Submitted by च्रप्स on 15 January, 2022 - 20:48
चांगली हिंदी पुस्तके सुचवा... शक्यतो किंडल अनलिमिटेड वरील... या वर्षी चांगले हिंदी साहित्य वाचण्याचा मानस आहे..
हिंदी विरोधकांनी या धाग्यावर कृपया येऊ नये.. .
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फणीश्वरनाथ रेणू यांची बहुतेक
फणीश्वरनाथ रेणू यांची बहुतेक सर्व
मुन्शी प्रेमचंद यांची सर्वच.
सादत अली मंटो
सुरेंद्र मोहन पाठक पॉकेट बुक्स
वापसी - गुलशन नंदा
मोहिनी विद्या
ठकठक
चंपक
मोटु पतलु और घसीटा संपूर्ण मालिका
तेनालीराम
अकबर बिरबल पॉकेट बुक्स
रात की बंबई
रंगीन रातें
औरत को वश मे कैसे करें ?
अघोर मंत्र
इंद्रजाल
कोकशास्त्र
फ्लिपकार्ट स्पेशल
बेस्टसेलर्स
https://www.amazon.in/Hindi-Bestseller-Books-Set-Diamond/dp/9354862535/r...
औरत को वश मे कैसे करें ?
रंगीन राते
औरत को वश मे कैसे करें ?
कोकशास्त्र
>>> सिरियसली???
सर, इथे नको असेल तर गुगल वर
सर, इथे नको असेल तर गुगल वर एका क्लिक वर माहिती मिळेल.
हा धागा वाचू आनंदे ह्या
हा धागा वाचू आनंदे ह्या ग्रुपमध्ये हलवा. तो आधीचा किंडल वाला पण. कोतबो "General catch-all" असल्यासारखं झालं आहे अगदी
पराग सर...वाचू आनंदे कोणी
पराग सर...वाचू आनंदे कोणी वाचत नाही... कोतबो लोक चवीने वाचतात
सर, इथे नको असेल तर गुगल वर
सर, इथे नको असेल तर गुगल वर एका क्लिक वर माहिती मिळेल.
>> तुम्ही गूगल करून लिस्ट दिली का? मी गूगल वापरत नाही... मी गूगल विरोधी आहे...
सर, मी तुमचा भक्त आहे.
सर, मी तुमचा भक्त आहे. तुम्ही वापरत नसाल तर मी कसा वापरेन ?
तुम्ही विचारले म्हणून मी लिस्ट दिली सर.
.वाचू आनंदे कोणी वाचत नाही >
.वाचू आनंदे कोणी वाचत नाही >>>> ऑ ? हे नवीनच कळलं. अॅडमिनांनी सगळे ग्रुप बंद करून फक्त कोतबोच सुरू ठेवावा मग.
कुरु कुरु स्वाहा- मनोहर श्याम
कुरु कुरु स्वाहा- मनोहर श्याम जोशी
क्याप- मनोहर श्याम जोशी
राग दरबारी-श्रीलाल शुक्ल
ही वरची तीन अगदी अवश्य वाचण्यासारखी आहेत. मनोहर श्याम जोशी फारच आवडले मला तरी.. पहा तुम्हाला कसे वाटतात.
शिवाय
पीली छतरी वाली लडकी- उदय प्रकाश
दीवार में एक खिडकी रहती थी- विनोदकुमार शुक्ल
कोहरे में कैद रंग- गोविन्द मिश्र
लाल पीली जमीन- गोविन्द मिश्र
शिवाय कवितासंग्रहांमध्ये,
साये में धूप- दुष्यन्त कुमार
पत्थर फेंक रहा हूं- चंद्रकांत देवताले
बाकी मग निदा फाजलींचे शायरींचे संग्रह पण आहेत... त्यांचं 'हाक आणि प्रतिसाद' हे आत्मचरित्र मराठीतही अनुवादित झालंय.. एवढं जिव्हारी लागणारं आत्मचरित्र फारच कमी वेळा सापडतं.
याशिवाय रजनीशांची आवडत असतील भरपूर आहेत- उदाहरणार्थ.. ताओ उपनिषद, सुनो भई साधो, गहरे पानी पैठ, साधनापथ, कृष्ण स्मृति, देख कबीरा रोया, पतंजलि योगसूत्र, शिवसूत्र
मस्त लिस्ट पाचपाटील …
मस्त लिस्ट पाचपाटील …
छान धागा, उपयोगी पडेल.
छान धागा, उपयोगी पडेल.
चांगला धागा.
चांगला धागा.
एकही हिंदी पुस्तक वाचलेलं नाही मी अजूनपर्यंत. या धाग्यामुळे वाचायला स्फूर्ती मिळेल
माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या
माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मुलासाठी चांगली हिंदी पुस्तकं कुणी सुचवू शकेल का? माझ्या मुलासाठी हवी आहेत. त्याचं इंग्रजी अवांतर वाचन बरंच आहे. मराठी वाचनही चांगलं आहे. शाळेत हिंदी विषय आहे आणि सीबीएसई असल्यामुळे हिंदीची पाठ्यपुस्तकं उत्तम दर्जाची आहेत. पण त्या मानाने हिंदी अवांतर वाचन नाही. म्हणजे जवळजवळ नाहीच. त्यामुळे भाषेवर म्हणावी तशी कमांड नाही. परीक्षेत मार्क्स मिळतात. पण भाषा सुधारण्यासाठी, शब्दसंग्रह वाढवण्यासाठी, गोडी लागावी म्हणून हिंदी पुस्तकं हवी आहेत.
मराठीत फास्टर फेणे, इंग्रजीत टॉम सॉयर वगैरे आहेत तशा प्रकारची हिंदी पुस्तकं असल्यास चांगलं. म्हणजे रस निर्माण होईल.
च्रप्स, https://hindisamay
च्रप्स, https://hindisamay.com/ ही साईट पहा. वावे तुम्हीही.
हिंदी भाषा फार मस्त वाटते वाचायला.
नीलकंठी ब्रज इथेच वाचली मी.
मला पाठ्यपुस्तकात वाचलेल्या
मला पाठ्यपुस्तकात वाचलेल्या लेखकांपैकी महादेवी वर्मा आणि प्रेमचंद लक्षात आहेत आणि आवडले होते.
पाठ्यपुस्तकातले पाठ ज्या पुस्तकांतून घेतलेत, ती पुस्तकं वाचता येतील.
मोठ्यांसाठी - archive dot org
मोठ्यांसाठी - archive dot org वर दहा लाख+ पुस्तकं आहेत.
लहान मुल़ांसाठी चित्रकथा , Jionews Android appवर ( हे भारतात चालतं) आहेत.
सामो आणि srd - धन्यवाद...
सामो आणि srd - धन्यवाद...
आज हिंदी दिवस आहे... योग्य
आज हिंदी दिवस आहे... योग्य वेळी धागा वर काढला...
गर्व से कहो हम हिंदी है!!!
धन्यवाद.
धन्यवाद.
प्रेमचंदांची 'गोदान' मी वाचली आहे (ऑडिओ बुक ऐकलं आहे). त्यांचा कुठला कथासंग्रह वगैरे आहे का की जो या वयाच्या मुलाला आवडू शकेल? पाठ्यपुस्तकातले धडे ज्यातून घेतले आहेत ती पुस्तकं वाचणं हे लक्षात नव्हतं आलं खरं तर मी स्वतः मराठीच्या बाबतीत हे केलेलं आहे.
वरच्या लिंक्स बघते. पण विशिष्ट लेखकांची किंवा पुस्तकांची नावं कुणी सुचवू शकलं तर आवडेल. (ज्यांनी स्वतः वाचली असतील त्यांना ती पुस्तकं कशी वाटली हे कळेल.)
गर्वसे कहो हम मराठी है.
गर्वसे कहो हम मराठी है.
गर्वसे कहो हम तमिळ है.
गर्वसे कहो हम तेलगु है.
गर्वसे कहो हम मल्याळम है.
गर्वसे कहो हम बंगला है.
...
...
...
गर्वसे कहो हम हिंदी है.
शतरंज के खिलाडी तथा अन्य कथाए
"शतरंज के खिलाडी तथा अन्य कथाए" हे एक माहीत आहे.
ऑनलाईन मिळेल.
१. हिंदीमध्ये हरिशंकर
१. हिंदीमध्ये हरिशंकर परसाईंचं नाव ऐकून होतो. त्यांची काही पुस्तकं वाचली आणि ते श्रेष्ठ आहेत, हे मत पटलं.
विकलांग श्रद्धा का दौर - हरिशंकर परसाई
हम इक उम्र से वाकिफ है- हरिशंकर परसाई (आठवणी)
ठिठुरता हुआ गणतंत्र - हरिशंकर परसाई
२. याशिवाय डॉ. ज्ञान चतुर्वेदी हे एक नाव अलीकडे कळलं. हा बापलेखक आहे..!
एकदा योगायोगानं त्यांची 'स्वांग' असं विचित्र नाव असलेली कादंबरी दिसली. किरकोळ कुतूहल वाटलं म्हणून उचलली आणि पहिल्या पानावरून नजर फिरवली, तर ओठाची एक कड दुमडत सुरू झालेलं हासू हळूहळू चेहराभर पसरत गेलं. म्हटलं साला हेच तर पाहिजे होतं. असंच तर लिहायचं असतं..!
मग नंतर त्यांच्या ''नरकयात्रा'', ''बारामासी'' आणि ''पागलखाना'' ह्या कादंबऱ्या मिळवून वाचल्या. खात्रीशीर वाचनीय ऐवज आहे.
म्हणजे एवढा तिखट उपहास (डार्क कॉमेडी) मराठी साहित्यात फारसा वाचायला मिळाला नव्हता. (रंगनाथ पठारेंच्या 'ताम्रपट'चा सन्माननीय अपवाद वगळता.)
बाकी, डॉक्टर चतुर्वेदी पेशानं डॉक्टर आहेत, हृदयविकारतज्ञ आहेत. असे डॉक्टर्स जगात खूप आहेत, पुढेही असतील. पण वाचणाऱ्यांच्या काळजाची भीषण शस्त्रक्रिया करणारे 'लेखक चतुर्वेदी' अगदीच दुर्मिळ..!
(अवांतर: त्यांच्या बऱ्याच मुलाखती आहेत यू ट्यूबवर. ऐकण्यासारख्या आहेत. म्हणजे साहित्य/समाज/सिस्टीम/सत्ता/आयुष्य वगैरेबद्दलची त्यांची दृष्टी/निरीक्षणं थेट भिडणारी आहेत.)
३. आणखी एक म्हणजे मानव कौल. हा एक चांगला हिंदी अभिनेता आहे. आणि त्याहीपेक्षा तो एक चांगला हिंदी लेखक आहे. डेप्थ आहे त्याच्यात. त्याचं वाचनही खूपच आहे. म्हणजे ते काही लपत नाही. झलक दिसत राहते. आणि तो जी हिंदी भाषा वापरतो ती अत्यंत साधी सोपी, प्रवाही असते. अलंकारिकतेचा जराही सोस नसलेली. पण त्यातला आशय फार खतरनाक.
"ठीक, तुम्हारे पीछे" म्हणून एक कथासंग्रह आहे त्याचा.
काही कथा आहेत. वेगवेगळ्या धाटणीच्या पण सगळ्यांमध्ये एक समान धागा आहे. एक अंतर्धारा आहे. ती म्हणजे आपल्या आतली पोकळी. नथिंगनेस. रिकामपण. अगदी शुद्ध स्वरूपातला नथिंगनेस. अंगावर येणारा..!
तर दीर्घकाळापासून तीव्र नैराश्याचा सामना करणाऱ्यांनी हे जरा जपूनच वाचलं, तर बरं.. अर्थात, हे पण तसं सांगायचं म्हणूनच सांगतोय.. कारण असले डिस्क्लेमर फार कामाचे नसतात, असा अनुभव आहे. कारण मग तर हटकून वाचावंसं वाटतं.
४. याशिवाय मग आणखीही काही पुस्तकं आहेत. सर्वार्थानं अजोड आहेत.
उदाहरणार्थ,
धन यात्रा - मुश्ताक अहमद युसुफी (कादंबरी)
एक बता दो- सुजाता (कादंबरी)
खिलेगा तो देखेंगे- विनोद कुमार शुक्ल (कादंबरी)
गुलजारनी मुलांसाठी लिहिलं आहे
गुलजारनी मुलांसाठी लिहिलं आहे. त्यांच्या मुलीसाठी लिहिलेल्या गोष्टी - कवितांची पुस्तकं छापली. कोणत्या वयासाठी योग्य ते माहीत नाही.
हिंदीसाठी सुरभी हा सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे यांचा दूरदर्शन कार्यक्रम सुचवेन. एक दृकश्राव्य मॅगॅझिन.
@ संप्रति१
@ संप्रति१
तुमच्या यादीतला ऐवज बावनकशी !
धनयात्रा -- मुश्ताक अहमद
@ संप्रति काय मस्त यादी दिलीत. हे शोधून वाचण्यात मस्त वेळ जाइल.
धनयात्रा -- मुश्ताक अहमद युसुफी
हरिशंकर परसाई की चुनिंदा व्यंग्य रचनाएं
बाकीची शोधते.
वावे, तुमच्या मुलाकरता -
वावे, तुमच्या मुलाकरता - https://archive.org/details/gandhi.imhasanabattisi0000yash/page/n13/mode... - सिंहासन बत्तीशी
National Book trust यांनी
National Book trust यांनी बरीच पुस्तके काढली आहेत. पण बरीचशी विकली गेल्यावर नवीन छापत नाहीत. त्यामुळे त्यांचा स्टॉकिस्ट पाहावा तुमच्या शहरात. डिसेंबर ते फेब्रुवारी पुस्तक प्रदर्शनात सहज सापडतील. चाळून घेता येतात.
जुन्या प्रसिद्ध हिंदी लेखकांचा विषय सामाजिक अन्याय असतो. भाग उप्र. आणि बिहार. काळ १९०० ते १९६०. तर ती पुस्तके २००५ नंतर जन्म झालेल्या आताच्या पिढीला आवडतील का ही शंकाच आहे. आम्ही शाळेत (६०-७०) काळात धडे वाचले ते लेखक आता कंटाळवाणे वाटू शकतात.
मुद्दा असा आहे की पुस्तक सुचवलं म्हणून विकत घेऊ नये. थोडंसं चाळल्यावरच विकत घ्यावे.
'सिमसिम'
'सिमसिम'
बसरमल पूरस्वाणी नावाच्या एका वयोवृद्ध ज्ञानवृद्ध सिंधी मनुष्याच्या स्मृतींचा ठाव घेत ही कादंबरी उलगडत जाते. वर्तमानात मुंबईत रहिवसलेला हा मनुष्य कराची-लारकाना स्मृतींतून जिवंत करत राहतो. त्याच्यासोबत आपल्यालाही आठवणींच्या या दुतर्फा उघडणाऱ्या भुयारातून टाईम ट्रॅव्हलला नेतो.
ही कादंबरी विभाजनादरम्यान सिंधी समाजावर कोसळलेल्या हाल-अपेष्टांना, यातनांना भाषा देते. ही भाषा आक्रस्ताळी, किंचाळून लक्ष वेधून घेणारी नाही. तर सोशिक आहे. मूक रूदनाची भाषा आहे. म्हणून शाश्वतही आहे.
ही कहाणी भावनिक-मानसिक निर्वसनाची व मृत्यूबोधाची जितकी आहे, तितकीच प्रेमाची-जिंदादिलीची-उमेदीची देखील आहे. मुंबईत लॅंडमाफियांची भूमीसाठी जी सदैव पेटलेली हवस असते, त्यातून आपली लायब्ररी वाचवायला धडपडणाऱ्या एका वृद्धाच्या जूनून ची ही कहाणी आहे.
लायब्ररीबद्दल-पुस्तकांबद्दल अपार माया असणारा हा गोड म्हातारा, आपल्याला प्रेमात पाडतो. तसेच जराजर्जर अवस्थेतली ती लायब्ररी वाचवण्यासाठी सगळं करून विकल झालेला हा बुजुर्ग कादंबरीतून जिवंत होऊन आपल्याभोवती वावरतोय असं वाटतं. डोक्यातून जाता जात नाही.
यातल्या त्या लायब्ररीत पुस्तकं बोलतात, गातात, नाचतात, त्यांच्या मानवजातीबद्दलच्या निष्कपट भावना व्यक्त करतात, ते प्रकरण आत्म्याला स्पर्श करणारं आहे..!
आपण काळाच्या ज्या भरधाव वेगाखाली रगडले जात आहोत, त्या काळाचे अंत:स्तर, त्याचं वजन समजून घ्यायचं असेल तर ही कादंबरी वाचायला हवी.
गीत चतुर्वेदी हे एकविसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ भारतीय लेखकांपैकी एक आहेत. त्यांच्या कलाकृती वाचत असताना ते तसे का आहेत, याची झलक आपोआपच मिळते.
सिमसिम च्या इंग्रजी अनुवादाला 'पेन-हॅम अमेरिका ट्रान्सलेशन ग्रॅंट ॲवॉर्ड' आहे. हे सगळं तसं वैश्विकच आहे अर्थात. या लेखकाचं साहित्य बावीस भाषांमध्ये अनुवादित झालं आहे, ही अधिकची माहिती.
'कौरव सभा'
'कौरव सभा'
मित्तरसैन मीत हे पंजाबमधले मोठे लेखक आहेत. त्यांची कौरवसभा ही मूळची पंजाबी कादंबरी आहे, तिचा भारतीय ज्ञानपीठानं हिंदी अनुवाद केलाय.
कादंबरी अजस्त्र आहे. तिला वेग आणि खोली असं दोन्ही आहे. हातात घेतली की संपवल्याशिवाय खाली ठेवणं अवघड आहे.
मायानगर नावाचं एक काल्पनिक शहर. तिथलं एक उद्योगपती घराणं. त्यांच्या वारसदारांत प्रॉपर्टीवरून कलह होतो, आणि त्याचं पर्यवसान एका गुन्ह्यात होतं. हा गुन्हा आणि त्यासंबंधी चाललेली कोर्टकेस, यांचा आधार घेऊन ही कौरवसभा रचलेली आहे. कोर्टकचेरीच्या आणि त्यामागे चालणाऱ्या पडद्याआडच्या हालचालींच्या जंजाळात आत आत हरवत चाललो तरी "पुढं काय होणार" याची उत्सुकता सुरूवातीपासून शेवटपर्यंत ताणलेली राहते. त्यामुळे मग दिवसभर मॅरेथॉन रिडींग.
न्यायाची व्यवस्था सडलेली आहे आणि खालपासून वरपर्यंत सगळे आपादमस्तक बरबटलेले आहेत, हे वरवर माहित असतं. पण ते नेमकं कसं? याचं जिवंत चित्रण यात येतं. महापुरानं भरलेली नदी जशी रोरावत येताना दिसावी तशी ही कादंबरी गाळण उडवते.
लेखक स्वतः आयुष्यभर वकील राहिलेले आहेत. त्यांनी हे सगळं आतून बघितलेलं आहे. तर हे बघितलेलं भोगलेलं वास्तव, 'भोगा हुआ यथार्थ !' यात आलेला आहे.
ते या व्यवस्थेशी संबंधित सगळे कंगोरे अत्यंत बारकाईनं उलगडून दाखवतात. समाजाच्या सर्व स्तरातील पात्रं यात भूमिका वठवताना दिसतात. हा लेखक व्यवस्थेतला कुठलाच पैलू सोडत नाही. या माणसाच्या नजरेतून काहीही सुटत नाही. आणि विशेष म्हणजे ते व्यासांसारखं 'जे आहे ते असं आहे', एवढंच मांडतात. अर्थ लावण्याची जबाबदारी वाचणाऱ्यावर टाकतात.
हितसंबंधांची गुंतागुंतीची वॉटरटाईट साखळी. राजकारणी, उद्योगपती, वकील, जज, मिडीया, उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी, स्पिरीच्युअल बुवाबाज, पोलिस, डॉक्टर्स, दलाल अशा सगळ्या लागेबांध्यांचं नातेसंबंधांचं मायाजाल ! या सर्वांपर्यंत पैसा पोचवण्याचं नेटवर्क कसं चालतं, जजेसच्या नेमणुका कशा होतात, याचं हे भीषण विश्र्वरूप दर्शन! ते बघून आपण हक्काबक्का.! नैतिक-अनैतिकतेच्या, भल्या-बुऱ्याच्या आपल्या बाळबोध समजुतींवर हसावं की रडावं कळत नाही.
बाकी, ही एक प्रचंड दलदल आहे. दुरूस्त होण्यापैकी नाही. कुवतीबाहेरचं काम आहे ते. या भानगडीत कुणी पडला तर प्युअर फ्रस्ट्रेशनशिवाय दुसरं काहीही हाताला लागत नाही. यापासून चार हात लांब रहा, त्यात लडबडा, किंवा स्वतःपुरती थोडीशी जागा स्वच्छ ठेवून हरलेली लढाई लढत रहा, काही थोडंफार बरं करता आलं तर पहा. चौथा पर्याय नाही. अशा व्यवस्थेत चुकून एखाद्याला खरा न्याय आणि वेळेवर मिळालाच, तर तो चमत्कारच म्हणावा लागतो.
तर ज्या दुनियेतलं कणभरही माहीत नव्हतं, असं एक संपूर्ण वेगळं आयुष्य दिवसभरात जगून पार केलं. मोठा मानसिक प्रवास आहे हा. भंजाळून टाकणारा. आता चार दिवस एक शब्दही वाचवणार नाही.
अवांतर: पुण्यात अलीकडे एक पोर्शे कार दुर्घटना घडली होती. त्या केसमध्ये वरवर छाछूगिरी करून पडद्याआड काय काय चित्तथरारक हालचाली झालेल्या असाव्यात, याचा अंदाज या कादंबरीतून येऊ शकतो. त्याअर्थी हे सगळं सार्वत्रिक, स्थलकालातीत आहे, याचा प्रत्यय येतो.