काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?
पंढरपूर वारी विषयी खोलात जाऊन बघितलं असता, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांनी अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जायला सुरुवात केली. तुकारामांच्या देहवासानंतर त्यांचे वंशज नारायणबाबा ह्यांनी त्यांच्या पादुका पालखीतून न्यायला सुरुवात केली. १८२० मध्ये हैबतराव ह्या सरदारांनी पालखीतून पादुका नेवून त्याला वारी / दिंडी स्वरूप दिले. त्यानंतर त्याचे आताचे वारीचे विराट स्वरूप दिसते ज्यात कित्येक लाख लोक चालतात.
गणपतीचा उल्लेख वेदकालीन साहित्यातही आढळतो पण गणेश चतुर्थी कधी पासून आणि कुणी पहिल्यांदा साजरी केली ह्याचा उल्लेख मिळत नाही.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.
नंतर ब्रिटिश राज आले तेव्हा त्यात खंड पडला. लोकं गणेश चतुर्थी आपापल्या घरी करू लागले.
परंतु लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव (आणि शिवजयंती उत्सव ) सुरु केले.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे बदलत गेलेले स्वरूप तर सर्वाना परिचित आहेच. कदाचित गावांमध्ये अजूनही त्याचे सार्वजनिक रूप अक्राळ विक्राळ झाले नसावे जेव्हढे शहरात झालेले आढळते.
पूर्वी (वीसेक वर्षांपूर्वी किंवा कित्येक अंशी आजही ) गावांमधून केले जाणारे उत्सव सर्व गावाला एकत्र आणणारे होते किंवा आहेत, सर्वांचा सहभाग असल्यामुळे सहाजिकच ते निरुपद्रवी व आनंददायी होतात.
समजायला लागल्यापासून बघतेय ते बदलत जाणारे दहीहंडीचे स्वरूप, गणेशोत्सवाचे स्वरूप, हळू हळू नवरात्रीच्या देवीच्या जत्रेपासून तिचे दांडिया-डिस्को दांडियात होणारे रूपांतर. २००० च्या दशकापासून (?) नव्याने सुरु झालेल्या हिंदू नवंवर्ष यात्रा, सार्वजनिक संक्रातीचे हळदीकुंकू समारंभ, मंगळा गौर कार्यक्रम ( बहुदा यंदाच हे चालू झाले असावेत).
ह्यात ते जिथपर्यंत सोसायटी, गल्लीत सगळ्यांच्या हातभराने साजरे केले जातात तेव्हा कदाचित सार्वजनिक उत्सव सुरु करण्यामागील उद्देश सफल होत असावा असे वाटते.
पण जेव्हा त्यात (अ) राजकीय शक्ती उतरतात, मग खंडण्या, वर्गण्या, सेलिब्रिट, त्यांच्या लाखोंच्या बिदाग्या, आपले वर्चस्व प्रस्थापित करायला लावलेले ध्वनिक्षेपक, ज्याच्या नावाने उत्सवाची देणगी मागता त्याला बघवणार, ऐकवणार नाहीत अस ओंगळवाणं, हिडीस नृत्य, गायन-वादन, रस्ते बंद केल्यामुळे होणारी गैरसोय ... ही न संपणारी यादी समोर येते.
आणि मग प्रश्न पडतो की उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करावेत का?
म्हणजे मूळ चांगला उद्देश बाजूला सारून त्याचा आपमतलबासाठी वापर करून त्याचे स्वरूप इतके बिभित्स केले जाते की प्रश्न पडावा मुळात हे सुरूच कधी, कोणी आणि कशासाठी केले. त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.
तुमचे मत काय आहे जरूर लिहा.
तळटीप- मते कितीही विरोधात किंवा न पटणारी असतील तरी असभ्य भाषा वापरू नये. आणि वैयक्तीक पातळीवर घसरू नये.
हां क्लिकबेट धागा आहे>>>
हां क्लिकबेट धागा आहे>>>
काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
>>> त्यावेळी ती चर्चा थांबवलेली आणि त्यासाठी वेगळा धागा काढून चर्चा करावी असं काहीस मत होत.
त्यानंतर ..
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
म्हणून हा धागा काढला ...
https://www.tv9marathi.com
https://www.tv9marathi.com/crime/trio-in-mumbai-arrested-for-threatening-a-man-over-donation-for-ganpati-mandal-1020935.html
https://www.hindustantimes.com/cities/pune-news/pune-hotelier-assaulted-over-vargani-refusal-establishments-say-mandals-pressurise-for-high-donation-101661360420955.html
अशीच वर्गणी दहीहंडी उत्सवात ही मागितली जाते. इतर कोणत्याही धर्मात उत्सवासाठी वर्गणी मागितल्याचे उदाहरण दाखवा.
छन्दिफन्दि, एक सजेशन. लेखातली
छन्दिफन्दि, एक सजेशन. लेखातली इमेज काढून टाका . मी मोहर्रमच्या इमेजेस शोधल्या. कॉपीराइटचा इश्यु आला.
प्रतिसादांत आलेल्या जगभरातल्या सगळ्या उत्सवांबद्दल मजकूर लेखात वाढवा. म्हणजे अज्ञानी यांचं समाधान होईल.
जगभरातल्या सगळ्या
जगभरातल्या सगळ्या उत्सवांबद्दल मजकूर लेखात वाढवा. +१
थैंक्स भरत
हेच सांगायचं होतं मला फक्त माझी मुद्दा मांडताना बहुतेक / नक्कीच शैली चुकली असावी.
>>>>>लेखातली इमेज काढून टाका
>>>>>लेखातली इमेज काढून टाका . मी मोहर्रमच्या इमेजेस शोधल्या. कॉपीराइटचा इश्यु आला.
खरच काढून टाक. समयोचित नाही वाटत. माबोवरती गणेशोत्सव सुरु होतोय आणि नेमका .... हा फोटो. काढूनच टाक.
एकदम समर्पक छायाचित्र आहे.
एकदम समर्पक छायाचित्र आहे. अजिबात काढू नका. आणि इतरांनी धागाकर्त्याला फोर्स करू नका.
अरे धागाकर्ता दबावापुढे झुकलेला दिसतोय. ही कृती, आपल्या देशात जे काही सध्या चाललं आहे त्याचे एकदम समर्पक प्रतिनिधित्व करते. ४ लोकांच्या भावना दुखावल्या म्हणून दबाव आणून एखादी रचना बदलायला लावणे.
युरोप मधील साजऱ्या होणाऱ्या
युरोप मधील साजऱ्या होणाऱ्या उत्सवांची यादी : https://traveltriangle.com/blog/festivals-in-europe/
चार गोष्टी
चार गोष्टी
१. एक मुद्दा महत्वाचा म्हणजे सगळ्या धर्मांत आणि जगभर सार्वजनिकरित्या उत्सव साजरे केले जातात. त्याचे स्वरूप वेगवेगळे असले तरीही मिरवणूका किंवा मोठ्या प्रमाणात जमाव ह्या गोष्टीही सर्वत्र आहेत.
त्याचे संयोजन आणि नंतर ची स्वच्छता किंवा प्रदेशाप्रमाणे वेगळ्या रीतीने हाताळू शकतात
२. गणपती मिरवणुकीचा फोटो प्रतीकात्मक होता पण फक्त हिंदू धर्माला / सणांना टार्गेट करणे हा हेतू नाही जर फोटो वरून तसा अर्थ निघत असेल तर ती चूक दुरुस्त केली
३. ४-५ फोटो शोधून कोलाज करून लावणे हा योग्य पर्याय झाला पण माझ्याकडे तेव्हढा वेळ नाही
४. आपण पहिले आपल्या घरात डोकावतो आणि गर्जे प्रमाणे गोष्टी सुधारायला बघतो
चार गोष्टी>>> pity
चार गोष्टी>>>

pity
सार्वजनिक सण/समारंभ /उत्सव
सार्वजनिक सण/समारंभ /उत्सव /जयंती यात फक्त ३६ ते ३८ दिवसच लोक रस्त्यावर येतात. हे प्रमाण वर्षाच्या दहा टक्केही नाही ही मोठी शरमेची बाब आहे. काही काही सण राज्यापुरतेच असतात.
जे दिवस कोरडे जातात त्या दिवशी इतर राज्यातले सणही साजरे करावेत. त्यांचं राष्ट्रीयीकरण करावं. तरीही कमीच पडले तर दिवंगत मंत्री, संत्री,खासदार, आमदार, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, झेडपी सदस्य इ. च्या स्मरणार्थ मरणोत्तर सार्वजनिक बड्डे उत्सव, कडू घास उत्सव आयोजित केले जावेत. डीजे लावावे. मिरवणुका काढाव्यात. हल्ली मिरवणुकांमधे रस्त्याचा थोडा भाग शिल्लक राहतो, त्यातून दुचाकीस्वार घुसखोरी करतात. त्यामुळे रस्ता पूर्ण अडवला जावा.
हे ही कमीच पडले तर महिन्याचा पहिला दुसरा तिसरा अमूक तमूक वार असे सण काढावेत. उदाहरणार्थ नोव्हेंबरचा तिसरा बुधवार, मे चा दुसरा शनिवार इत्यादी. रविवारी कंपल्सरी रंगपंचमी असावी.
अशा सामाजिक सुधारणा व्हाव्यात.
<आपण पहिले आपल्या घरात
<आपण पहिले आपल्या घरात डोकावतो आणि गर्जे प्रमाणे गोष्टी सुधारायला बघतो> काही जण वेगळे असतात. ते आधी किंवा कायम दुसर्याच्या घरात डोकावतात आणि तो सुधरत नाही तर मी का सुधरू असं विचारतात. त्यांनाही आपलं म्हणा.
अजनबी यांचा आक्षेप "आमच्या सणांच्याच वेळी का असे धागे येतात" असा आहे. पुढल्या वेळी कोणताही सण नसताना किंवा 'दुसर्या' कोणाचा सण असताना धागा काढला जावा
माझे प्रश्न मी पुन्हा एकत्रित विचारेन.
अजनबी यांचा आक्षेप>>>
अजनबी यांचा आक्षेप>>>
अजनबी नाही ओ . अज्ञानी आहेत ते.
अजनबी यांनी पहिल्याच पानावर
अजनबी यांनी पहिल्याच पानावर अज्ञानी यांच्या पाठोपाठ आक्षेप घेतला आहे.
पायी हळू हळू चाला मुखाने
पायी हळू हळू चाला मुखाने गजानन बोला असं गात टाळ झांजा वाजवात मिरवणूक काढली तर कोणीही आक्षेप घेणार नाही. पण मग मज्जा कशी येणार?
>>>>>
येते हो मजा..
आम्ही चाळी मध्ये आरती म्हणताना सुद्धा फार मजा केली आहे.
मी वर म्हटले ना की लोकांच्या मौज मजेच्या कल्पना बदलल्या आहेत. धांगडधिंगा आणि व्यसने त्यात शिरली आहेत
इतर कुठल्या धर्मात इतके सण
इतर कुठल्या धर्मात इतके सण/धार्मिक उत्सव आणि एवढा धांगडधिंगा घालून साजरे केले जातात ह्यावर अ (ज्ञानी/जनबी) ह्यांनी प्रकाश टाकावा
असे क्लिकबेट धागे नेमक्या
असे क्लिकबेट धागे नेमक्या वेळी काढून प्रतिसाद मिळवता येतात असं लक्षात आल्यामुळे असे धागे काढले जातात का..?
असे क्लिकबेट धागे नेमक्या
असे क्लिकबेट धागे नेमक्या वेळी काढून प्रतिसाद मिळवता येतात असं लक्षात आल्यामुळे असे धागे काढले जातात का..?
नवीन Submitted by अ'निरु'द्ध on 17 September, 2023 - 14:22
माबोवर पण फेसबुक सारखे लाईक्स किंवा प्रतिसाद संख्येवरून पैसे मिळतात का?
माबोवर पण फेसबुक सारखे लाईक्स
माबोवर पण फेसबुक सारखे लाईक्स किंवा प्रतिसाद संख्येवरून पैसे मिळतात का?
>>>>
जर मिळत असतील तर मिळू दे की..
आपण कश्याला त्रास करून घ्यावा
त्या पेक्षा विषयावर बोलावे. नाही पटले तर इग्नोर करावे..
>>>संध्याकाळी एकत्र चहा
>>>संध्याकाळी एकत्र चहा वडापाव आणि रात्री पुलाव पावभाजी हे मौजमजेला पुरते. कारण कामाची आपली स्वतःची अशी एक नशा असते. साधे वर्गणी साठी फिरण्यातही एक मजा असते.. बा असायची... रात्र जागवायला डीजे आणि दारू नाही तर टाळ कुटत भजने किंवा गाणी, खेळायला पत्त्यांचा जोड किंवा हाऊजी, खायला चिवडा आणि प्रसाद, गप्पा मारायला मित्र हे पुरायचे.
आता लोकांच्या मौजमजेचया कल्पनाच बदलल्या आहेत.>>>>
थोडक्यात... स्वतःच्या मजेसाठी!!!!!!
त्या पेक्षा विषयावर बोलावे >>
त्या पेक्षा विषयावर बोलावे >> महत्वपूर्ण भूमिका.
कोण सांगतेय यापेक्षा काय सांगतेय....
सण साजरा दणक्यात झाला पाहिजे
सण साजरा दणक्यात झाला पाहिजे अशा विचाराची लोक आणि सण च कशाला हवेत अशा विचाराची लोक.
( ह्या मध्ये ३१पासून लग्न समारंभ ते सर्व धर्माच्या लोकांचे सण सर्व अंतर्भूत आहे)
विरोधी विचारांच्या लोकांनी सर्व च वरील सण आणि समारंभ ह्याला विरोध च केला पाहिजे तर त्यांची भूमिका योग्य आहे असे समजू शकतो.
आणि सण ,समारंभ साजरे करण्यास विरोध नाही पण पद्धती ला विरोध आहे.
अशा पण विचाराची लोक असतात.
.
लोकांना त्रास होवू नये ह्या प्रकारे सण,समारंभ साजरे करावेत हा मधला मार्ग झाला.
पण कोणाला कशाचा त्रास होईल हे काही सांगता येणार नाही
पण अनेक जन ताकाला जाताना भांड लपवतात.
ध्वनिप्रदूषण, अतिरिक्त वीज
ध्वनिप्रदूषण, अतिरिक्त वीज वापर, वाहतूक खोळंबा ह्या सार्वजनिक बाबींचा विचार करता सामुदायिक उत्सव त्रासदायकच ठरतात. याबाबतीतले तारतम्य व्यक्तिसापेक्ष बदलते त्यामुळे काही कायदेशीर मार्ग काढले तरच याला आळा बसू शकेल.
अतिरिक्त वीज
अतिरिक्त वीज
हा पॉइंट baseless आहे बाकी valid आहेत..
जे शहाणपण शिकवतात आदर्शवाद च्या गप्पा मारतात अशा करोडो लोकांच्या घरात विनाकारण ,
एसी,लाईट,पंखे,टीव्ही,चालू असतात..
आदर्शवाद शिकवणारे वीज चोरी करतात ते प्रकरण वेगळेच आहे
खूप मोठी लिस्ट आहे थोडक्यात उरकली आहे
शिवाजी महाराजांच्या काळात
शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली.
>>> अशी नवनवीन माहिती मिळते म्हणून मायबोलीवर येणे सार्थ आहे... धन्यवाद..
पण टिळकांनी सार्वजनिक
पण टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला ना?
सामो,
सामो,
हो लोकमान्य टिळकांनी सुरू केला.
पण त्या आधी शिवाजी महाराजांच्या राज्यात आणि नंतर पेशव्यांच्या काळात सार्वजनिक किंवा सामूहिक म्हणुया उत्सव होत होते.
ह्याचा उल्लेख ३-४ ठिकाणी सापडला. त्याला त्यांनी references दिलेले.
ब्रिटिशांनी त्यांच्या काळात जमावबंदी, संचार बंदी वगैरे आणून लोकांचे एकत्र येणे बंद करविले. तेव्हा लोक आपापल्या घरी गणपती बसवत आणि खाजगी मध्ये पूजा अर्चा चाले.
पण मुस्लिमांना शुक्रवारी सामुदायिक नमाज पढायला धार्मिक सबबीखाली परवानगी दिली.
परंतु हिंदूंना मात्र एकत्र येण्याला मज्जाव होता.
तेव्हा टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव, विशेषत: मिरवणुका सुरू केल्या. त्या निमित्ताने लोक एकत्र येऊ लागले.
ओके धन्यवाद.
ओके धन्यवाद.
असे क्लिकबेट धागे नेमक्या
असे क्लिकबेट धागे नेमक्या वेळी काढून प्रतिसाद मिळवता येतात असं लक्षात आल्यामुळे असे धागे काढले जातात का..?
Submitted by अ'निरु'द्ध on 17 September, 2023>>>
माझ्या सुदैवाने मी लिहिलेलं कोणीतरी वाचावं किंवा लोकांचं लक्ष वेधून घ्यायला गणपती सारख्या इतक्या श्रद्धेच्या आणि जवळच्या विषयावर अशा शुल्लक हेतूने धागे काढायची वेळ अजून माझ्यावर आली नाहीये.
पण त्या आधी शिवाजी
पण त्या आधी शिवाजी महाराजांच्या राज्यात आणि नंतर पेशव्यांच्या काळात सार्वजनिक किंवा सामूहिक म्हणुया उत्सव होत होते.>>>
मोहम्मद सिराज जसा त्या दिवशी एकापाठोपाठ एक विकेट घेत होता तसे इथे एकापाठोपाठ एक विनोदी विधाने वाचायला मिळत आहेत. जेंव्हा तुम्ही धाग्यातले छायाचित्र काढून टाकले तेंव्हाच पोचपावती मिळाली.
शिवाजी महाराजांनी नक्की कोणते गणेश मंडळ स्थापन केले ते पण सांगता का?
राजा, राज्यकर्ता जेव्हा एखादा
राजा, राज्यकर्ता जेव्हा एखादा सण साजरा करेल तेव्हा तो सहजच सार्वजनिक होणार ना ? पण त्याकाळचे सामान्य लोक सार्वजनिक किंवा सामुदायिक गणेशोत्सव करीत होते याचा दाखला आहे का?
ब्रिटिशांनी १८५७ नंतर इथल्या धार्मिक बाबतींत हस्तक्षेप न करण्याचे धोरण ठेवले होते. त्याकाळात संचारबंदी, जमावबंदी वगैरे संकल्पना होत्या का याबद्दल साशंक आहे. प्लेगच्या काळात एकत्र जमण्यावर बंदी घातली होती. पण सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात त्याआधीची आहे.
टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा मोहर्रमच्या मिरवणुकांतून मिळाली , असं एके ठिकाणी वाचलं होतं.
https://www.bbc.com/marathi/india-45527045 इथे आणखी वेगळी माहिती आहे.
Pages