पुण्यनगरीतील प्रभातफेरी अर्थात पुणे हेरिटेज वॉक

Submitted by मीपुणेकर on 7 November, 2023 - 04:19

पुणे सर्जिकल सोसायटीतर्फे 'अर्ली डिटेक्शन सेव्हज लाईव्हज' या ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती कार्यक्रमाचा एक भाग म्हणून गेल्या रविवारी सकाळी पुणे हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते.
ओंकारेश्वर मंदिरापासून शनिवार पेठेतून कसबा पेठेकडे या हेरिटेज वॉकमध्ये गेल्या १००+ वर्षांपासून असलेल्या पुण्यातल्या ऐतिहासिक वास्तु बघताना केवळ ऐतिहासिक पैलूच नाही तर स्थापत्यशास्त्र, पुरातत्त्वीय बाजू, सांस्कृतिक संक्रमण वगैरे माहिती देखील तज्ञांकडून जाणून घेता आली.
या हेरिटेज वॉक दरम्यान बघितलेली मंदिरे ( भांग्या मारुती, बिजवर विष्णु अशी गमतीदार नावांनी प्रसिद्ध व त्यामागचा ईतिहास), लाल महाल, नाना फडणवीस वाडा, बिनीवाले वाडा, महर्षि अण्णासाहेब पटवर्धन वाडा, शनिवार वाडा, भिडे वाडा (जिथे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेली देशातील पहिली मुलींची शाळेची जागा ) हा सर्व वास्तुरुपी जुना मौल्यवान ऐतिहासिक खजिना बघत, माहिती ऐकत प्रभातफेरीचा हा अनुभव खूप समृद्ध करणारा होता.

१.
1.jpeg

२.
2.jpeg

३.
3.jpeg

४.
4.jpeg

५.
5.jpeg

६.
6.jpeg

७.
7.jpeg

८.
8.jpeg

९.
9.jpeg

१०.
10.jpeg

११.
11.jpeg

१२.
12.jpeg

१३.
13.jpeg

१४.
14.jpeg

१५.
15.jpeg

१६.
16.jpeg

१७.
17.jpeg

१८.
18.jpeg

१९.
19.jpeg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! आपल्याच शहराची नवीन ओळख होते.
गेल्या वर्षी प्र. के. घाणेकरांबरोबर शनिवारवाडा हेरिटेज वॉक केला होता. असंख्य नवीन गोष्टी समजल्या होत्या!

वावे,
आपल्याच शहराची नवीन ओळख होते.>> +१ अगदी असच वाटलं Happy

फोटो छानच आले आहेत. ह्यात ब्रेस्ट क्यान्सर अवेअर नेस कसा वाढला? तुम्हाला माहिती दिली का ?