सण सार्वजनिक साजरे करावेत किंवा नाही?

Submitted by छन्दिफन्दि on 15 September, 2023 - 03:22

काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?
पंढरपूर वारी विषयी खोलात जाऊन बघितलं असता, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांनी अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जायला सुरुवात केली. तुकारामांच्या देहवासानंतर त्यांचे वंशज नारायणबाबा ह्यांनी त्यांच्या पादुका पालखीतून न्यायला सुरुवात केली. १८२० मध्ये हैबतराव ह्या सरदारांनी पालखीतून पादुका नेवून त्याला वारी / दिंडी स्वरूप दिले. त्यानंतर त्याचे आताचे वारीचे विराट स्वरूप दिसते ज्यात कित्येक लाख लोक चालतात.
गणपतीचा उल्लेख वेदकालीन साहित्यातही आढळतो पण गणेश चतुर्थी कधी पासून आणि कुणी पहिल्यांदा साजरी केली ह्याचा उल्लेख मिळत नाही.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.
नंतर ब्रिटिश राज आले तेव्हा त्यात खंड पडला. लोकं गणेश चतुर्थी आपापल्या घरी करू लागले.
परंतु लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव (आणि शिवजयंती उत्सव ) सुरु केले.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे बदलत गेलेले स्वरूप तर सर्वाना परिचित आहेच. कदाचित गावांमध्ये अजूनही त्याचे सार्वजनिक रूप अक्राळ विक्राळ झाले नसावे जेव्हढे शहरात झालेले आढळते.
पूर्वी (वीसेक वर्षांपूर्वी किंवा कित्येक अंशी आजही ) गावांमधून केले जाणारे उत्सव सर्व गावाला एकत्र आणणारे होते किंवा आहेत, सर्वांचा सहभाग असल्यामुळे सहाजिकच ते निरुपद्रवी व आनंददायी होतात.
समजायला लागल्यापासून बघतेय ते बदलत जाणारे दहीहंडीचे स्वरूप, गणेशोत्सवाचे स्वरूप, हळू हळू नवरात्रीच्या देवीच्या जत्रेपासून तिचे दांडिया-डिस्को दांडियात होणारे रूपांतर. २००० च्या दशकापासून (?) नव्याने सुरु झालेल्या हिंदू नवंवर्ष यात्रा, सार्वजनिक संक्रातीचे हळदीकुंकू समारंभ, मंगळा गौर कार्यक्रम ( बहुदा यंदाच हे चालू झाले असावेत).
ह्यात ते जिथपर्यंत सोसायटी, गल्लीत सगळ्यांच्या हातभराने साजरे केले जातात तेव्हा कदाचित सार्वजनिक उत्सव सुरु करण्यामागील उद्देश सफल होत असावा असे वाटते.
पण जेव्हा त्यात (अ) राजकीय शक्ती उतरतात, मग खंडण्या, वर्गण्या, सेलिब्रिट, त्यांच्या लाखोंच्या बिदाग्या, आपले वर्चस्व प्रस्थापित करायला लावलेले ध्वनिक्षेपक, ज्याच्या नावाने उत्सवाची देणगी मागता त्याला बघवणार, ऐकवणार नाहीत अस ओंगळवाणं, हिडीस नृत्य, गायन-वादन, रस्ते बंद केल्यामुळे होणारी गैरसोय ... ही न संपणारी यादी समोर येते.
आणि मग प्रश्न पडतो की उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करावेत का?
म्हणजे मूळ चांगला उद्देश बाजूला सारून त्याचा आपमतलबासाठी वापर करून त्याचे स्वरूप इतके बिभित्स केले जाते की प्रश्न पडावा मुळात हे सुरूच कधी, कोणी आणि कशासाठी केले. त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.

तुमचे मत काय आहे जरूर लिहा.

तळटीप- मते कितीही विरोधात किंवा न पटणारी असतील तरी असभ्य भाषा वापरू नये. आणि वैयक्तीक पातळीवर घसरू नये.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरगुती गणेश उस्तव किंवा सार्वजनिक गणेश उस्तव हा महाराष्ट्र मध्येच साजरा होता .
आता जिथे जिथे मराठी लोक गेली आहेत तिथे तो पोचला आहे हा भाग वेगळा.
तसे .
नवरात्र , गरभा हा गुजरात मध्ये च का ?
काली माता ustav bangal मध्येच का?
ह्याची काही तरी कारण असतील.
राज्यकर्ते लोकांनी ह्या प्रथा निर्माण केल्या असतील असे बोलण्यास जागा आहे

बैसाखी पंजाबातच का? पोंगल दक्षिणेतच का?

ते असो, शिवाजी महाराजांच्या काळात गणेशोत्सव साजरा होत होता हे धाडसी विधान आहे, तुमच्याकडे तुम्ही वाचलेले काही संदर्भ असतील तर कृपया द्यावेत

मला कुतूहलाने गूगल करता एक हे सापडले. यात शिवराय, जिजाऊ माता आणि गणेशोत्सव / गणपती मंदिराबद्दल आहे. मला रोचक वाटले म्हणून शेअर करत आहे.

https://www.lokmat.com/bhakti/ganesh-festival-2021-punes-kasba-ganpati-w...

हे महितीच आहे हो सर, शिवाजी महाराज गणपतीची पूजा करत होते का नव्हते हा प्रश्न नव्हता

तुमच्या माहितीसाठी त्या काळी जवळपास सगळ्या किल्ल्यांवर गणपती असत आणि त्यावर आधारित दुर्ग गणेश ही फोटो मालिका माबोवर टाकली होती मी

विषय आहे गणेशोत्सव साजरा केला जाण्याबद्दल

गणेशोत्सव साजरा म्हणजे काय?
आजच्यासरखे मंडप, ढोलताशे, बेंजो, मिरवणूक, फटाके, नाच ....
स्वरूप वेगळे असू शकते तेव्हाच्या गणेशोत्सवाचे. तारीख वेगळी असू शकते, कालावधी वेगळा असू शकतो, मंडप बांधून न होता मंदिरात साजरा होत असेल..
मला वाटते मूळ मुद्दा हा आहे की तेव्हा महाराजांनी गणेशाची पूजा करायला म्हणून लोकांनी एकत्र यावे, एकत्र राहावे अशी काही योजना केली का..
तर शक्यता असावी असे ते वाचून मला वाटले.. आणि सर्व किल्यांवर गणपती असण्यामागचा हेतू सुद्धा हाच असावा..

बाकी तेव्हा ना माझा जन्म झालेला ना ईथल्या कोणाचा, त्यामुळे माझे मत माझ्यापाशी, आणि ईतरांच्या मताचा आदर Happy

पायी हळू हळू चाला मुखाने गजानन बोला असं गात टाळ झांजा वाजवात मिरवणूक काढली तर कोणीही आक्षेप घेणार नाही. पण मग मज्जा कशी येणार?
>>१२३++

तर शक्यता असावी असे ते वाचून मला वाटले.. आणि सर्व किल्यांवर गणपती असण्यामागचा हेतू सुद्धा हाच असावा">>>

तुम्हाला काय वाटेल ते वाटेल हो, सर्व किल्यांवर गणपती, मारुती का असत यावरही लिखाण उपलब्ध आहे, थोडे कष्ट घ्या आणि वाचा

आणि तुम्हीच दिलेल्या बातमीत फक्त
महाराज मोहिमेला निघण्यापूर्वी गणपतीचे दर्शन घेत ही एक ओळ आहे, आणि पूजा अर्चा ठकार कुटुंबाकडे दिली होती ही

यावरून लोकांना एकत्र करायला महाराजांनी गणपती उत्सव केला असावा अशी शक्यता वर्तवली आहे

मुळात ती बातमी संधीग्ध त्यात तुम्ही तुमचा व्हर्जन मिसळून इथं लिहिणार म्हणजे धन्य च

तुम्हाला काय वाटेल ते वाटेल हो, सर्व किल्यांवर गणपती, मारुती का असत यावरही लिखाण उपलब्ध आहे, थोडे कष्ट घ्या आणि वाचा
>>>>>>

शेअर करा, वाचतो.

तुमच्याकडे तुम्ही वाचलेले काही संदर्भ असतील तर कृपया द्यावेत
>>>>>

तुम्ही लोकांकडे मागता.
तुमच्याकडे कोणी मागितले तर स्वतः शोधा
छान. चालू द्या. हे मा शे ह पो Happy

सालाबाद प्रमाणे गणपतीच्या सुमारास होणारी ही चर्चा २७ व्यांदा पार पडली. शतक झळकलं आता. सूप वाजवा आणि सार्वजनिक उत्सव शांततेत पार पाडा बघू!

सर कधीतरी वापरा की हो खांद्याच्या वरती जे काही दिलंय देवाने ते

मी बराच शोध घेतला पण शिवाजी महाराजांच्या काळात असा काही गणेशोत्सव साजरा होत असल्याचे वाचनात नाही, त्या साठीच मी वरती म्हणलं होतं की धाडसी विधान आहे. त्या संदर्भात होतं ते

तुम्हाला जे सांगितले तर आयतोबा सारखे तुम्ही मागत बसलाय कारण ही माहिती खुद्द माबोवरच उपलब्ध आहे, पण ते शोधायचे कष्ट तुम्हाला नको आहेत

आशुचँप, तुम्ही शोध घेतला पण मिळालं नाही म्हणजे तुमच्याकडे काहीच पुरावा नाही. सिंपल! आता नसल्याचा पुरावा देत नाहीत असल्याचा देतात ते सोडा.

आदिलशाहीचं राज्य असताना १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात शाहजहानने पुण्यातल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा उल्लेख केल्याचे सभापती बखरीत नमूद केले आहे. आईने अकबरीत देखील लोकमान्य टिळकांनी पहिला गणपती बसवला कि भाऊ रंगारी यांनी या वादाचा उल्लेख केला आहे. अकबराची आई मुंजाबाच्या बोळीतून तुळशीबागेत बेनटॅक्स चे दागिने घ्यायला आली होती तेव्हां तिच्या कानी हा वाद पडल्याची नोंद आहे.

तुम्हाला जे सांगितले तर आयतोबा सारखे तुम्ही मागत बसलाय कारण ही माहिती खुद्द माबोवरच उपलब्ध आहे, पण ते शोधायचे कष्ट तुम्हाला नको आहेत
>>>>

एकतर ते मी मागितलेच नव्हते
तुम्हीच मला सांगितले असे असे आहे... आणि तुम्हीच जबरदस्ती शोधा म्हणून मागे लागला आहात Lol

असो, महाराजांच्या काळात गणेशोत्सव होते किंवा नव्हते याचे उत्तर हो किंवा नाही यापैकी एक असेल.
जर उत्तर हो असले तर काय
आणि जर उत्तर नाही असले तर काय
याचे उत्तर आहे का कोणाकडे?

शेअर करा, वाचतो.>>>>

हे वाक्य आपोआप उमटलं का तुमच्या लेखणीतून
खोटं बोला पण रेटून बोला, सरांचा एककलमी बाणा

छान. चालू द्या. हे मा शे ह पो

याचा अर्थ हे माझे शेवटचे पोस्ट असा होतो, हे कुणीतरी सरांना सांगणारे का नाही Happy

>>>>>>अकबराची आई मुंजाबाच्या बोळीतून तुळशीबागेत बेनटॅक्स चे दागिने घ्यायला आली होती तेव्हां तिच्या कानी हा वाद पडल्याची नोंद आहे.
Lol Lol Lol
बेनटेक्स का डिस्को मणी Wink

शेअर करा, वाचतो. >>
तुमच्याकडे कोणी मागितले तर स्वतः शोधा >>>
एकतर ते मी मागितलेच नव्हते >>>

आदमी है ये नाम गझनी है
( लडकी है ये नाम रजनी है च्या चालीवर म्हणावे) Proud

1)Dj नको.
२)मिरवणूक शिस्तीत नियोजन बद्ध असावी.
३) मंडप रस्ता aadvnsre नसावेत .जिथे पर्यायी मार्ग नाही तिथे.
४) speaker च आवाज कमी असावा.

५) कृत्रिम तलावात विसर्जन करावे आणि मुर्त्या मातीच्याच हव्यात.
म्हणजे तीच माती विसर्जन नंतर झाडांना देता येते.
ह्या सर्व गोष्टी सर्वांना पटतात.
संयमित शब्दात कोणी ही पटवले तर मला नाही वाटत कोणी विरोध करेल.
मग माशी शिंकते कुठे.

१) आक्रमक पने गणेश ustav वर टीका करणे.
२) सुधारणा विषयी मत व्यक्त करताना चुकीच्या ,गरज नसलेल्या कॉमेंट करणे .
३) मिरवणुकीत आवाज मोजण्याचे यंत्र घेवून फिरणे (NGO)
हे असले प्रकार होतात मग हिंदू हिंदू म्हणून आपल्यावर अन्याय होत आहे असे समजतो आणि आक्रमक होतो.
मग तो कोणाचं काहीच ऐकून घेण्याच्या स्थिती मध्ये नसतो.
आपलं काय चुकतंय ह्याचा सर्वांनी च विचार केला पाहिजे.

हे वाक्य आपोआप उमटलं का तुमच्या लेखणीतून
>>>>

अहो तुम्हीच आधी हे लिहिले ना - थोडे कष्ट घ्या आणि वाचा Happy

बेनटेक्स का डिस्को मणी >>> त्या तुळशीबागेतून बायकोला घेऊन जातच नाही. बायकोच नाही कुठलीही महिला सोबत असताना हा रस्ता टाळतो. पण नेमका तिकडे खेचला जातोच. मग पुढचे दोन ते तीन तास रस्त्यावर पिशव्या घेऊन उभा असतो. तोपर्यंत सोबतची महिला बोळीत गायब असते. इतकीच त्या बाजाराची माहिती आहे.

अकबराची आई मुंजाबाच्या बोळीतून तुळशीबागेत बेनटॅक्स चे दागिने घ्यायला आली होती तेव्हां तिच्या कानी हा वाद पडल्याची नोंद आहे. Happy Happy Happy

हे मा शे ह पो >>> त्यात ह टाकलेला आहे.म्हणजे कुणी शेवटचे पोस्ट म्हटले कि सर " कच्चं फचवलं, कच्चं फचवलं" म्हणत ह म्हणजे हजारावी म्हणणार. स्मार्ट हं..
#सरांचे विनोद या बखरीतून

>>>>>>सोबतची महिला बोळीत गायब असते. इतकीच त्या बाजाराची माहिती आहे.
खी: खी:
जंतर मंतर आहे ते. भुलभुलैय्या. काय मस्त फॅशन ज्वेलरी मिळते.

अहो तुम्हीच आधी हे लिहिले ना - थोडे कष्ट घ्या आणि वाचा

हो कारण इथे तरी किमान नॉर्मल असाल असा माझा भ्रम झाला. म्हणून म्हणलं बघा वाचा जरा, तर आधी म्हणालात द्या वाचतो, मग म्हणालात मी कुठं मागितलं, आता म्हणाल, मी इथं काही बोललोच नाहीये आत्तापर्यंत...

सगळेच कसे तुमच्यासारखे असतील सर

हे मा शे ह पो >>> त्यात ह टाकलेला आहे.म्हणजे कुणी शेवटचे पोस्ट म्हटले कि सर " कच्चं फचवलं, कच्चं फचवलं" म्हणत ह म्हणजे हजारावी म्हणणार. स्मार्ट हं..
>>>

हे अर्ध्या मायबोलीला माहीत आहे एव्हाना की मी तो ह हजारातला लिहीतो. हा नवा शोध नाही. Happy

काय मस्त फॅशन ज्वेलरी मिळते. __/\__

हैद्राबाद ला गेलो तर काय होईल ?
दिल्लीचा मीना बाजार एकट्याने पाहिला त्यातल्या त्यात.

Pages