सण सार्वजनिक साजरे करावेत किंवा नाही?

Submitted by छन्दिफन्दि on 15 September, 2023 - 03:22

काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?
पंढरपूर वारी विषयी खोलात जाऊन बघितलं असता, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांनी अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जायला सुरुवात केली. तुकारामांच्या देहवासानंतर त्यांचे वंशज नारायणबाबा ह्यांनी त्यांच्या पादुका पालखीतून न्यायला सुरुवात केली. १८२० मध्ये हैबतराव ह्या सरदारांनी पालखीतून पादुका नेवून त्याला वारी / दिंडी स्वरूप दिले. त्यानंतर त्याचे आताचे वारीचे विराट स्वरूप दिसते ज्यात कित्येक लाख लोक चालतात.
गणपतीचा उल्लेख वेदकालीन साहित्यातही आढळतो पण गणेश चतुर्थी कधी पासून आणि कुणी पहिल्यांदा साजरी केली ह्याचा उल्लेख मिळत नाही.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.
नंतर ब्रिटिश राज आले तेव्हा त्यात खंड पडला. लोकं गणेश चतुर्थी आपापल्या घरी करू लागले.
परंतु लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव (आणि शिवजयंती उत्सव ) सुरु केले.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे बदलत गेलेले स्वरूप तर सर्वाना परिचित आहेच. कदाचित गावांमध्ये अजूनही त्याचे सार्वजनिक रूप अक्राळ विक्राळ झाले नसावे जेव्हढे शहरात झालेले आढळते.
पूर्वी (वीसेक वर्षांपूर्वी किंवा कित्येक अंशी आजही ) गावांमधून केले जाणारे उत्सव सर्व गावाला एकत्र आणणारे होते किंवा आहेत, सर्वांचा सहभाग असल्यामुळे सहाजिकच ते निरुपद्रवी व आनंददायी होतात.
समजायला लागल्यापासून बघतेय ते बदलत जाणारे दहीहंडीचे स्वरूप, गणेशोत्सवाचे स्वरूप, हळू हळू नवरात्रीच्या देवीच्या जत्रेपासून तिचे दांडिया-डिस्को दांडियात होणारे रूपांतर. २००० च्या दशकापासून (?) नव्याने सुरु झालेल्या हिंदू नवंवर्ष यात्रा, सार्वजनिक संक्रातीचे हळदीकुंकू समारंभ, मंगळा गौर कार्यक्रम ( बहुदा यंदाच हे चालू झाले असावेत).
ह्यात ते जिथपर्यंत सोसायटी, गल्लीत सगळ्यांच्या हातभराने साजरे केले जातात तेव्हा कदाचित सार्वजनिक उत्सव सुरु करण्यामागील उद्देश सफल होत असावा असे वाटते.
पण जेव्हा त्यात (अ) राजकीय शक्ती उतरतात, मग खंडण्या, वर्गण्या, सेलिब्रिट, त्यांच्या लाखोंच्या बिदाग्या, आपले वर्चस्व प्रस्थापित करायला लावलेले ध्वनिक्षेपक, ज्याच्या नावाने उत्सवाची देणगी मागता त्याला बघवणार, ऐकवणार नाहीत अस ओंगळवाणं, हिडीस नृत्य, गायन-वादन, रस्ते बंद केल्यामुळे होणारी गैरसोय ... ही न संपणारी यादी समोर येते.
आणि मग प्रश्न पडतो की उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करावेत का?
म्हणजे मूळ चांगला उद्देश बाजूला सारून त्याचा आपमतलबासाठी वापर करून त्याचे स्वरूप इतके बिभित्स केले जाते की प्रश्न पडावा मुळात हे सुरूच कधी, कोणी आणि कशासाठी केले. त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.

तुमचे मत काय आहे जरूर लिहा.

तळटीप- मते कितीही विरोधात किंवा न पटणारी असतील तरी असभ्य भाषा वापरू नये. आणि वैयक्तीक पातळीवर घसरू नये.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विमानं कानाजवळून जातात पण अद्याप कुणी बहीरे झाल्याचे ऐकिवात नाही. आमच्या सोसायटीच्या आवारात पूर्वीच्या एअर इंडीयाची विमाने उतरायची. सहाराची विमाने शेजारच्या. विमानतळाचा शोध लागला तर हा आवाज तिकडे जाईल. शिवाय विमान आहे म्हटल्यावर हवेतून उडवायला हवे. ते रस्त्यावरून नेतात.

काही गरजेच्या नाहीत करोड वर्ष ह्या सेवा नव्हत्या तरी लोक मस्त जगत् होती.
आता दोनशे वर्ष झालीत फक्त ह्या सेवा आहेत.

>>>> Biggrin जावा मग जंगलात रेल्वे आणि विमानाच्या गोंगाटापासून दूर, फक्त गरजेच्या सेवा, लेझर आणि डॉल्बी घेऊन...

अँटी बायोटिक अजिबात गरजेचे औषध नाहीये लोक मस्त जगत होती.
अजून काय काय आहे लोकहो ज्याआधी लोक मस्त जगत होते ?

हिरव्या पानावर पोस्टी लिहून घरोघरी जाऊन वाचून दाखवायच्या. हाकानाका.
फक्त लोकांनी लपून बसायला नको.

जावा मग जंगलात रेल्वे आणि विमानाच्या गोंगाटापासून दूर, फक्त गरजेच्या सेवा, लेझर आणि डॉल्बी घेऊन...

मग गणपती उस्ताव मध्ये सर्व पुरोगामी लोकांना सरकार नी जायचं खर्च देवून आफ्रिकेच्या वाळवंटात पाठवून द्यावे.
असे पण हे अल्प संख्यांक आहेत.
व्यवहारी दृष्टी नी परवडेल.
आणि त्यांना अशांतता नको असेल तर तिकडेच राहावे..यायचे असेल तर स्व खर्चाने यावे

मग गणपती उस्ताव मध्ये सर्व पुरोगामी लोकांना सरकार नी जायचं खर्च देवून आफ्रिकेच्या वाळवंटात पाठवून द्यावे.
>>>
रेल्वे आणि विमान गरजेच्या सार्वजनिक सेवा नाहित असे वाटणाऱ्या माणसालाच असल्या पोरकट स्किमा सुचणार Biggrin

कॉम्प्युटर आणि सेल फोन. Wink
हे सर्व नकारा.
Dj गणपती उस्तावं मध्ये वाजत नव्हता तो पर्यंत मागे जा.
आणि त्या नंतर चे सर्व नाकरा.
कडवा विरोध करा आम्ही पण तुमच्या मागे आहे .
फक्त स्वार्थ साठी एकच गोष्टी ला विरोध नको,द्वेष व्यक्त करण्यासाठी तर बिलकुल नको

ल्वे आणि विमान गरजेच्या सार्वजनिक सेवा नाहित असे वाटणाऱ्या माणसालाच असल्या पोरकट स्किमा सुचणार

ऑफर स्वीकारा आफ्रिका वाळवंट.
हिंदू ची अलर्जी आहे ना
आम्ही सर्व वर्गणी काढून खर्च करू

हेमंत सर, तुम्ही मधे शुद्ध लिहीत होते. पुन्हा काय झाले ?
आता पूर्वीचेच ते हा आयडी चालवतात का ?

डीजे हा हिंदूंचा एकविसाव्या शतकातल्या नवा देव आहे.
बदल होतात हा निसर्ग नियम आहे.
बदल मग सर्व च गोष्टी मध्ये होतात.
सनई जावून आता डॉल्बी आला हे पण नैसर्गिक आहे जसे बैलगाडी जावून मोटर गाड्या आल्या.
आधुनिक आरोग्य सुविधा आल्या त्या बरोबर ..फालतू लाईफ स्टाईल पण आली
तरुण पनी च लोक विविध रोगाचे बळी पडू लागले.
हे सर्व नको असेल तर .
काळ माग फिरवा .
हाच उपाय आहे.

बाकी सर्व वायू, पाणी,हवा प्रदूषण चालते पण गणेश उस्त्वत मध्ये वाजणारा डॉल्बी चालत नाही.
हा विरोधाभास आहे ना.
विरोध प्रामाणिक असेल तर सर्व च गोष्टी ल असायला हवा

सरांनी लॉजिकला सोडचिठ्ठी देऊन जे काही तांडव सुरु केले आहे, ते विलोभनीय आहे.....

त्या दुसऱ्या दारुबंदी वाल्या सरांना हे दाखवयाला पाहिजे....की दारु न पिताही लोकं ताळतंत्र सोडून बरळू शकतात Happy

हेमंत सरांना इथले आयडी चांगलेच घाबरून आहेत असं दिसतंय. ज्याप्रमाणे ते समोरच्या व्यक्तीला टोलवत सुटतात ते बघून वीरेंद्र सेहवाग आठवतो.>>> @Hemant 333 तुम्ही हा @बोकलत यांचा दुसऱ्या धाग्यावरील अभिप्राय पाहून फुलून जाऊन तर हे रुप धारण केले नाही आहे ना?? बोकलतांपासून सावध रहा हो.. Lol

किती भयंकर विमानाचा आणि रेल्वे च्या हॉर्न चा आवाज येतो.
त्या पेक्षा dj परवडला
>> बरोबर.. म्हणून दोन पेग मारून बाहेर पडावे.. डीजे चा आवाज आवडायला लागतो...

काल रात्री रस्त्याने DJ लावून नाचत काही पोरं चालली होती.
मी त्यांना इथल्या पोस्ट लाईव्ह दाखवू लागलो. त्यांची हसुन हसून पुरेवाट झाली , पुढली काय पोस्ट येते त्याची उत्सुकतेने वाट पहात असताना त्यांनी लिंक त्यांच्या इतर मित्रांना शेअर केली. मला म्हणाले इतकी करमणूक होते हे माहीतच नव्हते, डीजेची काय गरज! बघता बघता शहरभरतील DJ बंद झाले.

सर्व माबोकरांना होळीच्या शुभेच्छा !
आज आम्ही रस्त्यात रंगीत पाण्याचा ड्रम घेऊन थांबणार आहोत. येणार्‍या जाणार्‍या वाहनचालकाच्या अंगावर पिचकार्‍या मारणार आहोत. डीजे पण लावणार आणि लेझर पण. गरीबांच्या गौतमी पाटीलचा डान्स ठेवणार आहे. त्यासाठी दुकानदारांकडून "ऐच्छिक" वर्गणी पण गोळा करणार आहोत.

<< Priyanka गांधी नी इस्कॉन वाले गो वंश विकतात असा आरोप केला आहे.
कोण आहेत त्यानं माहिती देणारे.
इस्कॉन ला प्रचंड फंड हिंदू धर्मीय देतात.
गो वंश विकून पैसे कमावण्याचे त्यांना काहीच कारण नाही
Submitted by Hemant 333 on 1 October, 2023 - 10:14 >>

----- (गो) मांसाचा व्यावहार करणारे देशातले ५-१० मोठे व्यावसायिक कोण आहेत?
नाव अल कबिर Exports Pvt. Ltd. ( तेलंगाणा) असेल पण व्यावसाय कोणाच्या मालकीचा आहे? ५०-५० % पार्टनरशिप आहे , एक नाव सतिश सब्रिवाल आहे. पहिल्या दहा मोठ्या नांवात अनेक नावे हिंदूंचीच आहेत ( व्यावसायाचे नाव भले अल*** असे काहीसे दिशाभूल करणारे असेल) , तिथे काम करणारे पण अनेक हिंदू आहेत.
https://economictimes.indiatimes.com/the-growth-of-al-kabeer/articleshow...

<< डीजे हा हिंदूंचा एकविसाव्या शतकातल्या नवा देव आहे.
बदल होतात हा निसर्ग नियम आहे.
बदल मग सर्व च गोष्टी मध्ये होतात.
सनई जावून आता डॉल्बी आला हे पण नैसर्गिक आहे जसे बैलगाडी जावून मोटर गाड्या आल्या.
आधुनिक आरोग्य सुविधा आल्या त्या बरोबर ..फालतू लाईफ स्टाईल पण आली
तरुण पनी च लोक विविध रोगाचे बळी पडू लागले.
हे सर्व नको असेल तर .
काळ माग फिरवा .
हाच उपाय आहे.
बाकी सर्व वायू, पाणी,हवा प्रदूषण चालते पण गणेश उस्त्वत मध्ये वाजणारा डॉल्बी चालत नाही.
हा विरोधाभास आहे ना.
विरोध प्रामाणिक असेल तर सर्व च गोष्टी ल असायला हवा
Submitted by Hemant 333 on 1 October, 2023 - 12:23. >>

-------- विरोध प्रामाणिक आहे / नाही हे कसे ठरवणार? "फालतू लाईफ स्टाईल " मुळे तरुण लोक विविध रोगांचे बळी पडत असतील तर DJ एकून ते रोग दूर पळतील का? २ -४ % लोकही या मिरवणूकीत नसतात, पण ९८ -९६ % लोकांना नाहक त्रास.

एका प्रमाणा नंतर कुठलेही ( ध्वनी, हवा , पाणी... ) प्रदूषण मनुष्याला घातक आहे.... जिथे शक्य आहे तिथे त्यावर नियंयत्रण ठेवणे आवश्यक आहे , तसा प्रयत्न होणे आवश्यक आहे.

मायबोलीवर काही लोक जर म्हणत असतील कि हे ३०२३ साल चालू आहे तर आपण खळखळ न करता मान्य केले पाहीजे. ते जर म्हणाले कि पुरूषाच्या पोटात नऊ महीने बाळ असते तर आपणही हो म्हटले पाहीजे. ते म्हणाले कि जान्हवी सर्वात सुंदर अभिनेत्री आहे तर आक्षेप घेऊ नये.

एव्हढे केले कि माबोजीवन सुखकर होते.

नक्की गो मांसाचा व्यवहार करतय का अल कबीर? बऱ्याच राज्यात गौ हत्येला परवानगी नाही. अल कबीर च मुख्यालय आहे त्या राज्यातही गो हत्येला परवानगी नाही.

DJ हा प्रकार भयंकर आहे त्या वर बंधन हवं, अशी काही बंधन घालून ustav खूप जोरात साजरे करता येतील.
तरुण पिढी नी सहभागी व्हावे म्हणून dj हा प्रकार आला.
दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने तरुण पिढी चा सहभाग वाढवता येईल.
पण ustav साजरे च करू नका हे मत अयोग्य.
माणूस हा समाज प्रिय प्राणी आहे ह्याचा विसर पडून देवू नका.

Submitted by Hemant 333 on 15 September, 2023 - 19:00

१५ दिवसांत त्यांना डीजेचा आवाज कानावरून मोरपीस फिरल्यासारखा मंदमधुर वाटू लागला. गणेशोत्सवात प्रसाद म्हणून नक्की काय खात होते?

दोन व्यक्ती असाव्यात. आलटून पालटून लिहीत असाव्यात.
त्यांना कुणीतरी सांगायला हवं कि मायबोलीवर प्रत्येकाला किमान एक तरी स्वतंत्र आयडी मिळतोच.

खाली दिलेली कविता मला व्हॉट्स ॲप वर आली. इथल्या चर्चेचे सार कुणीतरी लिहलय असे वाटले म्हणून शेअर करतेय. अज्ञात कवीला सलाम!

काल रात्री गणपती बाप्पा
होता टिळकांशी भांडत,
आपल्या अडचणींची कैफियत
होता पोटतिडकीने मांडत ||

देवघरातून तू मला
बाहेर का आणलंस ?
तुमच्या लाडक्या देवाचं कौतुक
कशाला चार-चौघात मांडलंस ?

गायलास तू सुरुवातीला
ताल-सुरात आरत्या,
केलीस साधी फुलांची आरास
भोवती रंगीत बत्त्या.

खूप मस्त छान असायचं
आनंद वाटायचा येण्यात,
सुख-शांती-समाधान मिळे
चैतन्य तुला देण्यात.

दहा दिवस उत्सवाचे म्हणजे
असे, दिव्यत्वाची रंगत...
काल रात्री गणपती बाप्पा
होता, टिळकांशी भांडत ||

पूर्वी प्रवचन, कीर्तन, गायनाने
मंगलमयी वाटायचे,
प्रबोधक, उद्बोधक भाषणांनी
विचार उंची गाठायचे.

आत्ता सारखा हिडीसपणा
मुळीच नव्हता तेव्हा,
शांताबाईच्याच नावाचा
आता अखंड धावा.

पीतांबर, शेला, मुकुट
हे माझे खरे रुप,
शर्ट, पँट, टोपी, पागोटे
धिगाण्याला फक्त हुरूप.

शाडूची माती... नैसर्गिक रंग
गायब आता झाले कुठे ?
लायटिंग केलेल्या देखाव्याने
मला दरदरून घाम फुटे !

श्रध्दा, भक्तीभाव, आदर मनीचा
गेला ना रे सांडत...
काल रात्री गणपती बाप्पा
होता, टिळकांशी भांडत ||

माणसां-माणसांनी एकत्र यावे
एकमेकांना समजुन घ्यावे,
देव-घेव विचारांची करतांना
सारे कसे एक व्हावे.

जातीभेद नसावा...
बंधुभाव असावा,
सहिष्णुतेच्या विचारांनी
नवा गाव वसावा.

मनातला विचार तुझ्या
खरंच होता मोठा,
पण, आज मात्र खऱ्या विचारांनाच
बघ मिळालाय फाटा.

पूर्वी विचारांबरोबर असायची
खाण्यापिण्याचीही रेलचेल,
आता मात्र देखाव्यांमागे
दडलेला असतो काळा खेळ.

पूर्वी बदल म्हणून असायचे
पोहे-चिवडा-चहा-काॅफी...
साग्रसंगीत जेवणा सोबत
लाडू-मोदक-पेढे-बर्फी.

आता, रात्री भरले जातात
पडद्यामागे, मद्याचे पेले
डी. जे. वर नाचत असतात
माजलेले दादांचे चेले.

नको पडूस तू असल्या फंदात
तेव्हाच मी होतो सांगत...
काल रात्री गणपती बाप्पा
होते, टिळकांशी भांडत ||

कशासाठी उत्सव असा
सांग ना रे बांधलास ?
देवघरातून गल्लोगल्ली
डाव माझा मांडलास !

दहा दिवस कानठळ्यांनी
होतो मला आजार,
व्यवहारी दुनिया इथली,
इथे चालतो लाखोंचा बाजार.

रितीरिवाज, आदर-सत्कार,
मांगल्याचा नाही पत्ता,
देवघरा ऐवजी माझा
रस्त्यावरती सजतो कट्टा.

जुगार-दारु-सट्टा-मट्टा -
अनैतिकतेला येतो ऊत,
देवा ऐवजी दैत्याचेच मग
मानेवरती चढते भूत.

सामाजिक बाजू सोडून सुटतो
राजकारणालाच इथे पेव,
गौरी-गणपती सण म्हणजे -
गैरव्यवहाराची ठेव-रेव.

नको रे बाबा, नको मला हा
मोठेपणाचा तुझा उत्सव,
मला आपले तू माझ्या जागी
परत एकदा नेऊन बसव.

कर बाबा कर माझी सुटका
नको मला ह्यांची संगत...
काल रात्री गणपती बाप्पा
होता, टिळकांशी भांडत ||

आपल्या अडचणींची कैफियत
होता पोटतिडकीने मांडत,
काल रात्री गणपती बाप्पा
होता, टिळकांशी भांडत ||

काल रात्री गणपती बाप्पा
होता टिळकांशी भांडत,
आपल्या अडचणींची कैफियत
होता पोटतिडकीने मांडत ||

देवघरातून तू मला
बाहेर का आणलंस ?
तुमच्या लाडक्या देवाचं कौतुक
कशाला चार-चौघात मांडलंस ?>>>
धागाकरतीच्या मते हा संवाद गणपती आणि शिवाजी महाराजांच्या मध्ये व्हायला हवा. उत्सव महाराजांनी सुरू केला ना.

आता ताई गरबा - दांडिया उत्सव व त्या चे तरुणा ई वर दुष्परिणा म असा धागा येउद्या. जिओ गार्डन मध्यी पण दांडिया आहे. आम्रविकेत काय परिस्थिती ते लिहा.

Pages