पारिजात

Submitted by jui.k on 17 December, 2023 - 14:02

कॅनव्हास वर केलेले पारिजात - प्राजक्त ( night blooming Jasmine) चे पेंटिंग
ps- कोणी मला छानशी कविता सुचवेल का पारिजात ची??

B612_20231218_000228_233.jpg
.
B612_20231218_000409_014.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान चित्र.

<< कोणी मला छानशी कविता सुचवेल का पारिजात ची? >>
सुवर्णतुला नाटकात "अंगणात पारिजात फुलला" हे नाट्यगीत आहे. इथे एक व्हिडिओ आहे.

चित्र वाटत नाहीय, फोटोच वाटतोय
>>>>
मला तर फोटो सुद्धा वाटत नाही... जणू खरी फुले चिकटवली आहेत..

रात्र गडद झालेली
हळूच झुळूक आली
तशी त्या उमलून बसल्या.
अन ते कळलच अगदी
वाऱ्याने पसरवला गंध.
वर चांदण्या चमचमल्या
अन त्या प्रकाशात याही.
रात्र चढू लागली तशी
याही अधिकच गंधाळल्या.
पहाटेचा गारवा सुटला
हलकेच पूर्व रंगू लागली.
अलवार उन्हाचे किरण
त्यांना लगटू लागले.
अन मग टपटप टपटप
त्या ओघळू लागल्या.
दुधट, अलवार पाकळ्या
अन गंधाळलेले देठ.
गोऱ्या, नाजूक, पऱ्यांचे
गंधाळलेले गोल पाय.
सारा गालिचाच पसरला
पांढरा, केशरी, नक्षीदार!
- अवल

अप्रतिम.
सुरेख चित्र

गदिमा यांचे गीत
माणिक वर्मा यांचे स्वर

बहरला पारिजात दारी
फुले का पडती शेजारी?
माझ्यावरती त्यांची प्रीती
पट्टराणी जन तिजसी म्हणती
दुःख हे भरल्या संसारी !

असेल का हे नाटक यांचे
मज वेडीला फसवायाचे?
कपट का करिती चक्रधारी?

का वारा ही जगासारखा
तिचाच झाला पाठीराखा
वाहतो दौलत तिज सारी

खुपच सुंदर झालं आहे चित्र जुई.
ऋतुराज , हे गाणं माझ्या फारच आवडीच आहे. ती फेमस गोष्ट छान गुंफली आहे काव्यात आणि मस्त म्हटल आहे माणिक वर्मा ह्यांनी. मी अगदी चवी चवीने ऐकत असते हे बरेच वेळा.

खूपच सुंदर प्राजक्ताची फुले
ह्या मी लिहिलेल्या काही ओळी (वृत्त भवानी)

बावरला पानी धुक्यात अवघ्या दवबिंदू की एक
आधार तयाला देण्या फुलले पारिजात मग कैक
- डॉ रोहिणी चंद्रात्रे वाघमारे