एका मोठ्या पेचात सापडले आहे. मदत करा.
मी युट्युबवर 'संदीप भट' म्हणून एका मुलाचे चॅनल पहात असते. तो वेगवेगळ्या गावांना जाऊन फार कुटुंबातल्या आजारी व्यक्तीला मदत गोळा करुन देतो. त्याच्या एका व्हिडिओत 'इटा' गावातल्या एका मुलाला दाखवले. तर त्या मुलाची हकिकत खूपच वेदनादायक होती. तो १७ वर्षाचा असताना झाडावरुन पडला व मणक्याला जबर दुखापत झाली. तेव्हा त्याच्या पाठीत प्लेट घालण्यात आली. त्याला आता ५ वर्षे झाली व तो मुलगा गेल्या पाच वर्षापासुन बिछान्याला खिळून आहे. आज तो २२ वर्षाचा आहे. पाय अगदी बारीक झालेत. आता ती प्लेट काढायची आहे पण पैशा अभावी अडलंय.
त्या व्हिडिओची लिंक खाली देते पण खूप दु:खद दृष्ये आहेत त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. जपून पहा.
https://m.youtube.com/watch?v=7fTKVJY08FE
त्यात तो मुलगा कळवळून सांगत होता की त्याला फक्त चालायचंय. त्यानंतर तो खूप मेहनत करुन काम करेल वगैरे वगैरे... व उपचाराचा खर्च तिनेक लाख आहे असही त्याच्या मातेने सांगितले. तर काही लोकांनी त्याला मदत केली ज्यात मीही एक होते व तितके पैसे गोळा झाले.
मी त्या मुलाला सहज मेसेज करुन ठेवला होता की सर्जरी झाली की कळव.
तर काल तो दवाखान्यात सर्जरीसाठी गेला. त्याने मला मेसेज केला की आंटी मै जा रहा हून वगैरे.
पण तेथील डॉक्टरांनी सांगितले की ते ऑपरेशन खूप गुंतागुंतीचे आहे व ते करु शकणारे एकच डॉक्टर भारतात आहेत व ते म्हणजे कोईमतुरच्या गंगा हॉस्पिटलचे डॉ. राजाशेखरन. व त्याचा खर्च किमान १० लाख येईल.
तर आज सकाळी घरी परत जाताना त्या मुलाचा व्हिडिओ मेसेज आला ज्यात त्याने हे सर्व रडतरडत सांगितले व त्याने मला ४-४ दा विनंती केली की 'आंटी मुझे मदद करो, मुझे ठीक होना है'.
१७ ते २२ अशा पुर्ण वाढीच्या वयात तो कायम पलंगाला खिळून आहे. आता जरा आशा निर्माण झाली होती तर ती ही संपली. यापुढचे पुर्ण आयुष्य कदाचित असेच झोपुन जायची शक्यता आहे हा विचार किती भयानक आहे याचा विचारही करवत नाही.
मला मणक्याच्या दुखापतीच्या कमीजास्त प्रकाराबद्दल काहीच माहिती नाही. त्याने अक्षरशः याचना केलीये माझ्याकडे पण मी काय करु? अजुन ७ लाख कुठून आणायचे? भारतात ते एकच डॉक्टर आहेत का जे हे व्यवस्थीत करु शकतात? त्यात कायकाय अडथळे आहेत? त्याला चालता येईल का? दुसरे कोणीच ही सर्जरी करु शकत नाही का? जरा कमी पैशात होऊ शकेल का? हे आणि असंख्य प्रश्न आता मला पडलेत.
अज्ञानात सुख असतं ते खोटं नाही. कारण असे असंख्य. दुर्दैवी जीव असतील जे बरे होऊ शकतात पण केवळ पैसा नसल्याने कधीच बरे होऊ शकत नाहीत. पण आपल्याला ते माहिती नसतं म्हणून सगळं छान चाललंय असं वाटतं. आता कोणीतरी कळवळीने मदत मागतंय आणि मला त्याकडे दुर्लक्ष करता येत नाहीये. ही भावना फार भयानक आहे. काहीही कळत नाही काय करावे. प्लीज सुचवा काहीतरी. दुसरे कोणी डॉक्टर, दुसरा काही उपाय, किंवा अजुन काही त्याच्याबद्दल माहिती हवी आहे का ते सांगा, मी त्याला विचारेन.
दुर्लक्षच करायला हवे होते
दुर्लक्षच करायला हवे होते तुम्ही,
जर खरेच अशी ऑपरेशनची गरज असेल तर तिथले लोकल सपोर्ट ग्रुप , डोनर असतात , ते करतात हेल्प. तुम्हाला द्यायचे असेल डोनेशन , तर डोनेशन द्यावे आणि मोकळे व्हावे
त्या व्हिडीओ बनवणार्याच्या हा छंद / कदाचित व्यवसायही असेल , तो काय असे दहा व्हिडीओ टाकत बसेल.
दिल्लीच्या त्या पंजाबी पोळीभाजी केंद्रवाल्याला अशीच लोकांनी व्हिडीओ बघून मदत केली , नंतर तो व्हिडीओ बनवणारा व तो पोलीभाजीवाला आजोबा ह्यांच्यात पैशावरून भांडण झाले
सात लाख रु म्हणजे ९०३८.४८४$
सात लाख रु म्हणजे ९०३८.४८४$ तुमच्या लोकल कम्युनिटीत क्राउड सोर्स करून जमले की त्याला बँक ट्रान्सफर करा. चांगले आर्थो सर्जन
चेन्हाई पुणे मुंबई सर्वत्र आहेत. आमचे लोकल आदिती हॉस्पिटल. जगात भारी आहे. व उपासनी सुपर स्पेशालिटी इथे रोबॉटिक सर्जरी उपलब्ध आहे. पण हे जरा जास्त महाग आहे.
क्रे डिट कार्ड वर १० के $ लोन घेतायेइल व सुलभ इ एम आय ने फेडता येइल.
मला स्पायनल सर्जरीची तरतूद व माहिती ठेवायची गरज आहे म्हणून होती ती माहिती दिली आहे. ऑल द बेस्ट. काय झाले ते नक्की लिहा.
व्हिडीओ पाहू शकत नाही.
व्हिडीओ पाहू शकत नाही. तुम्ही तपासून घेतलेच असणार. कृपया मदत कुठे करायची याचे डिटेल्स हेडर मधे किंवा कमेण्ट मधे द्यावेत. वैयक्तिक रित्या मोठी मदत करणे तर शक्य नाही. मित्रांना विचारून बघतो.
रोटरी / लायन्स असे क्लब्स एव्हढी मदत सहज करू शकतात ना ? प्रिंट - इलेक्ट्रॉनिक्स मीडीयाने मनावर घेतले तर काही तासात मदत मिळू शकेल. या धाग्यामुळे अशा प्रभावी व्यक्तींचे लक्ष वेधले जावे आणि हेतू तडीस जावा.
१४० जणांनी सरासरी ५००० रु. प्रत्येकी किंवा ७०० जणांनी सरासरी १००० रू प्रत्येकी दिले तरी काम होईल.
मिलाप किंवा इम्पॅक्टगुरू वर
मिलाप किंवा इम्पॅक्टगुरू वर पोस्ट टाकता येईल.
डोनेट करणाऱ्याना योग्य माहिती आणि सोपी डोनेशन पद्धत दिली तर ते डोनेट करतात(म्हणजे 'अमक्याला फोन करून चेक करा' वगैरे जादा ची कामे मागे न लावता एका क्लिक वर बसल्या जागी होत असेल, नंतर कोणी फोन करून त्रास देणार नसेल तर.शिवाय 80जी मिळणार की नाही याची माहिती लोकांना आधी स्पष्ट द्यावी लागते.).
चालणार असेल तर इथेही जीपे/ऑनलाईन डिटेल्स देऊन ठेव.
पुढे कोणतेही फोन/फॉलोअप येणार नसतील तर (माझ्या दृष्टीने) मोठ्या मदतीची तयारी आहे.
दुसरा एक पर्याय प्रशांती
दुसरा एक पर्याय प्रशांती निलयमचे हॉस्पिटल.
Credit card वर लोन न काढता
Credit card वर लोन न काढता मदत केली तर बरे.
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
ब्लॅककॅट, तो चॅनलवाला मुलगा त्याला जमेल तितकी देणगी गोळा करुन मदत देतो. खूप साधा मुलगा आहे.. बोलले आहे त्याच्याबरोबर. मनापासुन करतो. दुर्दैवाने त्याचे वडील काही वर्षापुर्वी हार्टअॅटॅकने गेले व १५-२० दिवसांपुर्वी त्याचा मोठा भाऊ पण. तरी त्याने पुन्हा हे काम सुरु केले. डॉ. राजाशेखरन बद्दल काही माहिती आहे का? किंवा अजुन कोणी डॉ.?
अमा, आजुबाजुला विचारल्यावर मित्रमंडळींनी मदत केली असती तर बहार आली असती. इथे लिहावे लागले नसते. पण तसे प्रत्येकवेळी होत नाही. म्हणुन खुप लोकांपर्यंत पोचावे लागते. क्रे डिट कार्ड वर १० के $ लोन घेतायेइल व सुलभ इ एम आय ने फेडता येइल. >>>>. हे मला लोन घ्यायला सांगता आहात का? कोणत्या हेतुने लिहिले कळले नाही व आवडलेही नाही.
मी_अनु आणि शान्त माणूस, बँक डिटेल देऊ शकते पण त्या मुलाचे वैयक्तिक आहेत. मायबोलीच्या नियमानुसार इथे लिहिता येत नाहीत. अॅडमिननी परवानगी दिली तर टाकेन नाहीतर ईमेलने. पण संपर्क ईमेल चालत नाही बहुतेक. युट्युब लिंकवर व्हिडिओच्या खाली आहे माहिती. रोटरी क्लब वगैरे काही नाहिये म्हणे गावात.
मी_अनु, मिलाप किंवा इम्पॅक्टगुरू वर मी तरी या आधी काही केले नाहिये. वाचावे लागेल.
एसारडी, धन्यवाद.
एसेनेन , बरोबर आहे.
पुन्हा एकदा सर्वांना खूप धन्यवाद.
ज्या ठिकाणी ऑपरेशन होणार आहे
ज्या ठिकाणी ऑपरेशन होणार आहे तिथले डॉक्टर निधी गोळा करण्यासाठी एक बँक अकाऊंट उघडून देतात. त्यासाठीच्या सर्व परवानग्या रूग्णालय किंवा त्यांचे सामाजिक कार्यकर्ते करतात. तशा खात्यासाठी त्या मुलाच्या घरच्यांना रूग्णालयाशी संपर्क साधायला सांगावा. तशा खात्यालाच मदत मिळते. अन्यथा नाही. वैयक्तिक खात्यावर फक्त ओळखीपाळखीचे लोक मदत करतात.
बऱ्याच देवस्थान संस्था सुद्धा
बऱ्याच देवस्थान संस्था सुद्धा मदत करतात जसे सिद्धिविनायक, साईबाबा ई.
पुट्टुपार्थीला कुणाची ओळख आहे
पुट्टुपार्थीला कुणाची ओळख आहे का? सत्यसाईबाबा ट्रस्टच्या मार्फत ऑपरेशन होऊ शकेल. दगडूशेठ ट्रस्ट सुद्धा एक पर्याय असेल. संदीपचे कार्य फारच स्पृहणीय आहे. पवार चॅरीटेबल ट्रस्टमार्फत सुद्धा मदत केली जाते वैद्यकिय उपचारांसाठी. सुप्रीया सुळेंना मेल करता येईल. आपण कृपया कमेंट्सने निराश होऊ नका. मी वैयक्तिकरित्या शक्य होईल तितकी मदत जरूर करेन.
हे मला लोन घ्यायला सांगता
.
मी पण अशा जाहिराती बघून gpay
मी पण अशा जाहिराती बघून gpay केले आहे.पण आज च्या काळात जास्त विश्वास कोणावर ठेवावा असे वाटत. नाही..
फसवणारे च जास्त आहेत
मदतीचे ऑनलाईन अकाऊंट
मदतीचे ऑनलाईन अकाऊंट हॉस्पिटलच्या मदतीने उघडले जातात. मला जास्त माहीत नाही. पण दोनेक वेळा केलेय असे पैसे ट्रान्सफर. त्यात एक मित्र होता त्यामुळे त्या बनवलेल्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर न करता सर्व मित्रांनी त्याच्या बायकोच्या अकाऊंटला केलेले. आणि ते बनवलेले अकाऊंट ईतर अनोळखी लोकांच्या सोयीसाठी होते. त्यात बहुधा काही पैसे हे कमिशन वा टॅक्स वा सर्विस चार्ज वगैरे रुपात कटतात असे कोणीतरी तेव्हा म्हणालेले. म्हणून आपण मित्रांनी थेट बायकोच्या अकाऊंटला करूया असा सल्ला सर्वांना देण्यात आलेला.
जो मुलगा विडिओ बनवतो त्याला अश्या गोष्टींची माहीती असेल. तसे अकाऊंट बनवल्यास ईथे डिटेल शेअर करायला हरकत नाही असे वाटते.
तुमच्या कार्याला शुभेच्छा,
अजूनही असतील ना जे या मदतीसाठी प्रयत्न करत असतील. अर्थात अजून असतील असा विचार करून तुम्ही आपले प्रयत्न थांबबावे असे सुचवायचे नाहीये. तुम्ही त्या मुलाशी प्रत्यक्ष बोलला असाल तर तुमच्या भावना आणि तळमळ समजू शकतो.
>>>>>>>तुम्हाला द्यायचे असेल
>>>>>>>तुम्हाला द्यायचे असेल डोनेशन , तर डोनेशन द्यावे आणि मोकळे व्हावे. त्या व्हिडीओ बनवणार्याच्या हा छंद / कदाचित व्यवसायही असेल , तो काय असे दहा व्हिडीओ टाकत बसेल.
पटले.
ऋन्मेषच्या प्रश्नाचे आधी
ऋन्मेषच्या प्रश्नाचे आधी उत्तर लिहिते. नाही ना, कोणीच नाहीये त्याला मदतीसाठी. त्याच्या मातापित्यांनी बरेच प्रयत्न केले म्हणे पण उपयोग नाही झाला. शेवटी त्यांनी संदीपला फोन केला व त्याने सुरुवातीची मदत केली. संदीप खूप लोकांपर्यंत पोचतो त्यामुळे त्याला पण पुन्हा किती जमेल नाही. त्यालाही कळवले.
शान्त माणुस, गंगा हॉस्पिटलला काल ईमेल केले होते. अजुन तर उत्तर आले नाही. फोन करुन विचारावे लागेल. पण त्यांना धर्मादाय खात्याबद्दल विचारणे ही चांगली सुचना आहे.
किशोर मुंढे , पूंबा... देवस्थानांबद्दल माहितीबद्दल धन्यवाद.
हेमंत३३, तुमचे म्हणणे चुकिचे नाही पण या केसमधे तसे होईल वाटत नाही.
सर्वांना खूप धन्यवाद.
सुनिधी , व्हिडिओ पहिला नाहीपण
सुनिधी , व्हिडिओ पाहू शकत नाही
पण तो मुलगा जर महाराष्ट्रातील असेल या लिंकेची मदत होऊ शकेल असे वाटते
एकच डॉक्टर भारतात आहेत
एकच डॉक्टर भारतात आहेत
यावरून समजून जायचे की प्रकरण अवघड आहे.
फक्त एकच डॉकटर पूर्ण भारतात
फक्त एकच डॉकटर पूर्ण भारतात कसा असेल ?
त्याला शिकवणाराही जिवंत असेल ना , की तोही मेला ?
आणि हा एकमेव डॉकटर ज्या सीटवर शिकला, तिथे पुढच्या वर्षी हा पुढच्या इयत्तेत गेला की तिथे नवीन वर्षाचा नवीन डॉकटर भरती होईल ना ? की हा पास झाला आणि ते मेडिकल कॉलेजही कुठे वाहून गेले ?
परदेशात शिकून आला असेल. या
परदेशात शिकून आला असेल. या/अशा शस्त्रक्रियेसाठी लागणारी सामग्री एखाद्याच ठिकाणी असावी ( कोइंबतूरला) आणि एवढी जोखिम घेण्याची तयारी कुणाची नसावी. पाठीच्या मज्जारज्जू /कणा याला हात लावणे अवघड असते ऐकून आहे.
जाई, थँक्स. तो उत्तर
जाई, थँक्स. तो उत्तर प्रदेशचा आहे.
मी लिहिलेलं 'एकच डॉक्टर' शब्दावरुन गोंधळ होतोय का? सॉरी. बेसिकली, फक्त त्याच डॉक्टरांकडे जा असे सांगितले गेले आहे. मी तरीही विचारायचे ठरवले की अजुन कोणी आहेत का? पण मला वाटतं मी ते करु नये. कारण डॉक्टरांनी रेकमेंड केलंय तर नक्कीच विचार करुन सांगितलं असणार.
सुनिधी, तुझी कळकळ समजते आहे.
सुनिधी, तुझी कळकळ समजते आहे. वर अनेकांनी चांगल्या सूचना केल्या आहेतच एक अश्विनीमावशी सोडून पण त्यांच्याकडे दुर्लक्ष कर.
मी विडिओ बघितला नाही. अलीकडेच एका लिव्हर transplant केससाठी काही मदत केली होती पण ते अगदी legit होते, एक dedicated बँक खाते होते.
या केसमध्ये मदत करण्यापूर्वी मी काय केले असते असा विचार केला. एकदा त्या डॉक्टरशी बोलले असते. तसेच त्या दवाखान्यात काही ट्रस्ट/फंड रेझर आहे का, सोशल वर्कर आहे का हे बघून त्यांच्याशी चर्चा करून पैसे पाठवले असते. किंवा फंड रेझर केला असता कारण रक्कम खूप मोठी आहे. SEWA International सारख्या संस्थेत पण काही मदत मिळू शकते का याची चौकशी केली असती. तुझी सेवाभावी वृत्ती माहीत आहे म्हणून हे सगळे लिहिले. न पटल्यास दुर्लक्ष कर.
तेथील डॉक्टरांनी सांगितले की
तेथील डॉक्टरांनी सांगितले की ते ऑपरेशन खूप गुंतागुंतीचे आहे व ते करु शकणारे एकच डॉक्टर भारतात आहेत व ते म्हणजे कोईमतुरच्या गंगा हॉस्पिटलचे डॉ. राजाशेखरन. व त्याचा खर्च किमान १० लाख येईल.>> हे ऑपरेशन ३ लाखात होणार होते त्याला आता १० लाख लागतायत वर करणारा पण एकच सर्जन आहे हे सगळ मला तरी अर्लामिन्ग वाटतय.
सुनिधी तुझी कळकळ समजतेय आणी तु एका नोबल कॉझ साठि प्रयत्न करतेयेस हे बघुन एक मायबोलिकर म्हणून तुझा अभिमानहि वाटतो आहे पण इन रिअॅलिटी असे एक ना अनेक जण अडचणिशी सामना करतच असतात.काहीवेळेस केसेस जेन्युइन असतात काहिवेळेस स्कॅम असतात.
माझ्यामते तु केलेली अर्थिक मद्त पुरेशी आहे अजुन अडकु नयेस बाकी कुठल्या सन्स्थेतुन मदत मिळत असेल तर बघता येइल
अर्थात हे वैयक्तिक मत आहे बाकी तुझा निर्णय आहे.
तुम्हा दोघींना खूप धन्यवाद.
तुम्हा दोघींना खूप धन्यवाद. तुम्ही मनापासुन लिहिले ते अगदी कळतंय. अपडेट नक्की कळवीन.
मदत करण्यासाठी कळकळ समजू शकतो
मदत करण्यासाठी कळकळ समजू शकतो पण जेव्हा प्रस्ताव येतात त्यावर काय मतं असतात हे इथे लिहिल्याने कळतं. बाकी लोक काय बोलत असणारच. तीन लाख लागणार असं सांगितलं आणि ते वाढून साडेतीन म्हटले तर पटेल. पण नंतर दहा म्हणणे म्हणजे जमा झालेल्या पैशांचं काय हा विचार येतोच.
जे परखड मतं मांडत आहेत
जे परखड मतं मांडत आहेत त्यांचंही काही चुकतंय असं नाही. ऐकायला बरं वाटत नसलं तरी ते ही खरं आहे आणि मदत देऊ करणे हे ही बरं आणि खरं आहे.
फेसबुकवर त्यापूर्वी ऑर्कुटवर त्या ही आधी ईमेलने अशा प्रकारची आवाहने येत असत. अजूनही येतात. क्राउड फंडींगची आवाहने ईमेल मधे असतातच. पण आता ती वेगळ्या फोल्डर मधे आपोआप जातात. आपण एव्हढ्या सर्वांना मदत करू शकत नाही. आवाहनांची संख्या वाढली कि मग चुट्पुट वाटेनाशी होते. तर काहींना दर वेळी गिल्ट येतो कि आपण मदत करू शकत नाही. प्रत्येक ठिकाणी थोडी थोडी रक्कम देणे हा उपाय असतो. पण एव्हढी कमी रक्कम पाठवतोय याचाही गिल्ट असतो.
फेसबुकवर तर वैयक्तिक नंबर्सच दिलेले असतात. या सर्व केसेस या निम्न आर्थिक वर्गातल्या असतात. ही मंडळी योजना निरक्षर असतात. सरकारी आरोग्य विम्याबद्दल माहिती नसणे किंवा त्याबद्दल उदासीन असण्याने ही वेळ येते. ज्यांचे उत्पन्न तुटपुंजे आहे त्यांच्यासाठी मोफत विमा असायला काहीच हरकत नाही. एखाद्या ब्लॉगरने गावागावात जाऊन आरोग्य विम्याची शिबीरे लावून अशा वस्तीचे विमाकरण केल्याचे व्हिडीओज दाखवले तर अनेक गावात जागृती होईल. एकेक केस मधे आवाहन करण्यापेक्षा हे जास्त गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यातल्या अशा गुंतागुंतीच्या केसेस कमी होतील.
विमा कधीच तहान लागल्यावर मिळत नाही. त्यामुळे आजाराचे निदान झाल्यानंतर विमा काढून उपयोग नसतो. ती वेळ येण्याआधीच त्याचे कव्हर असायला हवे. कुणा मायबोलीकराने जर या कामासाठी संस्था बनवली तर तीत काम करायला आवडेल.
कोरोना काळात लसीकरण ड्राईव राबवला तसा भगव्या रेशनकार्ड धारकांसाठी विमाकरण ड्राईव्ह राबवणे सरकारलाही अगदीच अशक्य नाही.
आरोग्य विम्याचे खाजगी दर
आरोग्य विम्याचे खाजगी दर परवडणारे नाहीत
विम्यातून औषधोपचार महागडे
विम्यातून औषधोपचार महागडे प्रकरण आहे.
बिना विमा रु सवा लाख , तेच काम विमासह तीन लाख रु आहे. काही विम्यांत काही रोगांसाठी कमाल मर्यादा निश्चित आहेत. अपेंडिक्स (/prostate) रु २३हजार होते त्यावेळी पेशंटने ६५ हजार डॉक्टरला दिले होते. आणि डॉक्टरनेच स़ागितले की यातले २३ हजारच परत मिळतील. क्याशलेस असते तर पुन्हा जीएसटी वाढतो. कारण ती एक सर्विस धरतात.
मग त्याने दरवर्षी १३ हजार रु हप्ता का भरायचा?( ६५ वयापुढे प्रिमिअम भरमसाठ वाढवतात. )
थोडे अवांतर पण इथे विमा विषय निघाला म्हणून लिहिले.
गंभीर आजार,किंवा अपघात मुळे
गंभीर आजार,किंवा अपघात मुळे अचानक निर्माण झालेली गंभीर स्थिती .ही मोठी समस्या भारतात आहेच.
मेडिकल उपचार खूप महाग आहेत.अगदी मध्यम वर्गीय लोकांना पण परवडणार नाहीत इतके महाग आहेत.
ह्या साठी epf सारखी एकादी योजना देश पातळीवर असायला हवी..
अमेरिकेतला विम्याचा रोग आता
अमेरिकेतला विम्याचा रोग आता भारतात पण पसरू लागला आहे. एकंदरीत भविष्यकाळ कठीण असणार तर.
सरकारी विमा असा स्पष्ट
सरकारी विमा असा स्पष्ट शब्दप्रयोग केलेला आहे.
Pages