तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

मग

पुरंदर, मावळ व जावळी तालुके सरदेशमुखी व चौथाई सह दारूविरोधकांना तोडून द्यावेत. >>> हे आत्ता वाचलं
हसून हसून डोळ्यात पाणी आलं Happy Happy

लिंबू, मध आणि आल्याचा रस. प्रमाण आणि चवीचा अंदाज घेऊन.
शिवाय आवडती बीयर किंवा आवडतं कार्बोनेटेड ड्रिंक / ब्रीझर.
एक मित्रसाहेब चक्क माझा / मँगो ज्युस घालतात. हे मी कधी ट्राय नाही केलं.
सोबत दिवाळीचं क्रिस्पी आणि नमकीन फराळही चालेल. चीझही. हे वरचे मित्रसाहेब चॉकोलेटही खातात. याची मला तरी कल्पना करवत नाही.

“ गॉर्डन्स जीन आणली आहे, त्याचं कुठलं कॉकटेल करावं कळत नाहीये” - जीन चं क्लासिक कॉकटेल म्हणजे मार्टिनी. जीन, व्हर्मूथ, आणि ऑलिव्ह्ज.

>> ..त्याचं कुठलं कॉकटेल करावं कळत नाहीये<<
जिन अँड टॉनिक, यु कॅन नेवर गो राँग. किंवा जिम्लेट - लाइम जुस अथवा लेमनेड, स्वीट फ्लेवर करता...

It's nine o'clock on a Saturday
The regular crowd shuffles in
There's an old man sittin' next to me
Makin' love to his tonic and gin

आज खूप दिवसानी पेनिसिलीन कॉकटेल पिले…
ब्लेंडेड स्कॉच + सिंगल माल्ट + गिंजर + होनी + लिंबू जूस

कुठल्याही खाद्यपदार्थाच्या किंवा पेयाच्या चवीमधे स्वादाचा किंवा वासाचा ६० ते ७० टक्के वाटा असतो तद्वतच मद्यपानाचा मज़ा हा खरं तर तुमच्या बरोबर असलेल्या तुमच्या निवडक आणि आवडीच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीमुळे आणि रंगलेल्या गप्पांमुळे ६०~७० टक्के असतो बाकी ज्याला जी आवडते ती मदिरा हवी तशी त्याच्या हातात असली म्हणजे झालं !
माझ्या संदर्भात आणखीन एक गोष्ट म्हणजे खाजगीत मैफिली रंगलेली असावी, माझ्या हातात हार्मोनियम , कंठात गजल आणि समोर या सगळ्याचा आनंद घेत दाद देणारे रसिक श्रोते....

Pages