Submitted by स्वाती_आंबोळे on 24 October, 2023 - 12:44
काल फेसबुकावर बॉलीवुड ट्रिवियाच्या एका पेजने 'भली भलीसी इक सूरत' या गाण्याची आठवण करून दिली.
ही चित्रपटसंगीताची एक इन्टरेस्टिंग क्याटेगरी आहे, ज्यात आडवळणाने प्रेमाचा इजहार, किंवा 'कौन है वो दिलरुबा?' या प्रश्नाला 'तू नाही, दुसरंच कोणीतरी' अशा छापाचं उत्तर दिलेलं दिसतं.
अशी आणखी काही आठवलेली गाणी:
१. खूबसूरत हसीना, जाने जा जानेमन
२. कोई लडका मुझे कल रात सपने में मिला
३. तेरे हुस्न की क्या तारीफ करूँ, कुछ कहते हुए भी डरता हूँ
४. आप के कमरे में कोई रहता है
आणखी एक क्याटेगरी 'ना ना करते' टाइप - म्हणजे घरौंदामधल्या 'तुम्हें हो ना हो, मुझको तो इतना यकीं है, मुझे प्यार तुम से नहीं है'
तुम्हाला कुठली आठवतात का अजून अशी गाणी?
मराठी मला एकही नाही आठवलं. पण ते समजण्यासारखं आहे, मुळात प्रेमाचा इजहार इथेच गाडं अडत असणार.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आपलं पाण्याचं भांडंही डाव्या
आपलं पाण्याचं भांडंही डाव्या हाताशी घेऊन बसला आहे >>> खरेच स्पीड डेटिंग करत असल्यासारखा पटकन येउन एकदम गायला सुरूवात करतो
मला "चलो एकबार फिरसे अजनबी बन
मला "चलो एकबार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो" बद्दल नेहमी एक शंका येते. त्याकाळी लोकांना एलिमिनेशन्/डिडक्शन वगैरे शिकवले जात नसावे म्हणून अशी गाणी खपून जात असावीत. नाहीतर "फिरसे" अजनबी मधे बरेच लोक निकालात निघतात आणि हे गाणे कोणाबद्दल आहे हे आपोआप उघड होते
"न जाहिर हो तुम्हारी कश्मकश का राज नजरोंसे" हे मात्र साहिरने अनेक रिटेक्स झाल्यावर कंटाळून "त्यापेक्षा मी ओळीतच चेहर्यावर भाव न आणण्याची मुभा देतो" असा विचार करून लिहीले असावे "गलत अंदाज नजर" म्हणजे मान तिरपी करणे वगैरे पाहिल्यावर रावसाहेब बाप बदला की ओ सांगतात तसे गाणेच बदलले.
शम्मी ?
शम्मी ?
शामा ऐकलं होतं. हरीवंशराय बच्चन यांची पहिली पत्नी.
फा
फा
'या दिल की सुनो दुनियावालों' मध्ये मल्टिपल चॉइसेस आहेत हे न कळून लोक ऐकत बसतात तसंच.
आचार्य, ही शम्मी.
मजा म्हणजे 'तुझे क्या सुनाऊं' ज्याच्यावरून इन्स्पायर्ड असल्याचा आरोप होतो त्या सज्जादच्या 'ये हवा ये रात ये चाँदनी' गाण्यातही ती आहे.
मल्टिपल चॉइसेस आहेत हे न कळून
मल्टिपल चॉइसेस आहेत हे न कळून लोक ऐकत बसतात तसंच >>>
ही शम्मीच आहे ना? नूतनच्या शेजारची?
सज्जादच्या 'ये हवा ये रात ये
सज्जादच्या 'ये हवा ये रात ये चाँदनी' गाण्यातही ती आहे. >>> अरे हो की! (आणि रावसाहेबांची लेडी सितारिस्ट सुद्धा )
असे संदर्भ लावायला मजा येते. उदा: डीडीएलजे मधे अमरिश पुरी ऐ मेरी जोहराजबी म्हणतो ते फरिदा जलाल ला उद्देशून. पण तेथे अचला सचदेवही बसलेली असते, जिला उद्देशून मूळ गाणे म्हंटले गेले होते.
>>> लेडी सितारिस्ट
>>> लेडी सितारिस्ट
येस!
(ह.पा.ला दाखवा. त्याला Qalaa मधल्या लेडी सितारिष्टबद्दल कायतरी प्रॉब्लेम होता. आता बोल म्हणावं! )
>>> पण तेथे अचला सचदेवही बसलेली असते... असे संदर्भ लावायला मजा येते
अगदी!
(८३मध्ये कपिल देवची आई नीना गुप्ता असणं हा अशा कॅटेगरीतला सर्वात भारी संदर्भ असेल बहुतेक! )
८३मध्ये कपिल देवची आई नीना
८३मध्ये कपिल देवची आई नीना गुप्ता असणं हा अशा कॅटेगरीतला सर्वात भारी संदर्भ असेल बहुतेक! >>>
"८३मध्ये कपिल देवची आई नीना
"८३मध्ये कपिल देवची आई नीना गुप्ता असणं हा अशा कॅटेगरीतला सर्वात भारी संदर्भ असेल बहुतेक!" -
"इन युअर फेस' आणि 'स्पीड डेटिंग" -
त्या अॅक्टर चं नाव शेखर आहे. हिंदी फिल्म इंडस्ट्रीतला रॉक हडसन
८३मध्ये कपिल देवची आई नीना
८३मध्ये कपिल देवची आई नीना गुप्ता असणं हा अशा कॅटेगरीतला सर्वात भारी संदर्भ असेल बहुतेक >> खट्टरणाक!!
ये हवा ये रात गाण्यातली लेडी सितारिष्ट पटते. स्वराप्रमाणे हात बोलतारेवर फिरत नसला तरी तिची बैठक पक्की आहे, सितार परफेक्ट पकडली आहे, हातांची पकडही योग्य. Qalaa मध्ये नुसती शोभा म्हणून सितार धरली आहे. हिच्यावर धैर्यधराचं कुत्र खुश होणार काय?? थू!!!
(No subject)
हर्पा _/\_
हर्पा _/\_
हिच्यावर धैर्यधराचं कुत्र खुश
हिच्यावर धैर्यधराचं कुत्र खुश होणार काय?? >>>
स्वराप्रमाणे हात बोलतारेवर फिरत नसला तरी तिची बैठक पक्की आहे >>> हे वाक्य संगीतसंदर्भानेच वाचावे ना?
हाहाहा. हो, संगीत संदर्भातच.
हाहाहा. हो, संगीत संदर्भातच.
“ हिच्यावर धैर्यधराचं कुत्र
“ हिच्यावर धैर्यधराचं कुत्र खुश होणार काय??” -
“ हे वाक्य संगीतसंदर्भानेच वाचावे ना?” -
@फा >> आत्तापर्यंत ऐकूनच हे
@फा >> आत्तापर्यंत ऐकूनच हे गाणे आवडत होते. इट इज रुईन्ड फॉर मी
मान्य आहे कि हिरोला अगदी तातडीने सांगायचे आहे. पण निदान फूटभर अंतर ठेवून तरी बोलावे ना माणसाने. नूतन किती अनकंफर्टेबल दिसते आहे.
डीडीएलजे मधे अमरिश पुरी ऐ
डीडीएलजे मधे अमरिश पुरी ऐ मेरी जोहराजबी म्हणतो ते फरिदा जलाल ला उद्देशून. पण तेथे अचला सचदेवही बसलेली असते, जिला उद्देशून मूळ गाणे म्हंटले गेले होते.>>> अर्रे हो की, पण हे आ त्ता जाणवलं
हे वाक्य संगीतसंदर्भानेच वाचावे ना?>>
८३मध्ये कपिल देवची आई नीना गुप्ता असणं >> नाही कळालं. प्लीज संत्रं सोला.
बर्याच नवीन पोस्टी आहेत.
बर्याच नवीन पोस्टी आहेत. नंतर निवांत बघतो.
नवीन प्रतिसाद भारी आहेत.
नवीन प्रतिसाद भारी आहेत.
ते नूतनचं गाणं मला माहितीच नव्हतं अजूनपर्यंत.
ती शम्मी हम साथ साथ है मधे करिष्माची आजी म्हणून ओळखीची आहे.
आशु२९, विव्ह रिचर्ड्स.
देख भाई देख मालिकेत भावना
देख भाई देख मालिकेत भावना बलसावरची आई आणि शेखर सुमनची सासू शम्मी. त्यात तिचं तकिया कलाम होतं - तेरे मूह में कीडे तेरे मूह में धूल
इथे उलट मेरे मूह में म्हटलंय.
स्वाती आंबोळे, धन्यवाद.
स्वाती आंबोळे, धन्यवाद.
कपिल नीना गुप्ता ट्यूबलाईट लागली नाही.
विव्ह रिचर्डस वरून तर नाही?
हो, त्यावरूनच.
हो, त्यावरूनच.
फारेंड यांनी दिलेली लिंक..
फारेंड यांनी दिलेली लिंक.. तुझे क्या सूनाऊ...
हे गाणं इतक्या वेळा ऐकलं आहे, पण (सुदैवाने!) बघायचा योग आला नव्हता अजून!>>>> +++
इतक्या सुंदर गाण्याची इतकी पराकोटीची वाट लावली आहे !!
हे गाणं इतक्या वेळा ऐकलं आहे,
हे गाणं इतक्या वेळा ऐकलं आहे, पण (सुदैवाने!) बघायचा योग आला नव्हता अजून! >> सुदैवाने ला +१
पर्सनल स्पेस मधे टोटल आक्रमण >> दुहेरी आक्रमण आहे. - एकिकडे हा गाणे म्हणत पीळ घालतोय नि दुसरीकडून शम्मी अशक्य चेहरे करत वात आणतेय . नूतन ची अॅ़क्टींग मानायला हवी. म्हणजे शम्मीचे चेहरेविलाप बघून फिदीफिदी हसायला आले असते. बाकी नूतनचा केविलवाणा चेहरा बघत "तेरे दर्द से रहे बेख़बर, मेरे दिल की कब ये मज़ाल है" हे इतक्या मक्खपणे म्हटल्याबद्दल सूटाचे कौतुक करायला हवे.
८३मध्ये कपिल देवची आई नीना गुप्ता असणं हा अशा कॅटेगरीतला सर्वात भारी संदर्भ असेल बहुतेक! >> आवरा !
मी ही पाहिले नव्हते हे गाणे
मी ही पाहिले नव्हते हे गाणे
पाण्याचे भांडे घेऊन...:
हे चालेल का? यात हवा
हे चालेल का? यात हवा पाण्याच्या भरपूर गप्पा आहेत. आणि तुझाच डिओ आहे वाटतं अशी आडून आडून खात्री केलेली आहे.
हे मस्त गाणं आहे. दोघांच्या
हे मस्त गाणं आहे. दोघांच्या चेहर्यावरचे भाव आणि एडिट करत केलेला दृष्यांचा वापर सहीच आहे. तो अस्वाच्या मामे बहिणीचा चुलत भाऊ आहे ना? हे पीएस२ आहे होय! तुम्ही लोकांनी फॉर डमीज वगैरे लिहुन अगदी समजणारच नाही असं वातावरण करुन टाकलेलं. बघतो आता.
माझेमन
माझेमन
एकदम सिक्सर!
अमित, बघ रे आता तरी... डमिज लिहून लोकांना पिक्चर पासून दूर लोटल्याचं फीलिंग आलं आहे. स्वतः डमी पेक्षा सहा पट डमी असून मला कळलंच ना. तुला काय प्रोब्लेम आहे!
बघतो आता >>> बघा बघा. पण
बघतो आता >>> बघा बघा. पण डमीज् वाचून बघितलंत तर जास्त बरं
(No subject)
Pages