तुम्ही नाही जा! (हिंदी चित्रपटसंगीतातील आडवळणाने दिलेल्या प्रेमाच्या कबुलीची उदाहरणे)

Submitted by स्वाती_आंबोळे on 24 October, 2023 - 12:44

काल फेसबुकावर बॉलीवुड ट्रिवियाच्या एका पेजने 'भली भलीसी इक सूरत' या गाण्याची आठवण करून दिली.
ही चित्रपटसंगीताची एक इन्टरेस्टिंग क्याटेगरी आहे, ज्यात आडवळणाने प्रेमाचा इजहार, किंवा 'कौन है वो दिलरुबा?' या प्रश्नाला 'तू नाही, दुसरंच कोणीतरी' अशा छापाचं उत्तर दिलेलं दिसतं.

अशी आणखी काही आठवलेली गाणी:
१. खूबसूरत हसीना, जाने जा जानेमन
२. कोई लडका मुझे कल रात सपने में मिला
३. तेरे हुस्न की क्या तारीफ करूँ, कुछ कहते हुए भी डरता हूँ
४. आप के कमरे में कोई रहता है

आणखी एक क्याटेगरी 'ना ना करते' टाइप - म्हणजे घरौंदामधल्या 'तुम्हें हो ना हो, मुझको तो इतना यकीं है, मुझे प्यार तुम से नहीं है'

तुम्हाला कुठली आठवतात का अजून अशी गाणी?
मराठी मला एकही नाही आठवलं. पण ते समजण्यासारखं आहे, मुळात प्रेमाचा इजहार इथेच गाडं अडत असणार. Proud

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि हे आद्य, वंदनीय, पूजनीय विबासं

ज्याची आडवळणाने पण जाहीर कबुली दिली गेली.
रंग बरसे भीगे चुनर वाली

अशा थ्रिलिंग कबुलीची गाणी येऊ द्या सटासट.

बिना लग्नाचे कबुली जबाब आता काय थ्रिलिंग वाटत नाही. पूर्वी चाळिशीच्या उंब-यावर असेतो वाटायच. पण आता टीन एज मधे पाऊल ठेवल्यापासून मॅच्युअर्ड लोकांच्या साहसी मोहिमांचे अप्रूप वाटू लागले आहे.
किती प्रगत होते आपले पूर्वज!

बडजात्यांच्या चित्रपटांची टायटल सॉंग्स ..चित्रपटाला गाण्यांपेक्षा हीच जास्त चांगली होती. बहुतेक उत्तम सिंग अरेंजर होते. त्यांची छाप दिसते या गाण्यांवर.

आणि आडवळणालाही कॉम्प्लेक्स येईल अशी कबुली - 'चंदा रे चंदा रे'

फेफ आणि रघु आचार्य यांनी आडवळणी त्रिकोण, चौकोन असा नवा मार्ग दाखवला आहे. त्यातले काही नमुने
ये कौन आया, शीशा हो या दिल हो, यह रात खुशनसीब है

हिर्विनीच्या लग्नात हिरव्यानी गायलेली गाणी जनरली सुटा बुटात किंवा गेला बाजार शेरवानीत असायची

ड्रीम गर्ल 2 मधे आयुष्मान बाई बनून ड्यांस करतोय...
तेरे इश्क में दिल बंजारा ढुंडे अपनी मंजिल...

अजिब दास्तां है ये -- हे येइल का इथे ? येउन गेलय का? की माझे मन च्या धाग्यावर एन्ट्री मारायची

"मुबारकें तुम्हें के तुम
किसी के नूर हो गए
किसी के इतने पास हो
के सबसे दूर हो गए

सुरज हुआ मध्धम, चांद जलने लगा
आसमां ये हाय, क्यो पिघलने लगा
मैं ठहरा रहा, जमीं चलने लगी
धडका ये दिल, सांस थमने लगी
क्या ये मेरा पहला पहला प्यार हैं

अशा थ्रिलिंग कबुलीची गाणी येऊ द्या सटासट. >> ह्यात नि फा च्या हिरॉईन च्या लग्नात / एंगेजमेंट मधे जाऊन बोंब करण्याच्या गाण्यात जान तेरे नाम च्या टायटल साँग चा हात कोणीच धरू शकत नाही. फरहीनच्या एंगेजमेंट मधे जाऊन रोनित रॉय गातो

फस्ट टाईम देखा तुम्हे हम खो गया, सेकंड टाईम मे लव हो गया
येह आख्खा इंडिया जानता है, हम तुम पे मरता है
दिल क्या चीज है जानम अपनी , जान तेरे नाम करता है

मधे तिच्या बापाला पण ठणकावून प्रॅक्टिकल गोष्टी सांगतो -
तेरेसे (हिरॉईनशी - बापाशी नाही) मॅरेज करनेको मै बंबई से गोवा आया
पर मेरेको तेरे डॅड ने रेड सिग्नल दिखालाया
फादर से तेरे क्या लेना मुझे, तू चाहे मुझको , मैन चाहूं तुझे

इथे तिच्या बापाच्या पैशाने केल्या जात असलेल्या पार्टीला जमलेले सगळे, तिच्या बापाच्या पैशाने आणलेली दारू पीत, कोरस मधे "येह आख्खा इंडिया जानता है , येह तुझपे मरता है " गातात. टॉक अबाउट एहसान फरामोशी !!

येह आख्खा इंडिया जानता है हम तुझ पे मरता है " गातात. टॉक अबाउट एहसान फरामोशी !!
>>
येस्स...

या पिक्चर चा फक्त शेवट पाहिला होता

या गाण्यानंतरही हाकलून देण्यात आल्या मुळे हीरो वैफल्यग्रस्त होऊन (साला एक ब्युटीफूल म्यूझिक पीस वेस्ट गेला टाईप) गायाबतो. हिरविणीला प्रेमाची उपरती होऊन ती हिरोच्या घरी जाते, तर भावी सासू सुनेला हीरो कुठे आहे हे सरळ न सांगता आधी लेक्चर देते अन् मग म्हणते की तो कुठे जाणार जाऊन जाऊन, लव्हर्स पॉइंट वर गेला असेल जीव द्यायला.
आई प्राथमिक शाळेत शिक्षिका असावी. म्हणजे पोटाच्या पोराचा जीव महत्त्वाचा नाही, लेक्चर महत्त्वाचं.

पण हिंदी सिनेमा असल्याने हीरो पण हिर्विण अन् बाकी लटांबर येईपर्यंत जीव देऊ की नको देऊ की नको करत बसलेला असतो अन् आपेक्षित शेवट होतो...

>>> पार्टी ला जमलेले सगळे,, बापाच्या पैशाने आणलेली दारू पीत, कोरस मधे "येह आख्खा इंडिया जानता है हम तुझ पे मरता है " गातात
कोरसने निदान 'ये इस पे मरता है' म्हणायला नको का? लावण्यांत नाही का त्या एक्स्ट्रा बाया 'चुगली नगा सांगू गं 'हिच्या' म्हातार्‍याला' म्हणतात? Lol

'चुगली नगा सांगू गं 'हिच्या' म्हातार्‍याला' म्हणतात? >> Lol हो हो ! केली दुरुस्ती. गोव्यात येऊन गाणे बोलत असल्यामूळे - इसपे नाही तर तुझपे Wink

साला एक ब्युटीफूल म्यूझिक पीस वेस्ट गेला टाईप >> Lol

इथे तिच्या बापाच्या पैशाने केल्या जात असलेल्या पार्टीला जमलेले सगळे, तिच्या बापाच्या पैशाने आणलेली दारू पीत, कोरस मधे "येह आख्खा इंडिया जानता है , येह तुझपे मरता है " गातात. टॉक अबाउट एहसान फरामोशी !!>>> Lol अगदी अगदी.. लाज ही नाही चेहर्या वर छान स्माईल घेऊन बॅकग्राऊंड माहित नसताना हिरो ची बाजू घेऊन गातात Lol

इथे तिच्या बापाच्या पैशाने केल्या जात असलेल्या पार्टीला जमलेले सगळे, तिच्या बापाच्या पैशाने आणलेली दारू पीत, कोरस मधे "येह आख्खा इंडिया जानता है , येह तुझपे मरता है " गातात. टॉक अबाउट एहसान फरामोशी !
भावी सासू सुनेला हीरो कुठे आहे हे सरळ न सांगता आधी लेक्चर देते अन् मग म्हणते की तो कुठे जाणार जाऊन जाऊन, लव्हर्स पॉइंट वर गेला असेल जीव द्यायला
'चुगली नगा सांगू गं 'हिच्या' म्हातार्‍याला' म्हणतात
>>>>> Rofl Rofl

असामी, अँकी Lol

जान तेरे नाम +1
'दिल क्या चीज है जानम अपनी जान तेरे नाम करता है'...
ना दिलाला किंमत- ना जानला, आवेश केवढा पण..!

'कहेदोके तुम हो मेरी वरना, जीना नहीं मुझे है मरना' ऐकलं की 'मर मग' हे स्वगत उमटतं.

कहेदोके तुम हो मेरी वरना, जीना नहीं मुझे है मरना' ऐकलं की 'मर मग' हे स्वगत उमटतं.>>> Lol रोड रोमिओंचे कोमल टपोरी मन तुला कधी कळणार नाही गं Rofl

कह दो के तुम >>>>>>>> मला आवडते ना...मी टपोरी...........? भोकाड पसरलेली बाहुली

बाय द वे, त्या गाण्याच्या सुरुवातीला बॅकग्राउंडला दोन गुरे चरताना दाखवली आहेत. या मागचा दिग्दर्शकाचा विचार काय असेल?
बाकी माधुरीला दिलेले भयाण ड्रेसेस आणि मेकअप, दोघांच्या विचित्र डान्स मूव्हज वगैरे नेहमीचेच, अनिल कपूरचा कॅनरी यलो शर्ट हे (म्हटले तर) नावीन्य

'ज्युबिली' वेबसिरीजमधलं 'नही जी नही' गाणं यात बसेल का?

(मी ३, ४ ही पानं पाहिलेली नाहीत. त्यामुळे आधी येऊन गेलं असेल तर माहिती नाही.)

लड्डू पीला का ??? नक्की नाही सांगता येणार पण हलकीशी हिरवी छटा येते त्यात.....लड्डूवाला असता तरी काय फरक पडला असता?

भारी धागा आणि प्रतिसाद.

असे सीद्दे शालेपर्यंत जा >> Lol

'आप जैसा' कोई मेरी जिंदगी में आये - आहे ना आडवळणी?

तुम्ही नाही जा कॅटेगरीती अनेक गाण्यांना आपण लाइक केले, लोल केले. पण एक गाणे असेही आहे की "हे जरा तुम्ही नाही जा मोड मधे चालले असते" असे म्हणावे लागते पाहून.
https://www.youtube.com/watch?v=nc8wYuZyMdU

पिक्चर पाहिलेला नाही पण पिकनिक आहे असे वाटेल अशा सेट अप मधे तिच्या शेजारी एकदम सुटाबुटात येउन तो नायक बसतो व एकदम "इन युअर फेस" इजहार सुरू करतो. तो ही एकदम डीप मीनिंग स्टाइल मधे. "तेरे दर्द से रहे बेखबर, मेरे दिल की कब ये मजाल है" हे पिकनिक मधे आणि जाहीरपणे म्हणायला तशी काही कथेत पार्श्वभूमी आहे का माहीत नाही. नाहीतर दिग्दर्शकाला हे मिनिंगफुल गाणे पिक्चरमधे कोठेतरी असायलाच हवे वाटल्याने इथे ते कोंबले आहे असे वाटते.

मग जरा मान वळवावी तर ती "ग्रूप मधली खट्याळ ई" मैत्रीण "यावर तुझी प्रतिक्रिया काय" विचारत असल्यासारखी तिकडून स्टेअर करत आहे. नूतनच्या पर्सनल स्पेस मधे टोटल आक्रमण झाले आहे Happy

हे गाणे ग्रूप मधे सूचक स्टाइलने तिच्याकडे थेट न पाहता वगैरे म्हणत चालले असते. लंबक जरा जास्तच दुसर्‍या बाजूला गेला आहे Happy

>>> तिच्या शेजारी एकदम सुटाबुटात येउन तो नायक बसतो व एकदम "इन युअर फेस" इजहार सुरू करतो
हो असा काय - तो जेवायला बसल्यासारखा (ती वाढलेलं ताट आहे असं समजून) तिला फेसिंग बसला आहे की एकदम! Biggrin
आपलं पाण्याचं भांडंही डाव्या हाताशी घेऊन बसला आहे. Rofl

ती खट्याळ इ. मैत्रिण शम्मी आहे. म्हणजे जी 'अजीब दास्ताँ है ये' गाण्यातही अंदर की बात कळल्यासारखी एक्सप्रेशन्स देत बसलेली असते तीच.
हा हीरो( Uhoh ) कोण आहे काय माहीत!

हे गाणं इतक्या वेळा ऐकलं आहे, पण (सुदैवाने!) बघायचा योग आला नव्हता अजून!

Pages