यावर्षी मी गणेशोत्सवाचे धागे जरा उशिराच बघितले. या उपक्रमामध्ये भाग घ्यायचा हे ठरवलं होतं. पूर्वी सजवलेल्या दोन बाटल्या घरी होत्या. त्यांचीच एन्ट्री द्यावी असं ठरवलं. पण त्यातली मला आवडलेली decoupage केलेली बाटली नेमकी व्हिस्कीची आहे. इथे चालली नसती.
मग नविन प्रोजेक्ट करायचे ठरवले. ज्युसच्या, जॅमच्या आणि कॉफीच्या वेगवेगळ्या आकाराच्या बाटल्या बाहेर काढून ठेवल्या. decoupage करणं सगळ्यात सोप्पं काम होते किंवा मग रंगवणे. पण मला मोझेक करायची इच्छा होत होती. काचेच्या बाटलीवर याआधी कधी मोझेक केलेलं नाही, तिनेक दिवस वेगवेगळ्या आकाराच्या, साइझ च्या बाटल्या टेबलावर पडून होत्या. पण काय करावं सुचत नव्हतं. शेवटी काल दुपारी एका बाटलीवर टाइल्स कापून मोझेक बनवायला सुरवात केली. काचेवर फेव्हिकॉल लवकर वाळत नाही आणि टाईल्स घसरतात. मग रेसिबाँड नावाचा सिलिकॉन घेतला. काल रात्रीपर्यंत मेन डिझाइन करून झाले. पण उरलेलं बॅकग्राउंड करताना मात्र टाइल्स घसरायला लागल्या. तरी आज सकाळी सगळं बॅकग्राउंड संपवून बारावाजेपर्यंत फोटो काढता येईल असं वाटलं होतं. पण अजूनतरी वेळ मिळाला नाहीये आज त्यावर काम करायला.
म्हणून ही एक जुनी अॅक्रॅलिक रंगांनी आणि ग्लास कलर्स नी रंगवलेली ज्युसची बाटली एंट्री म्हणून देतेय.
साहित्य - काचेची ज्युसची बाटली, अॅक्रॅलिक कलर्स, ग्लास कलर्स, ब्रश, स्पन्ज आणि लाइट साठी एलइडी कॉर्क सेलो टेप.
आधी बाटलीवर रँडमली सेलोटेप चे चौकोन कापून चिटकवले. नंतर स्पंजने पूर्ण बाटलीला अॅक्रॅलिम कलरने रंगवलं. बाटली वाळल्यावर सेलोटेप काढून त्यात ब्रशने ग्लास कलर्स भरले. काळ्या अॅक्रेलिक कलरने शुन्य नंबरच्या ब्रशने बाकी डिझाइन केले.
मला या बाटलीत लाईट लावायचा होता सुरवातीपासूनच. अॅकृएलिक रंग पारदर्शक नसतात म्हणून आधी ते चौकोन रिकामे ठेवले होते. पण त्यात मजा येत नव्हती म्हणून मग त्यात ग्लास कलर्स भरले.
ही रिकामी बाटली..
हे सहा -सात वर्षांपूर्वी केलेलं आहे.बहूतेक तासाभरात झाले होते. त्यावेळी माझ्याकडे असलेले ग्लास कलर्स संपत आलेले होते, त्यामॉल्ले ते धड भरले गेले नाहीत. ही बाटली हलक्या हाताने बर्याचदा धुतली आहे. अजूनतरी रंगाचे कुठे टवके उडाले नाहीत.
मोझेक वाल्या बाटलीचा एक फोटो
मोझेक वाल्या बाटलीचा एक फोटो इथे देते. पूर्ण झाले कि नवीन धागा काढेन. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मला खूप दिवसांपासून काचेच्या बाटलीवर मोझेक करणं शिकायचे होते, ते मी करू शकले.
अरे मस्त दिसतोय लँप .. सहा
अरे मस्त दिसतोय लँप .. सहा सात वर्षे म्हणजे उपयुक्त आणि टिकाऊ देखील आहे.
मस्तच . लाइट लावल्यावर काय
मस्तच . लाइट लावल्यावर काय सुरेख दिसते आहे.
खूप सुंदर!
खूप सुंदर!
फेअरी लाईट्सची आयडिया मस्तच !
मोजेइक् ग्लास बॉटल पण मस्त यूनिक आहे!
सुंदर!!
सुंदर!!
फारच सुंदर.
फारच सुंदर.
मस्तच, अल्पना!
मस्तच, अल्पना!
सुंदर!
सुंदर!
सुपर्ब.
सुपर्ब. लाईट आयडीया जाम भारी.
सुंदर
सुंदर
मस्त.
मस्त.
अभिनंदन अल्पना !
अभिनंदन अल्पना !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुमचे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.