गर्दी

Submitted by अंतिम on 5 December, 2023 - 15:22

साधी कुडाची झोपडी, वर कौलारु छप्पर
दारी भोपळ्याचा वेल, वर चढे सरसर;
हसे हिरवे कौतुक, कशी ठरेना नजर
गोठा भरला गुरांनी, अशी मायेची पाखर
माझ्या आईचा वावर, जशा स्निग्ध सांजवाती
बाप, भाऊ, बहिणी सारे, कष्ट करती दिन-राती.

--- खडा पडता तळ्यात, चित्र हेलकावे सारे
संथ होता पुन्हा पाणी, आता तरळे दुसरे ---
येथे एका आड एक, जुन्या जिन्यांना पायर्‍या
नाही दारामध्ये झाड, पण पुस्तकांत पर्‍या.
उभ्या भेगाळल्या भिंती, एकमेकिंना खेटून
उरे खोलीत काळोख, वस्तू-वस्तू लपेटून.
नाही येथे प्रेमपाश, नाही शेजार्‍या शेजारी
नाही राहण्यास जागा, रस्त्यांवर गर्दी सारी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाव म्हणजे सर्व आलबेल व शहर म्हणजे बकाल असे नसते ताई. अर्थात हे माझे मत. कविला तिचे मत प्रकट करण्याचा हक्क आहेच.

छान