Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
लॅरी एलिसननी डोनेट केलं >>>
लॅरी एलिसननी डोनेट केलं >>> म्हणजे तात्याशी पुरानी दोस्ती खतम? त्याला इतक्या टिकटॉकचा बिझिनेस देउन सुद्धा?
बाकी डिबेट मधे टिकटॉकचा विषय आलेला दिसत नाही, चीनबद्दल इतके बोलून सुद्धा. मी पाहिलेल्या भागात तरी नव्हता. दोन्ही सरकारांनी गलथानपणा केला आहे त्याच्या बाबतीत.
सोरोस आजकाल आपल्याकडच्या
सोरोस आजकाल आपल्याकडच्या व्हॉट्सॅप अंकल्सनाही माहीत झालेला दिसतो. बर्याच रॅण्डम फॉरवर्ड्स मधून येत असतो >> बहुतेक देशी अंकलचा समज आहे कि अमेरिकतली राईट विंग नि भारतातली राईट विंग सारख्याच आहेत त्यामूळे इथला सोरोस चा ब्रह्मराक्षस तिथेही बागुलबुवा म्हणून वापरला जातो. असेही असेल कि ज्या फॅक्टरींमधून हे भारतीयकरण केलेले फॉरवर्ड्स येतात त्यांचा सोर्स अमेरिकन असेल नि गूगल ट्रांस्लेशन मधे विशेषनामाचे भारतीयकरण होत नसेल
मला अजून त्याची टकर कार्लसननी
मला अजून त्याची टकर कार्लसननी घेतलेली मुलाखत बघायची आहे. >> काही अनपेक्षित नाहिये त्यात. "ते" तुला मारणार आहेत असा काहीसा हवेत मारलेला बाण आहे. "ते" कोण ते विचारू नका - सोरोस पासून हिलरी ते विंडी - हंटर बायडेन कोणीही असू शकतो.
म्हणजे तात्याशी पुरानी दोस्ती
म्हणजे तात्याशी पुरानी दोस्ती खतम? त्याला इतक्या टिकटॉकचा बिझिनेस देउन सुद्धा?
बाकी डिबेट मधे टिकटॉकचा विषय आलेला दिसत नाही, चीनबद्दल इतके बोलून सुद्धा. मी पाहिलेल्या भागात तरी नव्हता. दोन्ही सरकारांनी गलथानपणा केला आहे त्याच्या बाबतीत. >> मधे बरेच बदलले आहे. चायना ने रुल्स बदलल्यामूळे ऑरॅकल शी केलेली पार्अटनर्शिप वेगळ्या प्रकारची झाली. बायडन आल्यावर त्यात अजून बदल झाले जे ओनरशिप मूव्ह करण्याच्या दिशेने होते नि परत त्यात चायन ने रूल्स बदलून काहीच गोच करून ठेवली. चेस गेम आहे सूरू त्यात. इंफो वर्ल्ड मधे डीटेल मधे लेख होता बघ.
एक दोन वर्षांपूर्वी ट्रम्पचे
एक दोन वर्षांपूर्वी ट्रम्पचे लॉयर्स पुरावा, मोठ्ठा पुरावा, एकदम मोठ्ठा पुरावा - क्रॅकेन - देणार होते आठवते का? २०२० च्या निवडणुकीत हस्तक्षेप केला गेला आहे म्हणून?
तर ते ऑल्मोस्ट सिद्ध व्हायच्या बेतात आहे.
फरक इतकाच, की तेच स्वतः करत होते असे दिसते. त्यांच्या टीमचे क्वार्टरबॅक, सेण्टर फॉरवर्ड, नं ३ बॅट्समन - सिडनी पॉवेल हिने जॉर्जिया निवडणुकीच्या खटल्यात "गिल्टी प्ली" दाखल केली आहे. तेथील मशीन्स मधे फेरफार करायच्या प्रयत्नांबद्दल.
याबद्दल तिला - तब्बल $९००० इतका दंड द्यावा लागणार आहे! ज्या खटल्यात इतर एकसो एक नग अजून आरोपी आहेत तेथे हिला इतक्या कमी शिक्षेत सोडत आहेत त्यावरून अंदाज येइल की तिच्याकडे किती मोलाची माहिती असेल.
२०२४ बद्दल बोलायचे, तर तिकडे निकी हेली ने साउथ कॅरोलीना मधे चायनीज कंपन्यांना जमीन विकल्याचे साफ फेटाळले आहे. कारण "चायना जुशी" या कंपनीला त्यांनी २०० एकर जमीन फुकट दिली आहे! चीन मधल्या कंपन्या किती स्वतंत्र असतात हे जगजाहीर असल्याने हे उत्तर फारच क्लिअर आहे. उगाच लोक आरोप करतात!
तर एकीकडे टेररिट्स हल्ल्यानंतर नक्की कोणाचा निषेध करायचा या पेचात अडकलेले ब्लीडिंग हार्ट वोक्स, तर दुसरीकडे हे नग.
डिबेट कोणी पाहिलेत का लोकहो?
डिबेट कोणी पाहिलेत का लोकहो? कॉमेडी शो होता. हेली ने जास्त स्कोअर केला अस दिसते प्रतिक्रियांवरून.
रामस्वामी आणि हेली मधले बॅण्टर जबरी होते. ३ इन्च हील्स, टिकटॉक, "स्कम" ई.
मात्र आदल्याच दिवशी व्हर्जिनिया आणि ओहयो मधे उडालेल्या रिपब्लिकन्सच्या विकेट्स चर्चेत आल्या नाहीत कोठे. अॅबॉर्शन बद्दल ही एक सर्वात धमाल कॉमेण्ट न्यूजमॅक्सवर आहे "अॅबॉर्शन सारख्या सेक्सी गोष्टी बॅलटवर टाकतात, आणि मग तरूण लोक भरघोस मतदान करतात"
https://www.youtube.com/watch?v=SqTCx_ZGZm8
हा माणूस एकेकाळी प्रेसिडेन्शियल कॅण्डिडेट होता.
हेली आणि रामस्वामी क्लिप
हेली आणि रामस्वामी क्लिप टिकटॉकवरच बघितली. रामस्वामी त्यात तरी डोक्यात गेला. हेली आवडली.
अर्थात माझ्या डोक्यात गेला म्हणजे रिप्सना तोच आवडत असणार हे नक्की.
हेली आणि रामस्वामी क्लिप
हेली आणि रामस्वामी क्लिप टिकटॉकवरच बघितली. >>> हे आयरॉनिक आहे ती चर्चा टिकटॉक बॅन करण्याबद्दल होती
अर्थात माझ्या डोक्यात गेला म्हणजे रिप्सना तोच आवडत असणार हे नक्की. >>> फॉर अ चेंज, नाही. भरपूर "बू" केले गेले त्याला. अर्थात हे डिबेट डि सॅण्टिस कंट्री मधे होते.
हेली स्कम म्हणते ते 'मी याहुन
हे आयरॉनिक आहे >> हो हो!
हेली स्कम म्हणते ते 'मी याहुन वाईट शब्द उच्चारूच शकत नाही' असं म्हणते. ते फारच क्युट वगैरे होतं.
तिच्या मुलीबद्दल असं डिबेट मध्ये बोलणे अगदीच बिलो द बेल्ट होतं. ..... बोलेतो टोटल स्कम! एकदम व्हॉअॅअंकल-आंटी गॉसिप टाईप.
रामस्वामी तात्याची भ्रष्ट
रामस्वामी तात्याची भ्रष्ट नक्कल आहे.
सेकंड प्लेस साठी इतके
सेकंड प्लेस साठी इतके भांडणारे हे पहिलेच. पण, सगळे पॉइंटलेस होते. राष्ट्राध्यक्ष होणे लांब. ह्यांना ट्रम्प कडून vice किंवा कॅबिनेट जागा मिळणार आहे असे सुद्धा दिसत नाही. सगळे आपापल्या मार्केटिंग साठी आलेले.
रामस्वामी टिकटॉक बद्दल
रामस्वामी टिकटॉक बद्दल ॲक्च्युअली बरोबर बोलला. त्याचे म्हणणे होते की इतके तरुण लोक त्या ॲप वर आहेत, तर सगळ्या conservative लोकांनी ते ॲप वापरणे बंद केले तर परिणाम चांगला थोडीच होईल ? उलट ते ॲप चालू आहे तोवर आपण सुद्धा अल्गोरीदम वापरून तरुणांपर्यंत पोहोचायला हवे, असे रामस्वामी ने conservative दृष्टीतून बरोबर म्हणले. आणि हेलिने आधी तो टिक टॉक वापरतो म्हणून त्याला डिवचले. मग खुद्द तिची मुलगी वापरते हा फेअर रिस्पॉन्स आहे.
<<<<सेकंड प्लेस साठी इतके
<<<<सेकंड प्लेस साठी इतके भांडणारे ........ सगळे आपापल्या मार्केटिंग साठी आलेले.>>>>
अगदी बरोब्बर.
सगळे आपापल्या मार्केटिंग साठी
सगळे आपापल्या मार्केटिंग साठी आलेले. >>> हो ते तर आहेच. पण रामस्वामीचे पहिल्यापासून उघड आहे. तो ट्रम्पचा रनिंग मेट हाच गोल डोक्यात ठेवून हे करतोय असे वाटते. यातली लंबी रेस का घोडा फक्त निकी हेली वाटते.
टिकटॉक अमेरिकेने बॅनच करायला हवे (आणि अमेरिकन कंपन्यांना चीन मधल्या सबसिडिअरीज बरोबर डेटा शेअर करायलाही बंदी हवी - तसे काही होत असेल तर - परवा डिबेट मधे कोणीतरी म्हंटले). टीनेजर्सना तसेच दुसरे कोणतेतरी अमेरिकन अॅप सापडेल काही दिवसांत आणि ते मूव्ह ऑन होतील. तात्याने नुसत्याच वल्गना केल्या आणि लॅरी एलिसनला मदत करण्यापलीकडे फारसे काही केले नाही. तर बायडेनला मुळात काही फार इंटरेस्ट दिसत नाही. या बाबतीत अमेरिकन कायद्यात आणखी क्लॉजेस घातल्याशिवाय पर्याय नाही - कारण तोपर्यंत अमेरिकन कोर्टात हा बॅन टिकणार नाही. ऑलरेडी एकदा कोर्टाने रद्द केला आहे. पण हे सगळे डीटेल बॅकएण्ड काम आहे. त्यात कोणाला इंटरेस्ट आहे. त्यापेक्षा स्टेजवरून ठोकून देणे सोपे.
पण डिबेटबद्दल - रामस्वामीच्या बोलण्यात "टॅक्ट" नव्हती. "आपल्या सगळ्यांची पुढ्ची पिढी हे वापरते, मग आपण त्यापासून लांब राहिलो तर नुकसानच आहे" वगैरे बोलू शकला असता. तो पॉइण्ट बरोबर आहे. पण त्यात निकी हेलीला कसे पकडणार. म्हणून तिला वादात कॅच करायच्या नादात तिच्या मुलीला गोवले. पब्लिकला ते आवडले नाही. त्याचा एकूण अमेरिकन्स मधे अॅनॉय कोशंट वाढलाच उलटा यामुळे.
ओके कॉमी.
ओके कॉमी.
टिकटॉकवर जेवढी क्लिप आली त्यात हेलीचं डिवचणं न्हवतं.
आणि तरी सुद्धा तिची मुलगी काही रेसमध्ये नाही आणि ती मला वाटतं अॅडल्ट आहे. आता ती काय वापरते काय नाही त्याचा काय संबंध? मला तरी फेअर वाटलं नाही. स्नॉबिश अंकल बिहेविअर वाटलं.
मला तरी फेअर वाटलं नाही. >>>
मला तरी फेअर वाटलं नाही. >>> +१ हो ना. इव्हन गँगस्टर्स एकमेकांच्या फॅमिलीजना मधे आणत नाहीत. हे टीव्ही सिरीयलमधे पाहिलेले लॉजिक आहे पण खरे असावे
बाय द वे, इस्रायलच्या बाबतीत सर्वांचे सल्ले फार सखोल होते. "फिनिश देम". म्हणजे नक्की कोणाला? आणि फिनिश म्हणजे नक्की काय करायचे?
>>मग खुद्द तिची मुलगी वापरते
>>मग खुद्द तिची मुलगी वापरते हा फेअर रिस्पॉन्स आहे.<< +१
सर्वप्रथम डिबेट बारकाईने बघितल्याबद्दल आणि त्यातला काँटेक्स्ट तुम्हाला समजल्याबद्दल अभिनंदन..
रामास्वामीची ती कामेंट, हेलीच्या आधिच्या टोल्याशी संबंधीत होती. इवन आय वाज सरप्राय्ज्ड व्हाय शी गॉट टिक्ड ऑफ बाय दॅट रिमार्क. डिबेटमधे फॅमिलि, फ्रेंड्सना ओढणे हे नविन नाहि, शिवाय त्यात वावगंहि काहि नाहि. इट हॅपन्स, अँड यु शुड बी प्रिपेर्ड बिफोर शोइंग अप ऑन दॅट प्लॅटफॉर्म. यापुर्वि, हंटर (बाय्डन), एरिक, इवांका, डानल्ड जु. (ट्रंप), चेल्सी (क्लिंटन), मेगन (मकेन).. लिस्ट मोठि आहे; प्रेसिडेंशियल डिबेटमधे ओढले गेलेले आहेत. असो. शिवाय टिक-टॉक वापरते हि शिवी नाहि; पण रामास्वामीने हेलीचेच शब्द तिच्याच घशात घातल्याने तिचा तिळपापड झाला. विथ दॅट रिमार्क, रामास्वामी वाज स्टिल इन हिज लेन, बट हेलीज रिस्पाँस वाज कंप्लिटली आउट ऑफ द लाइन, एस्पेशियली व्हेन यु अटर दॅट वर्ड फॉर ए प्रेसिडेंशियल कँडिडेट. इट वाज नथिंग बट ग्रोस डिस्प्ले ऑफ ए डिस्रिस्पेक्टफुल बिहेवियर...
कॉमी, तुमचं नक्की चुकलेलं आहे
कॉमी, तुमचं नक्की चुकलेलं आहे. हेन्स प्रूव्ह्ड!
हॅप्पी डिवाली!
डिबेटमधे फॅमिलि, फ्रेंड्सना
डिबेटमधे फॅमिलि, फ्रेंड्सना ओढणे हे नविन नाहि, शिवाय त्यात वावगंहि काहि नाहि. >>> हे म्हटल्यानंतर "हेलीज रिस्पाँस वाज कंप्लिटली आउट ऑफ द लाइन" कसे योग्य होते ?
"फिनिश देम". म्हणजे नक्की कोणाला? आणि फिनिश म्हणजे नक्की काय करायचे? >> त तात्या ने मागे सांगितलेले ना ? दोन बाँब टाकायचे - कुठे ? कसेल ? त्याने काय होईल वगैरे प्रश्न विचारू नकोस
रामास्वामी ने काल अजून तारे तोडले आहेत कि मी निवडून आलो तर ज्यां फेडरल एंप्लॉईजचा सोशल सिक्युरिटी नंबर ऑड नंबर ने संपेल त्यांना काढून टाकेन (त्याने मास लेऑफ अशी टर्म वापरता येणार नाही नि काही लेगल इश्यू पासून सूटला होईल वगैरे वगैरे) . अशा मनुष्याला पाठिराखे आहेत हे बघितल्यावर नक्की कोणाची कीव करावी हेच कळत नाही. आपलीच करायची वेळ आली आहे.
Submitted by अमितव on 10
Submitted by अमितव on 10 November, 2023 - 15:19
>>>> हॅप्पी दिवाली!
बाईडन पोल्स मध्ये खूप घसरलेला
बाईडन पोल्स मध्ये खूप घसरलेला दिसतो आहे. इजरायल - पॅलेस्टाईन वरचा स्टँड कारणीभूत असावा असे वाटते. तरुणांचा सपोर्ट खूप कमी झाला आहे. RFK ज्युनियर बऱ्यापैकी मुसंडी मारून पुढे आला आहे. इतक्या दिवस तो ट्रम्पची मते खात होता. आता बायडनची पण खात आहे. शेवटी कोणाला आडवे करील सांगता येत नाही.
ज्यो मँचिन धावणारे का?
ज्यो मँचिन धावणारे का?
शेवटी कोणाला आडवे करील सांगता
शेवटी कोणाला आडवे करील सांगता येत नाही. >> त्याची एकंदर मुक्ताफळे वाचून आपल्याला हेच उत्तर अॅप्ट आहे
हेलीने त्याची एरव्ही चर्चेत
हेलीने त्याची एरव्ही चर्चेत नसलेली फॅमिली वादात ओढली असती आणि त्याला उत्तर म्हणून याने उल्लेख केला असता तर ठीक होते. पण तसे काही झाले आहे असे दिसत नाही. हंटर बायडेन वगैरे त्यांच्या काड्यांमुळे चर्चेत आहेत. त्यांचा उल्लेख टोटली फेअर आहे. पण हेलीची मुलगी तिच्या काही कारणांनी वादात नसेल तर तिचा उल्लेख करणे आउट ऑफ लाइन आहे. तसेही २५ वर्षांच्या मुलीने कोणते अॅप वापरावे हे निकी हेली काय ठरवणार आहे.
बाय द वे, टिम स्कॉटने आज माघार घेतली. मुळात तो फार पुढे जाईल असे वाटतच नव्हते. पण ही माघार अचानक घेतली म्हणे. या घोषणेच्या १५-२० मिनीटे आधी त्याच्या कॅम्पेन मधून "आपल्या हातात वेळ कमी आहे..." टाइप मेसेज डोनर्सना केला गेला होता. तो वेळ कमी म्हणजे याने माघार घ्यायच्या आत डोनेट करा, असा अर्थ असावा
रामस्वामी सुरूवातीला इम्प्रेसिव्ह वाटला होता - डिबेट्सच्या आधी. पण जितकी जास्त त्याची मते माहीत होत गेली तितका त्याचा ऑपोर्च्युनिस्टिक अजेंडा लक्षात आला.
<<<<रामस्वामी सुरूवातीला
<<<<रामस्वामी सुरूवातीला इम्प्रेसिव्ह वाटला होता - डिबेट्सच्या आधी. पण जितकी जास्त त्याची मते माहीत होत गेली तितका त्याचा ऑपोर्च्युनिस्टिक अजेंडा लक्षात आला.>>>>
मला पण आधी रामास्वामी प्राॅमिसिंग वाटला होता. कदाचित असंही असेल की जसजसे सगळे कॅंपेन मध्ये पुढे जात गेले तस ट्रंप चा रनिंगमेट होणे हे जास्त वास्तववादी ध्येय आहे हे लक्षात आले असेल त्याच्या म्हणुन मग स्वतःची मते त्या दिशेने वळवली.
बायडनचे अप्रूव्हल रेटिंग आणखी
बायडनचे अप्रूव्हल रेटिंग आणखी खाली गेले... It's joever
मागच्या वर्षी साधारण या
मागच्या वर्षी साधारण या सुमारास ट्रम्पचा भाव उतरत चालला आहे असे दिसत होते. त्याने बॅकिंग दिलेले बरेचसे उमेदवार मिडटर्म्समधे पडले. फ्लोरिडामधे दणदणीत फरकाने विजयी झालेला डिसॅण्टिस एकदम पुढे आला. २०१८,२०२० आणि २०२२ मधे तात्या व त्याच्या कल्टला हरवण्याचे श्रेय बायडेनला मिळाले.
आता हे चित्र बरेचसे बदलले आहे. तात्याचे काही उमेदवार नुकतेच पुन्हा पडले आहेत, काही राज्यांमधल्या निवडणुकांत. पण खुद्द तात्याचा भाव वधारला आहे. रिपब्लिकन पक्षातील इतर उमेदवार अजून चाचपडतच आहेत. डिसॅण्टिस फारच थोडा काळ चमकला. त्यामानाने निकी हेली सध्या तुलनेने जोरात दिसते. पण हे चित्रही पुढच्या डिबेट्सनंतर बदलू शकते.
तात्याच्या "रनिंग मेट" साठी बर्याच जणांचे प्रयत्न सुरू आहेत असे उघड आहे. विवेक रामस्वामी पहिल्यापासूनच तोच गोल ठेवून आल्यासारखा वाटतो. ख्रिस्ती, डिसॅण्टिस व निकी हेली उघडपणे त्याच्या विरोधात असल्याने त्यांचा चान्स कमी दिसतोय. महिला वोटर्स डोक्यात ठेवून कदाचित महिला व्हीपी निवडला तर आपला नंबर लागेल या कॅल्क्युलेशनने बहुधा केरी लेक व एमटीजी यांचे प्रयत्न सुरू आहेत. लॉरेन बोबर्टचे सध्या काय सुरू आहे माहीत नाही.
निवडणुकीच्या आधी एक दोन वर्षे एक पुस्तक लिहून प्रकाशित करायचे हा इथला फार जुना पायंडा आहे. पण तात्याच्या रनिंग मेट करता इच्छुक असणारे कोणी पुस्तके लिहीतील असे वाटले नव्हते. केरी लेक व एम्टीजी दोघींनी ते केलेले दिसते. या दोघीही तात्याच्याच व्हर्जन्स आहेत त्यामुळे त्यांच्यापैकी कोणी त्याने निवडले तर आश्चर्य वाटणार नाही.
एम्टीजीच्या पुस्तकात जाने ६ च्या कमिटीचेच इन्वेस्टिगेशन करावे अशी काहीतरी मागणी केली आहे तिने तर केरी लेक अजून २०२२ च्या निवडणुकीतून बाहेर आलेली दिसत नाही. खालच्या कोर्टाने डिसमिस केलेली केस मध्ली कोर्ट्स स्किप करून थेट अॅरिझोना सुप्रीम कोर्टाने घ्यावी अशी तिची मागणी त्या कोर्टाने नुकतीच फेटाळली. ती २०२२ ची इलेक्शनच रद्द करावी अशीही एक तिची मागणी होती. त्याचे काय झाले माहीत नाही. तिचे सभांमधून स्वतःला कॅरी करणे, बोलण्याची पद्धत वगैरे पाहता तात्या एकदम थेट रनिंग मेट म्हणून पिक करेल अशीही एक शक्यता आहे. पण ती मागची निवडणूक हरली असल्याने ते तिच्या विरोधात जाऊ शकते.
तिकडे बायडेन ऑलरेडी ८१ वर्षाचा आहे आणि त्याचा अनेकदा उडणारा गोंधळ अगदी उघड दिसतो. डेम्सना दुसरा कोणी मिळालाच नाही की फार बडबड न करता प्रत्यक्षात निवडणुकांमधली त्याची सॉलिड कामगिरी बघून अजून त्यालाच धरून आहेत माहीत नाही. दुसरे म्हणजे कमला हॅरिसच परत रनिंग मेट असेल की आणखी कोणी, हे ही.
लोकहो, ट्रंपचे नवीन "डिजिटल"
लोकहो, ट्रंपचे नवीन "डिजिटल" कार्ड आले आहेत, घेतले का ? सगळे ४७ विकत घ्या, म्हणजे त्याच्या मागशॉट वेळी घातलेल्या सुटावर छापलेले फिजिकल कार्ड मिळेल ! नशीब चांगले असेल तर गॉड- एम्परर ट्रंपनी सही केलेले कार्ड सुद्धा मिळेल. त्वरा करा !
*नियम व अटी लागू
१. "डिजिटल" कार्ड आहेत. ब्लॉकचेन वर नाहीत. म्हणजे एक्सक्लूजीव नाहीत. कोणी कोणालाही कॉपी पेस्ट करून पाठवू शकेल.
२. प्रति कार्ड किंमत फक्त ९९$.
३. एकूण किती कार्ड मार्केट मध्ये येणार हे सांगितले नाही. पण लोक घेत आहेत तोपर्यंत "लिमिटेड" स्टॉक संपणार नाही ही खात्री बाळगा. मागच्या दोन सिरीज मध्ये तरी कुठे "डिजिटल" कार्डांचा स्टॉक संपला ?
४. वैधानिक सूचना : ट्रंप हे ही संधी चुकवू नका असे म्हणत असले तरी वकिलांनी हा वैधानिक इशारा द्यायला सांगितले आहे: हे कार्ड व्यक्तिगत आनंद व छंदासाठी बनवले आहेत, ते गुंतवणूक म्हणून कोणीही घेऊ नका.
५. कार्ड वरची चित्रं AI जनरेटेड आहेत. उगा कशाला आर्टिस्ट वर खर्च ?
https://youtu.be/RnvF27zzoTE?si=N1va8kBFyVTagvC0
या सगळ्यात शेंडेनक्षत्र यांची
या सगळ्यात शेंडेनक्षत्र यांची उणीव भासते.
रशियाने त्यांना पैसे देणे बंद केले वाटते?
कोलोरॅडो
कोलोरॅडो कोर्टाने ट्रम्पला रिपबलिकन प्रायमरी मध्ये उभरण्यापासून बंदी घातली. (१४वी अमेंडमेंट- पूर्वी सरकारी ऑफिसर असणाऱ्या व्यक्तीने आपली शपथ भंग करून राष्ट्रविरोधी बंड किंवा insurrection करण्याचा प्रयत्न केला असल्यास त्या व्यक्तीला निवडणुकीस ऊभा राहता येऊ नये)
कोलोरॅडो हे तसेही ब्लू स्टेट आहे, त्यामुळे निवडणुकीवर परिणाम जवळपास शून्य आहे. ह्याचा मुख्य परिणाम हा precedent इतर राज्ये पाळतील का हा होणार आहे. लोकशाही बद्दल चिंता असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला जे अत्यंत obvious वाटेल ते कोलोरॅडो कोर्टाने केले आहे. ऑपरेशन २०२५, मी सत्तेत आल्यावर संविधान रद्दबातल ठरवीन, विरोधी नेत्यांना अटक करीन असे म्हणणारा आणि या आधी लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाला पुन्हा निवडणूक लढवू देणे म्हणजे स्वतच्या हाताने स्वतःचा घात करणे झाले असते.
Pages