उपक्रम २ - (द्वि)शशक - सब करते है - वंदना

Submitted by वंदना on 23 September, 2023 - 14:10

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले तसा तो चमकला "ही महामाया भर दुपारी आणखी काय करतेय इथे?? मेलो मी आता!"
तेवढ्यात तिचेही लक्ष त्याच्याकडे गेले. तिने पटकन नजर चुकवून मान फिरवली. मनात चरफडत "हे माकड आणि ऑफिस सोडून इथे काय करतंय?? आजच तडमडायचं होतं यालाही!"
दोघेही आपापल्या उबरमधून गंतव्य ठिकाणी पोचले.
उतरताना परत तेच!! "शी** सकाळी उठल्यावर कोणाचं तोंड पाहिलं होतं की या महामायेचं/ माकडाचं तोंड परत परत पहावे लागतेय" दोघेही परत मनात चरफडले.

त्याच टेन्शनमध्ये आपापले मित्रमंडळ गाठून तो आणि ती आत गेले. आतमध्येही हेच घडणार या जवळपास खात्रीसह.
तेच घडले. पण आता ते सैलावले होते. बेपर्वाई दाखवत त्यांनी नजर न चुकवता एकमेकांना ऍकनॉलेज केले.

जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा मात्र चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या होत्या. काही लपवायचे, घाबरायचे, लाजायचे शिल्लक राहिलेच नव्हते. त्यांनी एकमेकांना शोधक नजरेने पाहिले आणि निखळ हास्याची देवाणघेवाण झाली. त्याने किंचित मान तुकवून हसून तिच्याकडे पाहिले. तिनेही प्रसन्न हसून त्याचा स्वीकार केला. काही न बोलता त्यांना एकमेकांच्या मनातलं कळलं. ही अवचित भेट हे फक्त त्यांचेच सिक्रेट.

दोघेही प्रसन्न हसत आपापल्या गाडीकडे चालू लागले.
तेव्हा पोस्टरवरचा किंग खान मिश्किल हसत टंग इन चिक बोलता झाला "मिलते हैं फिर कल ऑफिस में मॅडम"!

#armyofjawan
#सबकरतेहै

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बाई दवे,
कथा आवडली
शब्द मात्र १०० च्या पार गेलेत.
पण माफ आहे, जवान देखील हजार करोडच्या पार जातोय Happy