बंदिवान मी ह्या संसारी
आशा काळे, निळू फुले, लता अरुण , मोहन कोटिवान, लीला गांधी, माया जाधव.
दिग्दर्शक -अरुण कर्नाटकी
१९८८
आशा काळे(कमल) लहानपणी प्रिया अरुण असते. प्रिया अरुणची सख्खी आई लता अरुण तिची सावत्र आई झाली आहे. बाबा आधी आजोबा वाटू लागले होते . पण प्रिया मोठी होऊन आशा झाल्याने ते नंतर लेव्हल मेकप झाले. आई लहानपणापासून छळते, बालमित्र अचानक काढता पाय घेतो. सावत्र आईला हिला उजवायचं पडलेलं असतं. गरिबीमुळे निळू फुलेशी लग्न होते, तो आईबाबाला पंधराशे रुपये देऊन हे लग्न जमवतो. निफु एक 'गुरू' नावाचा गरीब, कोपिष्ट व मूर्ख भटजी असतो. त्याच्या कानशिलावरल्या नकली-स्टिकर टकलाची सुद्धा वाळवणासारखी पापडं निघत असतात.
मग गावातला एक पाटील टाईप माणूस तिच्यावर वाईट नजर ठेवतो. याची नजर इतकी वाईट आहे की हा सतत डोळे आल्यासारखा दिसत होता. मग हा तिचं जे काही बघत असतो, ते आपल्यालाही बघावं लागतं, हळूहळू आपणही पाटील होतो. नववारी पातळ किती revealing असू शकते हे मला आता कळले. गरीबाची पण 'लस्ट स्टोरी' ;)..!
या सगळ्यात गावात हातात कादंबरी घेऊन नेहरू शर्ट-पायजामा घालून इकडंतिकडं फिरणारा माधव (खर्शीकर) हिला विहिरीतून ओलेती वगैरे बाहेर काढतो, नंतर भरल्या वांग्याची भाजी खायला येतो. लाल डोळ्याचा पाटील म्हणतो माधव आणि कमलचं लफडं हाय. निळू त्यांच्यावर विश्वास ठेवतो व तिची निर्भर्त्सना करतो. ती सवाष्ण म्हणून पाटलाकडं जेवायला जात नाही, तर तो घरी येऊन छेडतो. मग शेजारच्या काकू दोडकं घेऊन येतात. पाटील पुन्हा निफुचे कानं फुंकतात. नंतर काकू जत्रेत 'जाऊन या ' वगैरे सांगायला येते. तिथेही पाटील निफुला कटवून हिला बैलगाडीत घेतो व इकडंतिकडं हात फिरवायला बघतो. दुसऱ्या गावी बालमित्र/एक्स म्हणतो की याची नजर चांगली नाही. घ्या आता..!
बालमित्र जो कोणी आहे ज्याच्यासोबत गातगात ती पाच मिनिटांत मोठी होते , तो मूर्तिमंत 'दगड' आहे. ह्यांच्या लहानपणीच्या गप्पा बघून पुन्हा पाटील निफुला म्हणतो की हिचं चारित्र्य बरं नाही, कधी माधव - कधी एक्स.
निफु म्हणतो, 'तू पातळी सोडली आहेस. आता मी काही तुला पातळं घेऊन देणार नाही '. मग ती म्हणते की 'मी नागवी बसेन, नको तुमची पातळी आपलं पातळं'. अचानक सत्तावीसावं रडकं गाणं सुरू होतं व संपेपर्यंत पातळ फाटते सुद्धा. माधव गुपचूप येऊन नवीन कोरं गुलबक्षी रंगाचं पातळ ठेवून जातो. 'तुझ्या या लाडक्या भावाने गाणं संपायच्या आत पातळ आणलेलं आहे तायडे', टाईप चिठ्ठी सोडून जातो.
पुन्हा निफुला राग येतो (याला दुसरं येतंच काय). ही पोटुशी होते तर निफु संशय घेतो हे लेकरू 'भरल्या वांग्याचं' आहे म्हणून. मग निफु हिला मारायला जातो, शेजारच्या काकू म्हणतात 'हे लेकरू तुझंच आहे, वांग्याचं नाही. पाटील नालायक आहे, ही तर पवित्र 'कमल' आहे'. एका क्षणात तो शहाणा, समजदार होतो व घराची किल्ली मानाने तिला देऊन कुलूप लावतात. ते गाव सोडून निघून जातात. आनंदी 'टिडिंग टिडिंग' वाजून सिनेमा संपतो.
#दोनतासकुठंहोताकाकू
खऱ्या व्हिलन काकूच आहेत. त्यांनीच प्रेक्षकांचा लाक्षणिक अर्थाने आणि सिनेमाचा शब्दशः अर्थाने अंत बघितला. दोडकं द्यायला आल्या तेव्हा सांगितले असते तर शॉर्ट फिल्म झाली असती.
श्रद्धा, 'अंगाई' अमेरिकेत
श्रद्धा, 'अंगाई' अमेरिकेत नाही उपलब्ध. मला रेंट द्या म्हणतेय<<<<
तू 'बंदिवान...' पॉप्युलर केलास, मग तो एकदम ट्रेंड व्हायला लागल्यावर अमेरिकन प्राईमवाले जागे झाले. आकाचे माहात्म्य त्यांना जाणवले व त्यांनी लगेच 'अंगाई' रेंटल केला.
#इंटरनॅशनलक्रशअर्थातक्याहुस्नहैमेरेआका
अरे, काय ..... मी एकटीच हसतेय
अरे, काय ..... मी एकटीच हसतेय
माबोचं हे मला आवडतं.... कोणता धागा कधी कसा धमाल पळायला लागतो सांगता येत नाही
जावयाची जात हा सुद्धा मी खेड्यात तंबूत पाहिलेला आहे... कु.प.ची ती भूमिका तेव्हा फार फेमस झाली होती..... त्यानंतर थेट "परमवीर बोलतोय!" (कु.प.च्या आवाजात हे इमॅजिन करून बघा.)
अंगाई सिनेमा आता बघावा लागणार... त्यातली २ गाणी तेवढी छान आहेत.
लोकहो,
लोकहो,
काल चुकून उमेश भेंडे असं लिहीले गेले. त्यांचं खरं नाव आहे प्रकाश भेंडे ( भालू फेम). त्यांच्या बायकोचं नाव उमा असल्याने उमेश भेंडे हे सुद्धा बरोबरच आहे.
काल नणंद भावजय शोधला पण सापडला नाही. रविराज सर्च दिला तर जावयाची जात समोर येतो.
पण आयएमबीडी ने सुधीर दळवी, रविराज, नयन भडभडे (रीमा लागू) ही नावे सांगितली. म्हणजे सिनेमा बरोबर आहे. चक्क व्ही शांताराम प्रतिष्ठान प्रेझेंटस असा उल्लेख आहे.
लहान असताना पाहिलेला पण स्मरणशक्ती चांगली आहे असे प्रमाणपत्र स्वतःचे स्वतःला देऊन टाकले.
धमाल चालली आहे इथे
धमाल चालली आहे इथे
फुलपाखरांच्या सहलीच्या चित्रपटातही जावयाची जात मधलीच मंडळी आहेत. रीमा नाही, पण तिची आई आहे.
दिग्दर्शकही तोच आहे. कमलाकर तोरणे. हे मिस्टर पद्मा चव्हाण. यांनी पद्माविरुद्ध कोर्टात / पोलिसात केस केली होती.
. यांनी पद्माविरुद्ध कोर्टात
. यांनी पद्माविरुद्ध कोर्टात / पोलिसात केस केली होती. >>> खालचा सिनेमा बहुतेक अनुभवातून काढलेला असेल.
निंबोणीच्या झाडामागे गाण्यात
निंबोणीच्या झाडामागे गाण्यात 'जगावेगळी ही ममता' ओळ ऐकल्यावर दुसर्या खोलीत धुंदीत, मस्तीत जगण्यात बिझी असलेली बाळाची आई मोठ्या आवाजात ओरडून 'ममता नाही, मी नयनतारा आहे' सांगेल असं वाटतं.
ते धु.म.ज.सीन्स मराठी पिक्चरच्या मानाने एकदमच इरॉटिक आहेत.
उमा भेंडे - प्रकाश भेंडे
उमा भेंडे - प्रकाश भेंडे म्हणजे तोच सिनेमा ना, ज्यात उभेंला सारखं वाटत असतं की आपण मरणार आहोत आणि ती स्वतःच्या बहिणीचं (कांचन अधिकारी आहे बहुतेक ती) नवर्यासोबत - प्रभेंसोबत सेटिंग लावायला जाते. डोक्यावर हात मारू संकल्पना आहे ही! ह्या सिनेमातही भरभरून रोस्टत्व आहे.
असा सिनेमा असेल आणि कांचन
असा सिनेमा असेल आणि कांचन अधिकारी , तर तो खूप नंतर आला असावा. कधी ऐकलं नाही. उमा आणि प्रकाश भेंडे म्हणजे भालू. यात नाना पाटेकर व्हिलन आणि भालू कुत्रा हीरो.
शिवाय प्रकाश भेंडे हिरो असलेला आणखी एक सिनेमा आहे. नायिका जयश्री टी. त्यात माय डिअर चांदणी हे निळू फुलेंना मांडीवर चांदणी वाटतं.
<डोक्यावर हात मारू संकल्पना आहे > या संकल्पनेवरचे तीन चित्रपट आठवले. त्यात बहिणीबरोबर नाही, पण दुसर्या स्त्री / पुरुषाबरोबर सेटिंग आहे. आणखी एका चित्रपटात एक बहीण वेडी होते आणि तिची जागा जिजाजीवर आधीपासून लाइन मारणारी साली घेते.
नवीन Submitted by हरचंद पालव
नवीन Submitted by हरचंद पालव on 13 September, 2023 - 09:41 >> प्रेमासाठी वाट्टेल ते
हां बरोबर. माझ्या मते त्याचं
हां बरोबर. माझ्या मते त्याचं नाव नुसतं 'वाट्टेल ते' असायला हवं होतं.
आमदाराच्या पंचवार्षिक
आमदाराच्या पंचवार्षिक संकल्पनेतली कूपनलिका
प्रायोगिक अंगाई
>>> फारएण्ड
त्या अंगाईत आका असंही म्हणतात ‘तुझे दुःख घेण्यासाठी, केली पदराची झोळी’
कसलं दुःख? शेजारच्याच रुममधे आहे त्याची आई. कुठे मंगळावर नाही गेली त्याला टाकून. आणि ही ओळ म्हणत असताना ते मुल मस्त हातपाय हलवतेय.
रोस्टत्व या शब्दाबद्दल हपांचे
रोस्टत्व या शब्दाबद्दल हपांचे आभार.
न्यूटन च्या आधीही फळ खालीच पडत होते, पण कार्यकारणभाव सांगता येत नव्हता. तसंच आधीही अदमासे रोस्ट चालूच होते. आता पिसं काढण्यासाठी नेमके कोणते सत्व असावे हे नक्की झाले. गुरुत्वाकर्षणाच्या शोधासारखाच हा शब्द अनमोल ठेवा आहे.
रोस्टत्वाचे तीन नियम आणि फॉर्म्युले मागोमाग येतीलच.
आगायाया
आगायाया
हसून हसून बेजार झालो की
काय धागा, काय अब्यास एकेकाचा.
माबोकर भारी आहेत.
कोळशाच्या खाणीतून रत्न बाहेर काढतात
बंदिवान धागा बंदीमुक्त केला धागा लेखिकेने त्यामुळे अजून जोर आलाय धाग्याला.
दाखवताना मुलगी अलका कुबल
दाखवताना मुलगी अलका कुबल दाखवायची आणि लग्नात आंतरपाटाच्या पलिकडे राखी सावंतला उभी करावी असं झालेलं. >>>
वर झबलं आणि खाली पायघोळ पलाझो
वर झबलं आणि खाली पायघोळ पलाझो. सगळ्यात वैताग म्हणजे शर्टाची बटणं फक्त शेवटची दोन लावलीत. >>> ऑ! कोणी?
माबोवरच्या दोन सुप्रसिद्ध
माबोवरच्या दोन सुप्रसिद्ध अंगाया - पहिली गानू आजींची आणि आता ही आशा काळेताईंची.
हे सुधीर दळवी पप्पा भलतेच
हे सुधीर दळवी पप्पा भलतेच रंगात येऊन मुलीला विचारतात " काय मग आमच्या जावई बापूंनी बँकेत खातं उघडलं कि नाही ?" >>> कहर आहे.
म्हणजे मटा किंवा लोकसत्तेच्या "युवा स्पंदन" टाइप पुरवणीतील तरूणांची कल्पित मराठी Happy "फ्रेण्ड्स मी आज तुम्हाला माझ्या व्हेकेशनचा प्रोग्रॅम सांगणार आहे" ई. >>>
'मायबोलीवरचे धमाल धागे'वर टाकते हा धागा. जोरात सुरू आहे.
रोस्टत्व >> हा शब्द
रोस्टत्व >> हा शब्द सोडत्ववरून सुचला. त्यामुळे मूळ आभार अनु यांचे मानायला हवेत.
शीर्षक बदलल्यामुळे अनधिकृत
शीर्षक बदलल्यामुळे अनधिकृत बांधकामे अधिकृत करतात तसा अनुभव आला.>>
सुटलेत सगळे... फुल टू धम्माल
सुटलेत सगळे... फुल टू धम्माल चाललीये..... अजून येऊ द्या.
मला अजून बंदिवान बघायलाच मुहूर्त मिळत नाहीये....
माझा नाही माझा नाही सोडत्व
माझा नाही माझा नाही सोडत्व शब्द.(इदं न मम)
मी पण ऐकला आहे.
अरे बंदिवान ची चर्चा हीच का
अरे बंदिवान ची चर्चा हीच का ती? अंगाई वर आली वाटतं.
रोस्ट यज्ञ जोरात पेटला आहे जमेल तशी मी सुद्धा आहुती घालतो
बादवे अंगाई वरून असेच कुठे कुठे फिरवून आणणारी अजून एक रिक्षा प्लाटफॉर्म नंबर 66981 वर लागलेली आहे
https://www.maayboli.com/node/66981
हे सामुदायिक रोस्ट वगैरे नाव
हे सामुदायिक रोस्ट वगैरे नाव अगदी साधंसुधं वाटतंय पण!
सतीचं वाण घेतलेल्या सासुरवाशिणीच्या माहेरची माणसं
किंवा
बंदिवान कमलने बाळाला जोजवताना अंगाई म्हटली तरी वैतागणाऱ्या जावयाची जात
असली नावं पाहिजेत.
काळजी मिटली.
काळजी मिटली.
साहेबांनी परवानगी दिली.
सतीचं वाण घेतलेल्या
सतीचं वाण घेतलेल्या सासुरवाशिणीच्या माहेरची माणसं
>>>> मी याला जोरदार अनुमोदन देते अध्यक्ष महोदय....
>>>>>सतीचं वाण घेतलेल्या
>>>>>सतीचं वाण घेतलेल्या सासुरवाशिणीच्या माहेरची माणसं
अगदी अगदी, माझाही बाहेरुन पाठिंबा
एक राहिलं.
एक राहिलं.
सतीचं वाण घेतलेल्या सासुरवाशिणीच्या नणंद भावजयीच्या माहेरची माणसं
बंदिवान कमलने बाळाला जोजवताना
बंदिवान कमलने बाळाला जोजवताना अंगाई म्हटली तरी वैतागणाऱ्या जावयाची जात>> अरे पण स्केलेबिलिटीचा विचार करा. अजून बरेच पिक्चर यायचेत. गल्लेवाल्यांना शीर्षकाचा एफेसाय तिप्पट-चौपट वाढवून द्यायला लागेल
धन्यवाद अश्विनी ९९९.
धन्यवाद अश्विनी ९९९.
-------
सगळेच
ही काही कापून कोंड्याची गोष्ट नाही, नाही तर मला
'सतीचं वाण घेतलेल्या बंदिवान सासुरवाशिणीच्या नणंद भावजयीच्या माहेरची माणसं जेव्हा लागली छळू तेव्हा काय हो चमत्कार धावून आली कुलस्वामिनी अंबाबाई पण ही विसरली नाही जोजो आणि अंगाई' हे नाव आवडलं असतं.
असली नावं पाहिजेत. >>> +१
असली नावं पाहिजेत. >>> +१ यातील कोणतेही चालेल पण "सतीचे वाण..." ला आपले मत.
Pages