लेखन उपक्रम २- छोटीसी ये दुनिया - बिपीन सांगळे

Submitted by बिपिनसांगळे on 24 September, 2023 - 09:27

छोटीसी ये दुनिया

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं ....
तो चमकला . ती ... त्याची एकेकाळची प्रेयसी !
सौंदयाच्या जोरावर तिला जग जिंकायचं होतं म्हणून तिने त्याला झटकून टाकल्यावर, तो मात्र आयुष्यातून उठला होता. इथेतिथे काम करून , दारू पिऊन तो दिवस ढकलत होता. दारू पिताना तो रोज म्हणायचा , ' एक दिवस ती माझ्याकडे परत येईल .' आणि आज ती आली होती ...अशी !
त्याचा ठेकेदार त्याला ओरडला , ' ए , आवर पटपट . इथं चारच माणसं असली, तरी त्यांची गाडी आत्ता येईल .'
तिच्याकडे पहात , त्याने खोलीतून गोवऱ्या काढून द्यायची सुरुवात केली . भरल्या डोळ्यांनी .
सध्या तो स्मशानातला कामगार होता .
तिरडीवर ती . अगदी शांत . सुकलेल्या गुलाबपुष्पासारखी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ओह्ह.
मला वाटलेलं हा मजुरीवर काम करतोय आणि ती नवीनघर बघायला आलीय.