भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशुचँप , ओड्याला सख्त लौंडा बनवायच्या प्रयत्नात आहेत
तर ओड्या प्यार करने वाले कभी डरते नहीं मोडात आहे Biggrin

हीच ती ओड्याची गर्लफ्रेंड...ओड्या आला की लांबून धावत येते आणि लाडे लाडे सुरु होतं, मला मग खरोखरच व्हीलन होऊन त्याला घरी घेऊन जावं लागतं

ही ती लोकल भूभूंची गँग. मधोमध त्यांची अल्फा फिमेल बसलीय. ओड्या जराही त्यांच्या दिशेने सरकला तर ती लगेच भुंकत त्याला हुसकावते. एरवी मग तो लांबून गेला तर कुणी काही बोलत नाही, म्युच्युल अंडरस्टॅंडींग झालंय आता

अरे वा
ओडिन ला त्याचं प्रेम मिळालं.(डोळ्याला पदर लावून सुक करून हुंदका)

पुढच्या पोस्ट मध्ये ओड्याचं युगुलगीत होऊन जाऊदे Wink

ओड्या आला की लांबून धावत येते आणि लाडे लाडे सुरु होतं >>> या situation ला ' तू जब जब मुझको पुकारे, मैं दौडी आयी नादिया किनारे ' वगैरे चालेल Proud

काल एक मजा झाली
सध्या घरात सुतार केव्हाही येत जात असल्याने दारं उघडी असतात.काल अचानक काम करता करता मागे पाहिलं तर 2 फुटावर सोसायटीतला पाळीव लॅब डॉन. म्हणजे हा जाता येता ओळखीचा असला तरी असं 2 फुटावर त्याचं तोंड पाहून घाबरावं की हसावं कळेना.तो शांतपणे लोक झालेल्या कामाची पाहणी करायला येतात तसं फिरून सगळं फर्निचर बघत होता.मग त्याला गो बॅक म्हटल्यावर डुलत डुलत निघून गेला Happy

या situation ला ' तू जब जब मुझको पुकारे >>> Happy

किंवा सात समंडर पार मै तेरे पिछे पिछे आ गयी Happy

ओडिन ला त्याचं प्रेम मिळालं
>>> तो छावा आहे, आसपासच्या सगळ्याच भुभ्या (भटक्या) त्याच्या मागे मागे हिंडतात
पण आम्हीच त्याला अजिबात मिसळू देत नाही त्यांच्यात

युज्वली हिरवीण चा बाबा व्हिलन अस्तोय.. पण इथं वेगळंच आहे. >>>> इथे मी "मै तुम्हे मुंह मांगे पैसे दे दुंगा, मगर मेरे लडके के जिंदगीसे हमेशा के लिए निकल जाना होगा" असे म्हणणारा आशु डोळ्यासमोर आला Lol

<<<<पण आम्हीच त्याला अजिबात मिसळू देत नाही त्यांच्यात

नवीन Submitted by आशुचँप >>>>>

तैयबअली प्यार का दुष्मन, हाये हाये...

पैसे नाही, ट्रीटस

बाकी ओडिन ची लिश / दोरी ताणलीय चांगलीच, त्यावरून त्याची ओढ येतेय लक्षात Happy

IMG_7677.png

हि आहे आमच्या सिंब्याची मैत्रीण. नाव तर काय क्लियोपात्रा Happy आमचे घर सोडून ५-६ घरं पुढे राहते, आमचा हिरो तिच्या घरासमोरून जातांना १-२ मिनीट थांबून ती कठे दिसतेय का ते पहातो. ती बाहेर नसली कि हिरमुसला होऊन पुढे चालायला लागतो, म्हणजे मलाच थोडं ओढत न्यावे लागते

सिंबा नम्रपणे त्याच्या गर्लफ्रेंड समोर बसला आहे.त्याने कुछ कुछ होता है पाहिला असावा.(इंसान का सर सिर्फ 3 लोगो के सामने झुकता है वगैरे)

वरचे किस्से आणि फोटो पाहून इथली बाळे आता मोठी झालीत असं वाटायला लागलं Happy

कुछ कुछ होता है पाहिला असावा.(इंसान का सर सिर्फ 3 लोगो के सामने >>> Lol

राजा राणी ची नावं वाटत आहेत.
.....
कोणे एकेकाळी सिम्बा नावाचा राजा होता. तो शिकार/ (व्यापार whatever )करायला इजीप्त देशात गेला.
रुबाबदार असा सिम्बा नावाचा राजा देशाची पाहणी करत हमरस्त्याने जात होता. तिथे त्याला एक सुंदर युवती दिसली.
Love at first sight. इतक्यात तिच्या सखीने तिला हाक मारली, क्लिओ पात्रा, महाराजांनी आज्ञा दिली आहे, लवकर महालात चल. So on....

किल्ली लोल.
मग राजकुमार सिंबा नम्रपणे सुंदरी क्लिओपात्रा समोर बसून म्हणाले, 'हे सुंदरी, तुझं नाव काय?मी तुझ्यावर मोहित झालो आहे. मला वरशील का?

क्लिओ पात्रा चा भाऊ होता ओडीन. तो त्या देशाचा युवराज होता. ओडीन दादा च्या परवानगी शिवाय क्लिओ साधी गळ्यातली तार सुद्धा खरेदी करत नसे.(refer क्लि
ओ images )
(जास्तच अवांतर होतंय, sorry )

धमाल पोस्टी. Lol
हे बघून एका खेड्यातल्या आईसारखं मलाही 'माझ्या कोकोनटलाही दिया मिर्झा -गेला बाजार यामी गौतम सारखी मैत्रीण आणते की नाही बघाच' झाले आहे.
आणि आपले दोन्ही दादा असे मैत्रिणीसोबत बघून कोकोनटला 'लडकी मिल गई दोस्त को भूल गया' झाले आहे.

Pages

Back to top