Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53
उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.
प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.
प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.
प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.
चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दारुड्याचे पहिले लक्षण म्हणजे
दारुड्याचे पहिले लक्षण म्हणजे एकट्याने दारू पिणे.
(अर्थात सगळ्या दारूड्यांना हे माहिती असते मग सेल्फ डिनायल मधे जाऊन कुणालातरी सोबत घेऊन त्याला पाजण्यात जास्त खर्च करत गाळात जायला लागतात.)>>>>
इतक्या ठामपणे चुकीच्या गोष्टी नका हो सांगत जाऊ
हे जे काही लिहिलं आहे त्याला काही आधार आहे का उगाच गप्पा?
जाऊन मग कँपनी द्यायची, त्यात
जाऊन मग कँपनी द्यायची, त्यात काय इतकं
>>>
हो खरेच तसे वाटते. कंपनी द्यावी. चार ईकडच्या तिकडच्या गप्पा माराव्यात. कदाचित त्याला असे दारूला कवटाळायची गरज भासणार नाही. कोणी असेल आयुष्यात तर कोणी का असे एकट्याने दारू पित बसेल. ऑफिस सुटल्यावर सरळ घरी वा मित्रांसोबत नाही का जाणार?
पण प्रश्न आहे की त्यांना हे पटेल का की त्यांना दारूचे व्यसन आहे आणि ते वाईट आहे आणि ते सुटणे गरजेचे आहे..
नाहीतर मुद्दाम मला चूक ठरवायला ती व्यक्ती आणखी एक बॉटल ऑर्डर करायची ..
असेही तुम्हाला फालतू वेळ बराच
असेही तुम्हाला फालतू वेळ बराच असतो, तेवढाच सत्कारणी लागेल

<<
कोणत्याही बारमधे कोण बसलंय हे बाहेरून सहज दिसतं?
हे जे काही लिहिलं आहे त्याला
हे जे काही लिहिलं आहे त्याला काही आधार आहे का उगाच गप्पा?
<<
व्हॉट्सॅपवर आलं होतं.
व्हॉट्सॅपवर आलं होतं.>>>>
व्हॉट्सॅपवर आलं होतं.>>>>
मीही अट्टल दारुडा आहे म्हणजे, मला कारण एकट्यानं प्यायला आवडते, मस्त गझल लावावी, किंवा क्लासिकल
किंवा एखादा मूव्ही किंवा उत्कंठावर्धक वेब सिरीज
आपला ग्लास भरून घ्यावा, सोबत चखना घेऊन घोट घोट आस्वाद घ्यावा यासारखी मज्जाच नाही दुसरी
त्यामुळे डीनायलसाठी दुसऱ्याला जबरदस्ती नेऊन पाजयची असले प्रकार संभवत नाहीत पण
एकट्याने दिवसा दारू पिण्यास
एकट्याने दिवसा दारू पिण्यास सुरुवात होते तेव्हा तो व्यक्ती दारू च्या आहारी गेला असे म्हणायला काही हरकत नाही
झेपेल त्यानी च दारु च्या
झेपेल त्यानी च दारु च्या नादाला लागावे.
ज्याचा स्वतःवर कंट्रोल आहे त्यांनी आणि ज्याची आर्थिक
स्थिती इतकी चांगली आहे की दारू मुळे आर्थिक घडी विसकळीत होण्याची बिलकुल शयस्ता नाही त्यांनी
बाकी लोकांनी लांब च राहावे.
नाहीतर घराचा पूर्ण विस्कोट होतो
उलट सुलट प्रतिसाद देणारे सरळ
उलट सुलट प्रतिसाद देणारे सरळ प्रतिसाद देतील असा एखादा काढा आहे का?
ज्याची आर्थिक स्थिती इतकी
ज्याची आर्थिक स्थिती इतकी चांगली आहे की दारू मुळे आर्थिक घडी विसकळीत होण्याची बिलकुल शयस्ता नाही .......
>>>>>>
हाच विचार करून एखादा सलमान दारू पितो आणि रस्त्यावर झोपलेल्या निष्पाप जीवांना चिरडतो
(No subject)
हा माणूस जगातला सर्वात मोठा
हा माणूस जगातला सर्वात मोठा सुपर्रस्टार आहे. बॉलीवूडचा देव आहे.
पण तरीही याच्या दारू सिगारेट व्यसनांचे समर्थन होऊ शकत नाही. दारूची जाहीरात करून ईतरांना पिण्यास उद्युक्त करणे तर आणखी चुकीचे आहे. याच्या या कृत्याचा मी नेहमीच निषेध करत आलो आहे.
दारूची तर ठीक आहे. जुगाराची
दारूची तर ठीक आहे. जुगाराची करतो ते आणखी वाईट आहे.
विमल गुटखा विसरला काय
विमल गुटखा विसरला काय
“जगातला सर्वात मोठा
“जगातला सर्वात मोठा सुपर्रस्टार आहे.” -
सर, जगाची व्याप्ती फार मोठी आहे आणि त्यात पहिल्या पन्नासातसुद्धा येत नाही शाहरुख खान. किमान एखाद्या वेळी तरी फॅक्टचेक करत चला पोस्ट करण्याआधी.
सुपर्रस्टार
सुपर्रस्टार
हा शब्द पण अशुद्ध लिहला आहे.
ह्या शब्दाचा नक्की उच्चार कसा करायचा आणि त्याचा अर्थ काय हे ऋनमेष सांगावे.
" दारू चढल्यावर असे शब्दांचे उच्चार बदलतात हे ऐकून आहे)
Shah Rukh Khan only Indian in
Shah Rukh Khan only Indian in Empire magazine’s ’50 Greatest Actors of All Time
https://www.empireonline.com/movies/features/best-actors/
प्रत्येकाचं आपापलं जग असतं की
प्रत्येकाचं आपापलं जग असतं की नाही?
अग्निवीर
अग्निवीर
बरे झाले तुम्हीच लिंक दिलीत
कष्ट वाचवले.. आकडाही बरोबर पन्नासचा घेतला त्यांनी
भारताचा एकमेव कलाकार आहे ऑलटाईम जागतिक ५० मध्ये..
आणि हो.. आजच्या तारखेला तो बहुधा जगात दुसरा की तिसरा श्रीमंत कलाकार आहे..
अरे हो.. तेच जग बरे का.. ज्यात तुम्ही आम्ही राहतो. नसेल आवडत शाहरूख खान तर चला दुसरे जग शोधायला घ्या अवतार सारखे
मारा ठुमका बदल दिया मुद्दा
मारा ठुमका बदल दिया मुद्दा मितवा
देखो देखो रे हमरा कमाााल... हिक!
मानव,
मानव,
पण दारू पिणे चांगले वा वाईट हे फक्त ज्याने कधीतरी दारू प्यायली आहे तोच ठरवू शकतो. असे माझे वैयक्तीक मत आहे.
अर्थात कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा सामाजिक दृष्ट्या वाईटच मग तो चांगुलपणाचा असो, खूप सारे धागे असो (हे व्यसनाचाच भाग आहे) स्वतःचच घोडं दामटणं असो. खाण्याचा झोपण्याचा.
त्यामुळे मर्यादित मद्य हे खोकल्याच्या औषधातून तर सगळेच घेतात.
https://www.news18.com/news
https://www.news18.com/news/india/did-shah-rukh-khan-plagiarise-jk-rowli...
हा ब्लॉग माझ्या ऑफिस colleague च्या बहिणीने लिहिला होता
त्यावरून तिला शाहरुख फॅन्स ने फार त्रास दिला
https://www.firstpost.com/entertainment/blogger-faces-vicious-cyberbully...
शाहरुख ने चांगले काम केले तर त्याचे फॅन्स असे वागतात कि यांच्यामुळेच तो टिकला आहे
धाग्याचा विषय दारू कशी प्यावी
धाग्याचा विषय दारू कशी प्यावी हा आहे
सरांना धागा भरकटत न्यायची संधी देऊ नका लोक्स
आपला फोकस कायम ठेवा
सध्या थंडीत कुठली दारू घेताय
दारू पिणे चांगले वा वाईट हे
दारू पिणे चांगले वा वाईट हे फक्त ज्याने कधीतरी दारू प्यायली आहे तोच ठरवू शकतो.
>>>
वाह.. खून चोरी लूटमार बलात्कार .. ही सगळी कृत्ये चांगली की वाईट हे ठरवायला आधी ती स्वत: करणे गरजेचे. कमाल लॉजिक आहे. बाकी वैयक्तिक मताचा आदर आहे
..
मर्यादित मद्य हे खोकल्याच्या औषधातून तर सगळेच घेतात.
>>>>>
१. औषधात नेमके प्रमाण असते
२. त्यासोबत ईतरही औषधी असे काही असते.
३. ते तेव्हाच प्राशन केले जाते जेव्हा त्याची गरज असते.
४. आणि तितक्याच प्रमाणात प्राशन केले जाते जितकी गरज असते.
इथे तर आत्ताच बर्फाचे वादळ
इथे तर आत्ताच बर्फाचे वादळ येऊन गेले
Woodford Reserve बॉरबॉन नीट
या वेळेस बॉरबॉन एक्सप्लोरेशन चालू आहे
Woodford Reserve बॉरबॉन नीट>>
Woodford Reserve बॉरबॉन नीट>>>
झकास
चिअर्स
आमच्याकडे ओल्ड मंक झिंदाबाद
त्यातही ओल्ड मंक रिझर्व्ह जास्त आवडली आहे
त्या बाटलीचा शेप पण मस्त आहे
मला ते विचारी भरु आज पेला
मला ते विचारी भरु आज पेला
तसा मी म्हणालो कशाला कशाला .........
“ सध्या थंडीत कुठली दारू
“ सध्या थंडीत कुठली दारू घेताय” - मागच्या विकेंडला एक कॉकटेल ट्राय केलं. डिटेल्स बघायचे राहून गेले. पण ब्लॅक लेबल, कॉन्याक, ब्लॅक कॉफी हे इन्ग्रेडियंट्स होते. बहुदा ऑरेंज लिक्युअर पण होतं. मस्त होतं. पुढच्या वेळी आणखी डिटेल्स शेअर करिन.
३१ डिसेंबर मल्ड वाइनच्या
३१ डिसेंबर मल्ड वाइनच्या धर्तीवर एक कॉकटेल केले. मस्त झाले होते. वेगळा धागा काढते त्या रेसिपीचा.
आमचीही 31 ची पार्टी चांगलीच
आमचीही 31 ची पार्टी चांगलीच गाजली
बाबांच्या मित्रांचा प्लॅन होता, त्यांना म्हणलं नुसतं सोडा आणि व्हिस्की नका घेऊ मी मस्त कॉकटेल करून देतो
मग पाणीपुरीच्या तिखट पाण्याचा पॅक घेऊन आलो, त्यात भरपूर लिंबाचा रस ओतला, चिमूटभर चाट मसाला घातला
) आणि दिलं प्यायला
हे मिश्रण चांगले घुसळून घेतलं त्यात बर्फाचा चुरा घातला मग त्यांच्या कपॅसिटी प्रमाणे 60 आणि 90 मिली व्हिस्की, थोडा सोडा आणि अप्पी फिझ घातलं (मला सध्या हे फिझ लै आवडायला लागलं आहे, त्यामुळे ते हमखास घुसडून देतोच
सोबत थोडा चीझ चिली टोस्ट बनवला, रोस्टेड काजू बदाम
याचीही रेसिपी एकदम सोपी
एका कढईत आपलं नेहमीचे साजूक तूप अर्धा चमचा घालून त्यात काजू आणि बदाम टाकायचे, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतत राहायचे त्यावेळी गॅस अगदी बारीक पाहिजे नैतर करपतात
ब्राऊन झाल्यावर एका डब्यात भरून वरून मीठ, तिखट, मसाला घालायचा आणि बंद करून चांगला हलवयाचा
थोड्यावेळाने उघडला की मस्त रोस्टेड मसाला काजू आणि बदाम
सगळ्यांना इतकं आवडलं की बस, जाईपर्यंत चार चार वेळा सांगितलं की आता इथून पूढे सगळ्या 31च्या पार्ट्या इथेच
बाबाही सगळ्यांना सांगत सुटलेत की मी मस्त कॉकटेल बनवतो, या एकदा पार्टीला
हे हिट झालं म्हणून त्यांना ख्रिसमस स्पेशल पण दिल पण ते फार नई आवडलं, फारच सॉफ्ट आहे म्हणे
पाणीपुरीचा तिखटपणा आणि व्हिस्की चा उग्र पणा एकमेकांना भारी सूट होतात
टाकली रेसिपी. बघा.
टाकली रेसिपी. बघा.
Pages