Submitted by च्रप्स on 4 August, 2022 - 01:07
Lic घ्या म्हणून मागे लागणाऱ्या नातेवाईकांना कसे हँडल करावे? एक जण फारच मागे लागला आहे.. व्हाटसप मुळे अमेरिकेत कॉल सोपा झालाय आणि वारंवार फोन करतोय... ऑनलाईन काढा अमेरिकेतून असा पिच्छा पुरवलाय .. नको म्हटले तर थोडेसे डॉलर टाका.. काकाची मदत होईल अशी विनवणी असते... कंटाळून मी विचार करायला थोडे दिवस द्या म्हणालोय...
कसे हॅन्डल करावे? नकोय पॉलिसी.. इकडे आहे आल्रेडी...
फोन न उचलणे पर्याय आहे पण त्यांनी फोनच करू नये यासाठी काय करता येईल...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काहीच माहिती नाही हे तुम्ही
काहीच माहिती नाही हे तुम्ही म्हणताय. खोलात जाऊन पाहिलं नाही, असं मी लिहिलंय. ढोबळ माहिती आहे मला. आणि तुम्ही काहीही माहीत नसताना छातीठोक विधाने करून माझा वेळ फुकट घालवताय आणि इतरांना मिसगाइड करताय.
अधिकृत लिंक म्हणजे पिंक असेल तर _/\_.
अधिकृत लिंक म्हणजे पिंक असेल
अधिकृत लिंक म्हणजे पिंक असेल तर >> तुम्हाला वाचता येते का ?? काहिहि लिंका टाकत आहात
एका वर्षात ३ वेळा प्लैन बदलुन दाखवा .
मला शिकवताय फ्लेक्सिबिलिटी
एन पी एस शेअरमध्ये पैसा लावतं
एन पी एस शेअरमध्ये पैसा लावतं म्हणून नक्को. एल आय सी गोळा केलेले पैसे नक्की कुठे लावते?
गाळात जात असलेल्या कंपन्यांचे आणि सरकारला काढायचे असलेले शेअर्स एल आयसीने घेतल्याच्या बातम्या कानावर नाही आल्या?
https://theprint.in/economy/lic-has-lost-more-than-rs-20000-crore-in-jus...
https://www.npstrust.org.in
https://www.npstrust.org.in/return-of-nps-scheme
तुम्च्याच साइट् वरुन आहे. रिटर्न अओफ एन्पीएस !
ऐव्हरेज ८.९७ येते !
एन पी एस शेअरमध्ये पैसा लावतं
एन पी एस शेअरमध्ये पैसा लावतं म्हणून नक्को. एल आय सी गोळा केलेले पैसे नक्की कुठे लावते? >>> मोद्याने मुर्खपणा केला आहे पण अजुन sovereign guarantee आहे ना तुम्च्या विम्याला !
एन्पीअस देणार आहे का !
मोद्या च्या चुका वेगळ्या ठिकाणी बोलु. त्यावर आपले एकमत आहेच कि !
तसेहि एन्पीअस हि मोद्याच्या
तसेहि एन्पीअस हि मोद्याच्या डोकुआतलीच स्कि म आहे आणी म्हणुन डेंजरस आहे
भरत, मी कधी असे म्हणाले आहे,
भरत, मी कधी असे म्हणाले आहे, की टर्मप्लान आणि व्होल लाईफ चा प्रिमियम सेम येईल?
मी फक्त ईतकेच म्हणते आहे, ज्यांना ईतर काही करायची इच्छा असेल त्यांनी खुशाल करावे. इतरांना सल्ला देताना पुर्ण द्या नाही तर देऊ नका.
शहा,
तुम्ही १ करोड ची पॉलिसी बेस धरुन कॅलक्युलेशन केले आहे, आणि RBI Bond साठी सध्याचे व्याजदराने केले आहे.
आता, लाभ च्या पॉलिसी ला दर ४७/१००० असा बोनस दर वार्षिक आहे. हे १००० , एक करोड मध्ये किती हजार आहेत असे धरतात. १०००० ×१०००=१०००००००. म्हणून दर वर्षी ४७×१००००=४७०००० बोनस दर वर्षी जमा होईल.
४,७००००×२५ वर्षे = ११७५०००० हा एकुण बोनस जमा होईल.
शिवाय मुदतपुर्तीला LIC अजुन एक बोनस देते FAB- Final Additional Bonus
तो २५व्या वर्षी ४५०/१००० असा आहे.
४५०×१००००= ४५०००००
आता
विमा रक्कम १०००००००+ बोनस ११७५००००+ FAB ४५००००० असे सगळे बेरीज करून
मॅच्युरिटी रक्कम येईल - २६२५०००० हि रक्कम येईल.
बोनस रेट आणि FAB, LIC च्या साईट वर चेक करु शकता.
हि रक्कम पुर्णपणे करमुक्त आहे.
तुमच्या केलेल्या बॉंड च्या कॅलक्युलेशन मध्ये २५ व्या वर्षी मिळणारी रक्कम २४३७६००५ आहे.
आता मला सांगा कुठे तोटा होतोय?
तुमच्या एका पोस्ट मध्ये वय कमी घेतले असा उल्लेख आहे, पण कमी म्हणजे किती ते सांगु शकाल का?
मी लाभ पॉलिसी साठी व्यक्ती चे वय ३० धरले आहे, पैसे मिळायच्या वेळी ती व्यक्ती ५५ वयाची असेल, तिला १५h फॉर्म चालणार नाही ना? माझ्या माहिती प्रमाणे तो साठीच्या वर चालतो.
शिवाय दरवर्षी बॉंड विकत घ्या, १५h form भरा हे सातत्याने करत रहावे लागेल.
LIC ला मात्रे मासिक हप्ता घेतला आपसुक बॅंकेतुन कट होत राहतील.
पॉलिसी च्या मुदतीत मृत्यू झाला तर, विमा रक्कम, जमा झालेला बोनस, अपघाती मृत्यू झाला असेल तर अपघाती मृत्यू विमा रक्कम असे सगळे वारसदाराला करमुक्त मिळते.
कितीही नाचले तरी एल आय सी चा
कितीही नाचले तरी एल आय सी चा फायदा पीपीएफच्या पुढे जातच नाही
मोद, तुम्ही माझी पोस्ट नीट
मोद, तुम्ही माझी पोस्ट नीट वाचलेली दिसत नाही, त्यात मी विमा रक्कम, बोनस, FAB धरुन मिळालेली रक्कम करमुक्त आहे असे नीट लिहीले आहे.
पेन्शन प्लान मध्ये जीवन विमा असत नाहीच, ते फक्त ठेवीवर व्याज स्वरुपाचे असते, त्याला TDS लागतो पण तो LIC कट करत नाही, जर कर लागत असेल तो ग्राहक ने भरणे अपेक्षित त्यामुळे १५ h सारखा कोणताही फॉर्म दरवर्षी द्यावा लागत नाही.
तुम्ही जर मी पहिल्या काही पोस्ट मध्ये लिहीलेला ८%व्याजदराचा पेन्शन प्लान असे डोक्यात धरुन असाल तर, तुमच्या माहिती साठी सांगते, तो ठेवीवर व्याज या स्वरूपाचा प्लान नव्हे. तो ही पुर्णतः करमुक्त, गॅरंटीड, आयुष्यभरासाठी आहे.
म्हणून च योग्य माणूस, योग्य वेळी गरजेचे आहे.
हे सगळे पीपीएफ मध्येही
हे सगळे पीपीएफ मध्येही करमुक्तच असते
आता नवा भिडू का?
आता नवा भिडू का?
असो, वरील उदाहरण हे पान तीन वर साहिल शहा यांच्या प्रश्नाला उत्तर आहे. कृपया ते वाचा.
मी एकाही पोस्ट मध्ये म्हणले नाही कि, LIC सर्वोत्तम परतावा देते.
पण सगळ्यांना वाटते कि LIC मध्ये काहिच मिळत नाही, तर हा गैरसमज आहे.
आणि मग ती एवढी भली रक्कम घेऊन
आणि मग ती एवढी भली रक्कम घेऊन काय करणार ? तीही कुठेतरी एफ डी च करून व्याज खाणार ना ?
नका घेऊ एकत्र, सेटलमेंट मध्ये
नका घेऊ एकत्र, सेटलमेंट मध्ये घ्या, ते पण करमुक्त.
पंधरा वर्षात घेतली तर अजून व्याज जमा होऊन एकूण मिळणारी रक्कम ३५७५८०५२ ईतकी होईल.
पुन्हा तोच प्रश्न ना !!
पुन्हा तोच प्रश्न ना !!
आणि मग ती एवढी भली रक्कम घेऊन काय करणार ? तीही कुठेतरी एफ डी च करून व्याज खाणार ना ?
मग गप्प पीपीएफमध्येच राहिली तर काय वाईट आहे?
पीपीएफ ला जास्तीत जास्त दिड
पीपीएफ ला जास्तीत जास्त दिड लाख भरु शकता, त्याहून जास्त नाही.
सुहृद कृपया मी दिलेली लिंक
सुहृद कृपया मी दिलेली लिंक cleartax पहा. Returns from policies which fulfil certain criteria only are tax free other aren’t
सेटलमेंट म्हणजे दर महा रक्कम
सेटलमेंट म्हणजे दर महिन्याला रक्कम देऊ, पंधरा वर्षे. एकत्र नाही. पण एकत्र न घेतल्यामुळे व्याज जमा होऊन रक्कम वाढेल.
मोद जी, त्याला अशी एकच अट आहे
मोद जी, त्याला अशी एकच अट आहे कि वार्षिक हप्त्याच्या दहा पटीहुन जास्त विमा रक्कम हवी तर मॅच्युरिटी करमुक्त.
बहुतेक वेळेला असेच असते. मला तर LIC चा असा नसलेला प्रॉडक्ट शोधावा लागेल. एखादाच असेल बहुदा..
म्हणूनच योग्य माणूस योग्य वेळी..
म्हणजेच सरसकट करमुक्त आहे असे
म्हणजेच सरसकट करमुक्त आहे असे विधान बेजवाबदार आहे असे तुम्हाला वाटत नाही का? विशेषतः जेव्हा टॅक्स हा तुमचा (तुमच्या कामाच्या क्षेत्राच्या संदर्भात) विषय नाही तेव्हा?
तुमची तळमळ पटते आहे फक्त काही विधाने करताना काळजी घ्या हीच विनंती.
All the returns from all
All the returns from all policies aren’t tax free . That’s the point I am trying to make.
एखाद्या फारशा न चालणार्या
एखाद्या फारशा न चालणार्या पॉलिसी बद्दल तुम्ही सांगत आहात, ठिक आहे, माझी चुक मान्य.
पण १५ h बद्दल तुम्ही काहीच बोलला नाहीत, का त्याला लिमीट नाही? वयाचे आणि रक्कमेची? का फक्त विरोधाला विरोध?
आता मी तेही बघीतले, कोणता
आता मी तेही बघीतले, कोणता प्लान दहा पटी पेक्षा कमी विमा संरक्षण देते.
एक प्लान आहे, त्यात चार प्रकारे वेगवेगळे पद्धतीने घेता येतो, पण त्यातील फक्त एका पद्धतीवर कर लागू शकतो.
15H It’s merely a form /
15H It’s merely a form / declaration. Since when such procedural aspects start determining the investment decisions? The process of decision making itself is faulty if procedural aspects play such crucial role.
My parents are senior citizen and aren’t that savy with internet but still file 15H every year without fail.
My base case is insurance is a necessity from point of view of protection but not an iota more than that.
If ur point is about deduction of tax at source from other sources of investments then my personal experience is refund process has improved drastically. Gone are the days when refund used to driven by ‘other considerations’ - atleast in cases of individuals drawing salary / pension income
मोद जी, तुम्हाला लक्षात आले
मोद जी, तुम्हाला लक्षात आले नाही बहुदा मी कशाबद्दल म्हणत आहे ते,
साहिल शहा यांनी RBI bond च्या करमुक्ततेसाठी 15H भरावा लागेल असे सांगितले, त्यावेळी तुम्ही काहीच बोलला नाहीत..
पान नंबर तीन वर तुम्ही जेंव्हा मी बॉंड वर सोवेरिअन गॅरंटी बद्दल विचारले त्या विषयी तुम्ही केलेल्या माझ्या एकुणच माहिती विषयी प्रश्न उत्पन्न केलात त्याच्या वरची कमेंट, शहा यांची..
15H बद्दल मला फारसे माहित नाही, कृपया मराठी तुन समजावून सांगितले तर उपकार होतील.
१५H हे वयाच्या ६० वर्षानंतर
१५H हे वयाच्या ६० वर्षानंतर जर आपले करपात्र उत्पन्न नसेल तर वापरु शकता. 15G हे ६० पर्यत करपात्र उत्पन्न नसेल तर वापरु शकता. आणि जरी कर कापला गेला तरी रिटर्न भरुन जास्तीचे भरलेली रक्कम परत मिळते.
तुम्ही जे रिटर्न दाखवत आहात आणि online पॉलिसी काढताना जे guaranteed आणि max रिटर्न दाखवत आहात त्यात खुप फरक आहे. तुम्ही पण online फॉर्म भरुन बघु शकता की मी तक्यात दिलेल्या गोष्टी LIC च्या pdf फाईल मधुन घेतल्या आहेत.
LIC जे सांगते त्यापेक्षा जास्त रिटर्न देते का?
15H मध्ये बोलण्यासारखे किंवा
15H मध्ये बोलण्यासारखे किंवा चर्चा करण्यासारखे काही आहे असे मला वाटत नाही.
It’s a procedural requirement for some types of investments - so be it. Just because one has to fill up that form he / she shouldn’t opt for investment which yields better is beyond comprehension..
शहा सर, मला माहित नाही ऑनलाईन
शहा सर, मला माहित नाही ऑनलाईन काय दाखवतात.
पण आमची जी पद्धत आहे मॅच्युरिटी क्लेम द्यायची त्या प्रमाणे कॅलक्युलेशन केले.
असेच डेथ क्लेम ही असाच करतो.
सुहृद - चांगलं लिहितांय. वर
सुहृद - चांगलं लिहितांय. वर एक मुद्दा वेहेमंटली मांडला गेलांय कि ६० नंतर टर्म इंशोरंस कामाचा नाहि. बॅड फिनांशियल डिसीजन, वगैरे वगैरे..
तर ते विधान सरसकट लागु होत नाहि. कदाचित भारतात अजुन तशी थॉटप्रोसेस रुजलेली नाहि म्हणुन सोकॉल्ड अर्थसाक्षर त्याविषयी अनभिज्ञ आहेत. अर्थसाक्षरते बरोबर फिनांशियल इंडिपेंडंस (अर्थमुक्त?) हा एक प्रकार आहे, ज्याची माहिती अस्णं जरुरीचं आहे. साठीच्या पुढे तुमचा नेटवर्थ काय आहे, अडिअडचणीला लागणारे पैसे, मृत्युनंतर येणार्या खर्चाची तजविज तुम्हि स्वतः करुन जाणार आहांत कि मुलाबाळांवर टाकणार हा विचार करुन ठेवणे हे फिनांशियल इंडिपेंडंस अंतर्गत येते. आता तुम्हि भले अर्थसाक्षर असाल, पण फिनांशियली इंडिपेंडंट नसाल तर त्याचा काहि उपयोग नाहि. टर्म इंशोरंस काहि प्रमाणात, साठीनंतरहि फिनांशियली इंडीपेंडंट होण्यास मदत करतो...
सोकॉल्ड अर्थसाक्षर . >>>
सोकॉल्ड अर्थसाक्षर . >>> हा शब्द मस्त आहे. भरपुर आहेत इथे
मला वाटते हा धागा lic वाले
मला वाटते हा धागा lic वाले नातेवाईक कसे हॅन्डल करावे याबद्धलच ठेऊया...
रानभुली बाकीचे रेलेवंट धागे मेहनतीने वर आणत आहेत( थँक्स ) त्या त्या धाग्यावर बाकीची रेलेव्हंट चर्चा करूया...
Pages