Submitted by अंतिम on 8 December, 2023 - 14:14
दारु-दारु ऐसा, लागलासे ध्यास
शेवटचा श्वास, दारुसंगे
दारु-दारु ऐसे, करोनी चिंतन
ठिबक सिंचन, बसविले
फुका म्हणे नाही, पीत म्या फुकट
देतो ज्ञानामृत, लोकांआधी
बरे झाले देवा, धाडलीत दारू
संगतीला पारु, पाठवावी
काय सांगू देवा, दारुचे उपकार
स्वर्गाचेच द्वार, उघडिले
कोणी देखिली गा, स्वर्गाची वसती
दृष्टी आड सृष्टी, खरी खोटी
जाणून घ्या बापा, दारुची महती
स्वर्गच खालती, आणियेला
कृपाळू देवाने, निर्मियली व्हिस्की
अवनीवरी दु:खी, आता कोण
दयाळू देवाने, निर्मियली रम
मोक्षमार्ग सुगम, सर्वांसाठी
देवा दयाघना, निर्मियली ब्रँडी
सानथोरा तोंडी, समभावे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान.
छान.
पण दारूबंदी कार्यकर्ते येतील जरावेळाने.
छान.
छान.
छान रचना..
छान रचना..
>>पण दारूबंदी कार्यकर्ते येतील जरावेळाने. <<
ते दारुबंदी कार्यकर्ते नव्हेत.. Self Promotion वाले आहेत.
भारी आहे कविता. लयबद्ध !
भारी आहे कविता. लयबद्ध !
अंतिम दारू असे काहीसे वाचून उत्सुकता चाळवली
छान!
छान!
ज्यांना अश्या कविता आवडतात त्यांच्या साठी
https://www.misalpav.com/node/6610
चालचलाऊ गीता. आणि त्यावरचे प्रतिसाद वाचा.
कृष्ण म्हणे अर्जुना | काढ तंबाखु लाव चुना ||
त्याविण माझी सुस्ती जाईना ||
हे पण वाचलेले आहे. कवी कोण आहे?
एकूण मिपाकर जास्त लिबरल असावेत असे दिसते.
ज. के. उपाध्ये..
ज. के. उपाध्ये..
अ'निरु'द्ध
अ'निरु'द्ध
हे सगळे काव्य कुठे वाचायला मिळेल?
माझी आई काॅलेजला शिकवायची
माझी आई काॅलेजला शिकवायची तेव्हाच्या अभ्यासक्रमात उपाध्येंच्या दोन, तीन कविता होत्या.
आवडल्या म्हणून हाती उतरवून घेतल्या होत्या. ती डायरी शोधावी लागेल.
चालचलाऊ भगवद्गीता असं नाव होतं.
https://www.bobhata.com/lifestyle/chalchalau-geeta-j-k-upadhye-1558
ह्या लिंकमधे काही अन्य कवितांची फक्त नावे आहेत.
ही अजून एक लिंक : https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C.%E0%A4%95%E0%A5%87._%E0%A4%89%...
विसरशील खास मला हे गीतही यांचंच.
https://www.aathavanitli-gani.com/Geetkar/J_K_Upadhye
अ'निरु'द्ध
अ'निरु'द्ध
अनेक अनेक आभार!
"कविते करीन तुला मी ठार," आणि "विसरशील खास मला" हे माहित होते. पण त्यांचा इतिहास वाचून वाईट वाटले. आता तुमची पोस्ट निवडक दहात साठवून ठेवेन.
जाता जाता अवांतर,
गजाननराव वाटावे हे नाव तुम्ही दिलेल्या विकी लिंक मधून वर आले. आणि जुने दिवस आठवले.
"पाहिली पेशवे उद्यानी, बाजीराव आणिक मस्तानी"
"दोन ध्रुवावर दोघे आपण, तू तिकडे अन मी इकडे."
आणि कार्यक्रमाच्या शेवटी ते कवि यशवंत ह्यांची आई कविता रडत रडत गायचे.
पुन्हा एकदा अनेक आभार.