लेखन उपक्रम २ - प्राप्ती - rmd

Submitted by rmd on 24 September, 2023 - 20:38

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं...
ती त्याला अगदी चिकटून होती. थोडी उंच. रंगानं सावळी.
तो समाधानानं हसला. त्याने कौतुकाने स्वतःकडे एक नजर टाकली.
खूप प्रयत्नांनंतर त्याला ती प्राप्त झाली होती. वाट पाहाणं संपलं होतं.
अखेरीस त्याची तपश्चर्या फळली होती.
त्याला आठवत होती त्या अघोरी साधूकडे केलेली याचना, त्याने सांगितलेल्या सगळ्या विधींची पूर्तता... अगदी २१ कुमारिकांचे प्राण घेण्यापर्यंतचा टप्पा.

सोपा नव्हता निर्द्रव्य, तरल अस्तित्वापासून ते ही अशी सावली पडणार्‍या घन शरीरापर्यंतचा प्रवास!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे...
सुरुवात वाचून गोड प्रेमकथा वाटली होती.

बाप रे. ह्म्म्म!!! सावली.
पण २१ कुमारिकांचा बळी - Sad आक्षेप असा नाही कारण कथेची ती डिमांड आहे. पण .... कसंतरीच वाटलं.

मस्त !
आता मी लक्ष्या होणार... ईति तात्या विंचू Happy

धन्यवाद माऊमैया, सामो, मामी, स्वाती२, ऋ, असाम्या, मापृ आणि sonalisl!

सामो Happy ते अजून जास्त कसंतरी वाटू नये म्हणून डीटेल्स आवरती घेतली आहेत Wink

Proud

असाम्या Lol अगदी अगदी!

>>>>सामो Happy ते अजून जास्त कसंतरी वाटू नये म्हणून डीटेल्स आवरती घेतली आहेत Wink
हाहाहा

मस्तच