Submitted by भरत. on 31 October, 2023 - 02:30
यंदाचे दिवाळी अंक प्रकाशित होऊ लागलेत. कुठे काय वाचण्यासारखं वाटतंय , वाचल्यावर कसं वाटलं याची नोंद करूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिनंदन गुरुदिनि !!
अभिनंदन गुरुदिनि !!
<< ऐसी अक्शरे. ह्यावेळी
<< ऐसी अक्शरे. ह्यावेळी त्यान्ची सन्कल्पना "आफ्रिका खन्ड" आहे.
लेख माहितीपूर्ण आहेत.
https://aisiakshare.com/diwali23_tracker
त्यतील M-Pesa हा एक माझा लेख.
Submitted by छन्दिफन्दि>>
M-pesa लेख माहितीपूर्ण आहे. या विषयी कधी वाचनात/ऐकण्यात आलं नव्हतं
Submitted by छन्दिफन्दि>>
Submitted by छन्दिफन्दि>>
M-pesa लेख माहितीपूर्ण आहे.>>
वाचल्या बद्दल धन्यवाद!
गेल्या आठवड्यात लायब्ररीत
गेल्या आठवड्यात लायब्ररीत उरलेल्या अंकांपैकी त्यातल्या त्यात बरा वाटला म्हणून श्री दीपलक्ष्मी घेतला. मुखपृष्ठावरचा माधुरी दीक्षितचा फोटो
unreal अनरिअल वाटला. शोभा बोंद्रे यांचा माधुरीवरचा लेख आहे. यांची मुलगी आणि माधुरी केजीपासून एका शाळेत आणि एका वर्गात. माधुरीच्या निमित्ताने स्वतःच्या कामाचे ठळक उल्लेख. पालक म्हणून माधुरीच्या आईशी चांगला परिचय - भेटीगाठी, घरी जाणे. मग माधुरीच्या आईनेही कशी यांच्या मुलीची चौकशी केली हे सांगताना, यांची मुलगी काय काय करत असे तेही छापा. आधी शाळेत सौंदर्यस्पर्धा घेतात हे वाचून धक्का बसला. त्यात माधुरी काही नंबरात आली नाही यावर धक्का बसणे अपेक्षित असावे. मग लोकमान्य सेवा संघात लेखिकेने पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या माधुरीच्या नृत्याच्या कार्यक्रमाला फार प्रेक्षक आले नाहीत. अशा आठवणी. लेखासोबतच्या फोटोंपैकी फक्त माधुरीचा तिच्या आईवडिलांसोबतचा फोटो आवडला. लेखिकेचं नाव ओळखीचं वाटलं. नॉट ओन्ली पोटेल्स, मुंबईचा अन्नदाता (डबेवाले) , धंदा ही पुस्तकं नावावर आहेत. हा लेखही रागदरबारी या पुस्तकातून आहे . या सुंदर माझं घर मध्ये सूत्रसंचालन करायच्या का?
मग ज्यासाठी हा अंक मुद्दाम घेतला तो डॉ मृदुला दाढे यांचा बंदिनी हा लेख वाचायला घेतला. लेखिका आधी गाण्यातलं फक्त स्वरसौंदर्य उलगडवून दाखवत असे. आता त्यासोबत चित्रपटाची कथा, गाण्यांतले भाव इ.इ. रसग्रहणच केलं आहे. ओ पंछी प्यारे या गाण्याबद्दल लिहिताना - अनेक 'वैदी' स्त्रियांच्या मनातली वेदनाच ही! असं वाक्य आलं. एकेरी अवतरण चिन्हे लेखातलीच. म्हटलं हा काहीतरी अपरिचित शब्द असावा. मग पुढे वैद, वैसे चलूं उस पार, वैफियत हे शब्द आल्यावर कपाळावर हात मारून घेतला. शिवाय बिचार्या , नाचर्या. गावकर्यांनी हेही आहेच.
सुनील दत्त वरचा बाबू मोशायचा लेख विस्कळीत आहे. त्यात माझ्यासाठी नवी अशी माहिती थोडीच आहे.
जीवनकला यांच्या आगामी आत्मचरित्रातून २५ पाने छापली आहेत. जीवनकला म्हटलं की जिथे सागरा धरणी मिळते आणि मराठा तितुका मेळवावा एवढंच आठवतं. पण ती हिंदीतली नृत्यांगना. लेखातलं पहिलंच वाक्य आहे - कुकू , हेलननंतर त्याकाळी ज्या चार सहा जणी डान्सर म्हणून फेमस झाल्या त्यातली मी पहिली होते. हंसता हुआ नूरानी चेहरा या गाण्यात त्या होत्या. या २५ पानांत त्यांच्या हिंदी मराठी चित्रपटांतला सगळाच प्रवास आल्यासारखा वाटतो. यात सहकलाकारांबद्दलच अधिक लिहिलं आहे. त्यात जे फार प्रसिद्ध नव्हते किंवा आता अस्तंगत झाले अशांबद्दलही ट्रिव्हिया म्हणावं अशी माहितीही दिली आहे. ही सगळीच जीवनकला यांनी दिली की शब्दांकन करणार्याने शोधून घातली, हे कळणार नाही. पण त्यामुळे लिखाण रंजक झाले आहे.
कुमकुमवरच्या परिच्छेदात एक गडबड झाली आहे. तिच्यासोबत जीवनकला यांनी शेरखान हा चित्रपट केला. त्यात नायक कमलजीत म्हणजे वहिदा रेहमानचा नवरा असं सांगितल्यावर पुढे दोनचार वाक्ये वहिदावर लिहून गाडी पुन्हा कुमकुमवर आली आहे. पण सर्वनामेच वापरल्याने ते वहिदाबद्दलच लिहिलंय असं वाटतं. त्यामुळे २०२० साली तिचं निधन झालं हे ऐकून धक्का बसला. पण एकंदरित हा लेख आवडला.
शिवाय मायबोलीवर एडिट करताना अक्षरांचा गुंता होतो तोही प्रकार लेखात आहे.
फास्टर फेणे दूरदर्शन मालिकेबद्दलचा महेश दुर्वे यांचा लेख वाचेन.
बाकी सगळ्याला पास.
हे हे दाढे बाई कसली डॉक्टर
हे हे दाढे बाई कसली डॉक्टर आहे?! मराठीच्या चुका
बोंद्रे बाई का ल्हितात. ते ही माधुरी बद्दल. खरे तर नेन्याने लिहायला हवे. घरी आज्जिबात काम करत नाही. स्वयंपाक येत नाही. टाइप काहीतरी डिटेल. पण तो पार्टी मध्ये फोटॉ देण्यात धन्य मानतो स्वतःच दे आर रेगुलर एन आर आय कपल.
मराठीच्या चुका दिवाळी
मराठीच्या चुका दिवाळी अंकाच्या कृपेने असाव्यात.
हंस नवल प्र्रोफ रीडिन्ग एकदम
हंस नवल प्र्रोफ रीडिन्ग एकदम भारी आहे.
ऐसी अक्षरेचा दिवाळी अंक खरंच
ऐसी अक्षरेचा दिवाळी अंक खरंच छान आहे. टिंबक्टु चा लेख मस्त आहे. एक झायरे वर आहे तो ही छान आहे. नक्की वाचा.
रेको बद्दल धन्यवाद.
'लोकसेवक' या पेण येथून
'लोकसेवक' या पेण येथून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकात माझे 'राजकारणा'वरील शब्दकोडे समाविष्ट झाले आहे.



बऱ्याच वर्षांपूर्वी 'माहेर'
बऱ्याच वर्षांपूर्वी 'माहेर' दिवाळी अंकात बहुतेक शोभा बोंद्रे यांनीच माधुरी दीक्षितवर लेख लिहिला होता. तेव्हा मुखपृष्ठावरही माधुरी होती. त्याच अंकात बहुतेक ऑप्रा विंफ्री शोबद्दल एक लेख होता. सहज आठवलं वरचे प्रतिसाद वाचून.
मृदुला दाढे-जोशी याचे लोकसत्तेतले दोन लेख वाचलेत हिंदी गाण्यांच्या रसग्रहणाचेच. (दिल ढूंढता है आणि रुके रुके से कदम) ते खूप आवडले होते.
त्या कसल्या डॉक्टर आहेत याचा इथे काय संबंध ते समजलं नाही!
'लव अंकुश' या डोंबिवली येथून
'लव अंकुश' या डोंबिवली येथून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकात माझे 'चित्रपट' विषयक शब्दकोडे प्रसिद्ध झाले आहे


गुरुदिनि ,
गुरुदिनि ,
नवीन कोणत्या अंकाबद्दल लिहिलंय म्हणून बघायला यावं तर सारखे आपले तुमचे शब्दकोड्यांच्या बद्दलचे प्रतिसाद.
एकूण किती अंकांमधे तुमची शब्दकोडी आली आहेत
एकदाच काय ती यादी लिहाल तर बरे होईल.
आणि त्याहीपेक्षा दिवाळी अंकांमधे कुठे काय वाचण्यासारखं वाटतंय, वाचल्यावर कसं वाटलं याबद्दलही लिहाल का ?
लिहाच !
हर्पेण प्लस वन. काल ऐसीचा
हर्पेण प्लस वन. काल ऐसीचा अंक वाचायला सुरु केला तर हपिसातले इंटरनेत गेले. आता आज उरलेला वाचणार.
आफ्रिका खंड विषय त्यामुळे ऐसी
आफ्रिका खंड विषय त्यामुळे ऐसी वाचला नाही. थोडं तरी प्रदेश गमन असेल तर कळेल. इजिप्तबद्दल उत्सुकता होती पूर्वीपासून. यूट्यूबवरचे खूप विडिओ पाहिलेत. (हिस्ट्री चानेलचे.) तसं काही हवं.
'मौज' वाचायला घेतलाय.
'मौज' वाचायला घेतलाय.
सगळं वाचून झालं नाही. टप्प्याटप्प्याने वाचायला हवं.
महेश एलकुंचवारांचं पत्र भारी आहे, पण खूप मोठं आहे
'रहना नहीं देस बिराना है' हा वंदना अत्रे यांचा लेख अतिशय आवडला. अठराव्या-एकोणिसाव्या शतकातल्या भारतीय गायिका हा लेखाचा विषय आहे. त्या काळात 'तवायफ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्त्रिया. गायन आणि नृत्यकलेत निपुण असलेल्या. धनाढ्य जमीनदार, संस्थानिक यांच्या आश्रयाला राहून त्या आपली कला सादर करत.
१९०२ साली ग्रामोफोन अँड टाईपरायटर लिमिटेड कंपनीच्या रेकॉर्डिंग तज्ज्ञाने, फ्रेडरिक गायस्बर्गने अनेक तवायफ स्त्रियांच्या तीन तीन मिनिटांच्या रेकॉर्ड्स काढल्या आणि त्या प्रचंड प्रमाणात खपल्या. (पुरुष गायक रेकॉर्डिंगच्या यंत्राला बिचकले. )
समाजाचा या कलावतींकडे बघण्याचा दृष्टिकोन दुटप्पी होता असं म्हणणंही understatement ठरावं. तवायफ, देवदासी अशा नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या स्त्रियांचा वर्ग मुळात निर्माण झाला तो पुरुषांच्या मनोरंजनासाठी. नंतर त्यांच्याकडेच तुच्छतेने बघितलं जाऊ लागलं. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्याची इच्छा त्यांनी जेव्हा व्यक्त केली तेव्हा त्यांच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं गेलं, मात्र त्यांनी जमवलेले पैसे स्वीकारले गेले!
या गायिकांपैकी मलका जान आणि गौहर जान ही दोन नावं तेवढी ओळखीची होती.
'तुंबाडचे खोत' या कादंबरीत नरसू खोत मुंबईहून ग्रामोफोन आणि रेकॉर्ड्स आणतो. त्यात 'मलका जान' ची रेकॉर्ड असते. रेकॉर्ड संपताना 'मेरा नाम मलका जान' असं वाक्य असतं. ते वाक्य आणि एकूणच रेकॉर्ड हा प्रकार त्या परिसरात इतका प्रसिद्ध होतो की त्या 'मलका जान' शब्दाला वेगळाच अर्थ चिकटतो. 'अमुक अमुक झालं नाही तर नाव बदलीन' अशा अर्थाने लोक म्हणू लागतात, ' अमुक अमुक झालं नाही तर मलकाजान'
ती मलका जान, तिचं चित्र आणि रेकॉर्डच्या शेवटी 'माय नेम इज....' असं सांगण्याची पद्धत या लेखात सापडली!
सर्वांची दिवाळी अंक माहिती
सर्वांची दिवाळी अंक माहिती आणि फोटो मस्त आहेत.यावर्षी, मागच्या वर्षी एकही आणला नाही.वाचन खूप आवडतं, पण 'कशाला घरी अजून पसारा' असं होतं.लायब्ररीत जाणे येणे पेशन्स उरला नाही.
अमा,वैताग कळला आणि पोहचला पण.तरी तुम्ही या वैतागावर हिलेरियस लिहिलंय.आता उतारा म्हणून सुपरस्टोर किंवा धमाल किंवा वेलकम किंवा फ्रेंड्स किंवा बिग बँग थियरी बघा.दिवाळी अंकात कथा हलक्या फुलक्या किंवा माहितीपूर्ण सुद्धा चालतील.इतकं डिप्रेशन माहेर मध्ये एरवी बायकांना रडवून डोळे साफ करायला ठिके पण दिवाळी अंकात नक्कीच नको.(यावरून आठवलं: बेस्ट आवडलेला एक लहानपणी बाबांनी आणलेला चित्रलेखा दिवाळी अंक.त्यात रुद्राक्ष प्रकारांची सर्व माहिती, परफ्युमस बनवायच्या प्रोसेस ची आणि काही प्रसिद्ध ब्रँड्स ची माहिती, कथा होत्या.तुम्हाला खूप आवडला असता लेख.अजूनही कुठे जुन्या अर्काइव्ह मध्ये मिळाला तर हवाय. शिवाय संसारी साधू नावाची एक तद्दन बॉलिवूड कथा होती, कोणीतरी मरतो, मग चितेवरून उठतो, साधू बनून येतो वगैरे(दिवाना मध्ये ऋषी कपूर ला नॉर्मल दाढीवाला ऐवजी साधू दाढीवाला केलं तर बनेल तशी होती कथा.) चित्रलेखा वॉज अ जेम.
ऐसी अक्षरे मधील सई केस कर
ऐसी अक्षरे मधील सई केस कर हयांचा साखरेचे उत्पादन व स्लेवरी वरील लेख पन सुरेख व माहिती पूर्ण आहे.
ओके हर्पेन ,
ओके हर्पेन ,
सर्व दिवाळी अंक वाचल्यावर नक्कीच लिहिणार,
बऱ्याच अंकांना लेख व कोडी पाठवली होती, आत्ता हळूहळू अंक येत आहेत
गुरुदिनी इथेच सर्व लिस्ट टाका
गुरुदिनी इथेच सर्व लिस्ट टाका व अपडेट करत रहा. दर वेळी नवा धागा काढायची गरज नाही. इथे तुम्हाला जास्त टीआर पी मिळेल.
मी किती वेळ विचार करतेय नुसती
मी किती वेळ विचार करतेय नुसती एक यादी टाकायला गुरूदिनाचा मुहूर्त का शोधायचा
मग वर पाहिलं तर आयडी चं नावच गुरुदिनी आहे.
माधुरी पुरंदरे - धाकट्या
माधुरी पुरंदरे - धाकट्या मामाच्या गोष्टी
वाचून संपवलं. खूप दिवसांनी इतकं छान आणि निर्मळ वाचायला मिळालं.
त्याचा वाचनाचा प्रवास, त्याचे सर, त्या काळातली घरच्यांची मानसिकता सगळच खूप छान लिहिलंय
https://aisiakshare.com/node/8857
माधुरी पुरंदरे - धाकट्या
माधुरी पुरंदरे - धाकट्या मामाच्या गोष्टी
वाचून संपवलं. खूप दिवसांनी इतकं छान आणि निर्मळ वाचायला मिळालं.
त्याचा वाचनाचा प्रवास, त्याचे सर, त्या काळातली घरच्यांची मानसिकता सगळच खूप छान लिहिलंय
https://aisiakshare.com/node/8857
मार्गदर्शनासाठी धन्यवाद -
मार्गदर्शनासाठी धन्यवाद - अश्विनीमामी
पुरंदरे मस्तच लिहितात,मिळवून
पुरंदरे मस्तच लिहितात,मिळवून वाचते.
नवल वाचला. काही कथा चांगल्या,
नवल वाचला. काही कथा चांगल्या, तर काही - विशेषतः खुनाच्या रहस्यावर आधारित अगदीच पपलू आहेत. संपादकीय वाचून जेवढ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या, त्या पूर्ण झाल्या नाहीत.
आश्चिग यांच्या कथेतली संकल्पना कळली. मांडणी आवडली. सुरुवातीच्या भागातले संवाद इंग्रजीत विचार करून मराठीत लिहिल्यासारखे वाटले. आता ही कथा भविष्यकाळात घडते, त्यामुळे त्यावेळची पात्रे तसेच करतील असा विचार करून ते केले असेल का?
सध्या श्री व सौ वाचतोय. याबद्दल आधी लिहिलंय. कृतज्ञतेचं रोप - डॉ अंजली भाटवडेकर - कॅन्सर सर्व्हायवर. कठीण परिस्थितीत आणि एकंदरितच रोजच्या रोज आपल्या बाबत घडणार्या चांगल्या गोष्टी लक्षात घेऊन, नोंदवून त्याबद्दल कृतज्ञ राहिलं की सकारात्मकता वाढते , बळ मिळतं. इ. पूनम छत्रे यांचा चालढकल आणि तनुजा राहाणे यांचा किमानवाद हे लेख पसरट झालेत. चालढकल मधला उत्क्रांती इ. भाग उगाच घुसवलेला वाटला. डॉ उल्हास लुकतुकेंचा 'स्वतःवरच खुष पण किती?' हा लेख आटोपशीर , टोकदार आहे. मंगला गोडबोलेंचा चाकर (मत) राखो जी बराच मोठा आहे. पण कंटाळवाणा होत नाही. थोडा भूतकाळ, चित्रपटांवरचे विनोद, वर्तमान आणि भविष्याचा वेध. - रामा गडी ते अलेक्सा , रोबोट ; माहिती आणि मतप्रदर्शन. बाई स्वतःला अपडेट ठेवतात याचं कौतुक वाटतं.
दिलीप लिमये यांचा व्यक्तिचित्रणपर लेख फेसबुक , व्हॉट्स अॅप वर जे स्मरणरंजनपर लेख फॉर्वर्ड आणि शेअर लाइक होतात, तसा आहे . तो
इथे कथा म्हणून छापलाय.
इतर कथा अजून वाचल्या नाहीत. बिपिन सांगळे यांची बॅड टच वाचेन.
अक्षर मधलं जेवढं वाचलं, तेवढं आवडलं / पोचलं. त्यातल्या सतीश तांबेंच्या कथेला फेसबुकची पार्श्वभूमी आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांची विचारसरणी मांडली आहे. पण नंतर घेतलेलं वळण अनपेक्षित आहे. हा एक लेखकही बदलत्या परिसराचा, वातावरणाचा माग ठेवतो. त्यांच्या कथा त्याच कौटुंबिक चाकोरीत फिरत नाहीत. अर्थात भूमिका न घेणार्या किंवा वेगळ्या भूमिका घेणार्या वाचकांना त्या कदाचित आवडत नसतील.
माधुरी पुरंदरे एकदम सुरेख,
माधुरी पुरंदरे एकदम सुरेख, हृदयस्पर्शी. थँक्स छंदीफंदी.
माधुरी पुरंदरे एकदम सुरेख,
माधुरी पुरंदरे एकदम सुरेख, हृदयस्पर्शी. थँक्स छंदीफंदी.
नवीन Submitted by अन्जू on 16 December, 2023 - 17:>>> welcome
वावे आणि भरत , छान लिहिले आहे
वावे आणि भरत , छान लिहिले आहे.
मी दिवाळी अंक वाचणं सोडून दिलं आहे पण तुम्ही सगळेच जे लिहिताय ते वाचायला छान वाटतं आहे.
धन्यवाद अस्मिता.
धन्यवाद अस्मिता.
सकाळ साप्ताहिक दिवाळी अंक अतिशय आवडला. जवळजवळ सगळे लेख/कथा/मुलाखती वाचून झाल्या!
वहिदा रेहमान, पंकज त्रिपाठी यांच्या मुलाखती आहेत. दोन्ही आवडल्या. ख्रिस्तोफर नोलानवरचा सुहास किर्लोस्कर यांचा 'प्रेक्षकांना हुशार समजणारा दिग्दर्शक' हा लेखही आवडला. (मी त्याचा फक्त 'इंटरस्टेलार' बघितला आहे आणि तो खूप आवडतो. बाकीचे नक्की बघायला हवेत असं हा लेख वाचून वाटलं.)
ऑलिव्ह रिडले कासवांचं गेल्या काही वर्षांत झालेलं जतन आणि संवर्धन याबद्दल आरती कुलकर्णींचा लेखही छान आहे.
याबद्दल गेली काही वर्षे खूप ठिकाणी वाचलं, ऐकलं आहे. पण नवीन नवीन माहिती वाचायला आवडतेच.
बाळ फोंडके यांचा विवाहबाह्य संबंधांबद्दल सर्वांगीण ऊहापोह करणारा लेखही आवडला.
'किन्नरचा आशीर्वाद' ही लक्ष्मीकांत देशमुख यांची कथा हृदयस्पर्शी आहे. लेखकाने विषयाचा खूप जवळून अभ्यास केला असावा अस़ं जाणवलं.
गौतम पंगूंची 'व्हाईब्ज' ही कथा आवडली. त्यांच्या कथा छानच असतात.
इतर कथाही चांगल्या आहेत.
मृणालिनी चितळे यांचा मंगला नारळीकरांवरचा लेख चांगला आहे. तसं बरंचसं माहिती असलेलंच होतं, तरी आवडला. त्या नारळीकरांच्या जवळच्या नातेवाईक असल्याने घरगुती आत्मीयतेने लिहिला आहे.
गोव्यातल्या हवेल्यांवरचा लेख अजून वाचायचा राहिला आहे, तो इंटरेस्टिंग वाटत आहे.
'शिवतेज' या पुणे येथून
'शिवतेज' या पुणे येथून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकात, अष्टपैलू क्रिकेटपटू 'दत्तू फडकर' यांच्यावरील 'दमदार फर्जंद' हा माझा लेख प्रसिद्ध झाला आहे.



Pages