काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?
पंढरपूर वारी विषयी खोलात जाऊन बघितलं असता, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांनी अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जायला सुरुवात केली. तुकारामांच्या देहवासानंतर त्यांचे वंशज नारायणबाबा ह्यांनी त्यांच्या पादुका पालखीतून न्यायला सुरुवात केली. १८२० मध्ये हैबतराव ह्या सरदारांनी पालखीतून पादुका नेवून त्याला वारी / दिंडी स्वरूप दिले. त्यानंतर त्याचे आताचे वारीचे विराट स्वरूप दिसते ज्यात कित्येक लाख लोक चालतात.
गणपतीचा उल्लेख वेदकालीन साहित्यातही आढळतो पण गणेश चतुर्थी कधी पासून आणि कुणी पहिल्यांदा साजरी केली ह्याचा उल्लेख मिळत नाही.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.
नंतर ब्रिटिश राज आले तेव्हा त्यात खंड पडला. लोकं गणेश चतुर्थी आपापल्या घरी करू लागले.
परंतु लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव (आणि शिवजयंती उत्सव ) सुरु केले.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे बदलत गेलेले स्वरूप तर सर्वाना परिचित आहेच. कदाचित गावांमध्ये अजूनही त्याचे सार्वजनिक रूप अक्राळ विक्राळ झाले नसावे जेव्हढे शहरात झालेले आढळते.
पूर्वी (वीसेक वर्षांपूर्वी किंवा कित्येक अंशी आजही ) गावांमधून केले जाणारे उत्सव सर्व गावाला एकत्र आणणारे होते किंवा आहेत, सर्वांचा सहभाग असल्यामुळे सहाजिकच ते निरुपद्रवी व आनंददायी होतात.
समजायला लागल्यापासून बघतेय ते बदलत जाणारे दहीहंडीचे स्वरूप, गणेशोत्सवाचे स्वरूप, हळू हळू नवरात्रीच्या देवीच्या जत्रेपासून तिचे दांडिया-डिस्को दांडियात होणारे रूपांतर. २००० च्या दशकापासून (?) नव्याने सुरु झालेल्या हिंदू नवंवर्ष यात्रा, सार्वजनिक संक्रातीचे हळदीकुंकू समारंभ, मंगळा गौर कार्यक्रम ( बहुदा यंदाच हे चालू झाले असावेत).
ह्यात ते जिथपर्यंत सोसायटी, गल्लीत सगळ्यांच्या हातभराने साजरे केले जातात तेव्हा कदाचित सार्वजनिक उत्सव सुरु करण्यामागील उद्देश सफल होत असावा असे वाटते.
पण जेव्हा त्यात (अ) राजकीय शक्ती उतरतात, मग खंडण्या, वर्गण्या, सेलिब्रिट, त्यांच्या लाखोंच्या बिदाग्या, आपले वर्चस्व प्रस्थापित करायला लावलेले ध्वनिक्षेपक, ज्याच्या नावाने उत्सवाची देणगी मागता त्याला बघवणार, ऐकवणार नाहीत अस ओंगळवाणं, हिडीस नृत्य, गायन-वादन, रस्ते बंद केल्यामुळे होणारी गैरसोय ... ही न संपणारी यादी समोर येते.
आणि मग प्रश्न पडतो की उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करावेत का?
म्हणजे मूळ चांगला उद्देश बाजूला सारून त्याचा आपमतलबासाठी वापर करून त्याचे स्वरूप इतके बिभित्स केले जाते की प्रश्न पडावा मुळात हे सुरूच कधी, कोणी आणि कशासाठी केले. त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.
तुमचे मत काय आहे जरूर लिहा.
तळटीप- मते कितीही विरोधात किंवा न पटणारी असतील तरी असभ्य भाषा वापरू नये. आणि वैयक्तीक पातळीवर घसरू नये.
जे जे वाईट आणि हानीकारक आहे
जे जे वाईट आणि हानीकारक आहे ते कायदे आणि सरकार बंद करू शकले असते तर दारूबंदी केव्हाचीच झाली असती..
>>> दिशाभूल. चुकीची तुलना.
Submitted by लुटुपुटुचा
Submitted by लुटुपुटुचा खेळीया on 6 October, 2023 - 21:15 >> +१
जर अनॉनिमसली लोक तक्रार दाखल
जर अनॉनिमसली लोक तक्रार दाखल करु शकले, तर पोलीसांना कारवाई करावी लागेल, न केल्यास माहीतीच्या अधीकारात या बाबी उघड होउऊन पोलीसांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता कायम रहाते>>> अनोमनस राहू दे, उघड तक्रार केली तरी काही होत नाही
कागदोपत्री गुन्हा दाखल होतो
कित्येक मंडळांच्या कार्यकर्त्यांवर असे गुन्हे दाखल आहेत
त्यात विनापरवाना वीज वापरण्यापासून ते आवाजाचे उल्लंघन, मारामारी, धमक्या, खंडणी पर्यंत सगळं आहे
बहुतांश मंडळाच्या पदाधिकारी हे राजकीय नेते आहेत, ते व्यवस्थित सगळं मॅनेज करतात
पोलीस सुद्धा
शेवटी सगळ्यांनाच जगायचं आहे
Submitted by जाई. on 6
Submitted by जाई. on 6 October, 2023 - 20:53 >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
असंच काही नाही. आज रात्रीपर्यंत टिच्च्चून सबमिशन असल्याने अधून मधून तेव्हढाच श्वास घ्यायला![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बहुतांश मंडळाच्या पदाधिकारी
बहुतांश मंडळाच्या पदाधिकारी हे राजकीय नेते आहेत, ते व्यवस्थित सगळं मॅनेज करतात >>> मग सरसकट ब्लॅंकेट बॅन हाच पर्याय रहातो पण ते होउ शकत नाही कारण त्यात नैसर्गिक न्यायाचे उल्लंघन होते...
एक गोष्ट आहे की पोलीसांच्या नोकरीवर आले तर ते राजकारण्यांच्या दबावालाही जुमानत नाहीत... पर्सनल अनुभवा वरुन सांगत आहे, आणि कुठल्याही तक्रारीवर काहीच होणार नाही हे म्हणणे धाडसाचे ठरेल...सुरवात तर होऊ द्यात आणखी सुधारणा होत जाईल त्यात.. आणि कायद्यांनी काहीच होत नाही हीच धारणा असल्यास इतर कोणत्याही कायदेशीर प्रकरणात प्रत्येकाने सनी देओल बनून स्वतः हिशेब चुकता करण्यास तयारी ठेवावी लागेल...त्या नंतर मात्र तुम्ही कायदे करुच नका हे हक्काने म्हणण्यास पात्र ठराल.
नुसता कायदा करून काहीच उपयोग
नुसता कायदा करून काहीच उपयोग नाही, त्याची अंमलबजावणी व्हायला हवी
>>>>
वर कोणीतरी म्हटले की कायदा करणे कठीण आहे अंमलबजावणी करणे सोपे आहे..
धाग्यावर कोण कशावर काय बोलते काही समजत नाहीये..
प्रत्येक जण आपल्या पोस्टचा सारांश एकत्र लीहेल का...
पण त्यासाठी आधी प्रत्येक
पण त्यासाठी आधी प्रत्येक चौकात बोरिंग हैण्ड पंप बसवायला पाहिजेत म्हणजे कायदा व्यवस्थितपणे हातात घेता येईल
पण त्यासाठी आधी प्रत्येक
पण त्यासाठी आधी प्रत्येक चौकात बोरिंग हैण्ड पंप बसवायला पाहिजेत म्हणजे कायदा व्यवस्थितपणे हातात घेता येईल>>>
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
ध्वनी प्रदुषण ( अधिनियम आणि
ध्वनी प्रदुषण ( अधिनियम आणि नियंत्रण) असा कायदा २००० मध्ये बनलेला आहे .हा कायदा अस्तित्वात आहे.
पाच वर्ष कारावास प्लस दंड अशी शिक्षा ह्या मध्ये आहे.
पण ह्या २३ वर्षात कोणाला ह्या कायद्याने शिक्षा झाल्याचे वाचनात नाही.
केसेस मात्र कोर्टात नक्की असतील.
नक्की काय अडचण येत असेल गुन्हा सिद्ध करायला .. तो विश्व निर्माता जाणे.
प्रतेक राज्याला आवाजाची मर्यादा ठरवण्याचा अधिकार आहे .
आणि वर्षातून १५ दिवस ह्या कायद्यातून सुट देण्याचा पण अधिकार आहे
वाट , पळवाट सर्व काही आहे.
Jivo aur जिने दो
पण ह्या २३ वर्षात कोणाला ह्या
पण ह्या २३ वर्षात कोणाला ह्या कायद्याने शिक्षा झाल्याचे वाचनात नाही. >>> मुंबई चौफेर मधे ?
वर कोणीतरी म्हटले की कायदा करणे कठीण आहे अंमलबजावणी करणे सोपे आहे
Submitted by ऋन्मेऽऽष on 6 October, 2023 - 21:58..>> स्क्रीन शॉट प्लीज..
तो काय आरोप आहे का कोणावर
तो काय आरोप आहे का कोणावर स्क्रीन शॉट द्यायला![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
कोण शोधणार इतक्या पोस्ट
कुठल्या तारेत वाचलं हे तर
कुठल्या तारेत वाचलं हे तर समजेल![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
<< अजुन एक सहज सोपा मार्ग आहे
<< अजुन एक सहज सोपा मार्ग आहे जो सरकार तत्काळ अमलात आणू शकते.
Dj/ डॉल्बी साठी ज्या काही मशीन लागतात.
Speaker,mixer, amplifiers, ह्यांच्या वर खूप मोठ्या प्रमाणात टॅक्स लावणे .
आणि ह्या सर्व वस्तू प्रचंड महाग होतील असे उपाय करणे.
२) ठराविक decibel पेक्षा जास्त आवाज करणाऱ्या speaker निर्मिती ,इम्पोर्ट, साठा,विक्री ह्याला पूर्ण देशात बंदी घालने.
४) ज्या वाहनात ही यंत्रणा बसवली जाते त्या वाहनांना तसे बदल करण्यासाठी प्रचंड मोठी फीस ठेवणे.
हे सरकार सहज करू शकते
आणि हे कृत्य कोणत्या धर्माच्या सणा विरुद्ध आहे अशी बोंब पण कोणाला मारता येणार नाही
Submitted by Hemant 333 on 6 October, 2023 - 10:14 >>
------- "DJ चा त्रास होतो म्हणून तक्रार करणार्यांना विमानाने अफ्रिकेला ( किंवा अंटार्टिकाला
) पाठवायचे.
उगाच हिंदूंचा सण आहे म्हणून टिका करत रहायची याला अर्थ नाही. "
पण त्यासाठी आधी प्रत्येक
पण त्यासाठी आधी प्रत्येक चौकात बोरिंग हैण्ड पंप बसवायला पाहिजेत म्हणजे कायदा व्यवस्थितपणे हातात घेता येईल>>>>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पण त्यासाठी आधी प्रत्येक
पण त्यासाठी आधी प्रत्येक चौकात बोरिंग हैण्ड पंप बसवायला पाहिजेत म्हणजे कायदा व्यवस्थितपणे हातात घेता येईल>>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
याला सर्वोत्तम प्रतिसाद म्हणून घोषित करण्यात यावं अध्यक्ष महोदय
या बोटाची त्या बोटावर
या बोटाची त्या बोटावर करण्याचा प्रकार सोडून देऊ.
एकंदरच धागाकर्तीचा प्रश्न उत्सव सार्वजनिक असावेत कि नाही इतकाच आहे. जगभरात उत्सव सार्वजनिक होतात. पण भारतात वर्षभर काही न काही कारणाने रस्ते बंद राहतात. त्यात सणांची भरमार आहे. त्यामुळे सरकारला साधक वाधक विचार करणे गरजेचे आहे. खूप वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातले देखावे शहरात एकाच ठिकाणी करावेत म्हणजे लोकांनाही पहायला सोयीचे होईल अशी कल्पना पुण्यात निघाली होती असे शाळेत सरांनी सांगितले होते. सारसबागेच्या समोरच्या मैदानावर गणपतींचे देखावे करणार होते. ते प्रत्यक्ष झाले कि नाही हे आता लक्षात नाही. पण हा विचार चांगला होता.
मिरवणूक निघावी पण रस्ते बंद न होता. शक्तीप्रदर्शनापेक्षा भक्तीभाव हाच उद्देश असावा. यात कुणाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा कशी येईल.
आता पुन्हा - इतका साधा विषय असताना तो विनाकारण फाटे फोडत क्लिष्ट झाला आहे.
चोरी करू नये, दुसर्याच्या घरात शिरून गैरवर्तन करू नये हे सांगणे हा प्रबोधनाचा हेतू नसतो. ते संस्कार असतात. ज्यांच्यावर ते नाहीत, अशा सर्वांवर संस्कार करणे हे आपले काम नाही. त्यासाठी पोलीस आहेत. पोलीस त्यांचे काम नीट करतात कि नाही हा आपला विषय नाही. करत नसतील तर कोर्ट आहेत. पुन्हा, एव्हढी सवड असेल तरच. काही लोक चिकाटीने पाठपुरावा करतात. सर्वांना हे शक्य नसते.
कोणत्याही धर्माच्या सार्वजनिक उत्सवात धांगडधिंगा करू नये, दारू पिऊ नये, येणार्या जाणार्यांना त्रास देऊ नये यासाठी प्रबोधनाची काहीच आवश्यकता नाही. कायद्याने हे प्रकार बंद करावेत. जर कायद्याने सुद्धा बंद करता येत नसतील, तर अशांच्या नादाला लागण्यात शहाणपणा नाही.
प्रबोधन यासाठी करतात कि सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप हे धांगडधिंगा असावे कि सांमाजिक उपक्रम हाती घेणे, जनजागृती असावे याबद्दल लोकांचे विचार बदलवणे. उत्सव सार्वजनिक असायला हवा का यासाठी प्रबोधन असावे/ असते. सार्वजनिक उत्सवाचे आता प्रयोजन राहिलेले आहे का याबद्दल जागरूकता होण्यासाठी प्रबोधन असावे.
रस्ता किती अडवलाय, शिवीगाळ होतेय, महिलांची छेडछाड होतेय, मुलींना धक्काबुक्की होतेय, गर्दीचा फायदा घेऊन पाकीट मारले जाते, गर्दी नियंत्रित करण्याच्या नावाखाली कार्यकर्ते वाटेल तसा लाठीचा प्रसाद देऊन मौजमस्ती करताहेत हे पोलीसांचे विषय आहेत. तिथे नागरिकांनी प्रबोधनाने बदल घडवा असे सांगणे हे वेगळ्या नंदनवनात राहण्यासारखे आहे.
यात काही चूक असेल तर तर कृपया निदर्शनास आणून द्यावी. धागा मूळ विषयावर येऊ शकत असल्यास पुढे चालू द्यावा.
कायद्याच्या मर्यादा, संविधानाच्या मर्यादा हा वेगळा विषय आहे. राजकीय इच्छाशक्ती हा ही वेगळा आणि गंभीर विषय आहे. ते उथळपणे एकाच धाग्यावर आणून कायद्याने काही होऊ शकत नाही म्हणून प्रबोधन करा असला अचाट निष्कर्ष वारंवार थोपवणे थांबवूयात. अशांना हेतूपुरस्सर प्रोत्साहन देऊन जे नीट चर्चा करत आहेत त्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये.
( यातल्या सर्वच बाबी मागच्या पानांमधे येऊन गेलेल्या आहेत. ज्या इथे आलेल्या नाहीत त्यासाठी मागचे प्रतिसाद पहावेत).
सार्वजनिक उत्सव.
सार्वजनिक उत्सव.
ह्या मध्ये काय काय येते.
1), सण.( अर्थात च सर्व धर्मीय लोकांचे).
२) लग्न समारंभ ( हल्ली लग्न उत्सव सारखेच च असतात),.
३) सर्व प्रकारच्या जयंत्या , पुण्यतिथी.
४) ३१ फर्स्ट चा उत्सव.
५) सर्व जत्रा,यात्रा,उरूस..
६) धार्मिक यात्रा .( मक्का मदिना,पंढरपूर, )
इत्यादी ,इत्यादी.
ज्या इव्हेंट मध्ये ५० लोकांच्या वर माणसं एकत्र येतात त्यांना उत्सव च म्हणता येईल.
Calendarमध्ये जेवढ्या
Calendarमध्ये जेवढ्या उत्सवाच्या सुट्ट्या आहेत त्या सर्व दिवशी संचार बंदी लावा म्हणावे सरळ. काय कसले ते सर्व उत्सव करा घरच्या घरी साजरे ... लॉक डाउनमध्ये केलेच होते की सर्वानी.
बरं झालं आता उत्सवाची
बरं झालं आता उत्सवाची व्याख्या केली ते. आता सर्वच कमेंट्स उडवून पुन्हा पहिल्या पासून सुरूवात करा. इतका वेळ किटी पार्टी, हळदीकुंकू, सोसायटीची एजीएम यावरच सहाशे कमेंट्स पडल्यात.
वघो बद्दल धन्यवाद.
पुण्यातील साऊंड सिस्टीम
पुण्यातील साऊंड सिस्टीम पुरवणाऱ्या व्यावसायिकांची संघटना आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी आरोप केला आहे की अतिउच्च आवाज आणि घातक लेजर हे पुरवणारे लोकं बाहेरून येतात.
सर्व पक्षीय राजकीय नेते डॉल्बी आणि लेजर lights विरुद्ध जनहित याचिका दाखल करण्याच्या पवित्र्यात.
आता तर मला वाटतेय की माझ्यासारखा कॉमन मॅन डॉल्बी आणि लेजर lights आणतोय आणि सगळे नियम तोडतो की काय.
आता कुठे फुगडीच्या स्वतः
आता कुठे फुगडीच्या स्वतः भोवती सात प्रदक्षीणा पूर्ण झाल्या.
आता फुगडी स्वतः भोवती फिरते तशी दुसऱ्या एका केंद्राभोवती भोवतीही फिरते हे सार्वजनीक उत्सवाची व्याख्या आल्याने सूज्ञांच्या लक्षात आले असेलच आणि हे केंद्र बदलत असतात, कधी अमुक फटकेबाज तर कधी तमुक. त्यानुसार फुगडीचा अक्ष कधी या केंद्राकडे तर कधी त्या केंद्राकडे कललेला असतो. त्यामुळे कवींनी तिला "तिरक्या तिरक्या गं गिरकीची" असे म्हटले आहे, यालाच शास्त्रीय भाषेत परांचन असेही म्हणतात. आधी प्रतिसाद वाचुन त्यावर फटकेबाजी झाली की एक परांचन पूर्ण होते.
दुसऱ्या परांचनाची सुरवात शिर्षकाकडे लक्ष जाऊन त्यातील शब्दप्रयोगांची व्याख्या मांडून होते.
अशा तिरक्या गिरक्या घेत असताना कधी कधी लेखातील काही भागाकडे थोडेफार लक्ष जाण्याची शक्यता वाढते.
लेझर (LASER) ची Power तसेच
लेझर (LASER) ची Power तसेच wavelength हे दोन महत्वाचे घटक आहेत. खेळातील लेझर हे visible रेंज मधले असले तरी त्यामुळे धोका आहेच. लोकांच्या आरोग्याशी संबंध आहे, म्हणून एकच standard असायला हवे.
लेझर लाईट खेळ कोण चालवतो? laser safety officer किंवा लेझर तंत्राबद्दल माहिती असणारा तिथे असतो का? लेझर वापराबद्दल केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याची मार्गदर्शक तत्वे असतीलच ना?
उदय धन्यवाद.
उदय धन्यवाद.
धागा भरकटण्याआधी लेझरचे दुष्परिणाम या विषयावर चाललेली होती चर्चा.
ढोल पथक आता अति झालं अणी हसू
ढोल पथक आता अति झालं अणी हसू आलं असे झाले आहे. प्रामाणिक पणे व स्पष्ट पणे सांगायचे झाले तर त्याला टॅलेंट लागत नाही. आपण अर्धातास मिरवणूक पहाताना ढोल ऐकला तरीही डोके दुखते, १०- १२ तास सतत ढोल वाजवणार्यामुलां/मुलींचे, त्यांच्या कानांचे काय होत असेल ? नात्यातली एक मुलगी ढोल पथकात आहे व दोन तीन ठिकाणी ढोल वाजवून आता दवाखान्यात अॅडमिट आहे, आता धोक्याबाहेर आहे. आणी हे कमी होतं म्हणून आता लेसर ! हे जरा अती होतय असं फॅमिली ग्रूप वर लिहिताच नेहेमीचे लोक चवताळले व 'तुम्हाला रमजान चे ढोल, ख्रिस्मस चे लाईट दिसत नाहीत' वगैरे टेप सुरू झाली.
नात्यातल्या एक मुलगी ढोल
नात्यातल्या एक मुलगी ढोल पथकात आहे व दोन तीन ठिकाणी ढोल वाजवून आता दवाखान्यात अॅडमिट आहे
>>>>
ओह. कानाला त्रास झाला का?
ओळखीत आहेत असे ढोल पथकवाले.. हा धोका शेअर करतो
बॅक पेन चा त्रास पण आहेच...
बॅक पेन चा त्रास पण आहेच...
ओह. कानाला त्रास झाला का? >>
ओह. कानाला त्रास झाला का? >> अरेच्चा ! ते दुसरे सर लॉजिकल लिहीत होते ना ? आता तुम्ही पण कोलांट उडी मारलीय का ?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
एक पे कायम रहो ना बाबा.
?
?
=
=
ज्या इव्हेंट मध्ये ५०
ज्या इव्हेंट मध्ये ५० लोकांच्या वर माणसं एकत्र येतात त्यांना उत्सव च म्हणता येईल.
Submitted by Hemant 333 on 7 October, 2023 - 14:58
आणि जर ४९ लोक असतील तर?
Pages