Submitted by दत्तात्रय साळुंके on 17 November, 2021 - 01:19
कळीकाळाचे ते | सुटले ग्रहण ||
अभ्यंगाचे स्नान | भिमातीरी ||
ऐसी पंढरीशी | साजिरी दिवाळी ||
भक्त मांदियाळी | पायरीशी ||
झाडीले अंगण | विठूने सकाळी ||
रेखाटे रांगोळी | रखमाई ||
सजले तोरण | महाद्वारी छान ||
तुळशीचे पान | गंधाळले ||
नाम गजराचा | फुटला फटाका ||
त्याचाच दणका | दाहीदिशा ||
नामाचाच लाडू | करंजी नामची ||
जाजमे भक्तीची | बैसावया ||
बैसल्या पंगती | पंढरी नगरी ||
विठू हारोहारी | वाढतसे ||
भेटली विठ्ठली | नेत्र पाणावली ||
आस निववली | हृदयीची ||
मिठी दृढ पायी | लाविले हृदयी ||
भेटली गा माई | लेकराशी ||
कशानेही आता | नकोची दुरावा ||
मरण सांगावा | पायी यावा ||
उजळला दीप | अंतरी प्रदोष ||
ऐसी एकादश | दूजी नाही ||
© दत्तात्रय साळुंके
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चांगली आहे.
चांगली आहे.
प्रासादिक!
प्रासादिक!
खुप छान शब्दयोजना ... आवडली
खुप छान शब्दयोजना ... आवडली कविता !
विठ्ठल, विठ्ठल ___/\___
विठ्ठल, विठ्ठल ___/\___
खूपच सुंदर
विठ्ठल, विठ्ठल ___/\___
विठ्ठल, विठ्ठल ___/\___
खूपच सुंदर
सुरेख रचना.
सुरेख रचना.
खूप धन्यवाद सर्वांचे....
खूप धन्यवाद सर्वांचे....
शुभ दीपावली...
शुभ दीपावली...
आई ग्ग!! काय सुंदर रचना आहे.
आई ग्ग!! काय सुंदर रचना आहे.
सामो खूप धन्यवाद...
सामो खूप धन्यवाद...