एका गरीब मुलाचे मणक्याचे ऑपरेशन

Submitted by सुनिधी on 12 May, 2022 - 20:48

एका मोठ्या पेचात सापडले आहे. मदत करा.
मी युट्युबवर 'संदीप भट' म्हणून एका मुलाचे चॅनल पहात असते. तो वेगवेगळ्या गावांना जाऊन फार कुटुंबातल्या आजारी व्यक्तीला मदत गोळा करुन देतो. त्याच्या एका व्हिडिओत 'इटा' गावातल्या एका मुलाला दाखवले. तर त्या मुलाची हकिकत खूपच वेदनादायक होती. तो १७ वर्षाचा असताना झाडावरुन पडला व मणक्याला जबर दुखापत झाली. तेव्हा त्याच्या पाठीत प्लेट घालण्यात आली. त्याला आता ५ वर्षे झाली व तो मुलगा गेल्या पाच वर्षापासुन बिछान्याला खिळून आहे. आज तो २२ वर्षाचा आहे. पाय अगदी बारीक झालेत. आता ती प्लेट काढायची आहे पण पैशा अभावी अडलंय.
त्या व्हिडिओची लिंक खाली देते पण खूप दु:खद दृष्ये आहेत त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. जपून पहा.
https://m.youtube.com/watch?v=7fTKVJY08FE

त्यात तो मुलगा कळवळून सांगत होता की त्याला फक्त चालायचंय. त्यानंतर तो खूप मेहनत करुन काम करेल वगैरे वगैरे... व उपचाराचा खर्च तिनेक लाख आहे असही त्याच्या मातेने सांगितले. तर काही लोकांनी त्याला मदत केली ज्यात मीही एक होते व तितके पैसे गोळा झाले.
मी त्या मुलाला सहज मेसेज करुन ठेवला होता की सर्जरी झाली की कळव.
तर काल तो दवाखान्यात सर्जरीसाठी गेला. त्याने मला मेसेज केला की आंटी मै जा रहा हून वगैरे.
पण तेथील डॉक्टरांनी सांगितले की ते ऑपरेशन खूप गुंतागुंतीचे आहे व ते करु शकणारे एकच डॉक्टर भारतात आहेत व ते म्हणजे कोईमतुरच्या गंगा हॉस्पिटलचे डॉ. राजाशेखरन. व त्याचा खर्च किमान १० लाख येईल.

तर आज सकाळी घरी परत जाताना त्या मुलाचा व्हिडिओ मेसेज आला ज्यात त्याने हे सर्व रडतरडत सांगितले व त्याने मला ४-४ दा विनंती केली की 'आंटी मुझे मदद करो, मुझे ठीक होना है'. Sad

१७ ते २२ अशा पुर्ण वाढीच्या वयात तो कायम पलंगाला खिळून आहे. आता जरा आशा निर्माण झाली होती तर ती ही संपली. यापुढचे पुर्ण आयुष्य कदाचित असेच झोपुन जायची शक्यता आहे हा विचार किती भयानक आहे याचा विचारही करवत नाही.

मला मणक्याच्या दुखापतीच्या कमीजास्त प्रकाराबद्दल काहीच माहिती नाही. त्याने अक्षरशः याचना केलीये माझ्याकडे पण मी काय करु? अजुन ७ लाख कुठून आणायचे? भारतात ते एकच डॉक्टर आहेत का जे हे व्यवस्थीत करु शकतात? त्यात कायकाय अडथळे आहेत? त्याला चालता येईल का? दुसरे कोणीच ही सर्जरी करु शकत नाही का? जरा कमी पैशात होऊ शकेल का? हे आणि असंख्य प्रश्न आता मला पडलेत.

अज्ञानात सुख असतं ते खोटं नाही. कारण असे असंख्य. दुर्दैवी जीव असतील जे बरे होऊ शकतात पण केवळ पैसा नसल्याने कधीच बरे होऊ शकत नाहीत. पण आपल्याला ते माहिती नसतं म्हणून सगळं छान चाललंय असं वाटतं. आता कोणीतरी कळवळीने मदत मागतंय आणि मला त्याकडे दुर्लक्ष करता येत नाहीये. ही भावना फार भयानक आहे. काहीही कळत नाही काय करावे. प्लीज सुचवा काहीतरी. दुसरे कोणी डॉक्टर, दुसरा काही उपाय, किंवा अजुन काही त्याच्याबद्दल माहिती हवी आहे का ते सांगा, मी त्याला विचारेन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

#अपडेट्स
त्याला व्हीलचेअर मिळाली. त्याचा वापर करायला सुरुवात केल्यावर काही बाबी लक्षात आल्यावर त्याप्रमाणे कंपनीशी संपर्क करुन वॉरन्टी पिरिएड मधे पार्ट रिप्लेसमेंट करुन घेतला. मधल्या काळात त्याला जरा धडपडण्यामुळे त्यावर उपचार करण्यातही काही काळ गेला (कदाचित इतक्या काळानंतर ॲक्टिव्हिटी आणि मूव्हमेंट करण्याच्या प्रयत्नामुळे धडपडला असावा)

आता तो आणि व्हीलचेअर दोन्ही पुढची स्टेप घेण्यासाठी तयार आहेत.
व्हीलचेअरने त्याला बाहेरच्या जगाशी फिजिकली जोडले असले तरी त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास साह्य करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. त्या वाटेवर मदत म्हणूनही आमची ही आत्ताची पोस्ट आहे.

तो अपघात होण्यापूर्वी मोबाईल रिपेअरिंग शिकला आहे.
त्यामुळे त्या प्रकारचे शॉप सुरु करायचा त्याचा विचार आहे. त्या जोडीला फोटोकॉपी मशीन, प्रिंटर इत्यादी सेवाही उपलब्ध करुन देण्याचा विचार आहे.
त्याने एक दुकान भाडेतत्वावर घेतले आहे जे main road जवळ आहे व शेजारीच bank आहे. त्यामुळे त्याला हा व्यवसाय व ही जागा फायदेशीर होईल असा विश्वास आहे. सुदैवाने दुकानाचे भाडे फार जास्त नाही. (भाडे २५०० रुपये आहे).
आजवर जमा झालेल्या देणगी रकमेतूनच ही व्हीलचेअर घेण्यात आली आहे हे आधीच्या पोस्टींमधे लिहीले आहेच.

उरलेल्या रकमेत त्याच्या अजूनही सुरु असलेल्या औषध उपचाराचा खर्च, दुकानाचे सुरवातीचे डिपॉझीट व काही महिन्यांचे भाडे आणि फर्निचर घेणे त्याला शक्य आहे पण तरी इतर सामानासाठी ५०,०००/- कमी पडत आहेत.

त्यासाठी हा मेसेज मदत करु इच्छिणाऱ्यां पर्यंत पोहोचवण्यास मदत करावी ही विनंती.

त्याचा संपर्क क्रमांक इथे देत आहे. हाच त्याचा व्हॉट्स ॲप आणि गुगल पे नंबर आहे.

विकास कुमार संपर्क क्रमांक:
(+91) 6398 386 001

तुमच्यापैकी कोणी जर देणगी दिली तर इथे किंवा ईमेलवर तसे कळवल्यास त्याचा ट्रॅक ठेवणे आम्हाला शक्य होईल (हे जस्ट एक सजेशन आहे. कळवण्याची सक्ती अजिबात नाही) (इमेल आयडी kavita.navare@gmail.com)

तुम्हाला इतर काही सोर्स माहिती असतील मदतीचे तर ते इथे लिहीलेत तरी चालेल. आम्ही ते त्याच्या पर्यंत पोहोचवू.

तुम्हाला कुणालाही त्याच्याशी डायरेक्ट संपर्क साधायचा असेल तरी त्याच्या नंबरवर संपर्क साधू शकता.

आत्तापर्यंत केलेल्या सहकार्याकरीता आम्ही शतशः आभारी आहोत.

त्याने स्वतःचा व्हिडीओ पाठवला आहे त्याची लिंकही खाली देत आहोत.

विकास कुमारने पाठवलेला व्हिडीओ

धन्यवाद
सुनिधी आणि कविन

कविन,सुनिधी आणि तुमच्यासोबत ह्या कामात जे कोणी मदत करत आहेत त्या सर्वांना दंडवत.
त्याला आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे करण्याची तुमची जिद्द आवडलीय.

कविन,सुनिधी आणि तुमच्यासोबत ह्या कामात जे कोणी मदत करत आहेत त्या सर्वांना दंडवत.
त्याला आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे करण्याची तुमची जिद्द आवडलीय.>>>+++१

पेरु,
विकास कुमार संपर्क क्रमांक:
(+91) 6398 386 001 हा विकासचा gpay number आहे. इथे पाठवता येतील. त्याच्याकडूनही अपडेट घेतच आहोत आम्ही आणि नोंद ठेवत आहोत.

अपडेट्स

आत्तापर्यंत माबोकर्स आणि इतर मित्र मंडळ मिळून रुपये १६,५००/- इतकी रक्कम त्याच्या खात्यात जमा झाली आहे.

पुढील अपडेट्स देखील असेच जमेल तेव्हा देत राहीन.

धन्यवाद

भरत धन्यवाद

तुम्हाला रिप्लाय दिला आहे इमेलवर. एकदा चेक करुन सांगाल का? आधीचा इमेल स्पॅम मधे तर नाही ना गेला?

आता मिळालेली देणगी जोडून टोटल देणगी ५२,५००/- इतकी झाली आहे. (मेसेज एडीट केला कारण आधी ५०,५००/- रक्कम लिहीली होती आणि पोस्ट करे पर्यंत २०००/- जमा झाले होते अजून)

त्याच्या दुकानासाठी आवश्यक रक्कम जमा झाली असल्याने आता कोणीही देणगी पाठवू नये ही विनंती.

दुकानाचे फोटो इथे अपडेट करेनच त्याचा सेट अप पूर्ण झाला की

पुन्हा एकदा मदत करणाऱ्या आणि मेसेज स्प्रेड करणाऱ्या सर्वांचे आभार

कविन, आताचं उत्तर मिळालं.
आधीचं उत्तर स्पॅम मध्ये गेलं का हे आता कळणार नाही कारण चार तारखेला स्पॅम डोळे मिटून डिलीट केले.

updates

IMG_20231230_132654_0.jpg

सध्या जुजबी सामान आणि फर्निचरसह विकासचे दुकान सुरु झाले आहे.

सगळ्यांच्या प्रयत्नांनी त्याच्या स्वावलंबी होण्याच्या धडपडीची सुरुवात झाली आहे. आता तो मेहनत, जिद्द आणि हुशारीने त्यात प्रगती करेल अशी आशा करुया.

पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार.

त्याच्याकडे चांगला स्पष्ट दिसेल असा फोटो मागितला आहे. साईज कमी करतानाही माझ्याकडून अजूनच ब्लर झाला आहे फोटो.

कविता सुनिधी कौतुक तुमचं आणि रीस्पेक्ट. मदत करणाऱ्या सर्व मायबोलीकरांबद्दलही रीस्पेक्ट.

त्या मुलाला शुभेच्छा.

कविता सुनिधी कौतुक तुमचं आणि रीस्पेक्ट. मदत करणाऱ्या सर्व मायबोलीकरांबद्दलही रीस्पेक्ट.

त्या मुलाला शुभेच्छा.....-+१.

Pages