Submitted by अंतिम on 5 December, 2023 - 15:22
साधी कुडाची झोपडी, वर कौलारु छप्पर
दारी भोपळ्याचा वेल, वर चढे सरसर;
हसे हिरवे कौतुक, कशी ठरेना नजर
गोठा भरला गुरांनी, अशी मायेची पाखर
माझ्या आईचा वावर, जशा स्निग्ध सांजवाती
बाप, भाऊ, बहिणी सारे, कष्ट करती दिन-राती.
--- खडा पडता तळ्यात, चित्र हेलकावे सारे
संथ होता पुन्हा पाणी, आता तरळे दुसरे ---
येथे एका आड एक, जुन्या जिन्यांना पायर्या
नाही दारामध्ये झाड, पण पुस्तकांत पर्या.
उभ्या भेगाळल्या भिंती, एकमेकिंना खेटून
उरे खोलीत काळोख, वस्तू-वस्तू लपेटून.
नाही येथे प्रेमपाश, नाही शेजार्या शेजारी
नाही राहण्यास जागा, रस्त्यांवर गर्दी सारी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गाव म्हणजे सर्व आलबेल व शहर
गाव म्हणजे सर्व आलबेल व शहर म्हणजे बकाल असे नसते ताई. अर्थात हे माझे मत. कविला तिचे मत प्रकट करण्याचा हक्क आहेच.
दोन्ही चित्रं डोळ्यांसमोर उभी
दोन्ही चित्रं डोळ्यांसमोर उभी राहिली.
सुंदर भावदर्शी कविता..
रचनाही छान नादमधुर आणि गेय.
छान... बालभारतीमधील कविता
छान... बालभारतीमधील कविता वाचतेय असे वाटले.
छान
छान
चित्रदर्शी, हळवी.....
चित्रदर्शी, हळवी.....
बालभारतीमधील कविता वाचतेय असे
बालभारतीमधील कविता वाचतेय असे वाटले.+ १
सुंदर कविता..!
सुंदर कविता. आवडली.
सुंदर कविता. आवडली.
सुंदर कविता..
सुंदर कविता..
सुंदर कविता. आवडली.
सुंदर कविता. आवडली.