Submitted by श्वेतपर्ण on 6 December, 2023 - 04:08
रमायच होत जिथे
रस्ते सगळे बंद तिथे
गावास त्या पुन्हा फिरून जाणे नाही.
वळनावर वळले किती
चालताना थांबले किती
वाटेवर त्या मागे वळून पाहणे नाही
यावेत ज्यांनी शहारे
त्याच उदासीची कारणे
स्मृतींत त्या आता पुन्हा हरवणे नाही
ज्यांनी स्वप्नचित्र रंगवले
ते कुंचलेच हिरावले
भग्न त्या स्वप्नात आता पुन्हा रंगणे नाही
अनुभवायचा जो गंध
चोरुन गेला मकरंद
क्षणीकावर अशा व्यर्थ जीव ओवाळणे नाही.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान.
छान.
मस्त. निग्रह - हा शब्द
मस्त. निग्रह - हा शब्द डोक्यात आला.
पद्य ठीक ठीक वाटले, पण भावना
पद्य ठीक ठीक वाटले, पण भावना पोचल्या.
छान कविता..!
छान कविता..!
छान
छान
मस्त!
मस्त!