Submitted by स्वाती_आंबोळे on 24 October, 2023 - 12:44
काल फेसबुकावर बॉलीवुड ट्रिवियाच्या एका पेजने 'भली भलीसी इक सूरत' या गाण्याची आठवण करून दिली.
ही चित्रपटसंगीताची एक इन्टरेस्टिंग क्याटेगरी आहे, ज्यात आडवळणाने प्रेमाचा इजहार, किंवा 'कौन है वो दिलरुबा?' या प्रश्नाला 'तू नाही, दुसरंच कोणीतरी' अशा छापाचं उत्तर दिलेलं दिसतं.
अशी आणखी काही आठवलेली गाणी:
१. खूबसूरत हसीना, जाने जा जानेमन
२. कोई लडका मुझे कल रात सपने में मिला
३. तेरे हुस्न की क्या तारीफ करूँ, कुछ कहते हुए भी डरता हूँ
४. आप के कमरे में कोई रहता है
आणखी एक क्याटेगरी 'ना ना करते' टाइप - म्हणजे घरौंदामधल्या 'तुम्हें हो ना हो, मुझको तो इतना यकीं है, मुझे प्यार तुम से नहीं है'
तुम्हाला कुठली आठवतात का अजून अशी गाणी?
मराठी मला एकही नाही आठवलं. पण ते समजण्यासारखं आहे, मुळात प्रेमाचा इजहार इथेच गाडं अडत असणार.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ते बादशहा मधलं गाणं, वो लडकी
ते बादशहा मधलं गाणं, वो लडकी तो सब से अलग है
वर्तमान मधलं 'तू जो मेरा यार बने रुंबा रुंबा रुंबा रुंबा, तेरी मेरी खूब जमे, मेरेलीये फूल बने, काटे भला कौन चुने रुंबा रुंबा रुंबा रुंबा'
(नाईट लक्झरी बस ने मुंबई औरंगाबाद चे प्रवास करण्याचा परिणाम )
बागो मे बहार हैं
बागो मे बहार हैं
एकवार पंखावरूनी हे मराठीतले
एकवार पंखावरूनी हे मराठीतले एक आठवले
विजयादशमी जोरदार झाली कि
विजयादशमी जोरदार झाली कि
गुम है किसी के प्यार मे, दिल
गुम है किसी के प्यार मे, दिल सुबह शाम
रातकली इक ख्वाब मे आयी
जिता था जिसके लिये, उसके लिये मरता था
मराठीत
मराठीत
लाजली सीता स्वयंवराला
संशय कल्लोळमधील मजवरी तयांचे प्रेम खरे
आचार्य
आचार्य
‘रुक जा ओ दिल दिवाने’ गाण्यात ‘वो तो है तेरी इक सहेली’ असा उल्लेख आहे.
शोनू, आडवळणाने इजहार - अशी
शोनू आणि भ्रमर, आडवळणाने इजहार - अशी कॅटेगरी आहे.
एक अजनबी हसीनासे यूं मुलाकात
एक अजनबी हसीनासे यूं मुलाकात हो गई... मधे अशीच सिचुएशन आहे पण तो राजेश खन्ना असल्यामुळे "तुम सब लोग एक लाइन मे खडी हो जाओ, जिसके कांधेपर मै ये रुमाल रखूंगा वो समझ जाए असा कॉकी इजहार आहे
एक अजनबी हसीना से यूं मुलाकात
एक अजनबी हसीना से यूं मुलाकात हो गयी.
आणखी गाणं आठवून सेव्ह करेतो मैत्रेयींचा प्रतिसाद आला.
जिसके सपने हमें रोज आते रहे दिलं लुभाते रहे
ये बतादो कहीं तुम वही तो नहीं
--
कश्ती का खामोश सफर है शाम भी है तनहाई भी
इकरार करना मुश्किल है
इकरार करना मुश्किल है
इन्कार करना मुश्किल है
महबूब से मोहब्बत का
इज़हार करना मुश्किल है
आप युं ही अगर हमसे मिलते रहे
आप युं ही अगर हमसे मिलते रहे..
शोनुच्या रोखठोक स्वभावाला
शोनुच्या रोखठोक स्वभावाला तुम्ही आडवळणं कसली लावताय?
सिंडे
सिंडे
>>> जिसके कांधेपर मै ये रुमाल रखूंगा वो समझ जाए
देवा!
>>> कश्ती का खामोश सफर है शाम भी है तनहाई भी
हे आठवत नाही मला ऐकल्याचं, ऐकते.
जरासी आहट…कही ये वो तो नही
जरासी आहट…कही ये वो तो नही चालेल का?
बागोंमे बहार है?
नाही, त्यात इज़हार नाही...
'जरा सी आहट' नाही, त्यात इज़हार नाही…
'बागों में बहार है' - हो.
>>> तू जो मेरा यार बने रुंबा
>>> तू जो मेरा यार बने रुंबा रुंबा रुंबा रुंबा
असं गाणं आहे?!
तयांचे प्रेम खरे म्हणताना
तयांचे प्रेम खरे म्हणताना नायिकेच्या प्रेमाचा ( छुपा) इजहार नाही का ?
तिचे प्रेम नसते तर तिने शिव्या नसत्या का हाणल्या मागे लागणार्याला
'मजवरी तयांचे' हे सेकंड
'मजवरी तयांचे' हे सेकंड डिग्री छुपं आहे.
सांगायचं आहे 'तयांवरी माझे प्रेम खरे' पण सांगत्येय मजवरी तयांचे हा छुपा पार्ट. कर्म छुपं नाही तर कर्ता छुपा आहे.
तू ख्वाब है किसी और का
तू प्यार है किसी और का
तुझे चाहता कोई और है
तू पसंद है किसी और की
तुझे मानता कोई और है
(म्हणजे दोघांमध्ये नक्की फरक काय आहे, हे मला अजूनही कळलेलं नाही. )
हे चालेल का ?
जिसके कांधेपर मै ये रुमाल रखूंगा वो समझ जाए
देवा! >>>>>
काकांचं काही सांगता येत नाही, हलतडुलत पळतापळता मैत्रिणीजवळ 'लॅन्ड' व्हायचे. मग प्रेक्षकांना तिच माझी 'काकू' वाटायचं.
संभाला है मैने बहोत अपने दिल
१. संभाला है मैने बहोत अपने दिल को, जुबांपर तेरा फिर भी नाम आ रहा है !
२. होशवालोंको खबर क्या ?
३. "पापा कह्ते है " घेऊन टाका लिस्ट मधे - त्यातले सब्जेक्ट जनरल आहेत
शोनुच्या रोखठोक स्वभावाला तुम्ही आडवळणं कसली लावताय? >>
बरीच आहेत या सिच्युएसहनला
बरीच आहेत या सिच्युएशनला गाणी , ही पटकन आठवली
१.करते है हम प्यार मि. इंडियासे
२.नखरेवाली, देखने में देख लो है कैसी भोली भाली ,वो तो कोई और थी जो आंखोसे समा गई दिलमे.
३.मेरे सपनोंकी रानी तुम नही हो तुम नही हो, वो है भोली भाली सीधी साधी हिरनी जैसे आंखोवाली
४. जिसे ढुंढता हूं मै हर कही
ना जाने कहा से आयी है…
ना जाने कहा से आयी है… चालबाज. रुक जा ओ दिल दिवाने आलं का? त्यातलंच हो गया है तुझ को तो प्यार सजना.
हम आप के है कौन मधली अर्धी गाणी तरी भरतील या वजनात
मेरे रंग मे रंगनेवाली.
मस्त धागा
मस्त धागा
जिसके कांधेपर मै ये रुमाल रखूंगा वो समझ जाए असा कॉकी इजहार आहे >>>
मग प्रेक्षकांना तिच माझी 'काकू' वाटायचं. >>>
आम्ही लहानपणी "माझ्या आईचं पत्र हरवलं खेळायचो" ते आठवते मला हे गाणे पाहताना
मराठीत नाही कसे? मराठीतील एका सुप्रसिद्ध गाण्याबद्दल खूप चर्चा माबोवर नुकतीच झाली होती मी तुझ्या रूम मधे घुसून तुझे कपडे आवरत होते तरी तुला माझे प्रेम कळाले नाही ई.ई.
https://www.youtube.com/watch?v=0pABNu9_15U
अस्मिता - तू भी भूल गयी इस गाने को? उद्या आशा काळेच तुझ्यासमोर स्टेजवर नाचून हेच सांगेल. तुला तू पसंद है किसी और की वगैरे समजले पण साधी भोळी मीरा तुला कळली नाही
भवरे ने खिलाया फुल फुल को ले
भवरे ने खिलाया फुल फुल को ले गया राज कुवर(हे चालेल का, मी पिक्चर न बघितल्याने भवरा कोण राजकुवर कोण काही पत्ता नाही.फुल मराठीतले बहुतेक पद्मिनी असावी.)
तुम रुठी रहो, मै मनाता रहू
तुम रुठी रहो, मै मनाता रहू ,के इन अदांओंपे और प्यार आता है
थोडे शिकवे भी हो,कुछ शिकायत भी हो...
हे चालेल का?
1. रातकली एक खास में आयी
1. रातकली एक ख्वाब में आयी
और गले का हार हुई
2. एक लडकी भिगी भागी सी
3. ये दिल न होता बेचारा
4. ये शाम मस्तानी मदहोश किये जाय
सांग कधी कळणार तुला
सांग कधी कळणार तुला
हे चालेल का?
किंवा
बघा ना छळतो छळतो हा वारा?
आडवळणाने सांगणे जमत नसेल तर
आडवळणाने सांगणे जमत नसेल तर कोणताही आडपडदा न ठेवता केलेला प्यार का इजहार चालवून घ्यावा.
उदा.
उई अम्मा उई अम्मा, मुश्किल ये क्या हो गयी
खेत गये बाबा, बाजार गयी मां..
सॉलिड गाणी आठवलीयेत सगळ्यांना
सॉलिड गाणी आठवलीयेत सगळ्यांना. सनम तेरी कसम मध्ये, कमल हसन एका गाण्यात प्रपोज करतो, " कितने भी तू करले सितम, ह्यात एक कडवं आहे, जितना तडपाएगी मुझको उतनाही तडपेगी तू भी.......
याला रिना रॉय दुसऱ्या गाण्यात उत्तर देते, जानेजा ओ मेरी जानेजा, यात कडवं आहे,
कहां था इक दिन तडपेगी तू जितना तडपाएगी,
मुझे खबर ना थी के ऐसी हालत हो जायेगी !
जानेजाsssss
ही गाणी जोडीने चालतील का?
Pages