विठू माऊली - मिक्स मिडिया

Submitted by नीधप on 29 June, 2023 - 21:49

कालच्या आषाढी एकादशीनिमित्त मी केलेले मिक्स मिडिया.
हॅन्डमेड पेपरवर Gouche पेंट्स आणि तांबे आणि पितळेच्या तारा.

बरेच दिवसांपासून विठू माऊली थीमवर ताराचित्र करायचे डोक्यात होते. कमीतकमी रेषा(तारा) वापरायच्या हे नक्की होते. त्यासाठी बरेच स्केचिंग केले पण हवे तसे सुचत नव्हते. घडत नव्हते.

दोन दिवसांपूर्वी का कुणास ठाऊक 'देव माझा विठू सावळा' हे गाणं डोक्यात अडकलं होतं. त्या गाण्यामुळे काळ्या दगडाची मूर्ती, गाभाऱ्यातला अंधार पण विठूरायाच्या आकृतीबाहेर फाकलेली प्रभा आणि काळ्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारे गंध असं काय काय डोक्यात येत होतं.

जे डोक्यात येत होतं ते लगेच स्केच करून बघितलं. आणि करायला घेतलं. काल दुपारी तारेचे भाग सुटे बनवून झाल्यावर रील करायचं सुचलं. मग त्यासाठी शूट करता करता हा मिक्स मिडिया पिस पूर्ण केला. मग शूट एडिट करून रीलही बनवले.

हे बनवण्याचे प्रोसेस रील. इंस्टावर आहे.
https://www.instagram.com/reel/CuE-fVPrY3V/?igshid=MzRlODBiNWFlZA==
इंस्टा रीलची लिंक दिलेली चालते की नाही माहीत नाहीये. नियमात बसत नसेल तर संपादन करावे/ करेन. इथे व्हिडीओ अपलोड करता येत असता तर बाहेरची लिंक दिली नसती.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विठूराया, त्याच्या कानातली कुंडलं आणि फाकलेली प्रभा छानच!
गंध / टिळा, अंमळ शंखासारखे वाटले (आतल्या वेटोळ्यामुळे).

थँक्स सगळे!
हर्पेन, हो तो भास आहे. अजून एक दोन प्रकारे टिळा करून बघायचाय. कदाचित तसा केल्यावर टिळ्यासारखा जास्त दिसेल.

अप्रतिम ! ती प्रभा / आभा (योग्य शब्द माहित नाही), उच्च सुंदर जमली आहे.
मलाही कपाळीचा टिळा पारंपरिक असता तर जास्त आवडला असता. आताचा जरा मोठा आणि शंखासारखा वाटतो आहे.

टिळा मोठाच असतो विठ्ठलाच्या मूर्तीवरचा. >>>> हो बरोबर. आता बरेच फोटो पाहिले. कपाळाची पूर्ण उंची भरून आहे. मला दुसराच काही आठवत होता.
गुगल मॅपच्या आयकॉनसारखा असतो साधारण>>> हो हो Happy .

नी ने हे टाकल्यापासून माझ्या मनात भरलं होतं. तिला जुलैमध्ये ही फ्रेम माझ्याकरता करायला सांगितली. आजच ती माझ्यापर्यंत पोचली आहे. व्यवस्थित पॅक केली होती आणि वॉलवर लावायला एकदम रेडी आहे.
092623cb-6044-4526-8a9b-6bd819e1191d.jpeg

सायो तुझे घर फार सुंदर सजवले आहेस. या कलाकृतीने अधिकच शोभा वाढेल. जर तू भिंतीवरती फिक्स केलस तर असा फोटो पाठव ज्यायोगे डायमेन्शन्स लक्षात येतील.