मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्मपॅंपलेट:

आज बघितला हा चित्रपट Zee5 वर आणि खास याच्यासाठी थिएटरला गेलो नसल्याचे बरे वाटले!!
हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि एलिझाबेथ एकादशी आवडले होते त्यामुळे चित्रपटाकडून जास्तीच्या अपेक्षा होत्या पण भ्रमनिरास झाला.
सुरुवातीची काही मिनिटे त्या उच्च स्वरातले नरेशन अगदीच रसभंग करते आणि नंतरचे सगळे पण खुप ओढूनताणून वाटत राहते..... अधलीमधली काही चमकदार वाक्ये सोडली तर एकही प्रसंग भिडत असा नाही.
ना कुठली व्यक्तिरेखा नीट डेव्हलप होते ना त्या लव्हस्टोरीत जीव गुंततो.
बाकी ते जातीपाती आणि सर्वधर्मसमभाव वगैरेचे प्रसंग फारच बालिश वाटतात; म्हणजे ब्लॅक कॉमेडी वगैरेचा प्रयत्न असेल तर साफ फसलाय!! शेवट तर अगदीच अ आणि अ ची हद्द आहे .

एकंदरीत नाही आवडला!!

मला तर खूपच आवडला आत्मपॅम्फ्लेट. ते नॅरेशनही काही ठिकाणी लांबले असले तरी प्रेक्षक म्हणून एकदा त्याचा वेग अचूकपणे पकडला की आपण बरोबर रोलर कोस्टर सारखं खाली-वर जातो. नुकताच बघितलेला हेन्री शुगरही असाच वाटला होता. नॅरेशन वेगवान असण्याने कथानक एकाग्रता कमी असलेल्या प्रेक्षकाला धरून ठेवते. त्यामुळे एक प्रयोग म्हणून टीमचं कौतुक वाटलं आणि जिथे मार्केट फेअर नाही तिथे कलाकृती नवीन धाटणीत सादर करणे याला हिंमत लागत असावी.

माझ्यामते 'सर्वधर्मसमभाव' ह्या कन्सेप्टला कल्पकतेचा डेड एन्ड आला आहे. 'अमर ‌अकबर ॲन्थनी' पासून- ते 'बॉम्बे'- ते मागच्या आठवड्यात आलेला विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' पर्यंत सगळे जॉन्रा+कथाप्रकार करून झालेले आहेत, तरीही हा सिनेमा मला रिफ्रेशिंग वाटला. कारण सगळ्या जातींच्या कंडिशनिंगवर वास्तववादी भाष्य करूनही सिनेमा कुठेही कडवट वा टोकदार झालेला नाही, त्याने प्रेक्षक म्हणून तो सहज स्विकारता येतो व प्रवचनाचं ओझं होत नाही.

घराण्याचा मूळ पुरुष 'स्त्री' असणं हेही आवडलंय, आईबाबा, शिक्षक आवडले. मित्र तर खूपच आवडले. भावांनोने तर शेवटी धमाल आणली आहे. सगळे मिळून मिसाईल उचलतात व सर्व शत्रू डोळ्यात पाणी आणतात ते गमतीदार व निरागस वाटलं. 'चाचा चौधरी' कॉमिक्स मध्ये जी धमाल आणि निरागसता असायची , ती खोटी वाटली तरी मजा यायची तसं काहीसं वाटलं.

साधारण नव्वदच्या दशकातील बालपण असणाऱ्यांसाठी खूपच रिलेटेबल झाला आहे. अगदी राममंदिराची वीट- बाबरी मस्जिद असो , बर्फाचा गोळा, बेंचवर कर्कटकने खोडलेली नावं, शाळेत न्यायला येणाऱ्या बाई, इंग्रजी बोलण्याचे झटके मित्रांची उधारी ई .
पुन्हा बघेन.

अस्मिताला अनुमोदन, मलाही अथपासून इतिपर्यंत आवडला.
पूर्वी दूरदर्शनवर किंवा चित्रपटगृहांत मुख्य खेळाआधी दाखवल्या जाणार्‍या माहितीपटांचे एक भाई भगत म्हणून निवेदक होते, त्यांच्या निवेदनाची शैली वापरली आहे. आवाज बहुधा स्वतः परेश मोकाशीचा आहे.

आत्मपँपलेट गेले महिनाभर टुकीने बघतोय. सध्या एकाग्रता नाही हे आहेच..
आज जढईचा सीन पाहून चरकलो. उपहासात्मक शैली असली तरी नवजात शिशु एकदम कढईत ही उपमा नाही झेपली.
एरव्ही कधीतरी पाहिला असता तर चालले असते.

एका दिवसात जात पात या गोष्टी कळतात हे काही झेपले नाही. लहानपणापासून लग्न, मुंज, नातेवाईकांकडचे सोहळे, विविध उत्सव यापासून इतके अलिप्त कसे राहिले असतील ? शाळेत मूल नाही गेलं म्हणून जात कळत नाही का ? दिग्दर्शक स्वतःच या नरेटिव्हचा शिकार तरी आहे किंवा इथे हमखास टाळ्या हा हिशेब असावा..

कडकसिंग ला सुरूवात करायचीय... घ्या देवाचं नाव !

हो रघू, त्या सिन ला मला पण घाबरायला झालं होतं जरा.
एकंदर सेन्सर बोर्ड नावाचा प्रकार ott मध्ये अजून अस्तित्वात नाही.एका 2030 मध्ये घडलेल्या सिरीज मध्ये थेट चेहरा चेंदामेंदा झालेले मुडदे दाखवत होते. अगदी प्रोस्थेटिक मेकअप असला तरी मृतदेह खोटे पण दाखवण्याचा प्रोटोकॉल असतो.शक्यतो जखम किंवा रक्त ब्लर करून वगैरे.तो हल्ली सर्वांनी गुंडाळून टाकून दिलाय.

^^^makes sense

अगदी प्रोस्थेटिक मेकअप असला तरी मृतदेह खोटे पण दाखवण्याचा प्रोटोकॉल असतो. >>> अगदी. क्राईम शोज यासाठीच कित्येक वर्षे टाळले होते बघायचे. पण नंतर त्यातले धोक्याचे इशारे पटल्याने त्या त्या सीन्सला डोळे बंद करून,म्युट करून पहावे लागतात.

संपला बुवा एकदाचा आत्मपॅम्फ्लेट.
तुकड्यात पाहिल्याने असेल कदाचित, इथे सर्वांना जितका आवडला आहे तितकासा आवडला नाही. नरेशन खूप नाही, खूपच जास्त झाले आहे. त्यामुळे नाट्यवाचन किंवा फिम्स डिवीजन कि भेट चं स्वरूप आलं आहे. चित्रपटापेक्षा नाटक म्हणून आवडले असते.

कढईच्या सीननंतर सिनेमा वेग पकडतो आणि संपतो सुद्धा. ही दिग्दर्शकाची गोष्ट असेल ( असा क्लेम केल्याचे वाचले) तर निखळ विनोदाची झालर असलेली प्रेमकथा वाटली नाही. काही ठिकाणी यातला विनोद नक्कीच चिमटे गुदगुल्या करतो. पण दिग्दर्शकाचा कल निखळ प्रेमकथेवर नसून सटायर करण्याकडे आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्याकडे जास्त आहे हे जाणवण्याइतके व्यंग ठळक आहे. एलियन्स वगैरे बालिशपणा झाला.

फॉरेस्ट गंपचा निरागसपणा इथे तुलना म्हणून घेण्याचा मोह आवरत नाही कारण ठळक घटनांचा उल्लेख. पण चित्रपट म्हणून ठळक घटनांचा वापर करताना व्हिज्युअल्स मधे ग्राफिक्सचे चमत्कार त्या काळात फॉरेस्ट गंपने केले होते. इथे या घटना एक तर रेडीओ, टिव्ही किंवा पेपर मधून आपल्याला समजतात. त्या तशा आल्या नसत्या तरी फरक पडला नसता. या घटनांशी पटकथेची सांगड सफाईदार बसलेली नाही. त्या घटना एलियन्स वाटतात. बाबरी पडली हे टायमिंग त्यातल्या त्यात जमलं होतं,पण तो पुसटसा उल्लेख होता. व्यंग निवेदनातून येण्याऐवजी प्रसंगाधिष्ठीत असतं तर मात्र चित्रपटाने गर्दी सुद्धा जमवली असती.

खूप जास्त अपेक्षा ठेवून पाहिल्याने कदाचित असे झाले असावे. वाळवी याच्या पेक्षा छान जमलेला होता असे वाटते. वर स्वरूप यांची प्रतिक्रिया पण अशीच असल्याचे पाहून जिवात जीव आला. नाहीतर काहीतरी बिघाड झालाय का असे वाटत होते..

>>> चित्रपट म्हणून ठळक घटनांचा वापर करताना व्हिज्युअल्स मधे ग्राफिक्सचे चमत्कार त्या काळात फॉरेस्ट गंपने केले होते. इथे या घटना एक तर रेडीओ, टिव्ही किंवा पेपर मधून आपल्याला समजतात

अशानेच मराठी माणूस मागे पडतो म्हणा की! Proud

अशानेच मराठी माणूस मागे पडतो म्हणा की! >> Proud
उधार / उसणवारी हा शब्द वापरायचं टाळलं होतं. Proud
उचलायचंच होतं तर मग तिथे भन्नाट काही तरी अपेक्षित होतं. मोकाशी करू शकतात.

प्रसाद खांडेकरांच्या एकदा येऊन तर बघा चित्रपटाला हिवाळी अधिवेशनात स्क्रीन मिळत नसल्याच्या तक्रारीवर फडणविसांनी कायदेशीर कारवाईचे संकेत दिले आणि चित्रपटाला स्क्रीन्स मिळाल्या. प्रेक्षकांचाही भरभरून प्रतिसाद मिळाला, तो पाहून स्क्रीन्स ची संख्या वाढली. तीन दिवसात बजेट पार केले.

https://www.tv9marathi.com/entertainment/prasad-khandekar-movie-ekda-yeu...

यावरून स्क्रीन्स न मिळणे हे चित्रपट न चालण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे हे सिद्ध झाले. चित्रपट वाईट आहेत म्हणून स्क्रीन मिळत नाही या म्हणण्याला अर्थ नाही. नाहीतर हा सिनेमा चालला नसता. दुनियादारी च्या वेळी मनसे ने खळ्ळंखट्याक आंदोलन केले होते. रेस्ट इज हिस्टरी.

आज एवढ्या उशीराने मी YZ बघितला.
शेवट आवडला पण नाही आवडला.
काही गोष्टी काईच्याकाई सदरात मोडतात.

वाळवी याच्या पेक्षा छान जमलेला होता असे वाटते. वर स्वरूप यांची प्रतिक्रिया पण अशीच असल्याचे पाहून जिवात जीव आला. नाहीतर काहीतरी बिघाड झालाय का असे वाटत होते..>>> वाळवी च प्रचन्ड कौतुन झाल होत आणी मला तो कणभरही आवडला नव्हता...विनोदी म्हणून तर सपशेल फसला होता असच वाटल.

दोन व्यक्तींची आवड एकसारखी असायला हवी असे नाही. मला जे वाटतं ते तुम्हाला वाटायला हवं असा नियम नाही.
वाळवी यापेक्षा बरा जमला होता याचा अर्थ तो आवडला असे नाही तसेच आवडला नाही असेही नाही.

बापरे ते खरंच घाणेरडं डुक्कर दिसतंय... विक्रम , टमटम ला अलिबाग ला सितारा पण म्हणतात....
टमटम हे सर्वात पहिलं नाव जेव्हा ती इन्ट्रोड्यूस झाली अलिबाग मध्ये... साधारण 1993 की 94 मध्ये...
मग त्याला विक्रम असं ही म्हटलं जाऊ लागलं. आणि मग मेन अलिबाग सिटी मध्ये राहणारे ( आम्ही त्यांना व्हाइट कॉलर म्हणतो Wink ) त्यांनी सितारा म्हणायला चालू केलं...
सुरवात झाली तेव्हा रेवस ते अलिबाग 5 रुपये तिकीट होतं.. आमचा रेग्युलर प्रवास 2005 पर्यंत होत असे . तेव्हा रेवस ते अलिबाग 11 रुपये तिकीट होतं... आता माहीत नाही....

सॉरी मी मराठी चित्रपटांच्या धाग्यावर टमटम फिरवली... अस्थानी असेल तर अडमीन ने उडवली तरी चालेल पोस्ट......

अनिश्का, इथे अस्थानी वाटत असलं तरी, आत्ता मी सिताऱ्यात बसून वाचतेय. म्हणून भारी वाटलं. वावे ते अलिबाग.
पेणला असताना विक्रम म्हणायचो आम्ही.

खुपखुप वर्षानंतर परवा "आम्ही जातो आमुच्या गावा" पाहिला. काहिही बघण्यासारखे नव्हते म्हणुन surfing करताना एका channel वर दिसला. Print ही छान होती.
काय चित्रपट आहे! एकापाठोपाठ एक, सटासट घडत जातो. कुठेही रेंगाळत नाही. गोड आणि अर्थपुर्ण गाणी. आपोआप संपूर्ण सिनेमा बघितला गेला. सगळे actors त्या घरातलेच वाटतात. पूर्वी आवडला होताच पण आता परत आवडला. फ्रेश वाटलं.
हे मा वै म. ना Special effects ना fancy locations ना great tech वगैरे नसल्याने तो सपक वाटू शकतो.

*** ह्यात "एक माणूस आमच्यावर चिडलय वाटत" हे वाक्यं आहे.

बहुतेक इथेच कोणीतरी खूप कौतुक लिहिले म्हणून ' मसाला ' बघितला. आवडला. फार छोटी गोष्ट आहे पण अभिनय चांगला असल्याने आणि कसलेल्या कलाकारांनी पेलून धरलाय त्यामुळे बघता येतो.

सुरुवातीला मायबोलीचा लोगो बघून सगळे प्रमोशन वाले धागे आठवले एकदम.

देऊळ पाहीला. कोणत्या ओटीटीवर असेल तर माहीत नाही. मी विकत घेउन पाहीला.
देवस्थाने आणि तिथे होणारे बाजारीकरण.

देऊळ बंद गशमीरचा ना?
सिनेमा म्हणून छान आहे तो..
पण नास्तिक मनाला पटला नाही..

मला सामो यांनी देऊळ बद्दल लिहिलं बाजारीकरण etc तेव्हा एक मिनिट confusion झालं की असं का लिहिलं असेल. मग लक्षात आलं मी माझ्या डोक्यात देऊळ बंद आलं आणि त्या देऊळ बद्दल बोलत होत्या.
पाहिलेत दोन्ही पण सलग नाही तुकड्या तुकड्या मध्ये.

Btw, आत्मपॅफ्लेट बघायचा पुन्हा प्रयत्नं केला, यावेळी शेवटपर्यन्त पाहिला आय मिन बघता बघता सिनेमा संपलाच.. आत्ता स्टोरी सुरु होईल म्हणून वाट बघत होते Proud
बालपणीचे प्रेम, ९० चा काळ, जातपात , फॉरेस्ट गम्प सारख्या ऐतिहासिक घटना वगैरे डार्क ह्युमर्ची खिचडी नुसती, स्टोरी काहीच नाही !
फिल्म्स डिविजन कि भेट टाइप नरेशन , ‘कर्कटक काळजात घुसले‘ टाइप पंचेस आधी मजेशीर वाटले पण इतक्या फालतु स्टोरीत आणि अ‍ॅव्हरेज अ‍ॅक्टर्सला बघतस्ना ते तरी किती वेळ फनी वाटणार !
नेमकं जेवताना नाही ते मुव्हीज बघायची माझी खोड काही जात नाही, त्या पोराच्या लहानपणच्या उलट्या जुलाब वगैरे नरेशन तेंव्हाच नेमके Biggrin
एक मऊ लुसलुशीत बाळ घ्या, त्याला उकळत्या कढईत टाका (सोशल कंडिशनिंगच्या) डार्क ह्युमर जरी असला तरी इन्सेन्सिटिव वाटला , नॉट माय टाइप !

Pages