबद्दल आश्चर्य वाटते. असा गायक संगितकाराने दिलेल्या गाण्यात स्वतः काही बदल करेल हे संभवत नही. त्याने बदल सुचवल्याच्या काही गोष्टी मुलाखतींमधुन ऐकल्यात. ते बदल संगितकारांना मान्य झाले तरच तो तसे गायी.
माझ्या वडलांना त्याचा खुप चांगला अनुभव आला. माझे वडील हार्मोनियम बनवत. रफीच्या ऑर्डरची हार्मोनियम घेऊन ते जेव्हा त्याच्या बंगल्यावर गेले तेव्हा तो स्वतः गेटपाशी येऊन त्यांना आत घेउन गेला, चहापाणी करवले आणि तिथे फोटोग्राफर होता म्हणुन वडलांचा स्वतःसमवेत फोटो काढुन तो नंतर पाठवुन दिला. त्याला हे करायची काहीही गरज नव्हती. माझे वडिल खुप कलाकारांच्या घरी गेले पण असा अनुभव कुठेही आला नाही.
मला रफी आणि ऋषी कपूर
मला रफी आणि ऋषी कपूर कॉम्बिनेशन आवडतं. ऋषी कपूर स्वतः च गातोय एवढी जेल व्हायची रफीची गाणी . हम किसी से कम नहीं हे अतिशय आवडतं गाणं आहे.
मलापण 'क्या हुआ तेरा वादा' हे
मलापण 'क्या हुआ तेरा वादा' हे गाणं खूप आवडतं हम किसीसे कम नहीं मधलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
र आ लेख खूपच छान आहे, हे
र आ लेख खूपच छान आहे, हे लिहायचं राहिलं. साधना मस्तच किस्सा.
आशा रफीबद्दल जे बोलली ते मी
आशा रफीबद्दल जे बोलली ते मी इथेच पहिल्यांदा वाचले. मला त्यात रफीचाच गौरव दिसतोय >>> हे तुमचं मत आहे. तुमच्या मताशी सहमत नसलो तरी आदर आहे. तुम्ही पहिल्यांदाच वाचले हे सुद्धा शक्य आहे. अर्थात तुमच्याकडे नेट असेल आणि सर्च दिलात तर तुम्हाला या विषयावर भरपूर काही सापडेल. एनडीटिव्ही, इंडीयन आयडॉल हे तर टिव्हीवर दिसते.
दुसर्या एका धाग्यावर शम्मी कपूर रेकॉर्डिंगला का उपस्थित राहत असे तो किस्सा सांगितलेला आहे. कुठल्या ओळीवर तो काय करणार हे आधीच ठरलेले असे, ही चर्चा गायकाबरोबर करून त्या हरकतीला साजेशी हरकत गळ्यातून आलेली असावी असे त्याला वाटत असे. शम्मीने केलेली ही चर्चा संगीतकाराला सुद्धा मान्य असल्याने या अॅडीशन्स त्याच्या परवानगीने होत असत.
झी वर सारेगमप नावाच्या शो मधे वेगवेगळ्या संगीतकारांची मतं ऐकली. बर्याच संगीतकारांना त्यांच्या रचनेत बदल केलेला चालत नसे. गायकाने परवानगीने केला तर त्यांची हरकत नसते. गायकाने त्याला नेमून दिलेले काम करावे, चाल कशी लावायची ही सुद्धा कला आहे. तीत ढवळाढवळ म्हणजे त्या संगीतकाराला काही कळत नाही असे त्याला वाटू शकते. इथे लिहायचं टाळलं होतं, पण लता मंगेशकर या हटवादी / भांडखोर आहेत असे त्या वेळी अनेक जण म्हणत. ओ पी नय्यरने लता शिवाय संगीत दिलं. लता मंगेशकरचं आर के कँपमुळं बरंच वजन होतं. त्यामुळं लताशी कुणी पंगा घेत नसे. खखोदेजा.
संगीतकार उदय मुखर्जी यांनी
संगीतकार उदय मुखर्जी यांनी आशा भोसले यांच्या वक्तव्याबद्दल व्यक्त केलेलं मत.
https://www.youtube.com/watch?v=fKn0vWpsjU8
र आ उगीच कशाला शोधत बसायचे??
र आ उगीच कशाला शोधत बसायचे?? इथे वाचले, माझे मत लिहिले, विषय संपला… माझ्या कामांदरम्यान थोडा विरंगुळा म्हणुन मी इथे येते. बॅकग्राऊण्डवर श्रीपाद रेडिओ किंवा विविधभारती सुरु असते. वरचा तुम बीनजाऊ कहा वाचताना नेमके बॅकला तेच गाणे लागले होते. श्रीपाद रेडिओवर मिक्स करुन एक ओळ, कडवे रफी, किशोर असे लावतात..
लता मंगेशकरचं आर के कँपमुळं बरंच वजन होतं. त्यामुळं लताशी कुणी पंगा घेत नसे. खखोदेजा.>>>>>>
तिचे स्वतःचेच वजन सगळ्यात भारी होते, तिला कंपुची गरज नव्हती. हिरोइनी कॉन्ट्रक्ट साईन करताना गाणी लताच गाईल हे क्लॉज घालुन घ्यायच्या. अशा आत्मनिर्भर बाईला कुबड्या कशाला लागतील???
लता स्पष्टवक्ती व स्वमतांवर ठाम होती हे तिच्या मुलाखतींतुन दिसते. अशा व्यक्ती तशाही लोकप्रिय नसतात आणि त्यात स्त्री असे गुण बाळगत असेल तर तिच्यावर हटवादी/भांडखोर हा शिक्का बसतोच. लताच्या गुणवत्तेमुळे तिला ह्या शिक्क्यांची पर्वा करायची गरज नव्हती.
लता मंगेशकर कलाकार म्हणून
लता मंगेशकर कलाकार म्हणून ग्रेट असण्याबद्दल मी नेहमी लिहीलेलं आहे. ग्रेट कलाकार असणे आणि आपला हट्ट खरा करून घेणे, त्याला कुणाला विरोध न करता येणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. अर्थात हे सुद्धा मी तिथे अनुभवायला नव्हतो. ऐकून वाचूनच. शोधलं तर सापडेल.
सगळ्यांचे पाय मातीचे असतात.
सगळ्यांचे पाय मातीचे असतात. आपल्याला त्याचे काय?? आता दिवाना मस्ताना… आशा व रफीचे लागलेय. ती कोत्या मनाची आहे हे इथे वाचल्यामुळे त्या गाण्याचा आनंद कमी होणार आहे का??? आयुष्य आनंदात घालवावे.
तुमच्या मताचा आदर आहेच.
तुमच्या मताचा आदर आहेच.
एका पुरुषप्रधान इंडस्ट्रीमध्ये लता व आशाने फारशी मदत नसताना, गॉडफादर नसताना आपले स्थान निर्माण केले व तेही इतके ऊंच की लोकांनी खालुन मारलेले दगड त्यांच्यापर्यंत पोचणेही अशक्य झाले. शोषण करणारी इंडस्ट्री म्हणुन फेमस असलेल्या जागी एकल स्त्री म्हणुन वावरताना त्यांना काहीच त्रास झाला नसणार का? झाला असणार. गरज होती तोवर त्यांनी तो सहन केला. सामर्थ्य वाढल्यावर त्रास देणार्यांना त्यांनी उचलुन फेकुन दिले. लताने सि रामचंद्र, सलिल चौधरी इत्यादींची नावेही नंतर उच्चारली नाहीत, किती तो कृतघ्नपणा इत्यादी आरोप मीही वाचले. त्यामागे कारणे काय ते संबंधीत लोकांना माहित… त्यांनी कधी उघड केली नाहीत. बाकीचे नुसते तर्क करत राहिले. असो. आता सगळे पडद्याआड गेले.
आपल्याला मिठाईशी मतलब आहे
आपल्याला मिठाईशी मतलब आहे हलवाई कसा का असेना.
हे विषयांतराचे विषयांतर होतेय
हे विषयांतराचे विषयांतर होतेय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चर्चा वाचतेय.
चर्चा वाचतेय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
. ती कोत्या मनाची आहे हे इथे
. ती कोत्या मनाची आहे हे इथे वाचल्यामुळे त्या गाण्याचा आनंद कमी होणार आहे का??? आयुष्य आनंदात घालवावे. >>> यावर उत्तर देणार नव्हतो पण आता मूड झाला आहे. मी इथे दिलेली मतं ही टीव्हीवर आशा भोसले आणि लता मंगेशकर यांनी मांडलेली आहेत. त्यावर तुम्ही हे असं नाही असं असावं असं मत मांडलं. खरे तर यावर बाहेर भरपूर रणकंदन झालेलं आहे. किंवा रफीसाहेबांना आवाज बदलणे जमत नव्हते, इंप्रोव्हायजेशन जमत नव्हते असे बाष्कळ आरोप आशाने करावेत हे दु:खदायक आहे हा विषय होता. तुमच्या प्रतिसादात त्याला वेगळे वळण लागले. यामुळे पुढच्या प्रतिसादात लताचा विषय नाईलाजाने काढला.
यामुळे गाण्याचा आनंद कमी होतो किंवा आयुष्य दु:खात जाते असा संबंध कसा काय लावला हे काही केल्या समजले नाही. सोशल मीडीयात भरकटणे / भरकटवणे खूप असते. मात्र तुमचा प्रतिसाद इतका नकारार्थी आहे कि त्यामुळे तुम्ही दु:खी आहात हे सांगण्याची ही पद्धत आहे का ? तसे असेल तर ते लक्षात न येण्यासारखे नाही इतकेच सांगण्यासाठी हा खटाटोप. कुणाच्याही लक्षात येईल. फक्त सोडून द्यायचं कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न.
लता आशा ज्या काळात आपल्या कर्तृत्वाने पुढे आल्या तो काळच प्रतिभावान लोकांनी आपली जागा निर्माण करण्याचा होता. कुंदनलाल सैगल पासून कुणीही वाडवडलांपासून चालत आलेल्या घराणेशाहीचा बॉलिवूडमधे फायदा उचलणारे नव्हते.
त्या काळात बायका फिल्मलाईनमधे येत नसत. ज्या बायका गायनाच्या किंवा अभिनयाच्या क्षेत्रात आल्या त्यातल्या काही मुजरा होत असलेल्या परंपरेतून आल्या. गाणी म्हणायला कोठ्यावर जाऊन संगीतकारांनी शोधून आणल्या. नूरजहां या खानदानी होत्या. त्या पाकिस्तानात गेल्यावर इथे जी जागा निर्माण झाली ती लताने भरून काढली. संधी मुबलक होती तिचं सोनं करणारे कलाकार हवे होते फक्त.
रफी, मुकेश, मन्नाडे यातले कुणीही नेपोटिजम वर आलेले नाहीत. हेमंतकुमार, सचिन देव बर्मन , अशोककुमार यांचे बंगाली सर्कल होते. पण टॅलंटेड होते सारे.
थोडक्यात मुद्दा टॅलंटचा नसून वागणुकीचा आणि एखाद्याच्या मृत्यूनंतर केलेल्या बेताल आरोपांचा आहे. त्यासाठी वर एक लिंक दिलेली आहे. ती लिंक पाहिली तर यावर पुढे वाद (चांगल्या अर्थाने) होणार नाही.
तुमच्या मताचा अजूनही आदर आहेच. पण एका संगीतकाराला तसे वाटत नाही.
मात्र तुमचा प्रतिसाद इतका
मात्र तुमचा प्रतिसाद इतका नकारार्थी आहे कि त्यामुळे तुम्ही दु:खी आहात हे सांगण्याची ही पद्धत आहे का ? तसे असेल तर ते लक्षात न येण्यासारखे नाही इतकेच सांगण्यासाठी हा खटाटोप. कुणाच्याही लक्षात येईल. फक्त सोडून द्यायचं कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न>>>>>>>
माझ्या प्रतिसादात मी आशा जे रफीबद्दल बोलली ते रफीचेच कर्तृत्व दाखवणारे आहे असे म्हटले. ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे हे पाहणार्याच्या दृष्टीकोनावर ठरते. ग्लासातले द्रव्य तितकेच राहते.
लोक नेहमी लता, आशा वगैरे लोकांवर टिका करुन ते किती वाईट आहेत हे दाखवायचा प्रयत्न करतात. या टिकेचे धनी इतर क्षेत्रातले दिग्गजही आहेत पण ती नावे इथे घेत नाही, परत बिषय बदलल्याचे पातक माथी माराल.
या मोठ्या लोकांच्या कलेवर टिका केली जात नाही कारण ती फारशी होऊ शकत नाही असे प्राविण्य त्यांनी मिळवले आहे. मग व्यक्तीगत टिका करायची. किती वाईट आहेत, भांडकुदळ आहेत, अमुक आहेत तमुक आहेत..
यावरुन मी म्हटले की व्यक्तीगतरित्या मने कोती असली हे कळले तर त्यांनी गायलेल्या गाण्यांचा आनंद कमी होतो का?? तर त्यावरुन आता तुम्ही मला दु:खी ठरवतात आणि मी ते जाहिर करु इच्छिते असे तुम्ही म्हणताय… काय अफाट लॉजिक आहे तुमचे..
तुमचे मायबोलीवरचे प्रतिसाद मला कधीही फारशे कळले नाहीत. आता यापुढे समजुन घ्यायची तसदी घेणार नाही. तेवढी बौद्धिक कुवत आपली नाही असे आधी वाटायचे, आता त्याची खात्री पटली.
त्यामुळे धन्यवाद. या धाग्यावर परत येणे नाही त्यामुळे याला प्रतिसाद द्यायची तसदी घेऊ नये ही नम्र विनंती.
मग व्यक्तीगत टिका करायची.
मग व्यक्तीगत टिका करायची. किती वाईट आहेत, भांडकुदळ आहेत, अमुक आहेत तमुक आहेत.. >> इथे विषय एका मोठ्या कलाकाराने दुसर्या मोठ्या कलाकाराबद्दल केलेल्या कोत्या मनाच्या टीकेचा आहे. हे मी सांगितलेले तुम्हाला गौरवास्पद वाटले नाही, पण आशा भोसलेचे वक्तव्य गौरवास्पद आहे असे वाटले आणि ते तुम्ही "पटवून" द्यायचा प्रयत्न करत आहात" . तुम्हाला त्याच वेळी समजेल अशा भाषेत तुमच्या म्हणण्याशी सहमत नाही हे सांगितले होते. पुन्हा त्यावर प्रतिसाद देण्याची गरज नव्हती हे माझे मत. आग्रह नाही.
ज्या विषयावर बाहेर रणकंदन झालेले आहे तो विषय इथे पहिल्यांदाच समजला असे म्हणण्यामागे इनोसन्स सुद्धा असू शकतो किंवा मग असे कुठेही काहीही नसताना तुम्ही बळेच वाद उकरून काढत आहात असे सांगण्याचा प्रयत्न असतो. इनोसन्स असेल हे एक दोनदा समजू शकते. पण गेली अनेक वर्षे मायबोली वाचत असल्याने कोण इनोसन्ट आहे कोण कसे आहे याचे ठोकताळे बांधणे अवघड नसावे.
आपल्याला प्रतिसादाला उत्तर नको असेल तर प्रतिसाद न देणे हा राजमार्ग आहे. आशा भोसलेंच्या वक्तव्याने माझा गैरसमज झाला असेल हे एकवेळ मान्य करूयात पण वर दिलेल्या लिंकवर एका संगीतकाराचे म्हणणे ऐकता येतेय. आणि एकच नाही तर गेल्या काही वर्षात अशी अनेक वक्तव्ये केलेली आहेत. आशा भोसलेंच्या म्हणण्याचा समाचार अनेकांनी घेतलेला आहे. (तुम्ही पहिल्यांदा इथेच वाचले हे मान्य करून आणि त्याचा आदर करूनही).
पहिल्यांदाच ऐकलेले असताना ठामपणे वाद का घालावा हे समजत नाही. माहिती करून घेण्याला बंधने कधीही नव्हती आणि नसतील. आपल्याला माहिती नाही यात समोरच्याचा काय दोष ? उलट माहिती नसताना "समजावणे" मजेशीर नाही का ? तुम्ही थांबत असाल तरी थांबतो, नसाल थांबत तरी थांबतो. मर्जी तुमची.
छान लेख..! तुम्हांला या
छान लेख..! तुम्हांला या विषयांत बरीच माहिती आहे ..
महंमद रफी आवडते गायक आहेत.. त्यांचा आवाज काळजाला हात घालणारा वाटतो नेहमीच..
" चाहूंगा मै तू तुझे सांज सवेरे ..! " ऐकताना मला रडू येतेच .. माहित नाही पण वडिलांची खूप आठवण येते .. कारण त्यांचं ते आवडतं गाणं होतं...
ओ पी ने लताशिवाय संगीत दिलं
ओ पी ने लताशिवाय संगीत दिलं यामध्ये मानापमानाचा भाग नव्हता, असं तो स्वतः तिचा आवाज मला ज्या पद्धतीचं संगीत द्यायचं त्यासाठी योग्य नव्हता. बहुधा sensuous हा शब्द त्याने वापरला होता. त्याच्याही मते सर्वश्रेष्ठ गायिका लताच.
आधी हृदयनाथ आणि आता आशा (आशाही आधीपासून बोलत असेल, मी आताच पाहिलं) विशेषतः आता हयात नसलेल्या लोकांबद्दल बरं नाही, असं बोलतात. लता कायम पोलिटिकली करेक्ट बोलत आली आहे. पोलिटिकली करेक्ट नसलेल्या गोष्टी आपल्या जवळच्या पत्रकारांमार्फत बोलली असावी.
एनडीटीव्हीच्या मुलाखतीत आशा ओपी बद्दल म्हणते आहे की माझा आवाज मिळाल्यावर त्यांचं संगीत बदललं, उच्च झालं. हे बरोबरच आहे. अनेक संगीतकार हे स्वतःच सांगत की लता गाणार म्हणून आम्हांला अनेक चाली करता आल्या. हे आशाबाबतही खरेच आहे. रफीबाबत तसं बोलताना ऐकलं नाही, पण असायला हवं.
आपल्या करियरला ओपी मुळे उंची आणि वेगळी दिशा मिळाली हे आशा नाकारू लागली. लताने सी रामचंद्र यांचं नाव टाकलं.
गाताना रडता येत नाही असं या दोघी म्हणतात, त्याचा रोख रफीकडे असावा , असं वाटतं.
शम्मी कपूर- रफी विषय निघाला आहे तर कश्मीर की कली मधलं ये चाँद सा रोशन चेहरा या गाण्यात मला तारीफ वर
हरकतीकसरती करायच्या आहेत, तर तू तशा हरकती घे, असं शम्मीने रफीला सांगितलं आणि रफीने ते ऐकलं.पुरुष गायकांत रफीला तोड नाही, हे माझं मत. स्त्री पुरुष भेद सोडला तर लता रफी आशा हे जवळपास एकाच उंचीला. आवाज , गायकी आणि गाण्यातले भाव हे निकष.
फक्त नौशादने संगीत दिलेल्या काही गाण्यांत रफीने काही शब्द हॅमर करून म्हटले आहेत, ते खटकतं. मन तरपत हरि दर- शन को आज, मेरे मेहबूबचं टायटल साँग . यात भाव जरा जास्तच ओतलाय. याचा दोष माझ्या मते नौशादचा. याच सिच्युएशनचं बरसात की रात चं टायटल साँग त्याने संयत गायलंय. दोन्ही गाण्यांचं लताचं व्हर्शन आहे हा एक योगायोग.
ओ पी ने लताशिवाय संगीत दिलं
ओ पी ने लताशिवाय संगीत दिलं यामध्ये मानापमानाचा भाग नव्हता, असं तो स्वतः तिचा आवाज मला ज्या पद्धतीचं संगीत द्यायचं त्यासाठी योग्य नव्हता. बहुधा sensuous हा शब्द त्याने वापरला होता. त्याच्याही मते सर्वश्रेष्ठ गायिका लताच.
>>>> अगदी परवाच एका एफएम स्टेशन वर ओपींच्या मुलाखतीचा हा भाग ऐकवला होता.
https://www.indiatvnews.com
https://www.indiatvnews.com/entertainment/celebrities/bollywood-s-expens...
कोण श्रेष्ठ कलाकार आहे याबद्दल इथे वाद नव्हता.
स्ट्रॉ मॅन ऑर्ग्युमेण्ट असेल.....
https://www.timesnownews.com/entertainment-news/bollywood/the-true-story...
लता - ओपी बद्दल मी हे अमीन
लता - ओपी बद्दल मी हे अमीन सायानीं - ओपींच्या गप्पांत ऐकलं आहे. तिथे त्यांनी आसमां या चित्रपटाचा उल्लेख केला नाही. खरा असेलही. ओपींनी मात्र कायम माझ्या संगीताला तिचा आवाज योग्य नाही, असंच सांगितलं.
लताच्या अमीन सायानींसोबतच्या गप्पांत तिने सांगितलेले की एका संगीतकाराकडून एक चित्रपट काढून घेऊन तो ओपींना दिला गेला आणि त्यांनी तो करू नये म्हणून सांगायला ती त्यांना भेटली. सोबत चित्रपट संगीत क्षेत्रातलंच कोणीतरी होतं. नक्की कोण, कधी ते आठवत नाही. गीतमाला पुन्हा ऐकावं लागेल.
अन्य रेकॉर्डिंगमध्ये अडकल्याने रफी एकदा ओपीच्या रेकॉर्डिंगला खूप उशिरा आला, त्याने तसे कळवलेही नाही. आणि रागावलेल्या ओपींनी तिथून रफीला घ्यायचे थांबवले. ती गाणी महेंद्र कपूरला मिळत. पुढे रफीने त्यांची माफी मागितल्यावर पुन्हा जोडी जमली.
आशामुळे ओपींच्या संगीताला नवा आयाम मिळाला. या दोघांनी एकत्र काम करायचं थांबवल्यावर त्यांनी दिलराज कौर , कृष्णा कल्ले, पुष्पा पागधरे यांच्यासोबत काम केलं. ती सर येणं शक्यच नव्हतं.
अन्य रेकॉर्डिंगमध्ये
अन्य रेकॉर्डिंगमध्ये अडकल्याने रफी एकदा ओपीच्या रेकॉर्डिंगला खूप उशिरा आला, त्याने तसे कळवलेही नाही. आणि रागावलेल्या ओपींनी तिथून रफीला घ्यायचे थांबवले. ती गाणी महेंद्र कपूरला मिळत. >>> टॅक्सी ट्रॅफिक जाम मधे अडकली होती. आधीच उशीर झाला होता. ओ पी नय्यर आधी लष्करात असल्याने त्यांना वेळेची शिस्त खूप महत्वाची वाटत असे. रफींनी एका दुकानासमोर टॅक्सी थांबवली आणि तिथून रेकॉर्डिंग स्टूडीओत फोन केला. त्यांनी सरळ आधीच्या रेकॉर्डिंगला उशीर झाल्याने वेळ पाळता आली नाही असे सांगितले. त्यावर ओपींनी माझ्यासाठी वेळ नसेल तर इथून पुढे तसदी घ्यायची गरज नाही. दहा वाजता रेकॉर्डिंग होतं. आता साडेदहा झाले आहेत. येईपर्यंत अजून वेळ होईल. यायची गरज नाही असे सांगितले.
यानंतर काही दिवसांनी मोहम्मद रफी यांनी नय्यर यांच्या घरी जाऊन माफी मागितली. महेंद्र कपूरला दुसरा रफी बनवण्याचा किस्सा बी आर चोप्रा यांचा. तीन वर्षे चोप्रासाहेबांचा राग गेला नव्हता. त्यामागे अन्य कारणे काहीही असली तरी यश चोप्रा यांनी पळून जाऊन लग्न केले तेव्हां मोहम्मद रफी यांनी त्यांच्या मोकळ्या घराची चावी दिली याची कुणकुण लागल्याने तो राग निमित्त पाहून काढला होता.
रफी म्हटलं कि मला नेहमी हे
रफी म्हटलं कि मला नेहमी हे गाणे आठवते,
"गुरुवर ब्रम्हा, गुरुवर विष्णू, गुरुवर देवो..."
<अन्य रेकॉर्डिंगमध्ये
<अन्य रेकॉर्डिंगमध्ये अडकल्याने रफी एकदा ओपीच्या रेकॉर्डिंगला खूप उशिरा आला, त्याने तसे कळवलेही नाही. आणि रागावलेल्या ओपींनी तिथून रफीला घ्यायचे थांबवले. ती गाणी महेंद्र कपूरला मिळत. > हेसुद्धा मी अमीन सायानी - ओपी मुलाखतीत ऐकलं आहे.
कोणत्याही घटनेची वेगवेगळी व्हर्शन्स प्रचलित व्हावीत यात नवल नाही. फिल्म म्युझिक इंडस्ट्रीतही कँप्स होते. अशी व्हर्शन पसरवण्यात त्यांचाही हात असेल. ओपी आर्मीत होते, असं कधी वाचनात आलं नाही. मदन मोहन होते.
संबंधितांपैकी एकाने
संबंधितांपैकी एकाने सांगितलेले अधिकृत समजले पाहिजे. जोपर्यंत संबंधितांपैकी दुसरा वेगळं सांगत नाही.
ओपी आणि लता च्या सांगण्यात थोडा फरक आहे.
ओपी आर्मीत होते, असं कधी
ओपी आर्मीत होते, असं कधी वाचनात आलं नाही.>> मोठा भाऊ कर्नल होता. वडिलांबद्दल माहिती मिळाली नाही. पण ते ब्रिटीश इंडियात लाहोर मधे लष्करात होते असे यूट्युबवर ऐकले आहे.
अन्नू कपूरने लष्करी पार्श्वभूमी असा उल्लेख केला असेल माझ्याकडून चूक झाली.
Pages