दिवाळी अंक - २०२३

Submitted by भरत. on 31 October, 2023 - 02:30

यंदाचे दिवाळी अंक प्रकाशित होऊ लागलेत. कुठे काय वाचण्यासारखं वाटतंय , वाचल्यावर कसं वाटलं याची नोंद करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री व सौ दिवाळी अंकाची अनुक्रमणिका पाहायला मिळाली.
प्रथम मायबोलीकरांच्या लेखनाबद्दल - डॉ अतुल ठाकूर यांचा स्वमदत गटांबद्दलचा लेख, शर्मिला फडके आणि बिपिन सांगळे यांच्या कथा आणि पूनम छत्रे यांचा लेख. अरविंद जोशी मायबोलीवर आहे का नक्की आठवत नाही. त्याने भारत जोडो यात्रेबद्दल एक डॉक्युमेंटरी बनवली आहे. त्या अनुभवाबद्दलचा त्याचा लेख आहे. राजन खान यांची दीर्घकथा आहे. 'संभोग से समाधी तक' याबद्दल दोन लेख आहेत. अतिरेकी स्वप्रेमाचा मानसशास्त्रीय वेध घेणारा डॉ उल्हास लुकतुके यांचा लेख. पूनम यांचा लेख जगणं वागणं या विभागार आहे. याच विभागात मिनिमलिस्ट जीवनशैलीबद्दल तनुजा राहणे यांचा आणि मंगला गोडबोले यांचा चाकरचुकर आणि स्वावलंबनाच्या गोष्टी यांबद्दलचे लेख आहेत. ज्योतिष - राशिनुसार उद्भवणार्‍या आरोग्यविषयक समस्या.

मिपाचा दिवाळी अंक आज आला. डोळे दिपवणारी सजावट. अविस्मरणीय दिवाळी अंक. वाचतोय. एकदा भेट द्यावीच .
सर्व काही विनामूल्य. स्वतः जा आणि वाचा.

'गोष्टी पाण्याच्या' नावाने एक दिवाळी अंक रत्नागिरी येथून मागवला होता. दिवाळीच्या दोन दिवस आधी पोचला. त्यात गोष्टी झऱ्यांच्या, गोष्टी तळ्यांच्या, गोष्टी नद्यांच्या, गोष्टी भूजलाच्या, गोष्टी तंत्रांच्या, पाणी आणि विज्ञान ई. छोटेखानी लेखांचे एकूण आठ विभाग आहेत. बहुतेक सर्व लिखाण नवलेखकांचे आहे. अंक माहितीपूर्ण आहे.

अंक परिपूर्ण नक्कीच नाही. पण लिखाणा बरोबरच उत्तम मुद्रितशोधन, गुळगुळीत कागद, निर्दोष छपाई आणि मुख्य म्हणजे कमी जाहिराती ह्यामुळे संग्राह्य झाला आहे.

स्वागत मूल्य २५०/- रुपये

'क्रिक-कथा' - क्रिकेटविषयक एकमेव दिवाळी अंक.
यात माझा ‘कुटुंब रंगलय क्रिकेटमध्ये’ हा लेख आणि ‘क्रिकेट शब्दकोडे’ समाविष्ट
अंकासाठी संपर्क - info@crickatha.com ; टेलि - 84460 35509

crickatha.jpgCC23-ANUK-CROSS-2.jpgCC23-ANUK-LEKH-2.jpgck23-smg gv IMG-20231006-WA0050.jpg-

यावर्षी फक्त लायब्ररीमधले अंक आणणार.मागच्या वर्षी जास्त अंक घेऊन शेवटी काही अर्धवट वाचले होते.

काल वाघूर हा अंक आणला.चहा विशेषांक आहे.लिहिणारे चांगले असल्याने दीपावली सोडून हा अंक उचलला.

शुभ दीपावली व भाउबिजेच्या हार्दिक शुभेच्छा. मी माहेर, मेनका, नवे वर्शाचे कालनिर्णय, नवल, हंस , मौज , ग्रहांकित , आजकाल धनुर्धारी मिळत नाही. बंद पडल का? आवाज ऑफकोर्स व श्री व सौ घेतले.

श्री व सौ चे परीक्षण नंतर लिहिते पण आपल्या माबोकरीण शर्मिला फडके ह्यांची केरळावर आधारीत एक कथा आहे ती फार छान लिहिली आहे. म्हणजे त्यांची लेखन शैली. डिप्रेशन मधे असलेली आई पण मुलीला त्रास होउ न देणारी आई, घरचा गळ्यात पडलेला बिझनेस कसा बसा सांभाळनारी . हे सर्व पुरण माहितीचे आहे. पण कथा मात्र छानच रंगवली आहे. आई वारल्यावर मुलगी कोचिनला जाते व तिथ काय घडते व तिची विचार प्रक्रिया ह्यावर आह. केर ळ पाउस व कोची मधील आर्ट विश्वाचे वर्णन आहे. एक सेक्सी(च) असणार केरळी आर्टि स्ट आहे. पण आक्षेपार्ह काही घडत नाही वरी नॉट. उलट कथा एकदम तरल आहे. मलाच नं तर हाच तिचा बाप असला तर पोरीला आतातरी बाबाचे बरोबर काही क्षण मिळावेत असे वाटले पण कथेत तसे काही नाही. शर्मिला वी मिस यु. कम बॅक. वनवास पण १४ वर्शात संपतो की. बाकी अंक पण छान आहे. वेचू वेचू लिहिते.

ट्रिगर वॉर्निन्गः खालील पोस्ट क्यान्सर संदर्भाने आहे त्यामुळे आपण ट्रिगर होत असाल तर पुढे वाचू नका. >>

तर दिवाळी अंक आठ तारखेला आणले आणि १० ला माझी पेट स्कॅन ची अपॉइन्ट मेंट होती सकाळी साडे सहाची. इथे आत गेले की फोन इंटरनेट काहीही चालत नाही त्यामुळे घरुन काही तरी हार्ड कॉपी वाचायला न्यायचे ठरवले होते. मुक्काम व हिंदू एक समृद्ध अडगळ ही दोन काढूनही ठेवली होती. पण मग मनात आले काहीतरी नवे, व इमोशनली फुलफिलिन्ग पुणेरी वाचा यला मिळाले तर पेट स्कॅन अ‍ॅक्झायटी जरा कमी होईल. " ती स्वयंपाक घराच्या खिडकीतुन अंगणातल्या तुळशी कडे अनिमिष नेत्रांनी बघत होती. मध्ये च बेल बागेतील घंटा ऐकू ती दचकली समोरचा पाक तीन तारी व्हायचा बेतात होता. मोहनच्या आठवणीत रवा लाडू बिघडले असते ... " असे काहीतरी हार्मलेस हवे होते.
बट अलास दॅट वॉज नॉट टु बी.

सर्व सोपस्कार पार पडून आत गेले. प्रेप ची वाट बघत होते. मग अंक उघडला. जनरल चाळ ताना पहिलेच :
१) एक तर मागच्या रंगीत पानावर मधुमेह नाशक आयुर्वेदिक औषधांची जाहिरात आहे. व आत पान उघडल्यावर प्रस्था पित आयुर्वेदिक डॉ ची जाहिरात आहे. हार्ट डिसीज, बीपी मधुमेहावर आयुर वेदिक उपचार, थायरॉइड, सांधेदुखी स्ट्रेस. ह्यावर उपचार!!!. डिस अपॉइन्टेड. आणि ती बाई इतकी स्मग दिसते. सिरीअसली!!!

इथ परेन्त प्रेप झाले व इंजेक्षन ची वाट बघत होते.
२) कथा नंतर बघू म्हणून लेख बघत होते. तर ११२ पानावर मृ णा लिनि चितळे ह्यांचा एक संजीव मंगरऊळ कर नावाचा डॉक्टर मित्र क्यान्सरने ६७ वर्शी गेला . डिटेक्ट झाल्यावर ९ महिन्यात. संजीव गेला हे वेगवेगळ्या वाक्यात लिहिले आहे. चांगली ऑबि चुअरी आहे. माफक इतिहास आहे. तो कसा गुणी रसिक होता वगैरे. ही डाइड अ‍ॅट ६७. मोस्ट कॅन्सर पेशंट्स आर ट्राइन्ग टू अचीव धिस माइल स्टोन. जगातली सर्व कर्तव्ये पार पडून गेला पण जीवन एंजॉय करायच्या मानाने अकालीच गेला असे ताई लिहि तात. ऑबिचुअरे असल्याने १००२००% किती ग्रेट टाइप लेख आहे. नॉट अ लेख टु रीड बि फोर गेटिन्ग युअर रेडिओ अ‍ॅक्टिव डाय इंजेक्षन. पर क्या करते. पढ के काळजी बढ गया.

३) आता तास भर बसायचेच असते. तर आता हळू हळू कथा वाचू म्हणून सुरू केले. उत्तरा बावकर ह्यांच्यावर एक असाच ऑबिचुअरी पूर्ण गुणव र्णनाचा लेख आहे १०२ पानावर आहे अभय कुलकर्णी ह्यांचा. ह्यातही उत्तरा मॅडम गेल्या अशी वाइट बातमी घेउन सुरुवात होते व पु ढे लेखनाची त्यांची इंतर अ‍ॅक्षन, एन एस डीचे दिवस, तुमची स्मृती बकुळीच्या फुलाप्रमाणे हे ते आहे. वन मोर डेथ.

४) अरुणो दय नावाची प्रमोद बोरसरे ह्यांची कथा आहे. गडचिरोली तेंदुपात्ता कलेक्षन, आसन्न मरण बाप गरीबी.

हिंदू एक समृद्ध अडगळ..... ..... हे पुस्तक घरी असतानाही प्रथम वाचताना त्रास होत होता.

अमा,माझे एक नातलग 70 पार झाले आहेत.गेल्या वर्षी की 2 वर्षांपूर्वी त्यांचे ऑपरेशन की केमो झाले होते.अतिशय उत्साही आणि हुषार मनुष्य.स्वतःची कंपनी चालवतोय.
बरीच अशी उदाहरणे आहेत.

बाकी सर्वांनाच आपापला क्रॉस उचलावाच लागतो.

पुढे चालू: अरुणो दयाचे सोन शिंपण !!!
५) सांजसाव ल्या नावाची डिप्राइव्ड ओल्ड मॅन ची कथा आहे. ह्यात ह्याचा एका मित्रावर संशय असतो. बायको बरोबर ल फडे किंवा वन नाइट स्टॅन्ड केल्याचा. ह्यात ह्या मित्राची बायको पाच वरशे स्ट्रगल करून कॅन्सरने परते. झुंजँड ऑल. आता मी डिप्रेशन मध्ये जायचं सोडलं आणि मला आता पुढे काय पुढे काय असे ल अशी उत्सुकता वाटू लागली होती. पेट स्कॅन च्या आधी तुम्हाला एक बाटली देतात त्यात विचित्र केमिकल वासाचे पाणी असते व सारखे प्या प्या म्हणून मागे लागतात. मी आता एक शॉट गेम चालू केली. क्यान्सर म्हटले की एक ग्लास प्यायचा.
५) एक कोळी व को ळीणीला माराय ची( स्पायडर!) एक स पोज ड विनोदी कथा आहे.

६) मग एक मन उदास उदास नावाची कथा आहे: अ‍ॅ ज इफ!! ह्यात डिप्रेस्ड मुसलमान बाईची कथा आहे. ह्यात तिसर्‍या परिच्छेदाची सुरुवातच आईला कॅन्सर आहे अशी आहे!!! शॉट प्लीज. मग मुलगी प्रगाढ विषण्णतेत. जनरल डिप्रेशन मध्ये आहे. ह्या कथेचा शेवट कथेच्या मूळ लेखिका ह्यांच नुकतंच निधन झालं ब्लेस हर सोल. शॉट प्लीज.

७) सल नावाची कथा: नो वन इन नो स्टोरीज इज फुल्फिल्ड अँड हॅपी ऑर इन लव्ह.( अ‍ॅज अपोझ्ड टु धिस हंस मध्ये १०० तरी छान कविता व चित्रे आहेत. पुराना लव्हर भेटतो. हिरॉइनच्या नव र्‍याला गॉल ब्लॅडर खडे झाले आहेत. जाँ डिस आहे. शॉट शॉट. हिरो हिरवीणीची ताटातूट करायचे कर्तव्य करोन तिचे बाबा हार्ट अ‍ॅटेक ने मरतात( शॉट प्लीज) ह्यात ह रवीण हिरोला एक जखम पण देते( सं देव दास) हिरवीण धीर करुन हिरोला परत भेटायला जाते तर तो हार्टॅअ‍ॅटेकने मेलेलाच!!( शॉट प्लीज) पण हा मेल्यावर ही हिरवीणीला ए वेडाबाई म्हणतो.!!! वेल बाटली संपत आली औषधी पाणी पुरवून वापरले पाहिजे.
८) इथे देवीचा खेळ नावाची कथा आहे. एक मुलगी कच र्‍यातून उचलून आणली आहे व घरच्यांना मुले झाल्यावर तिला परत करायचे व कांटारा सार खा कन्नड प्रीसट असे करू नका म्हणतो नाहीतर देवीचा प्रको प होईल. म्हणून तिला परत घरात ठेवतात. ह्या कथेत त्या मुली बद्दल उकिरड्या वर पडलेला मां सा चा गोळा असे अपमान जनक उल्लेख आहेत!! त्या मुलीच्या नशीबी हाड हाड व उपेक्षा> व्हेरी रिलेटेबल.

अरे कोणी सुखात जगते आहे कि नाही.

९) मग एका डॉक्ट्रीण बाईंचा माझे विदेशातील पेसंट असा लेख आहे. ह्यातही डॉकत र पेशंट गोपनीयतेच्या धज्ज्या उडवल्या आहेत. काउन बाइ.
ह्यातून लेखिकेचे पूर्वग्रहच उघडे पडतात.

१०) ओवाळणी नावाची इन्क्लुझिव कथा आहे. म्हण जे काही इस्लामिक नावे आहेत व हिरो किसना ह्याला ओवा ळणी कशी भरावी अशी भीती आहे कारन पैसे पुरेसे नाहीत.

११) मग नथ नावाची कथा आहे: ह्यात अब्युझिव नवरा व समजुतदार भावोजी कम मित्र असे रु णा नुबं ध त्या बरोबर चुलीवरची पुरण पोळी आहे.
ह्यात ब्यु नवरा १६४ पानावर लास्ट स्टेज कॅन्सरने मरतो. ( बाटली संपली नो शॉट्स प्लीज) व समजुत दार भावोजी पण सपोर्ट सिस्टिम काढून इसको दवाकी नही दुवाकी जरुर त है फेज मध्ये आहे तो का हे चाणा क्ष वाचकांनी फिगर आउट केलेच असेल. तो इ न्हे भी मरा. वी आर अ‍ॅट पेज १६४!!!

१२) मग माझं राज्य कोणतं नावाची कथा अहे ह्यात हिरवीणीचा पती फोर्सेस मध्ये त्यामुळे तो तसा जातो. प्रेयरस. " ती पोकळीच्या आर्ततेतही सुखवली!! मंजे नक्की काय? व कसे!!ऑं . इथे वाट बघणारा समजुत दार कलीग आहे. ते एकत्र येतील अशी साधारण कल्पना आहे शेवटी. वेल बेस्ट लक. सेकंड टाइम. ही त्याचा बराच वेळ घालवते विचार करु करू.
१३) खिंडार म्हणून एका २५ वर्शे वाट बघ णार्‍या बाईची कथा आहे. प्रियकर परत भेटतो. पण पुढे नुसतेच उसासे. कॉफी सोडली. झाकोळुन आलेल्या आभाळासारख्या आठवणी... ओह प्लीज!!!

१४) सूरपारंबी नावाची लहान मुलांची कथा आहे. नॉट अ‍ॅट ऑल लंपन लेव्हल. एका मेइलिना नावाच्या मुलीची कथा आहे.

बाकी राशिभवीष्य, सरकारी योजनांची माहिती. प्रवास वरणने. हे अप्रतीम ते ज गावेगळे , मग मला बोलवणे आले व मी हसत खिदळत स्कॅन ला गेले. बाटली संपवली म्हणून नर्स खुष.

बर्‍याच डॉक्टरांच्या अ‍ॅडवर्टोरिअल जाहिराती आहेत. त्यत आयुरेवेद वाली बाई पण आहे. तिला सायन्स इज डोप चॅनेल दाखवले पाहिजे.
हुस्श. संपली सुट्टी. उद्या पासून वर्क वर्क वर्क.

माझं काय म्ह णणे. प्रत्येक जण काही आजारी नसतो हे मान्यच त्यांना वाचून काही होणार नाही. पण जे कार्यकारी संपादक वगैरे असतात इशू पुट टुगेदर करतात. ते सर्व कथा वाचत असतील ना. इतका डिप्रेसिव अंक का काढावा. दिवाळीत सर्व जण सुखी आनंदी राहयाचा प्रेत्न तरी करतात.

अमा! Lol
आता या ऐवजी अनिमिष नेत्रांनी तीन तारी पाक वाचलं असतंत तर काय पोस्ट लिहीली असतील बरं! Proud

व्याख्ग्या विख्ही वुख्हू. ह्या ह्या ह्या. भरत पोस्ट पटल्या नाहीत तर उडवायची विनंटी करा. दिस रिअली हॅपन्ड टु मी. हॉने स् ट रिव्यु आहे.

अमा Rofl
तुम्ही यातही विनोद शोधलात हे भारी आहे!

लहान मुलांची पुस्तके वाचावीत. ठकठक . आनंदीआनंद असतो.
(किशोर हे प्रौढ मुलांचे मासीक आहे. )
अमा. छान आहेत पोस्ट्स.
-------
माहेरची अनुक्रमणिका दिली आहेच भरत यांनी.

Pages