Submitted by च्रप्स on 4 August, 2022 - 01:07
Lic घ्या म्हणून मागे लागणाऱ्या नातेवाईकांना कसे हँडल करावे? एक जण फारच मागे लागला आहे.. व्हाटसप मुळे अमेरिकेत कॉल सोपा झालाय आणि वारंवार फोन करतोय... ऑनलाईन काढा अमेरिकेतून असा पिच्छा पुरवलाय .. नको म्हटले तर थोडेसे डॉलर टाका.. काकाची मदत होईल अशी विनवणी असते... कंटाळून मी विचार करायला थोडे दिवस द्या म्हणालोय...
कसे हॅन्डल करावे? नकोय पॉलिसी.. इकडे आहे आल्रेडी...
फोन न उचलणे पर्याय आहे पण त्यांनी फोनच करू नये यासाठी काय करता येईल...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला वाटतं सुह्रद यांची कळकळ
मला वाटतं सुह्रद यांची कळकळ खरी असावी पण अन्य गुंतवणूकीमधे फसलेले काही लोकं vis a vis फक्त त्यांच्या फसवणूकीच्या तुलनेत LIC च्या काही योजना, गुंतवणूकीच्या अर्थसाक्षरतेबाबत अत्यंत मर्यादित परीघ, आयुर्विम्यावर (फक्त LIC चा) अतिशय भाबडी व टोकाची श्रद्धा/भक्ती (याशिवाय LIC Agents चा मूलभूत आवश्यक गुणधर्म म्हणजे आत्यंतिक चिकाटी) यामुळे रघू आचार्य, भरत आणि अन्य काही जणांनी कितीही जबाबदार आणि अर्थसाक्षरतापूर्ण प्रतिसाद लिहिले तरी त्याचा काही उपयोग न व्हावा.
Insurance to use for Hedging (against investing), Asset Allocation, Rebalancing of Assets, Returns should surpass Inflation, Future Value (Purchasing Power) of Money यासारख्या संकल्पनांबाबत त्या कदाचित अपरिचीत असाव्यात. त्यामुळे मग त्यांच्या उदाहरणात आणि प्रतिसादामधे पुढेही काही विशेष फरक न पडावा (परिचित असतील तर मग मात्र अमितव यांचा Target Audience चा मुद्दा बरोबर असू शकेल.)
निरु धन्यवाद.
निरु धन्यवाद.
सुहृद ताई,
बेजबाबदार लोकांकडे कुणी लक्ष द्यायला हवे ? ज्याला विम्याची पॉलिसी घ्यायचीय त्याने का द्यायचे लक्ष ? तो स्वतःपुरते पाहील ना ? जे लोक अर्थसाक्षर नाहीत त्यांचा विमाधारकाने का विचार करायचा ?
तुम्ही एल आय सी कर्मचारी आहात म्हणून आदर्शवाद म्हणून अशा लोकांचा विचार करताय हे समजून घ्यायचे तर दुसरीकडे एल आय सी ने का विचार करावा असेही म्हणता. एक पे कायम रहो.
तिसरी गोष्ट.
तुम्ही ज्या दोन पॉलिसींचे उदाहरण दिले आहे ते नेमके नाही. तुम्ही सांगताय म्हणून विश्वास ठेवायचा.
त्याऐवजी त्या दोन पॉलिसीन कोणत्या हे सांगायला हवे होते. लोकांनी तुलना केली असती. दुसर्या पॉलिसीतून विम्याची रक्कम वजा केली हे स्टेटमेण्ट फारच व्हेग आहे. त्याची फोड कुठे केलीय ? आम्हाला कसे कळणार ? इथे सगळेच एल आय सी त कामाला आहेत या गृहीतकावर ही चर्चा चालू आहे का ? कि सगळ्यांची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे हे तुम्हाला मान्य आहे ?
माझ्याकडे काही पैसे आहेत, जे
माझ्याकडे काही पैसे आहेत, जे मला गुंतवायचे आहेत. पण माझ्या तीन अटी आहेत.
1. भरलेली पूर्ण रक्कम परत हवी.
2. ठरलेल्या दिवशी हवी.
3. ठरलेल्या दराने हवी.
या तीनही अटी पूर्ण होतील, अशी गुंतवणूक मला सुचवा कृपया. >>>
ही विम्याची जाहीरात आहे. विम्याचे पैसे टरलेल्या तारखेला मिळतात हा फायदा मार्केटिंग म्हणून सांगतात. पण लोकांना ते महत्वाचे वाटत नाही. डेथ झाल्यावर स्मशानभूमीत एल आय सी चा प्रतिनिधी चेक घेऊन येतो का ? किंवा ज्या दिवशी क्लेम केला त्याच दिवशी चहा घ्या तुमचा चेक बनतोय असे सांगतात ? हेलपाटे मारावेच लागतात. चेक बनायला वेळ लागतोच.
त्यामुळे इतर गुंतवणुकीतले पैसे काढून घ्यायला लागणारा वेळ लोकांना मान्य असतो. तुमच्या कंडीशन्स लोकांना का मान्य असायला पाहीजेत ?
तुम्ही कोणत्याही एका एल आय सी च्या योजनेचे नाव द्या. पूर्वी वय वगैरे दिले कि त्याचे कोष्टक यायचे. आता दिसत नाही ते. एल आय सी ने एज्यूकेट करायचे बंद केले. का ?
अन्य काही साईटवर इतर कंपन्यांच्या विम्यासोबत तुलना केली जाते. त्यांच्या प्रिमीयमची रक्कम कमी आहे.
मला लाईफ इन्शुअर करायचेय पण गुंतवणुकीचे कंपल्शन नको. मी जास्त रिस्क न घेता म्युच्युअल फंडाची सिप सुरू केली. चार वर्षांनी मला सरासरी २२ टक्के रिटर्न्स मिळाले. सोबत प्युअर इन्शुरन्स घेतला. त्याचा हप्ता एल आय सीच्या कोणत्याही स्कीम पेक्षा कमी येतो.
दोन्हीची टोटल आणि मिळणारे रिटर्न्स अशी तुलना होऊ नये म्हणूनच एल आय सीने ते कोष्टक दाखवणे बंद केले ना ?
एजंट्सच्या तक्रारींमुळे बंद केले.
सुहृद यांनी एल आय सी मधल्या
सुहृद यांनी एल आय सी मधल्या गुंतवणुकीला (? ) राष्ट्रवादाचा मुलामा दिल्यावर खरं तर हतबुद्ध झालो होतो. आणि त्यांच्या प्रशंसकांना त्यांची ही कळकळ योग्य वाटते आणि आम्ही गँग अप करून त्यांच्यावर हल्ला केल्यासारखं वाटतं. हे सगळे
एल आय सीच्यामनी बॅक विमा कंपन्यांच्या, त्याहीपेक्षा जास्त आता मागे पडलेल्या युलिप्ससाठी उत्तम गिर्हाईक आहेत.रघू आचार्य, तुमची गाडी योग्य दिशेने चालू आहे. विमा पॉलिसी कशी निवडायची हे सुहृद विमा कंपनीच्या कर्मचारी असून सांगू शकत नाही, ते तुम्ही सांगताय.
भरत.
भरत.
कळकळ हा शब्द नुकताच मी वापरला होता आणि तो तुमच्या प्रतिसादात कोट केल्यामुळे तुम्ही मला त्यांचा प्रशंसक म्हणाला असावात हे गृहित धरुन प्रतिसाद देतो..
माझ्या मनातला कळकळ हा शब्द "अन्य गुंतवणूकीमधे फसलेले (आणि अर्थसाक्षरही नसलेले) काही लोकं असतील त्यांनी निदान LIC पाॅलिसी काढावी" या त्यांच्या कळकळीबाबत होता.
त्यांची LIC च्या संदर्भात राष्ट्रवादाची मतं आणि तशा प्रकारे पाॅलीसी विक्रीची भलावण मलाही मान्य नाही.
(चिकाटी, टोकाची श्रद्धा/भक्ती {इथे वेगळे वाद नकोत व विषयांतर नको म्हणून मी अंध हा शब्द जाणीवपूर्वक टाळला होता} ह्या शब्दांचे प्रयोजन त्यासाठीच.
कळकळ कसली तर फक्त पाॅलिसीच्या भलावणीची, कां तर कदाचित मर्यादित अर्थसाक्षरता अथवा तिचा अभाव.. हे ही पुढे म्हटलेलं आहे.
जबाबदार अर्थप्रतिसादकांमधे आपल्या नावाचाही प्रथमपासूनच उल्लेख आहे.
आणि यदाकदाचित ही त्यांची चलाखी असेल तर अमितव यांच्या मुद्द्यालाही अनुमोदन दिलेले आहे.
कृगैन.. _/\_
तुम्हांला उद्देशून नाही. काही
तुम्हांला उद्देशून नाही. काही दिवसांपूर्वी अन्य काहींनी लिहिलं होतं.
भरत धन्यवाद.
भरत धन्यवाद.
र आ. कागदपत्रे नीट असतील तर
र आ. कागदपत्रे नीट असतील तर मॅच्युरिटी ज्या त्या दिवसाला मिळते, फेर्या माराव्या लागत नाही. मृत्यू दावा असेल तर काही वेळेला काही जास्तीच्या कागदपत्रांची गरज लागु शकते. मी ज्या पॉलिसी बद्दल लिहिले आहे ती जीवन लक्ष्य आहे, त्याचे सर्व तपशील साईट वर आहेत. आणि डिक्लेअर्ड बोनस पण. आता कोष्टक येत नाही असे कसे होईल? आता याचे ऑनलाईन तपशील कळतात.
मी कोणत्या पोस्ट मध्ये म्हणाले आहे, की टर्म घेउ नका? पण प्रत्येकाला मागे लागून फक्त टर्म इन्शुरन्स घ्या असे करणे शक्य नाही. (कागदपत्रे/ जीविताला धोका या अजूनच वेगळ्याच अडचणी) याचा विचार ज्याचा त्यानेच करायचा आहे. ईतर गुंतवणूकीतून फायदा होतोय तर ती गुंतवणूक अर्थसाक्षर करतातच. याचा अवेअरनेस ज्या त्या परतावा जास्त देणार्या संस्था नी वाढवावा, हेच बरोबर नाही का? ( त्यांना जास्त सखोल माहिती असेल)
जर टर्म प्लान विकायचा नसता तर तो एल आय सी ने ठेवला ही नसता. कित्येक नॉन पार्टिसीपेटींग प्रॉडक्टस आहेतच की.
मी आधी पण पोस्ट मध्ये म्हणले आहे, हळूहळू इतर प्लान्स कमी होतील, पण हे अगदी हातघाईच्या येउन होणार नाही.
एल आय सी मध्ये गुंतवणूक करा, कारण देशाच्या गरजेसाठी पैसे मिळतात. असा अर्थ कृपया काढू नका. कोणीही त्यासाठी पॉलिसी काढत नाही. हा मुद्दा मी धागा कर्त्याने HDFC LIFE ची जीवन संचय पॉलिसी काढल्याबद्दल लिहीली होती.
त्यात पॉलिसी कर्त्याला नफा कमी, काढायच्या आधी एल आय सी एजंट च्या नावाने खडे फोडले, त्या पैशांचा कमीतकमी सुधारणांसाठी ही उपयोग होत नाही.
मी जे सांगायचा प्रयत्न करतेय ते इथे सिद्ध झाले, तरी त्याकडे कोणी बघत नाही.
भलावण बद्दल, हीच पॉलिसी चांगली आहे आणि इतर काहीही नाही असे कुठे आहे?
जर 6.5 -7.5% ने परतावा मिळणार असेल आणि पैसे सुरक्षित राहात असतील, घेणार्याला हे चालत असेल तर का एक पर्याय आहे अजूनतरी हे मान्य असायलाच पाहिजे.असा परतावा पोस्ट पण देते शिवाय एल आय सी पेक्षा कमी सुविधा, तिथे आपण काहीच बोलत नाही, कित्येक पैसे बचत खात्यात असेच पडून असतात, तिथेही आपण गप्प.
मी गुंतवणूकीचे विचारले होते, त्यात मला कोणताही विमा अभिप्रेत नाही. ती रक्कम मला एल आय सी मध्ये ठेवायची नाही. कोणतीही चालेल पण अटी त्याच.
सध्या ग्रामीण भागात सुरू आरोग्य विमा, काही प्रमाणात टर्म विकण्यासाठी छोटे मोठे पर्सनल लोन ( एक -दोन लाखापर्यंत) त्यातच कर्जाची रक्कम वाढवून पॉलिसी करवून घेतात.(विविध फायनान्स कंपन्या आणि खाजगी विमा कंपनी मध्ये टाय -उप असल्याने)आणि ९९% अशा पॉलिसी पुढे बंद पडतात, कारण घेणार् याला काहीच माहीत नसते. अशा ठिकाणी काय करायचे? नवीन विमा करार भरपूर होतात, पण क्लेम्स मिळून शकत नाहीत. याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? का आपला उगा एक गोष्ट धरून सुरूच.
तुम्ही सर्वजण म्हणतात, ती आयडियल सिच्युएशन असेल पण मला तरी आपण त्याच्या जवळ पोहोचलो असे वाटत नाही.
मला पर्सनली LIC चा चांगला
मला पर्सनली LIC चा चांगला अनुभव आहे.
आईच्या पॅालिसीचा नॅामिनी मी होतो.
काय काय कागदपत्रे लागतात ते विचारून सगळी कागदपत्रे घेऊन गेलो. ॲाफिसरने बसल्या जागी माझ्याकडून फॅार्म भरून घेतला. एका DO ला फोन करून त्यावर सही करायला सांगितली. किती दिवसात पैसे जमा होतील ते सांगून जमा न झाल्यास फोन करायला सांगून स्वतःचे कार्ड दिले. एक तासा भरात मी तिथून बाहेर पडलो. सांगितलेल्या कालावधी मधे पैसे जमा झाले.
या धाग्यावर जो अर्थसाक्षरतेचा
या धाग्यावर जो अर्थसाक्षरतेचा मुद्दा आहे आणि investment/insurance products च्या mis-selling चा मुद्दा आहे त्यात फक्त LIC आणि LIC AGENTS हेच दोषी नसून पुर्ण ईंडस्ट्रीच आहे. प्रायव्हेट कंपन्यांनीही केलेल्या mis-selling ची उदाहरणे अनेक आहेत. ट्विटरवर अनेक वाचनात आली आहेत.
ग्राहकांमधेच जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.
मी स्वतः टर्म प्लॅन घेतला आहे. माझ्या सगळ्या मित्रांना सांगितले की अरे त्या endowment, money back पॅालिसी घेऊ नका. पण त्यांना फक्त पैसे भरायचे आणि शेवटी काही मिळणार नाही हेच पचनी पडत नाही.
कागदपत्रे नीट असतील तर
कागदपत्रे नीट असतील तर मॅच्युरिटी ज्या त्या दिवसाला मिळते, फेर्या माराव्या लागत नाही. >> कागदपत्रे तपासून मगच पॉलीसी देणे ही जबाबदारी कोणाची? विमा कंपनीची की विमा प्रतिनिधीची की पॉलीसी घेणाऱ्याची?
मृत्यू दावा असेल तर काही वेळेला काही जास्तीच्या कागदपत्रांची गरज लागु शकते.>> पॉलीसी विकताना ग्राहकाला हे सांगितले जाते का, की बाबारे आम्ही पॉलीसी तर विकतो आहोत पण तुझं बरं वाईट झालं तर हे- हे कागदपत्र लागतील.
प्रत्येकाला मागे लागून फक्त टर्म इन्शुरन्स घ्या असे करणे शक्य नाही. (कागदपत्रे/ जीविताला धोका या अजूनच वेगळ्याच अडचणी) याचा विचार ज्याचा त्यानेच करायचा आहे.>> अनुभव असा आहे की विमा प्रतिनिधी टर्म इन्शुरन्स बाबत शब्द पण काढत नाहीत. इतर पॉलिसी विकतांना मात्र त्यांची चिकाटी कौतुकास्पद असते. "याचा विचार ज्याचा त्यानेच करायचा " याचाच अर्थ, आम्ही जे अर्थ साक्षर नाहीत त्यांना आमच्या पॉलीसी विकु, पण टर्म प्लॅन बद्दल फार काही सांगणार नाही असा घ्यायचा का?
ईतर गुंतवणूकीतून फायदा होतोय तर ती गुंतवणूक अर्थसाक्षर करतातच. याचा अवेअरनेस ज्या त्या परतावा जास्त देणार्या संस्था नी वाढवावा, हेच बरोबर नाही का? >> एकीकडे अर्थनिरक्षरांना डोळ्यासमोर ठेवायचे आणि दुसरीकडे असं विधान करायचे यात विसंगती नाही का?? अहो त्या त्या संस्थांचे प्रयत्न तर सुरू आहेत. पण जे अर्थ निरक्षर आहेत त्यांना मुलांच्या भविष्या साठी पॉलीसी विकणारे महाभाग विमा प्रतिनिधी पण आहेत.
टर्म प्लान विकायचा नसता तर तो एल आय सी ने ठेवला ही नसता.>> मी तरी फारशी एलआयसी च्या टर्म प्लानची जाहिरात पाहिली नाही बुवा.
हळूहळू इतर प्लान्स कमी होतील, पण हे अगदी हातघाईच्या येउन होणार नाही.>> मागच्या पाचवर्षात असे किती प्लान कमी केलेत एलआयसीने??
असा परतावा पोस्ट पण देते शिवाय एल आय सी पेक्षा कमी सुविधा, तिथे आपण काहीच बोलत नाही>> नेमक्या कोणत्या सुविधा जरा स्पष्ट करून सांगाल का?
शिवाय एल आय सी पेक्षा कमी
शिवाय एल आय सी पेक्षा कमी सुविधा, तिथे आपण काहीच बोलत नाही, कित्येक पैसे बचत खात्यात असेच पडून असतात, तिथेही आपण गप्प. >>> याचा काय अर्थ ? आम्ही आवाज उठवावा असे म्हणायचे आहे का ? कशासाठी ?
पुन्हा एकदा, बचत खात्यात पैसे पडून आहेत किंवा हप्ते भरले नाहीत अशा केसेस हे सर्वच संभाव्य गुंतवणूकदारांचे एकमेकांचे नातेवाईक आहेत का ? हे म्हणजे काँग्रेसने असे केले मग त्या वेळी तुम्ही का गप्प असे झाले.
हप्ते बंद झाले, बचत खात्यात पैसे पडून आहेत या साठी इथे चर्चेत भाग घेणारा जबाबदार नाही. हे मान्य आहे का ?
हप्ते का बंद झाले हा एलआयसी कर्मचारी किंवा प्रतिनिधी यांचा विषय आहे. आमचा नाही.
माझ्या माहितीप्रमाणे ज्या ज्या पॉलिसीजचे हप्ते तिमाही, सहामाही असतात त्या बंद पडण्याचे प्रमाण जास्त आहे. कारण उघड आहे.
कोष्टक उपलब्ध असेल तर सरळ
कोष्टक उपलब्ध असेल तर सरळ लिंक का देत नाही ?
तुम्ही दिलेल्या दोन्ही उदाहरणात कोणत्या पॉलिसी आहेत हे समजल्याशिवा य त्यावर बोलण्यात अर्थ नाही. तुम्ही जे काही विचारले होते त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही हे तुम्ही वाचलेले नाही.
मंडळी जालावर शोधले असता LIC
मंडळी, जालावर शोधले असता LIC Premium Calculator मिळाले. प्लॅन निवडून विमा रक्कम, वय , टर्म ही माहिती भरली की बाकी माहितीचे टेबल मिळते. लाभ घ्यावा.
आमचा एलआयसीचा अनुभव हा तसा जुना आहे पण तरी इथे मांडते. माझा नवरा ३ लोन स्कॉलरशिप्सवर अमेरीकेत शिकायला आला तेव्हा त्याला त्या तीनही ट्रस्ट (सेवाभावी संस्था) ना परतफेडीच्या दृष्टीने , एलाअयसीच्या तीन पॉलिसी घ्याव्या लागल्या होत्या. १० वर्षांची टर्म आणि स्कॉलरशिप्ची रक्कम कव्हर होणे असे होते. या तीनही पॉलिसी मॅच्युअर झाल्या तेव्हा LIC चे एक महिना आधी पपांना पत्र आले. पपांनी चौकशी केल्यावर तिथल्या ऑफिसरनी व्यवस्थित माहिती दिली. आम्ही इथे असल्याने पपांना पैसे ताब्यात घेण्याविषयी काय करायचे ते सांगितले. त्यानुसार पपांना रक्कम मिळाली. नातवंडे- लेकीसुनांसाठी नव्या पॉलिस्या घ्या वगैरे आग्रह झाला नाही.
सुहृद एलआयसी ग्रामिण भागात काम करतात तर तिथली अर्थसाक्षरतेची परीस्थिती त्यांना चांगली माहित असणार. इतर कुठे फसवणूक होण्यापेक्षा विमा + कॅश सेविंग म्हणून हा पर्याय असे त्या म्हणत असतील तर मला तरी त्यात काही गैर वाटत नाही. कॅश सेविंग मधून इंन्फ्लेशनवर मात करणे अपेक्षितच नाही. जोखीम कमी तर परतावाही कमीच असणार ना.
'कागदपत्रे व्यवस्थित असल्यास ' याचा मी लावलेला अर्थ - पॉलिसी धारकाने त्याला एलआयसी कडून मिळालेली कागदपत्रे नीट ठेवणे आणि वारसाला त्याची माहिती असणे . बरेचदा कर्त्या पुरुषाने केलेले व्यवहार इतरांना माहित नसतात. कागदपत्र नीट फाईल केलेली नसतात. पॉलिसी हप्ता न भरल्याने रद्द झाली आहे हे सुद्धा बरेचदा माहित नसते. पत्नी वारस आणि कागदपत्रे दीर आणि सासर्याच्या ताब्यात, त्यांनी अडवणूक करणे वगैरे प्रकार तर अगदीच कॉमन असतात.
अवांतर - अर्थसाक्षरतेबद्दल बोलायचे तर इथे IRA अकाउंट बँकेत हा प्रकार बघितला आहे. अगदी गावतल्या क्रेडीट युनिअन पासून मोठ्या बँकेपर्यंत सगळीकडे तुमचे IRA हा विषय ऑफिसर काढतात. वॅनगार्ड कडे ब्रोकरेज म्हटले की ओह! असे म्हणून गप्प बसतात.
एल आय सी ची ही पॉलिसी आहे.
एल आय सी ची ही पॉलिसी आहे. पॉलिसी डॉक्युमेंट एक्स्प्लेन केलेले आहे. वाचून अभिप्राय कळवावा.
https://licindia.in/documents/20121/377150/Sales-Brochure_182.pdf/c5a77f...
एलयासीचा अनुभव चांगला येणे
एलयासीचा अनुभव चांगला येणे वेगळे. सुहृद या ग्रामीण भागात आहेत हे मला तरी माहिती नाही. पण त्यामुळे तिथल्या अनुभवांवर सर्वांना जज्ज करणे योग्य आहे का ?
एक विमाधारक ज्याला गुंतवणुकीचे अन्य पर्याय उपलब्ध आहे त्याला ग्रामीण भागात काय परिस्थिती आहे याच्याशी काय घेणं देणं आहे ? त्याला कमीत कमी रकमेत फक्त इन्श्युरन्स हवा आहे. त्यासोबत जी इन्व्हेस्टमेंट आहे ती त्याला नको आहे. त्याला प्रत्येक पॉलिसीत विमा किती आणि विमेतर रक्कम किती ही फोड हवीय. म्हणजे त्याला निर्णय घेता येईल. इतकाच प्रश्न आहे. आता सुहृद यांचे युक्तीवाद वाचा.
मी सुहृद यांच्या ठिकाणी असतो
मी सुहृद यांच्या ठिकाणी असतो आणि माझ्या एम्प्लॉयरला डिफेण्ड करत असतो ( जे प्रशंसनीय आहे) तर इतकेच म्हणालो असतो कि तुमच्यासाठी जी योग्य पॉलिसी वाटते ती तुम्ही घ्या. तुम्हाला जी पॉलिसी योग्य वाटते ती एलआयसी कडून घेण्याची कारणे अमूक तमूक.
बाकिच्या पॉलिसीज अन्य लोकांसाठी चालू ठेवणे आम्हाला भाग आहे कारण ही परिस्थिती आहे. असे विवेचन असते तर ज्यांचे हप्ते थकतात त्यांचे बर्डन इथल्या चर्चा करणार्यांवर पडतेय असे जे विचित्र चित्र उभे राहू पाहतेय ते टळले असते.
<< मी ज्या पॉलिसी बद्दल
<< मी ज्या पॉलिसी बद्दल लिहिले आहे ती जीवन लक्ष्य आहे, त्याचे सर्व तपशील साईट वर आहेत. >>
सुहृद,
हे जाहीर करून फसलात तुम्ही. एलआयसी च्या साइटवरून Policy document आणि sales brochure शोधले मी.
Sum assured on death किती आहे, ते तुम्हीच सांगा आता लोकांना. Policy amount च्या दुप्पट पैसे मृत्यूनंतर लगेच मिळतील वगैरे थापा मारणे कृपया ताबडतोब बंद करा आणि खोटी माहिती दिल्याबद्दल ताबडतोब बिनशर्त माफी मागा. पॉलिसीच्या ६.९ पट payout कुठल्याही परिस्थितीत मिळत नाही, जो दावा तुम्ही आधीच्या प्रतिसादात केला आहे. (मला एलआयसी ची कुठलीही पॉलिसी दाखवून द्या ज्यात ६.९ पट पैसे मिळतील. तुमच्या सोयीसाठी च्या सर्व पॉलिसीच्या माहितीची लिंक देत आहे.)
सहसा मी इतक्या तीव्र शब्दात प्रतिसाद दिला नसता, पण इतरांना तुमचा जो कळवळा वाटतोय तो किती अस्थायी आहे, हे कळावे म्हणून तसे लिहिले आहे. त्याबद्दल क्षमस्व.
Sum assured on death is
1. Annual income benefit equal to 10% of sum assured payable from policy anniversary after death till policy anniversary prior to date of maturity.
2. 110% of sum assured payable on due date of maturity
In addition, vested simple reversionary bonus + final additional bonus will be payable on due date of maturity.
पहिल्या आणि पुढल्या प्रत्येक
पहिल्या आणि पुढल्या प्रत्येक प्रिमियममधून किती किती टक्के भाग एजंट कमिशनवर खर्च होतो?
टर्म प्लान, एंडोमेंट प्लान आणि पेन्शन प्लान अशा तीन प्रकारच्या प्लान्ससाठी उत्तर अपेक्षित.
उ बो.
उ बो.
धन्यवाद तुम्ही सिद्ध केले कि, मी खरे बोलत आहे.
मी जो प्रिमियम सांगितला आहे, त्यात दोन रायडर ऍड केले आहेत.
प्रिमियम सगळा एकत्रच आहे.
Accidental death and disability rider
And Term rider
वीस लाखाची विमा रक्कम.
On death
Natural - immediately on death 20 lakh
Accidental additional 20 lakh
पहिल्या वर्षी अपघाती मृत्यू झाला तर
अशी शक्यता उदाहरणात दिली होती, तसे तिथे पोस्ट मध्ये लिहीले आहे.
40 लाख मृत्यू नंतर लगेच
किंवा
नैसर्गिक मृत्यू लगेच 20 लाख
पॉलिसी ची 24 वर्षे शिल्लक
10% ऑफ S A that is 2 lakh for 24 years
जे 48 लाख
मॅच्युरिटी - 110% S A + बोनस + फायनल ऍडिशनल बोनस.
ज्याची मॅच्युरिटी 52 लाख
वर्षे कमी असतील तर ही रक्कम बदलू शकते.
20 लाख विमा रक्कम
40+48+52 = 1.40 कोटी एकूण मृत्यू लाभ
सेम कॅलक्युलेशन 1 कोटी विमा रक्कम सहित.
अरे देवा, या बोटाची थुंकी
अरे देवा, जास्त प्रीमियम भरून रायडर पकडले आहेत, हे तुम्ही सांगितले न्हवते. (रघू आचार्य यांना आणि इतर प्रतिसादात फक्त "मृत्यू दावा" असे मोघम लिहिले आहे). या बोटाची थुंकी त्या बोटावर करण्यात तुम्ही पटाईत आहात हे सिद्ध झाले.
हरकत नाही. तुम्ही प्रचार करताय ती पॉलिसी, तरीही घाट्याचा सौदा कसा आहे ते सांगतो.
मी १ करोड टर्म पॉलिसी घेतली आणि १ वर्षाच्या आत मृत्यू झाला (कुठल्याही कारणाने, pancreatic cancer ने समजू), तर नॉमिनीला टर्म इन्शुरन्स पॉलिसीमुळे लगेच १ कोटी मिळतील.
टर्म इन्शुरन्सच्या आणि तुमच्या पॉलिसीमधील पहिल्या वर्षाचा प्रीमियमचा फरक ₹. ४,६७,५३२ याची किंमत १०% रिटर्नने २५ वर्षानी ₹.५०, ६५,५७१ होते. ते अजून जास्तीचे मिळतील.
तुमच्या पॉलिसी नुसार किती मिळतील? २० लाख त्वरित मिळतील. १ कोटी वजा २० लाख या वाढीव रकमेचे २५ वर्षानी किती होतील? ₹. ८ कोटी, ६६ लाख, ७७ हजार, ६४७
पैशाची NPV (net present value) म्हणजे आजची क्रयशक्ती हा प्रकार तुम्हाला माहीत आहे का? माहीत असेल अशी आशा आहे, पण प्रतिसादावरून तरी तशी शक्यता दिसत नाही.
जीवन लक्ष्य कॅल्क्युलेटर मधे
जीवन लक्ष्य कॅल्क्युलेटर मधे टाकलं कि प्लान जीवन आनंदचा येतो.
https://www.licpremiumcalculator.in/jeevan-lakshya-plan-933.html
एखादा इसम ५ वर्षांचा आहे तर
एखादा इसम ५० वर्षांचा आहे तर त्याला जीवन लक्ष्यचा उपयोग नाही कारण वयोमर्यादा ५० वर्षेच आहे. कमी वयात डेथ रिस्क कमी असते. विमा कंपनीला त्यात फायदा असतो. याचाच लाभांश दिला जातो.
पण लाभांश एक शतं ला नसून एक सहस्त्रं वर असतो. जेव्हां एल आय सी ६६% लाभांश म्हणते तेव्हां ते एक हजाराला ६६ रूपये असे असते. ही ग्यारण्ड्टीड रक्कम नसून एल आय सी च्या आजवरच्या कामगिरीवर आधारीत प्रोजेक्शन आहे. पुढच्या १५ वर्षात हीच कामगिरी सातत्याने राहील याची खात्री नाही.
उद्या एल आय सी ला तोटा झाला तर हा लाभांश कमी सुद्धा मिळू शकतो. हजाराला ६६ म्हणजे १०० ला ६.६ टक्के. बँकेत एफडी करत राहिलं तर इतकाच मिळेल.
माणसाला ४५ च्या पुढे विम्याची गरज जाणवू लागते.
५०व्या वर्षी जर एक करोडची पॉलिसी घेतली आणि टर्म रायडर न घेता पंधरा वर्षात ही व्यक्ती खालील प्रमाणे पैसे भरेल
First Year Premium
Mode Premium GST (@4.5%) Total Premium
Yearly 892910 40181 933091
Half Yearly 451103 20300 471403
Quarterly 227875 10254 238129
Monthly 75958 3418 79376
Maturity Benefits
Basic Sum Assured (A) १,00,00,000 (एक करोड)
Total Premium Paid (Approx) १,00,0९,०९६ ( एक करोड नऊ हजार शहाण्णव रूपये )
Accumulated Bonus (Approx) (B) 61,50,000 ( एकसष्ठ लाख पन्नास हजार रूपये )
Final Addition Bonus (FAB) (Approx) (C) 2,00,000 ( दोन लक्ष रूपये)
Maturity (Approx) (A+B+C) 1,63,50,000 ( एक करोड त्रेसष्ठ लाख पन्नास हजार रूपये )
पंधरा वर्षात मला एक करोड गुंतवणुकीवर ६३ लाख पन्नास हजार रूपये मिळतात.
हेच पैसे जर मी सोन्यात गुंतवले तर सोन्यावर दर वर्षी ९.६% परतावा मिळतो. गेल्या चाळीस वर्षात मिळालेला आहे. पुढच्या १५ वर्षात हा दर १०% मिळेल असे समजून जर माझा परतावा पाहिला तर निश्चितच तो यापेक्षा जास्त होईल.
आजच्य दराने एक करोडचा फ्लॅट घेतला तरी त्याचे पाच सहा करोड निश्चित मिळतील. व्याजाचे एक करोड आणखी गेले तरी मला नफा होईल.
शेअर बाजाराबद्दल इथे बोलणे चुकीचे आहे. पण म्युच्युअल फंडात सुरक्षित फंडात सिप ने गुंतवणूक केली तर चांगला परतावा मिळेल. १८ ते २२% असा परतावा अपेक्षित आहे.
५० व्या वर्षी या व्यक्तीला फक्त टर्म इन्शुरन्स घेऊन या प्रकारच्या गुंतवणुकीतून जास्त परतावा मिळेल.
वरच्या कॅलक्युलेटर मधे जीवन आनंद का दिसते हे मी त्या कंपनीत कामाला नसल्याने सांगू शकत नाही. ही काळजी कंपनीनेच घ्यायला हवी.
licpremiumcalculator.in ही
licpremiumcalculator.in ही साईट company अधिकृत आहे की नाही, माहिती नाही. मी तरी त्याच्यावर १००% विश्वास ठेवणार नाही. पण अंदाज घेण्यासाठी चालू शकेल.
लोगो आहे त्यावर. कंपनीने
लोगो आहे त्यावर. कंपनीने आक्षेप घेतला असता.
लोगोवर जाऊ नका. ती साईट A.
लोगोवर जाऊ नका. ती साईट A. वर्मा नावाच्या उत्तर प्रदेशातील माणसाच्या मालकीची आहे.
ते टर्म रायडर आणि अॅक्सिडेंट
ते टर्म रायडर आणि अॅक्सिडेंट रायडर चे कळले पण तरीही माझा प्रश्न -
मृत्यू दाव्यात लाभ मोजताना मॅच्युरिटीचे ५२ लाख का धरायचे?
जीवन लक्ष ब्रोशर मधे जे डेथ बेनिफिट म्हटले आहे त्यात या मॅच्युरिटीच्या रकमेचा उल्लेख नाही. तिथे फक्त
"Sum of 110% of Basic Sum Assured, which shall be payable
on date of maturity and Annual Income Benefit equal to 10%
of the Basic Sum Assured, which shall be payable from the
policy anniversary coinciding with or following the date of
death of Life Assured, till the policy anniversary prior to the
date of maturity.
The vested Simple Reversionary Bonuses and Final Additional
Bonus, if any, included in the Death Benefit, shall be payable on
due date of maturity" असे म्हटले आहे.
मृत्यूनंतर लगेच ठराविक रक्कम आणि नंतर मुदत पूर्ण होईपर्यंत दर वर्षी काही रक्कम इन्कम म्हणून + शेवटी काही रक्कम बोनस मी समजू शकते परंतू जोडीला मुदतपूर्ती नंतर मॅच्युरिटीची रक्कमही हे गणित नाही जमत. मृत्यूलाभ किंवा मुदतपूर्ती झाल्यावर मिळणारी रक्कम यापैकी एकच मिळेल ना? की माझी समजण्यात चूक होत आहे.?
की माझी समजण्यात चूक होत आहे.
की माझी समजण्यात चूक होत आहे.? >>माझ्या मते नाही.
Accidental death and
Accidental death and disability policy
Sum assure २० lack
Anyone can buy premium only ४८० for year
No waiting period or any medical
विमा सल्ल्यागार याची खरे तर
विमा सल्ल्यागार याची खरे तर आवश्यकता आहे पण lic असो किंवा खाजगी विमा कंपनी सगळीकडे विमा विक्रेतेच आहेत
Pages