तुम्ही नाही जा! (हिंदी चित्रपटसंगीतातील आडवळणाने दिलेल्या प्रेमाच्या कबुलीची उदाहरणे)

Submitted by स्वाती_आंबोळे on 24 October, 2023 - 12:44

काल फेसबुकावर बॉलीवुड ट्रिवियाच्या एका पेजने 'भली भलीसी इक सूरत' या गाण्याची आठवण करून दिली.
ही चित्रपटसंगीताची एक इन्टरेस्टिंग क्याटेगरी आहे, ज्यात आडवळणाने प्रेमाचा इजहार, किंवा 'कौन है वो दिलरुबा?' या प्रश्नाला 'तू नाही, दुसरंच कोणीतरी' अशा छापाचं उत्तर दिलेलं दिसतं.

अशी आणखी काही आठवलेली गाणी:
१. खूबसूरत हसीना, जाने जा जानेमन
२. कोई लडका मुझे कल रात सपने में मिला
३. तेरे हुस्न की क्या तारीफ करूँ, कुछ कहते हुए भी डरता हूँ
४. आप के कमरे में कोई रहता है

आणखी एक क्याटेगरी 'ना ना करते' टाइप - म्हणजे घरौंदामधल्या 'तुम्हें हो ना हो, मुझको तो इतना यकीं है, मुझे प्यार तुम से नहीं है'

तुम्हाला कुठली आठवतात का अजून अशी गाणी?
मराठी मला एकही नाही आठवलं. पण ते समजण्यासारखं आहे, मुळात प्रेमाचा इजहार इथेच गाडं अडत असणार. Proud

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निगाहें मिलाने को जी चाहता है
बसतय का कोणत्या गटात? (आधीच येऊन गेलय का? मी अजून धागा पूर्ण वाचला नाही. पण गाणं निसटून जाईल डोक्यातून म्हणून लिहिलं आधी.)

>>> मराठी मला एकही नाही आठवलं. पण ते समजण्यासारखं आहे, मुळात प्रेमाचा इजहार इथेच गाडं अडत असणार.

अगदी सहमत!

धुंदी कळ्यांना ते पाणी थेंब थेंब या रेंजमध्ये 'तुम्ही नाही जा' वाली गाणी कोणती हे पटकन आठवतदेखील नाही

असतीलही काही

ही कशानं धुंदी आली
काही समजं ना, काही उमजं ना
ह्यो चांद नभी, ही पुनव उभी
रेशमी धुक्यानं न्हाली....
हे मराठी आठवलं. बसतय का?

Pages