जीव ओवाळणे नाही.

Submitted by श्वेतपर्ण on 6 December, 2023 - 04:08

रमायच होत जिथे
रस्ते सगळे बंद तिथे
गावास त्या पुन्हा फिरून जाणे नाही.

वळनावर वळले किती
चालताना थांबले किती
वाटेवर त्या मागे वळून पाहणे नाही

यावेत ज्यांनी शहारे
त्याच उदासीची कारणे
स्मृतींत त्या आता पुन्हा हरवणे नाही

ज्यांनी स्वप्नचित्र रंगवले
ते कुंचलेच हिरावले
भग्न त्या स्वप्नात आता पुन्हा रंगणे नाही

अनुभवायचा जो गंध
चोरुन गेला मकरंद
क्षणीकावर अशा व्यर्थ जीव ओवाळणे नाही.

Group content visibility: 
Use group defaults

छान