LIC वाले नातेवाईक

Submitted by च्रप्स on 4 August, 2022 - 01:07

Lic घ्या म्हणून मागे लागणाऱ्या नातेवाईकांना कसे हँडल करावे? एक जण फारच मागे लागला आहे.. व्हाटसप मुळे अमेरिकेत कॉल सोपा झालाय आणि वारंवार फोन करतोय... ऑनलाईन काढा अमेरिकेतून असा पिच्छा पुरवलाय .. नको म्हटले तर थोडेसे डॉलर टाका.. काकाची मदत होईल अशी विनवणी असते... कंटाळून मी विचार करायला थोडे दिवस द्या म्हणालोय...
कसे हॅन्डल करावे? नकोय पॉलिसी.. इकडे आहे आल्रेडी...
फोन न उचलणे पर्याय आहे पण त्यांनी फोनच करू नये यासाठी काय करता येईल...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

र. आ. तुमचा गैरसमज होतोय, कोणी कुठे गुंतवणूक करावी हे ज्याचे तोच ठरवू शकतो.

आयटीआर हे टर्म प्लान ला कंपल्सरी आहेत, एन्डावमेंटला लागु शकतात पण कंपल्सरी नाहीत.
भारतात किती टक्के आयटीआर भरतात? जर पुन्हा मार्ग नसेल तर हे पैसे कुठे गुंतवले जाऊ शकतात?

अमितव, मी राष्ट्रवाद वा भक्ती आणतच नाहीये, मी फक्त यातून होणारा फायदा आणि सुधारणा बघते. कारण त्या मला वापरायला मिळतात.

सुन्या तुम्हाला दिसत नाही का वाचता येत नाही?
मी त्यात मृत्यू दावा लिहीला आहे.
जर 20 लाखाच्या पॉलिसी ला
मृत्यू झाल्यावर लगेच 40 लाख,
तिथून पुढे दर वर्षी 2 लाख, पुढची 24 वर्षे
आणि पंचविसाव्या वर्षी 52 लाख अशी रक्कम मिळते आहे.
एकूण मृत्यू लाभ 1 कोटी चाळीस लाख होतोय.

यात फक्त मृत्यू चे वर्ष बदलले तर दर वर्षी मिळणार्या दोन लाखाची वर्षे कमी होतील.

माझ्या गुंतवणूकीच्या प्रश्नावर लक्ष देऊ शकाल का? > नाही. अस्थानी आहे.

सध्या जमिनीत आणि सोन्यात गुंतवणुकीचे जे परतावे मिळतात त्यामुळे लोक विमा न घेताही विम्याच्या उद्देशापेक्षा जास्त पैसे कमावतात. विमा हा कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी असतो. गुंतवणुकीसाठी नाही. एल आय सी च्या कुठल्याच स्कीम मधे प्रॉपर्टी मधे सध्या मिळत असलेल्या रिटर्न इतके रिटर्न्स मिळणार नाहीत. गुंतवणूक तेल,मसाल्याचे पदार्थ यात सुद्धा होते. धातू मधे होते. भंगार मधे होते. या सगळ्यांमधे उत्तम रिटर्न्स मिळतात. टिंबर मधे सुद्धा गुंतवणूक होते. शेवटचं पुन्हा एकदा. गुंतवणूक आणि विमा एकत्र करू नका.

एल आय सी चा इतिहास ट्रेनिंग मधे सांगतात. त्यातच उद्दीष्टे पण सांगतात. ज्या वेळी बँक सर्वत्र नव्हती, सर्वत्र अकाउंट्स नव्हती तेव्हां लोक "सरकारी" म्हणून एल आय सी त पैसे गुंतवायचे. युटीआय मधे सुद्धा "सरकारी" म्हणून लोक पैसे ठेवायचे. नंतर पोस्टात ठेवू लागले.

क्षमा करा पण ,तुम्ही एल आय सी त काम करत असल्याने आउट ऑफ बॉक्स अवघड जात असावे कदाचित. प्युअर विम्याला विवरणपत्रे का मागतात आणि एण्डॉवमेंटला का मागत नाहीत याचे लॉजिकल एक्स्प्लेनेशन आहे का ? प्युअर विम्याला जर विवरणपत्रे लागत असतील तर ती एण्डॉवमेंटला पण असायला हवीत.

ट्रेनिंग दोन प्रकारचे असते. एक एलआयसीचे कंपल्सरी ट्रेनिंग किंवा मग एम आय टी चा कोर्स. आणि दुसरे प्रोफेशन एजंट्स चे ट्रेनिंग.
पहिल्या ट्रेनिंग मधे विमा म्हणजे काय, विम्याचे उद्दीष्ट, सरकारचा दृष्टीकोण, एल आय सी अ‍ॅक्ट हे शिकवतात. त्यातच एजंट्सची जबाबदारी सांगतात. एजंट्सने ही सर्व माहिती संभाव्य विमाधारकाला देणे अपेक्षित असते.

हे ट्रेनिंग करून आल्यावर डीओ सांगतो कि हे फक्त परीक्षेपुरतं होतं. ग्राहकाला जास्त अक्कल द्यायची नाही. ज्यात कमिशन जास्त आहे तेच प्लान विकायचे. कंपनीने युलिपचे टार्गेट दिले आहे म्हणून ती पण एक विकायची. जास्त भानगडीत पडायचे नाही. त्यात कमिशन एक टक्का आहे. मग तो प्रोफेशनल ट्रेनिंग ला पाठवतो. ज्यात भीक मागायला सुद्धा शिकवतात. भीक मागता आली पाहीजे त्या पद्धतीने पॉलिसी विकायची असे शिकवतात.

विम्याचं मुख्य उद्दीष्ट आहे कि आत्ता क्ष व्यक्ती जर एक लाख रूपये कमावत असेल तर तिच्या डेथनंतर फॅमिलीला एक लाख नाही तर किमान रिस्पेक्टेबल टोटल दरमहा मिळायला हवी. हे जज्जमेंट ती व्यक्ती ठरवू शकते. एक लाख उत्पन्न अचानक बंद झालं तर किमान ८० हजार कि पन्नास हजार हे हप्त्यावर ठरतं.

एल आय सी आणि सरकारी बँका यांना टेक होम सॅलरीचा रूल असतो. म्हणजे हप्ता गेल्यावर त्याच्या घरी एकूण कमाईच्या किती टक्के पगार गेलाच पाहीजे हा रूल असतो, त्याप्रमाणे त्याला विमा मिळतो. जास्त रकमेचा हप्ता पास होत नाही. अर्थात डीओ जर प्रभावी असेल तर तो राय्टर्सला पटवून पास करवून घेतो.

दुसरा राजमार्ग म्हणजे
क्ष व्यक्ती आज जी रक्कम कमावते त्यात घरखर्च आणि भविष्यातले वाढते खर्च यासाठी जी रक्कम लागते तीच तिच्या डेथनंतर मिळेल इतकी तजवीज करणे.

विमा हा हाच आहे.यात गुंतवणूक मिसळली कि हप्ते कायच्या काय येतात.

बॅंक आधीपासून च होत्या, पोस्टल गुंतवणूक एलआयसी च्या आधीपासून आहे. अजूनही बॅंकेपेक्षा एलआयसी शाखा कमी आहेत.
तुम्ही जे म्हणताय, हे तर खाजगी आयुर्विमा कंपनी साठीही लागु आहे. तिथे तो बदल करावा.
मी पुन्हा एकदा तोच पुन्ऊच्चार करते, या पेक्षा चांगले परतावे मिळत असतीलच. पण सगळ्यांना तशी गुंतवणूक करणे जमते असे नाही. त्यामुळे हा मार्गच नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही, म्हणून काही उपयोग नाही. कारण हे हळुहळू सर्वांना कळेल, आणि मग नंतर विमा कंपन्या फक्त टर्म प्लान देतील. आत्ताच लगेच होणार नाही.

आता लॉजिकल एक्स्प्लेनेशन, तर एण्डॉवमेंट ही अगदी किमान पन्नास हजार विमा रक्कम पासून घेता येते. त्याला काही वय आणि विमा रक्कम च्या अटी आहेत. त्यामुळे काही वेळा आयटीआर शिवाय या घेता येतात.
जर टर्म प्लान आयटीआर शिवाय दिला तर आयुष्याला धोका असू शकतो. मोठा मृत्यू दावा आणि कमी हप्ता.
त्यामुळे उत्पन्न सिद्ध करावेच लागेल.

यात डिओ काही करु शकत नाही. अंडररायटरचा निर्णय शेवट.
विमा एकुण उत्पन्नावर मिळतो, टेक होमवर नाही.

हो वाचले की, बॅंकेत खाते काढणे हे पॉलिसी काढण्यापेक्षा कायमच सोपे होते आणि असणारच. त्यामुळे बॅंक नव्हती म्हणून एलआयसी होती हे चूक आहे.

सुन्या तुम्हाला दिसत नाही का वाचता येत नाही?---तुम्हाला दिसत नाही की वाचता येत नाही की दोन्ही येऊन समजून घ्यायचे नाही :Dतुम्ही दिलेल्या उदाहरण मधे पूर्ण हफ्ते किती रकमेचे भरले हे लिहून फरक दाखवला आहे ना तर मग दोन्ही २० किंव २५ पाहिजे की सोयीनुसार

<< टर्म इन्शुरन्स २५ वर्ष आणि दुसरा २० वर्ष घेऊन आकडेवारी देतात. >>
इथे पण ताईंनी चलाखी केली आहेच. एका विम्याची रक्कम १ कोटी आणि दुसऱ्या विम्याची रक्कम २० लाख अशी वेगळी घेतली आहे.

१. वय ३५ टर्म प्लॅन, १ करोड विमारक्कम, मुदत २५ वर्षे - हप्ता दर वर्षी ३२,४६८/

२. वय ३५ -, २० लाख विमा रक्कम, मुदत २५ वर्षे, हप्ता पाहिल्यावर्षी १,००,०००/-. दुसऱ्या वर्षांपासून ९७,८६२/-

दुसऱ्या उदाहरणात विम्याची रक्कम ५ पट करू. म्हणजे १ कोटी विमा रक्कम, हप्ता पहिल्यावर्षी ५,००,०००/-. दुसऱ्या वर्षांपासून ४,८९,३१०/-
मुदतीअखेर देणार २६,००,०००

आता प्रीमियमच्या फरकाची रक्कम बघूया.
पहिल्यावर्षी ४,६७,५३२ आणि पुढे दरवर्षी ४,५६,८४२ अशी २४ वर्षे.
आता ही रक्कम गुंतवली तर कशात जास्त फायदा होईल, ते सांगा सुहृद तै. (विमा संरक्षण तर दोन्ही बाबतीत १ करोड म्हणजे सारखेच आहे.)

१०% रिटर्न= ४९,५३७,७९७
९% रिटर्न = ४२,२६९,६५०
८% रिटर्न = ३६,१४२,९०३

उ बो काहीही काय लिहीताय,... मी मृत्यू दावा दिला आहे त्यात
मुदती मध्ये जर मृत्यू झाला तर..
जर 20 लाखाच्या पॉलिसी ला
मृत्यू झाल्यावर लगेच 40 लाख,
तिथून पुढे दर वर्षी 2 लाख, पुढची 24 वर्षे
आणि पंचविसाव्या वर्षी 52 लाख अशी रक्कम मिळते आहे.
एकूण मृत्यू लाभ 1 कोटी चाळीस लाख होतोय.

यात फक्त मृत्यू चे वर्ष बदलले तर दर वर्षी मिळणार्या दोन लाखाची वर्षे कमी होतील.

म्हणूनच त्याला विमा रक्कम 20 लाख घेतली आहे. एकूण विमा संरक्षण खूप जास्त आहे, हे सर्व विमा संरक्षण बॉंड पेपर वर लिहून येईल.

मुदतीअखेर 52 लाख मॅच्युरिटी मिळेल.
तुम्ही म्हणतात तसे रिटर्न्स.

उ बो, तु्मही सांगितलेल्या प्रकरणात एक कोटी विमा रक्कम जर केली तर
मृत्यू झाल्यावर लगेच 2 कोटी
तिथून पुढे दर वर्षी 10 लाख, पुढची 24 वर्षे
आणि पंचविसाव्या वर्षी 2.5 कोटी अशी रक्कम मिळते आहे.
एकूण मृत्यू लाभ 6 कोटी 90 लाख होतोय

जर मृत्यू झाला नाही तर 2.5 कोटी मॅच्युरिटी आहे.

6 कोटी 90 लाख >> १ कोटीच्या पॉलिसीला ६.९ कोटी payout? too good to be true. पॉलिसी बाईंडर/certificate of insurance दाखवाल का?

मृत्यू झाला नाही तर 2.5 कोटी मॅच्युरिटी >> इथे इन्शुरन्स कंपनी निर्विवादपणे मार खाते.

मला खोटे बोलायची गरज नाही, मला माहिती आहे.
जर 6 कोटी साठी लागणार्या टर्म इन्सुरन्स चा प्रिमियम वजा केला तर जवळ जवळ 9 ते 10 टक्के परतावा दिसतो.
एक कोटी आणि वीस लाख वाले उदाहरण बघा.
टर्म प्लान साठी भरला जाणारा एकूण हप्ता 8.11 लाख
एनडॉमेंट साठी भरला जाणारा हप्ता 23.40 लाख
फरक 13.50 लाख, परतावा 52 लाख
काढा परतावा..
अत्युत्तम नसेल पण वाईट नक्कीच नाही.

क्लायंट चा डेथ क्लेम चा फोटो दाखवू शकते, नाव व इतर डिटेल्स लपवून. पण सो मी वर नाही.

म्हणूनच माझे म्हणणे आहे, आर्थिक साक्षर असलेल्यांना ही सर्व गोष्टी नेमक्या ठाउक असतील असे नाही, त्यामुळे इतरेजनांची बात अजून लांब. बदल घडतील हे खर आहे पण हातघाईवर येउन नाही.
आर्थिक बेजबाबदार लोकांकडे लक्ष न देउन चालणार नाही, त्यांना समजतील असे पर्याय अजूनतरी ठेवावे लागतीलच, तुम्हाला पटो वा न पटो.

<आर्थिक बेजबाबदार लोकांकडे लक्ष न देउन चालणार नाही, त्यांना समजतील असे पर्याय अजूनतरी ठेवावे लागतीलच, तुम्हाला पटो वा न पटो.>
आर्थिक बेजबाबदार लोक हेच आपले खरे कुरण आहे. त्यांच्यावरच व्यवस्थित लक्ष द्यावं.

डेथ क्लेम मध्ये ताईंनी अपघाती मृत्यूचे पैसे पण पकडले आहेत
अपघाती मृत्यू हे रायडर तुम्ही घेऊ शकता खूपच कमी हप्त्या मध्ये
हे अशीच आकडेवारी दाखवतात सरळ सरळ कधीच नाही

भाउ, दोन्हीत आहे,
फक्त टर्म ला फक्त अपघाती मृत्यू, ला क्लेम असतो.
पण एन्डोमेंट ला अपघाती मृत्यू आणि अपंगत्वाचा असे दोन्ही दावे मिळतात.

एक कोटी आणि वीस लाख वाले उदाहरण बघा. >>
तुलना करताना समान वय, समान विमा रक्कम आणि समान कालावधी वापरून तुलना करायची असते.

मला माहिती आहे. >>
मान्य आहे, पण माहिती चुकीची आहे इतकंच म्हणायचं आहे.

उ बो, मृत्यू दाव्याची रक्कम बघा, मग कळेल. वेगवेगळी विमा रक्कम का घेतली आहे.
तुम्ही आंधळेपणा करत आहात. मी केलेले पोस्ट्स पूर्ण पणे खर्या आहेत कारण मी असे काही क्लेम पूर्ण केले आहेत. मला योग्य माहिती नाही हे तुमचे म्हणणे खोटे आहे.

भाउ ते किंवा असते. अपंगत्वाचे लाभ एका वरच्या पोस्ट मध्ये लिहीला आहे बहुदा.

>>Submitted by सुहृद on 19 October, 2023 - 20:52>>
सॉरी, पण मला काहीतरी गडबड वाटतेय.
हे असे असायला हवे ना? - डेथ बेनिफिट = २० लाख पॉलिसी + २० लाख अ‍ॅक्सिडेंट राईडर + दर वर्षीचा बोनस हा ती व्यक्ती जिवंत होती तितक्या वर्षांचा. समजा २५ वर्षाच्या पॉलिसीच्या एक वर्ष आधी , म्हणजे २४ वर्षांनी मृत्यू झाला तर २०+२०+४८ = ८८ लाख. त्यात अजून मॅच्युरिटीचे ५२ लाख यात येणार नाहीत. कारण पॉलिसी मॅच्युअर होण्याआधी व्यक्ती गेली.
किंवा
मृत्यू झाला नाही , पॉलिसी मॅच्युअर झाली तर बोनस वगैरे सगळे मिळून ५२ लाख.

विमा हप्ते आणि मॅच्युरीटी, डेथ बेनिफिट्स याला टॅक्स बेनिफिट मिळत असेल ना?
असो. एकंदरीत याकडे विमा + टॅक्स बेनिफिटवाले साधे कॅश सेविंग म्हणून बघता येइल. अर्थ साक्षर नसल्यास, कुठेतरी फसवणूक होवून कुटुंब अगदीच निराधार होण्यापेक्षा हे बरे.

स्वाती ते असे आहे,
1) 20 लाख + 20 लाख मृत्यू नंतर लगेच
2) 10 % ऑफ विमा रक्कम (S A) every policy anniversary till date of maturity.
3) At time of maturity basic SA + Bonus And Final Additional Bonus. Even for death claim
This is death claim. Amount goes to nominee.

Maturity claim will be S A + Bonus + Final Additional Bonus.

छान चर्चा सुरू आहे.
exit penalty वरही माहिती असणे गरजेचे आहे.
'अ' ने दरवर्षी १ लाख रुपये एस आय पी + टर्म इन्शुरन्स घेतला, 'ब' ने साधारण तितक्याच एकूण प्रिमियम चा एन्डोमेंट प्लॅन घेतला. आता पाच वर्षानी दोघानीही प्लॅन बंद केला तर 'अ' ला टर्म प्रिमियम वर पाणी सोडावे लागेल पण एस आय पी मधले पैसे सगळे मिळतील. 'ब' चे प्रचंड नुकसान होईल.

हे थोडेसे अमेरिकेतील क्रेडिट कार्ड सारखे असावे. आमच्यासारखे लोक क्रेडित कार्ड चे बिल वेळच्या वेळी भरतात, त्यामुळे व्याज /दंड भरावा लागत नाही. पण आमच्यामुळे क्रेडित कार्ड कंपनीचा फायदा होत नाही. जे लोक मिनिमम पेमेंट करतात त्याच्याकडूनच व्याज मिळते.

Pages