"थोडेसे धर्मांध असलेले बरे"

Submitted by VaicharikKatta ... on 18 September, 2023 - 00:17

"अविश्वासाची नभ-भ्रमंती करून "तू
नैराश्याचे आभाळ व्यापण्यापेक्षा...."
"थोडेसे...."

आधुनिक पुढारलेले म्हणत म्हणत
सुसंस्कृत मानवतेच्या चिंधड्या उडवण्यापेक्षा,
झाकलेल्या अंगाला कालबाह्य संबोधून
नग्नतेचं प्रदर्शन मंडण्यापेक्षा,
जरासे धर्मांध असलेले बरे.

वारंवार कसा तोल ढळावा?
नितीमुल्यांचा इतका मुळी विसर पडावा?
तुला लागलेयेत विक्षिप्त डोहाळे,
त्यात आयुष्यभर तू बरबरटण्यापेक्षा
किंचितसे धर्मांध असलेले बरे..

भोगी झालीय तुझी वृत्ती
प्रखर जाणवतेय उन्माद प्रवृत्ती,
क्षणिक सुखाची झालर पांघरून
उद्विग्नता नशिबी ओढवण्यापेक्षा,
क्षणभर धर्मांध असलेले बरे...

अरे, तूच तारक, तूच मारक, तूच असे तुझा सोबती
पावलागणिक तुला असावी का भीती?
ऐन उमेदीचा काळ व्यसनक्त होऊन
उगाच नशिबाला जाब विचारण्यापेक्षा,
इंचभर धर्मांध असलेले बरे....

लेपलेल्या चेहऱ्यामागे नको लपवुस कपट
अघोरी मानसिकतेचे ते घाणेरडे सावट,
अविश्र्वाची नभ-भ्रमंती करून तू
नैराश्याचे आभाळ व्यापण्यापेक्षा,
टीचभर धर्मांध असलेले बरे.....

लाभली तुला गुळगुळीत कांती
जेव्हा पूर्वजांनी जपली माणस-माती,
पण आलिशान घर, मोठ्ठी गाडीही
विसरून गेलास गावातली पडवी,
अशी कृतघ्नतेची बाग आयुष्यभर फुलवण्यापेक्षा
काडीमात्र का होईना "तू धर्मांध असलेले बरे......

असे आई-वडिलांची थोर पुण्याई
नशिबी तुला सुख अंगाई,
पण, सेवा जन्मदात्यांची भाडेतत्वावर
अन् बायको प्रेम सदैव स्मृती पटलावर
असा जन्मदात्यांच्या भरवशाला हमखास टोणगा लावण्यापेक्षा,
तसूभर का होईना "तू धर्मांध असलेले बरे.......

नात्यातला गोडवा विसरून गेलास
थोरल्या-लहाण्याना परका झालास,
आभासी दुनियेत शोधतोय अस्तित्वाच्या खाना-खुणा
वेड्या पण कालचक्र का चुकलेय कधी कुणा?
.
आणि मग शेवटी....
.
.
चार....
.
.
.
फक्त चारच रे चार....
.
.
.
.
ते चार खांदेकरी शेवटच्या प्रवासात भाड्याने बोलवण्यापेक्षा,
एक श्वासभर का होईना "तू....
धर्मांध असलेले केव्हाही बरे........

"बर का....
थोडेसे धर्मांध असलेले केव्हाही बरेच"

-श्री:श्रीकांत गुंजाळ

Group content visibility: 
Use group defaults

की फरक पैंदा या कवितेत धर्मांध ऐवजी धार्मिक केले तर?

बऱ्याच लोकांचे perception असते की धार्मिकता आणि आस्तिकता आहे म्हणुन लोक चांगले वागतात, लबाडी, पाप वगैरे करत नाहीत, अन्यथा जगात भयंकर हल्लकल्लोळ माजेल. जे व जेवढे काही "अध:पतन" दिसते ते अधार्मिक लोकांमुळे.

फरक आहे.
लंबा लेक्चर सुनना है?

माझीही पहिली प्रतिक्रिया ' काहीही' अशीच होती.

या लेखनात जे काही अवगुण वा चुकीच्या गोष्टी म्हणून वर्णन केले आहे त्यांचा धार्मिक, धर्मांध असण्या नसण्याशी काही संबंध नाही.

रआ, कवितेत तो बदल केला तर काय फरक पडणार असे म्हणायचंय. प्रतिसादात पण तसा बदल करत आहे.

@भरत, कोट घालून भाषण देणाऱ्या व्यक्तीला असे बोलू नये.

मापृ - त्यांचे म्हणणे स्पष्ट झाले कि पुढे विचारले असते.

बऱ्याच लोकांचे perception असते की धार्मिकता आणि आस्तिकता आहे म्हणुन तरी काही लोक चांगले वागण्याचा प्रयत्न करतात., लबाडी, पाप करताना थोडेतरी मनाला डाचत असावे
जसे की काही लोक जिन्या च्या कोपर्‍यात देव देवतांच्या तसबीरी असतील तर सहसा थुंकत नाहीत. अपवाद तसे कमीच. किमान थुंकले व नंतर लक्षात आले तर जीभ तरी चावत असतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.

कुठे कुठे तसबिरी लावणार?

अर्थात आपल्या पुरते इप्सित साधता येते या क्लृप्तीने.

----
रआ, ओह, ओके.