शीर्षक अगदी ढोबळ दिलेलं आहे. या लेखाला शीर्षक काय द्यावे हे समजत नाही. मुळात हा लेख लिहावा का ? प्रकाशित करावा का हे ही कळत नाही. गेल्या काही वर्षात काही धूमकेतूसारखे विचार येतात आणि दिसेनासे होतात. नंतर त्याचा मागमूस राहत नाही. पण पुन्हा काही काळाने नवा धूमकेतू दिसला कि जुन्यांची आठवण व्हावी तसा प्रकार आहे. या वेळी हे विचार मावळण्याच्या आत मांडावे असे वाटल्याने हा प्रपंच. याला आस्तिक नास्तिक संघर्ष म्हणायचे का हे वाचून ठरवावे. पण दिशा पाहून आत्मा ओळखून त्याप्रमाणे प्रतिसाद द्यावेत ही विनंती.
गेल्या काही वर्षात आपली वाटचाल पुन्हा अविवेकाकडे चालली आहे का अशी शंका यावी अशी परिस्थिती दिसत होती. अवैज्ञानिक गोष्टींचा झुंडीने प्रचार, त्याला विरोध करणार्यांचा असांसदीय भाषेत केलेला उद्धार यामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली होती.
या विरोधात सुरूवातीला क्षीण का होईना आवाज उठला. सत्य सांगणे गरजेचे असते. असे म्हणतात कि सत्याला प्रचाराची गरज नसते. कारण सत्य हे फक्त सत्य असते.
तुझं सत्य
माझं सत्य
याचं सत्य
त्याचं सत्य
असे सगळे वर्ख गळून पडतात तेव्हां उरतं ते निखळ सत्य.
पण सत्याचे पापुद्रे चढवून असत्य प्रसवलं जातं तेव्हां सत्य आणि असत्य यातला फरक समजणे जिकीरीचे होते. यातून स्युडो सायन्सचा उदय होतो. सायन्स हे दुसरे तिसरे काहीही नसून सत्याचा शोध आहे. हा शोध निरंतर आहे. आजचे सत्य उद्या कालबाह्य होते आणि नवेच सत्य समोर उभे ठाकते तेव्हां ते सत्य स्विकारणे हा दृष्टीकोण अंगिकारणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टी होय. ही वैज्ञानिक दृष्टी प्रस्थापित करणे मानवासाठी श्रेयस्कर आहे. त्याच बरोबर सदसदविवेकबुद्धीचा अंगिकार करणे हे ही श्रेयस्कर आहे.
वैज्ञानिक दृष्टीचा प्रचार आणि प्रसार होत गेला कि आपोआप स्युडो सायन्स, अवैज्ञानिक बाबींना आळा बसतो. त्यामुळे सत्यासाठी आवाज उठवणे खूप गरजेचे होते.
आपली जिथपर्यंत पोहोच आहे तिथपर्यंत आपले म्हणणे पोहोचले आहे असे रॅशनल कंपूला वाटत नाहीये का ?
आपले रॅशनल विचार आपल्या परीघात जिथपर्यंत पोहोचायचे तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. त्याचा त्यांच्यावर जो काही सकारात्मक / नकारात्मक परिणाम व्हायचा तो झालाच असेल.
ज्याप्रमाणे अवैज्ञानिक प्रचाराचा अतिरेक हा नॉशिया आणतो तसे उठता बसता रॅशनॅलिझमचा अतिरेकी प्रचार सुद्धा नॉशिया आणतो का ?
विचार आत्मसात व्हायला वेळ द्यावा लागतो. सतत मारा करून बुद्धीला विचार करायला वेळ मिळत नसेल तर मग ते पीअर प्रेशर ठरते. जे लोक स्वत:चे मत मांडायला कचरतात ते एकीकडून सनातनी आणि दुसरीकडून पुरोगामी यांच्या कचाट्यात सापडतात. त्यांना काय बरोबर काय चूक हे कळेनासे होते.
एक वेळ अशी येते की सनातनी प्रचारातली हवा निघून जाते. पुढे पुढे ही मंडळी पूर्वीच्या जोमात आणि जोशात तसला प्रचार करू शकत नाहीत. याचाच अर्थ त्यांचा स्वत:च्या कॅंपेनवरचा विश्वास उडालेला असतो. हवा गेलेली असते पण निव्वळ कंपूत असण्याने प्रचार करणे कर्तव्य उरलेले असते. ही वेळ घुसळणीची असते. अशा वेळी समाजाला वेळ द्यावा लागतो.
रोजच्या रोज नवे दैदीप्यमान विचार देऊन आपण सर्व काळ समाजाला दिपवू शकत नाही. उलट वारंवार तेच तेच विचार मांडत राहील्याने त्याला एक प्रकारचा रेझिस्टन्स तयार होतो. अती काहीच चांगलं नाही. मग ते उत्तम का असेना !
हल्ली श्रद्धेला सुद्धा वैज्ञानिक आधार देता येतो. सश्रद्ध मनुष्य सुद्धा आपल्या श्रद्धेला विज्ञानाशी जोडून घेऊ पाहतो. हे सगळेच बंडलबाज असतात असे मत बाळगणे हा विवेक नाही. कोण कुठल्या हेतूने आपले मत बनवतो हे तपासणे हा नीरक्षीरविवेक वैज्ञानिक दृष्टीकोणाच्या जोडीने बाळगणे हे शहाणपण आहे. तसेच आपल्या श्रद्धा तपासून घेत वैज्ञानिक दृष्टीकोणाला सोडचिट्ठी न देणे हे ही शहाणपण आहे.
कुणाच्या श्रद्धांवर रोज उठून आक्रमण करणे हे ही शहाणपण नाही. एखाद्याची श्रद्धा अत्यंत वैयक्तिक असेल, त्या श्रद्धेची सक्ती होत नसेल आणि एखादा व्यक्ती त्यात खूष असेल, त्याची भरभराट झाली आहे असा त्याचा समज असेल तर त्याच्या पर्सनल स्पेसवर अतिक्रमण करून त्याला चर्चेला भाग पाडून माझं हे मत स्विकारच असा दुराग्रह योग्य आहे असे वाटते का ?
आपली मतं कितीही अचूक असू द्यात ती आक्रस्ताळी होताहेत का ? आपण ज्या सनातनी विचारांना विरोध केला त्यातल्या आक्रस्ताळी प्रचारामुळेच त्या विचारांचे अवमूल्यन आपोआप होत असते. आक्रस्ताळीपणा ही रणनीती झाली. ती विचारांवर मात करते. विचार सत्याकडे झुकणारे असणे आणि सत्याची मांडणी चुकीच्या पद्धतीने करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. सत्याची सक्ती करता येत नाही. ते मांडले तर पाहिजेच पण कुणाच्या विचारांची मग ते चुकीचे का असेनात गळचेपी तर होत नाही ना हे पाहणे हे विवेकवादात येत नाही का ?
बद्रीनाथला पहाटे उठून गेलो होतो. बद्रीनाथचा संपूर्ण इतिहास माहिती होता. पण माझ्यासोबत जो साथीदार होता तो स्वत: मानसशास्त्रज्ञ होता. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याचा नातू आणि पुरोगामी विचारांशी नाते असणारा होता. पण वैयक्तिक जीवनात सश्रद्ध होता. त्याच्या साठी हजारो वर्षांचा इतिहास माहिती असणे गरजेचे नव्हते. मानसशास्त्रातले त्याचे योगदान वादातीत आहे. फावल्या वेळेत जाहीरात कंपन्यांसाठी मॉडेलिंग करणे हा छंद असल्याने सोशल मीडीयात जाऊन वैचारीक लढाया करणे, आपल्या मताचा हिरीरीने पुरस्कार करणे यापासून तो अलिप्त होता.
त्याने पहाटे तीनच्या थंडीत मंदीर उघडण्याची वाट बघत नदीच्या काठावर वाट पाहिली. त्याच्या सोबत मी सुद्धा होतो. थंडी मी म्हणत होती. मंदीर उघडले तेव्हां ठिकठिकाणचे साधू वगळता कुणीच नव्हते.
समोर बद्रीनाथाची मूर्ती होती. दिवे आले होते. त्याने हात जोडले. माझ्या डोळ्यासमोर हजारो वर्षांचा इतिहास होता. दीड हजार वर्षांची ऐतिहासिक मूर्ती समोर होती. त्याचे डोळे मिटलेले होते. चेहर्यावर आत्मिक समाधान दिसत होते. थोड्या वेळाने त्याचे डोळे उघडले तेव्हां दोन्ही डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. त्याच्या या भावना त्याच्या पुरत्या खर्या नाहीत का ? तो या भावनांचा प्रचार करणार नाहीये. त्याच्या श्रद्धांमुळे त्याची अवनती होणार नाही. तो मिश्रा आहे म्हणजे उच्चवर्णिय आहे. याचाच अर्थ या श्रद्धांमुळे त्याच्या निन्म सामाजिक दर्जाचे उदात्तीकरण होत नहीये. गुलामीत राहण्याचे कारण त्याच्याकडे नाही. मुख्यमंत्र्याचा नातू आणि प्रभावी राजकारणी घराणे अशी पार्श्वभूमी असल्याने त्याची श्रद्धा ही गांजल्यामुळे आलेली नाही.
तर मग खाजवून खरूज काढून तुझ्या डोळ्यातून अश्रू का आले म्हणून वाद घालण्यात अर्थ नसतो.
तंबूत पोहोचल्यावर त्याने त्याच्या मानसिक अवस्थेचे वर्णन करायचा प्रयत्न केला पण मला ती अवस्था सांगता येत नाही असे त्याचे म्हणणे होते. तो एका वेगळ्या तरल पातळीवर पोहोच ला होता.
महिनाभराने परतीच्या प्रवासात त्याने मला हात का जोडले नाहीत असे विचारले तेव्हां माझी स्थिती सांगितली. तेव्हां तो हसला आणि म्हणाला तुझ्या जागी तू योग्य आहेस. माझ्या जागी मी.
ही भूमिका आपण का स्विकारत नाही.
ज्यांना ही भूमिका लागू करणे धोक्याचे आहे ते सोडून इतरांसाठी आपण आपले म्हणणे सौम्यपणे का सांगू शकत नाही?
सध्या सोशल मीडीयात सनातन्यांना उत्तर देता देता तोच आक्रस्ताळीपणा आपल्यात सुद्धा आलेला आहे का असे वाटू लागले आहे.
काय वाटते ?
वैज्ञानिक चिकित्सा करून मगच
वैज्ञानिक चिकित्सा करून मगच विश्वास ठेवणारा आस्तिक माझ्या तरी बघण्यात आला नाही.
वैज्ञानिक चिकित्सा करून मगच
वैज्ञानिक चिकित्सा करून मगच विश्वास ठेवणारा
नास्तिक पण मी माझ्या पूर्ण आयुष्यात बघितला नाही.
फक्त आडगे पना,उगाचच विरोधी भूमिका, असेलच नास्तिक जास्त बघण्यात आले
वैज्ञानिक चिकित्सा करून मगच
वैज्ञानिक चिकित्सा करून मगच विश्वास ठेवणारा आस्तिक माझ्या तरी बघण्यात आला नाही.
Submitted by उपाशी बोका on 18 December, 2023 - 11:43
जर माझा असा विश्वास असेल / श्रद्धा असेल कि अमुक अमुक स्तोत्र म्हणाल्यामुळे किंवा काही पूजा अर्चना केल्यामुळे माझ्या मनाला शांती /समाधान लाभते, तर मी याची वैज्ञानिक चिकित्सा नक्की कशी करावी? नक्की कोणत्या विज्ञानात या चिकित्सेची कृती दिलेली आहे?
> असे एकंदर ढोबळ मानाने जे
> असे एकंदर ढोबळ मानाने जे वर्गीकरण गेले काही दिवस मा बो वर वाचायला मिळतंय त्याच हसू येतंय.
हसू का येतंय ?
लिव्ह अँड लेट लिव्ह.
एखाद्याने सत्यनारायण प्रसादला बोलावले तर तिथे न जाण्याचा पर्याय आहेच. पण तिथे जाऊन आपले ज्ञान प्रदर्शन करू नये अशा मताचा मी आहे.
कोणतेही धर्मग्रंथ 'देवाने' लिहिलेले नसून माणसांनीच ( बव्हंशी प्रिव्हिलेज्ड पुरुषांनी) लिहिले आहेत. तात्कालीन समाजाचे बयासेस वगैरे तिथे दिसून येतात. एखादा धर्मग्रंथ 'पाठ' करणे हा कालापव्यय आहे असे मला वाटते. पण इतर कुणालाही त्रास न देता काही लोक पाठ करत असतील तर गूड फॉर देम. त्यावर टीका करणे अयोग्य आहे.
एखाद्या नदीला चारेक महिने अनवाणी प्रदक्षिणा घालणे हेही पटत नाही. पण पुन्हा तेच, जोवर इतरांना त्रास न देता हे सारे होत आहे तोवर काहीच आक्षेप असायचे कारण नाही.
श्रद्धा ही श्रद्धा न रहाता D%$^ measuring contest होते तेव्हाच प्रॉब्लेम सुरू होतात. आमच्या सणाला नॉन व्हेज विकू नका वगैरे...
धन्यवाद सर्वांचे.
धन्यवाद सर्वांचे.
माझ्या मते हेडर मधे गैरसमज होईल असे काहीच लिहीलेले नाही. काटेकोरपणे क्रमांक टाकून अशा प्रकारचे मुद्दे टाकता येत नाहीत. नाहीतर ते नियम बनतात. आपल्या राज्यघटनेत न्यायदानात जज्जसाठी कोणत्या केस मधे काय निर्णय घ्यावेत याचे डूज अॅण्ड डोन्ट असे मार्गादर्शक पुस्तक बनवलेले नाही. तिथे जज्ज करणे हेच अपेक्षित आहे. ते जज्ज करणे विवेकावर आधारित असावे एव्हढी माफक अपेक्षा आहे.
त्याच प्रमाणे आपल्याला सश्रद्ध मनुष्य दिसला रे दिसला कि त्याला झोडायला सुरूवात करू नये. जोपर्यंत तो काही गुन्हा करतोय असे वाटत नाही तोपर्यंत त्याला जज्ज करू नये. जेव्हां तो आपला अजेण्डा रेटतोय असे वाटेल तेव्हां करा कि वादविवाद. एरव्ही त्याची इच्छा नसतानाही त्याला वादात ओढणे, उत्तरदायी बनवणे या गोष्टी आपणही करू लागलोय का हे आपले आपण पाहिले पाहिजे. या गोष्टी नियम म्हणून बनवता येत नाहीत. ते ज्याचं त्याचं शहाणपण आहे. वादविवाद करू नये, नास्तिकांनी बाजू मांडूच नये असे काही फर्मान काढलेले नाही.
अपेक्षा नास्तिकांकडून ठेवल्या आहेत. नास्तिक ऐवजी रॅशनॅलिस्ट, पुरोगामी, सत्यान्वेषक हे शब्द योग्य आहेत. या कंपूने सनातन्यांना उत्तर देता देता आपले वर्तन त्यांच्या सारखे ठेवू नये ही अपेक्षा ठेवली आहे. सनातन्यांचे सतत संशय घेणे, जे म्हटलेले नाही ते म्हटलेच आहे असे समजून हल्ला करणे, उत्तर द्यायला भाग पाडणे हे पुरोगाम्यांनी करणे अपेक्षित नाही. पुरोगामी मंडळाला विवेकाचे बंधन असले पाहिजे. त्याच त्याच आरोपांना तीच तीच उत्तरे रोजच्या रोज दिल्याने त्या कंपूची विश्वासार्हता, स्विकारार्हता पणाला लागते. अति काटेकोरपणाचा आग्रह सामान्यांना दूर लोटतो, अशा गोष्टींचा विचार व्हायला हवा आणि तो करून आपले विचार मांडता आले पाहिजेत इतकेच.
नास्तिक योग्य कि आस्तिक हा इथे विषय नाही.
ईश्वर आहे की नाही ह्याची
ईश्वर आहे की नाही ह्याची चिकित्सा कशी करायची .
ईश्वराची चिकिस्ता करण्या इतका माणूस हुशार आहे का?
हेमंत, धागालेखकाने काय लिहिले
हेमंत, धागालेखकाने काय लिहिले आहे वाचले का?
नास्तिक योग्य कि आस्तिक हा इथे विषय नाही.
"बुद्धीप्रामाण्य ही सर्वात
"बुद्धीप्रामाण्य ही सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे" असे माझा नास्तिक मित्र म्हणतो... त्याचे तर्कशास्त्र येथे पूर्ण लिहिण्याचा माझ्याकडे पेशंस नाही पण वाक्य खूप महत्त्वाचे आणि विचार करायला लावणार आहे हे निश्चित!
"आमच्या सणाला नॉन व्हेज विकू
"आमच्या सणाला नॉन व्हेज विकू नका वगैरे..." >> हा प्रतिसाद विकु यांनी लिहिला आहे
चांगला धागा आहे. चर्चेत आलेले
चांगला धागा आहे. चर्चेत आलेले मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. श्रद्धा या वैयक्तिक पातळीवर असाव्यात आणि त्यांचा कुणाला त्रास होईल असं वर्तन करू नये या मताशी सहमत.
आपली मतं दुसऱ्यावर लादावित का? सरसकट सगळे जण नाही म्हणतील. पण धर्म/पंथप्रसार करणारे आणि विज्ञानवादी दृष्टिकोनाचा प्रसार करणारे, दोघेही म्हणतील की लोककल्याण हा आमचा उद्देश आहे. हाच मार्ग बरोबर आहे, दुसरा चुकीचा. ह्या दोघांचंही हे वागणं पटत नाही. तुझं
आहेठेव तुजपाशी. जगा आणि जगू द्या.तुझं आहे ठेव तुजपाशी. जगा आणि
तुझं
आहेठेव तुजपाशी. जगा आणि जगू द्या.>>>आधी चुकून प्रतिसादच वाचल्याने
आधी चुकून प्रतिसादच वाचल्याने श्रद्धा कोणाला तरी त्रास देते आहे असा गैरसमज झाला
लेख चांगला आहे आचार्य.
आपली मतं कितीही अचूक असू द्यात ती आक्रस्ताळी होताहेत का ? >>> हे फक्त आस्तिक्/नास्तिक, धर्म वगैरे गोष्टींपुरतं मर्यादित राहिलं नाही आता असं मला वाटतं. हा एक स्थायीभाव झाला आहे आजकाल. आपल्यापेक्षा कोणाचं काही वेगळं मत असू शकतं हे मान्यच केलं जात नाही असंच खूप दिसतं आसपास.
धर्म/पंथप्रसार करणारे आणि
धर्म/पंथप्रसार करणारे आणि विज्ञानवादी दृष्टिकोनाचा प्रसार करणारे, दोघेही म्हणतील की लोककल्याण हा आमचा उद्देश आहे. हाच मार्ग बरोबर आहे, दुसरा चुकीचा. ह्या दोघांचंही हे वागणं पटत नाही. तुझं आहे ठेव तुजपाशी. जगा आणि जगू द्या.
>>>
पटले नाही. विज्ञानवादी/पुरोगामी आपले म्हणणे लादतात असे उदाहरण लगेच आठवत नाही. सातत्याने आपले म्हणणे मांडणे हे काही लादणे होत नाही. Cringe म्हणा, भंकस म्हणा, किरकिरे म्हणा पण "लादण्याचा" आरोप अगम्य आहे. त्याउलट धर्माच्या प्रभावामुळे सर्वच लोकांवर, धार्मिक वां अधार्मिक, बऱ्याच गोष्टी, नियम, अटी 'लादल्या ' जातात.
माणूस आणि यंत्र ह्या मध्ये
माणूस आणि यंत्र ह्या मध्ये खूप फरक आहे.
1) सर्वात मोठा फरक माणसाला भावना असतात,आणि माणसाला मन असते.
माणसाला स्किल शिकवू शकता,माणसाला माहिती देवू शकता पण .
माणसाचा स्वभाव ,श्रद्धा,मत ठरवून बदलू शकत नाही.
जगात खूप गोष्टी रोज घडतात त्याची उत्तर कोणाकडे च नसतात.
म्हणून ईश्वर आज पण अस्तित्वात आहे.
आस्तिक म्हणजे.
देव अस्तित्वात आहे है समजणारे.
आणि नास्तिक म्हणजे देव अस्तित्वात नाही है समजणारे.
इतकाच फरक अस्तिक ,नास्तिक मध्ये आहे.
आणि हे बदलायचा कोणीच प्रयत्न करू नये.
हाताला काही लागणार नाही.
कर्मकांड कायद्याने बंद करता येतात.
पण कर्मकांड म्हणजे काय?
आणि सर्व धर्मीय लोकांची कर्मकांड ह्याचा अभ्यास करून कायदा करता येवू शकतो.
हे प्रकरण खूप नाजूक आहे.
मी नवीन गाडी घेतली निर्जीव वस्तू असली तरी सूक्ष्म स्वरूपात गाडी कधीच निर्जीव असू शकतं नाही.
अशी माझी भावना आहे.
मी त्या गाडी ची पूजा केली, हार घातला,नारळ फोडला ..म्हणून अंध श्रदेचा ठपका नास्तिक लोक लावत असतील तर अयोग्य च आहे.
त्यांना तो अधिकार च नाही.
मतभेद इथेच होतात
रघु आचार्य जी नी पोस्ट मध्ये
रघु आचार्य जी नी पोस्ट मध्ये जे विचार व्यक्त केले आहेत ये फक्त आदर्श आहेत.
रिअल मध्ये त्यांचे विचार लागू होत नाहीत.
प्रतेक माणूस वेगळा असतो आणि प्रत्येकाची वृत्ती ,स्वभाव,वेगळा असतो.
आणि त्या वर कोणाचे नियंत्रण नाही.
भावना,मन हे फक्त माणसाला च आहे आणि त्या वर च स्वभाव अवलंबून असतो.
बाह्य शक्ती हे बदलू शकत नाहीत.
तीव्र विरोध च अशा लोकांना थांबवू शकतो.
पण सुप्त भावना कधीच नष्ट होत नाहीत मोका मिळाला की त्या परत बाहेर येतात.
संघर्ष अटळ आहे.
आयात केलेल्या आधुनिक लढावू
आयात केलेल्या आधुनिक लढावू विमानांना.
लिंबू का बांधले,
कॉलेज मध्ये सत्य नारायण पूजा का केली.
इस्त्रो चे संशोधक मंदिरात का केले .
असले बकवास प्रश्न भारतीय बकवास नास्तिक, पुरोगामी उभे करत असतात.
त्यांची मतं थोपावत असतात.
आस्तिक लोकांना सर्व ज्ञान, विज्ञान उत्तम रित्या माहीत असते.
नास्तिक लोकांच्या सल्याची गरज नाही.
कर्मकांड, चुकीचे रीतिरिवाज ह्याचा विरोध स्वतः आस्तिक हिंदू करतोच करतो.
इतका तो समजदार आहेच.
आस्तिक ,नास्तिक हा जो वाद आहे तो फक्त आणि फक्त नास्तिक लोक आणि ढोंगी पुरोगामी लोकांमुळे आहे
>
>
पटले नाही. विज्ञानवादी/पुरोगामी आपले म्हणणे लादतात असे उदाहरण लगेच आठवत नाही.
खूप उदाहरणे आहेत .
कॉलेज मध्ये सत्यनारायण पूजा.
इस्रो चे संशोधक मंदिरात गेले.
नवीन लढावू विमानाची पूजा केली.
ह्या वर भारतीय कथित नास्तिक ,पुरोगामी गळे काढत होते.
कॉलेज मधील मुल आणि इस्रो चे संशोधक ह्यांना विज्ञान कळत नाही .
ते अडाणी आहेत हे ढोंगी भारतीय पुरोगामी, आणि ढोंगी भारतीय नास्तिक कसे काय समजतात.?
Pages