बंदिवान मी ह्या संसारी
आशा काळे, निळू फुले, लता अरुण , मोहन कोटिवान, लीला गांधी, माया जाधव.
दिग्दर्शक -अरुण कर्नाटकी
१९८८
आशा काळे(कमल) लहानपणी प्रिया अरुण असते. प्रिया अरुणची सख्खी आई लता अरुण तिची सावत्र आई झाली आहे. बाबा आधी आजोबा वाटू लागले होते . पण प्रिया मोठी होऊन आशा झाल्याने ते नंतर लेव्हल मेकप झाले. आई लहानपणापासून छळते, बालमित्र अचानक काढता पाय घेतो. सावत्र आईला हिला उजवायचं पडलेलं असतं. गरिबीमुळे निळू फुलेशी लग्न होते, तो आईबाबाला पंधराशे रुपये देऊन हे लग्न जमवतो. निफु एक 'गुरू' नावाचा गरीब, कोपिष्ट व मूर्ख भटजी असतो. त्याच्या कानशिलावरल्या नकली-स्टिकर टकलाची सुद्धा वाळवणासारखी पापडं निघत असतात.
मग गावातला एक पाटील टाईप माणूस तिच्यावर वाईट नजर ठेवतो. याची नजर इतकी वाईट आहे की हा सतत डोळे आल्यासारखा दिसत होता. मग हा तिचं जे काही बघत असतो, ते आपल्यालाही बघावं लागतं, हळूहळू आपणही पाटील होतो. नववारी पातळ किती revealing असू शकते हे मला आता कळले. गरीबाची पण 'लस्ट स्टोरी' ;)..!
या सगळ्यात गावात हातात कादंबरी घेऊन नेहरू शर्ट-पायजामा घालून इकडंतिकडं फिरणारा माधव (खर्शीकर) हिला विहिरीतून ओलेती वगैरे बाहेर काढतो, नंतर भरल्या वांग्याची भाजी खायला येतो. लाल डोळ्याचा पाटील म्हणतो माधव आणि कमलचं लफडं हाय. निळू त्यांच्यावर विश्वास ठेवतो व तिची निर्भर्त्सना करतो. ती सवाष्ण म्हणून पाटलाकडं जेवायला जात नाही, तर तो घरी येऊन छेडतो. मग शेजारच्या काकू दोडकं घेऊन येतात. पाटील पुन्हा निफुचे कानं फुंकतात. नंतर काकू जत्रेत 'जाऊन या ' वगैरे सांगायला येते. तिथेही पाटील निफुला कटवून हिला बैलगाडीत घेतो व इकडंतिकडं हात फिरवायला बघतो. दुसऱ्या गावी बालमित्र/एक्स म्हणतो की याची नजर चांगली नाही. घ्या आता..!
बालमित्र जो कोणी आहे ज्याच्यासोबत गातगात ती पाच मिनिटांत मोठी होते , तो मूर्तिमंत 'दगड' आहे. ह्यांच्या लहानपणीच्या गप्पा बघून पुन्हा पाटील निफुला म्हणतो की हिचं चारित्र्य बरं नाही, कधी माधव - कधी एक्स.
निफु म्हणतो, 'तू पातळी सोडली आहेस. आता मी काही तुला पातळं घेऊन देणार नाही '. मग ती म्हणते की 'मी नागवी बसेन, नको तुमची पातळी आपलं पातळं'. अचानक सत्तावीसावं रडकं गाणं सुरू होतं व संपेपर्यंत पातळ फाटते सुद्धा. माधव गुपचूप येऊन नवीन कोरं गुलबक्षी रंगाचं पातळ ठेवून जातो. 'तुझ्या या लाडक्या भावाने गाणं संपायच्या आत पातळ आणलेलं आहे तायडे', टाईप चिठ्ठी सोडून जातो.
पुन्हा निफुला राग येतो (याला दुसरं येतंच काय). ही पोटुशी होते तर निफु संशय घेतो हे लेकरू 'भरल्या वांग्याचं' आहे म्हणून. मग निफु हिला मारायला जातो, शेजारच्या काकू म्हणतात 'हे लेकरू तुझंच आहे, वांग्याचं नाही. पाटील नालायक आहे, ही तर पवित्र 'कमल' आहे'. एका क्षणात तो शहाणा, समजदार होतो व घराची किल्ली मानाने तिला देऊन कुलूप लावतात. ते गाव सोडून निघून जातात. आनंदी 'टिडिंग टिडिंग' वाजून सिनेमा संपतो.
#दोनतासकुठंहोताकाकू
खऱ्या व्हिलन काकूच आहेत. त्यांनीच प्रेक्षकांचा लाक्षणिक अर्थाने आणि सिनेमाचा शब्दशः अर्थाने अंत बघितला. दोडकं द्यायला आल्या तेव्हा सांगितले असते तर शॉर्ट फिल्म झाली असती.
ह्या पिक्चर चा ऍंग्री यंग मॅन
ह्या पिक्चर चा ऍंग्री यंग मॅन सतीश दुभाषी आहे. ते लिटररी संतापलेल्या अवस्थेत आशा काळे ला बघायला येतात आणि आपल्या लग्नासंबंधीच्या अटी सांगतात. तो मघाचा फजिती वाला लहान भाऊ चिडुन विचारतो 'तुम्हाला बायको हवी आहे की मोलकरीण?" तर हे उत्तर देतात दोघी एकाच वेळी घरात आणण्याइतकी माझी आर्थिक परिस्थिती नाही त्यामुळे एकीलाच दोघींचीही कामे करावी लागतील!" इतकी जबरदस्त पुर्वतयारी त्यांनी करून दिल्यामुळे आशा काळे त्यांच्या होम पीचवर जातात, म्हणजे लंपन ह्यांनी वर्णन केलंय तसं पाचवारीतुन नौवारीत जाऊन पदर तोंडांत कोंबुन रडणे. >>>>>झकास
मित्राच्या मुलाला घरात
मित्राच्या मुलाला घरात शिकायला ठेवणे इतपत ठीक आहे. पण ममव घरात दोन तरुण वयातील मुलांना इतकी जवळीक साधू देतात? तो आंघोळ करून बाहेर आल्यावर ती त्याचे कपडे देते यात घरातल्या कुणाला काही वाटत नाही? त्यांच्याकडे भोचक काकू, मावश्या, आत्या वगैरे नसायच्या का?
#नॅशनलक्रशअर्थातक्याहुस्नहैमे
#नॅशनलक्रशअर्थातक्याहुस्नहैमेरेआका >>>>>>>>>>>> ह ह ह
ही आपल्याकडे बघत काय काय बोलते आहे आणि आपली राधिका शेजारीच बसली आहे हे लक्षात येऊन विक्रम गोखलेचं ब्लड प्रेशर वाढल्याचं स्पष्ट कळतंय. >>>> हा हा हा
अनु!
अनु!
एकुणात "तुम्हाला बायको हवी आहे की मोलकरीण?" हे वाक्य...बाळा गाऊ कशी.. मधे वेग वेगळ्या वेळी येतं असे दिसते .
१. विगो बाथरुम मधून बाहेर आल्यावर - नयन ताराच्या तोंडी !
२. आका च्या भावाच्या तोंडी ! (सतीष दुभाषी आधीच आशा काळेला आपली वाग्दत्त वधू बघून जबरदस्त संतापलेले आहेत...!! त्यामुळे त्यांना वाटते की अटी घातल्या तर एखाद वेळेस ही ब्याद गळ्यात पडणार नाही!!)
अफाट सुटलाय हा धागा
अफाट सुटलाय हा धागा
सतीश दुभाषी जबरदस्त संतापलेले
सतीश दुभाषी जबरदस्त संतापलेले, रागारागाने आशा काळेला पाहायला येतात, हे तीन चार वेळा वाचून शेवटी मी तो 'अँग्री ओल्ड मॅन' पाहून आले. आशाने थोडा थोडा करत हाही सिनेमा पूर्ण पाहून होणार की काय?
श्रद्धा..
श्रद्धा..
आम्हाला 'आशा' आहे की तू ह्या सिनेमावर परीक्षण लिहीशील!
(सतीष दुभाषी आधीच आशा काळेला
(सतीष दुभाषी आधीच आशा काळेला आपली वाग्दत्त वधू बघून जबरदस्त संतापलेले आहेत...!! त्यामुळे त्यांना वाटते की अटी घातल्या तर एखाद वेळेस ही ब्याद गळ्यात पडणार नाही!!) >>>> ह ह ह हा हा हा हा हा हा
अरे धागा काय , विषय काय,
अरे धागा काय , विषय काय, चर्चा काय ???
आता कोणीतरी लगे हाथ थोरली जाऊ आणि धाकटी सून पण बघून घ्या आणि लिहा
स्त्रीचं वाण आधी पहा. तो जुना
सतीचं वाण आधी पहा. तो जुना आहे.
किती सांगू मी सांगू कुणाला
अरेरे काय चाललंय काय.... ??
अरेरे काय चाललंय काय.... ??
बरे झाले की माझी आई फार पुर्वी गेली. नाहीतर आशा काळेवरच्या कॉमेंट वाचून तिने मला बदडलेच असते हे असले काय वाचतोस म्हणून. माझ्या आईची फेवरेट होती (आठवा माझा पुर्वीचा प्रतिसाद ज्यात आईने मलाही कुलस्वामिनी अंबाबाई बघायला नेले होते)... लिहीणार तुम्ही मार मात्र मला..!!
प्रतिक्रिया वाचून हसून खरोखर डोळ्यात पाणी आले. पण त्या पाण्यात थोडाफार वाटा माझ्या आईच्या हळवेपणाचा व भाबडेपणाचा पण होता.
(अजून 20 वर्षांनी आपली मुलं
(अजून 20 वर्षांनी आपली मुलं त्या काळच्या हवेत बघून मनाने विचार उमटवायच्या मायबोलीवर लिहीत असतील. "आणि माहिताय का, त्या बाईने चक्क मांडीच्या खाली येईल असा ड्रेस घातला होता.हाऊ फनी अँड ओल्ड फॅशनड!! अँड माय परेन्ट्स यु नो, युजड टू लव्ह दॅट विअर्ड ड्रेसड आंटी कॉल्ड क्रिती सेनॉन अँड दीपिका! )
त्या काळच्या हवेत बघून मनाने
त्या काळच्या हवेत बघून मनाने विचार उमटवायच्या मायबोलीवर >>>
ऑफिस जवळ पडत असेल >>>
पण त्या पाण्यात थोडाफार वाटा
पण त्या पाण्यात थोडाफार वाटा माझ्या आईच्या हळवेपणाचा व भाबडेपणाचा पण होता.
>>> तुम्ही लकी आहात
चोळी मागणाऱ्या भूताचा पंचनामा
चोळी मागणाऱ्या भूताचा पंचनामा झाला असेल तर गृहकृत्यदक्ष भूत पण पाहून घ्या मंडळी. हे भूत मेल्यावरसुद्धा आधी ट्रेन पकडून घरी येतं. सगळा स्वयंपाक करतं. तो नवऱ्याला आपल्या हातांनी भरवतं. मुलाला अंगाई गाऊन झोपवतं. आणि मगच पुढच्या प्रवासाला निघतं. नाहीतर आजकालच्या मुली. साधं डोकं दुखत असलं तरी नवऱ्याला स्विगीवर ऑर्डर द्यायला सांगून झोपून देणाऱ्या!
(नवऱ्याचं सुद्धा बायकोवर किती प्रेम पहा. काही वेळापूर्वीच आई त्याच्यावर चिडून कायमची पंढरपूरला निघून गेलेली असते. तिला परत आणायला जायचं सोडून हा 'घरातली मांजर पळून गेली' सांगावं इतक्या सहजपणे आई पंढरपूरला गेली म्हणून सांगतो. मग बायकोला जेवण भरवतो. हेच पाचेक मिनिटांपूर्वी स्वयंपाकघरात असलेली बायको दिसत नाही तर माणूस बेडरूम, बाथरूममध्ये, परसात, शेजारीपाजारी शोधेल की नाही? तर हा 'किचनमध्ये नाही म्हणजे माहेरी असणार', असं बरोब्बर ओळखून तडक तिथे पोहोचतो)
चित्रपट- बाळा जो जो रे
घरातली मांजर!!लोल.
घरातली मांजर!!लोल.
भूताला प्रवास करायला ट्रेन का लागते बरं.
प्रेक्षकहो,
प्रेक्षकहो,
आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळेच आम्ही चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण थिएटर मधे असाच प्रतिसाद द्याल ही खात्री आहे.
आपलेच निर्माते
बंदीवान मी या संसारी
आणि
काय हो चमत्कार
काही माणसांना जशी बोट / बस
काही माणसांना जशी बोट / बस लागते तसेच काही भूतांना apparition /floo network लागत असावे, पण ट्रेन लागत नसावी, म्हणुन ट्रेन पकडत असतील.
माहेरी जायला ट्रेन हाच बेस्ट
माहेरी जायला ट्रेन हाच बेस्ट ऑप्शन असतो उषाकिरणकडे. या ट्रेन चुकण्यामुळेच सगळा राडा होतो. पुढची ट्रेन दोन तासांनी आहे. तोवर एक रेप करून घ्यावा म्हणतो, असा उदात्त प्रस्ताव स्टेशनमास्तर की कोणीतरी असतो, तो ठेवतो. तर उकि तो नाकारतात. तर तो म्हणतो मी बाळाचा खून करीन. मग ती ट्रेन यायच्या आत काय ते पटकन आटपून घेऊ, या विचाराने आत येते. तेवढ्यात सासू तिला पकडते आणि घोळ होतो.
तरी या चित्रपटातला सर्वात भीतीदायक सीन मी लिहीलाच नाही. नातू झाल्याने इंदिरा चिटणीस जाम खूश झालेल्या असतात आणि नातवाचं सग्ग्गळं मीच करणार, असा फतवा सोडतात. उकि बाळाला अंघोळ घालायला येतात, तर या घालवून देतात. बाळाचा पाळणा आपणच हलवणार, बाळाबरोबर आपणच झोपणार. इथपर्यंत ठीक आहे, पण उकि जेव्हा त्याला पदराखाली घेते तेव्हा तिथूनसुद्धा त्याला खेचून काढतात. आता ही म्हातारी काय कुदरत का करिश्मा दाखवते या विचाराने मी धास्तावलो, पण सुदैवाने त्यांनी त्याच्या तोंडात बाटली दिली आणि मी सुस्कारा सोडला.
धाकटी सून मध्ये या दोन पिक्चर
धाकटी सून मध्ये या दोन पिक्चर इतकं मटेरियल नाहीये. पण तरी लिहिता येईल
उषा किरण कुठून आल्या आता?
आं ?
उषा किरण कुठून आल्या आता?
या धाग्यावर कुणीही कुठूनही
या धाग्यावर कुणीही कुठूनही प्रकट होऊ शकतं.
हा धागा आता सर्वव्यापी झाला आहे.
आं ?
आं ?
उषा किरण कुठून आल्या आता?>>>माहेरून
हम उधर 'जेलर' देखने क्या चले
हम उधर 'जेलर' देखने क्या चले गये आपलोगोनें अंगाई, जोजो सब देख लिया.
अरे, किती मस्त लिहिताय सर्वजण... आकादेवी जिवतीच्या फोटोत आहेत , आपण सगळी बाळं रांगत आहोत आणि ती हताश नजरेने आपल्याकडे बघतेय असं चित्रं आलं डोळ्यासमोर ....!
----------
योगी , सिनेमे फार महत्त्वाचे असतात. कारण ते एका काळाला बांधून ठेवतात. मग आपण ज्या व्यक्तींसोबत ते बघितले त्यांच्याशी आभासी का होईना कनेक्शन होतं. ते कनेक्शन कुठेतरी आश्वस्त करतं आणि सिनेमा कसाही असो आपल्याला मोकळं वाटायला लागतं.
ते कनेक्शन कुठेतरी आश्वस्त
ते कनेक्शन कुठेतरी आश्वस्त करतं आणि सिनेमा कसाही असो आपल्याला मोकळं वाटायला लागतं >>> हे असलं काहीतरी वाचून उपरोल्लेखित सिनेमे नाही पहिले तर आयुष्य व्यर्थ , रिकामं आहे असं वाटायला लागतं
आणि ते खरं आहे. बाई वॉच
आणि ते खरं आहे. बाईsss, वॉच पार्टीला या...
चलो वॉच पार्टी!
चलो वॉच पार्टी!
अशी एकदा माझ्या मैत्रिणीने आणि मी किशन कुमार वॉच पार्टी केली होती त्याची आठवण आली
माझ्या मैत्रिणीने आणि मी किशन
माझ्या मैत्रिणीने आणि मी किशन कुमार वॉच पार्टी केली होती >>> विदाउट मी?
योगी - अरे आपल्या आधीच्या पिढीला कदाचित यातील अनेक गोष्टी अगदी स्वाभाविक वाटतील. बायकोने कपाटातून कपडे काढून ठेवणे वगैरे. आता ते बघायला खूप ऑड वाटते. पण यातले अनेक पिक्चर्स हिट्ट होते तेव्हा त्या पिढीला आका आवडत होती यात काहीच वाद/आश्चर्य नाही ती पिढी भाबडी होती असेही मी म्हणणार नाही. तेव्हाच्या पिक्चर्स मधे जी गृहितके धरलेली असतात ती आता भाबडी वाटतात. आत्ताच्या पिक्चर्समधली गृहितके पुढच्या पिढीला भाबडी वाटतील. होपफुली
एक उदाहरण म्हणजे ७०ज मधे मनमोहन देसाईच्या पिक्चर्स मधे प्राणी लीड कॅरेक्टर्सच्या मदतीला येतात तेव्हा ते चालून गेले. पण हेच खूप नंतरच्या "इन्सानियत" मधे आले तेव्हा आख्खे थिएटर चेष्टा करत होते म्हणजे ७०ज मधे लोक भाबडे होते असे नाही. त्या सीन्सची नॉव्हेल्टी होती. पण एक दोन वेळा तेच सीन दिसले की नंतर मग पब्लिक त्याची चिकित्सा करू लागते. त्यातील हास्यास्पदता किंवा इथे आकाच्या रोल्सच्या बाबतीत ते "रिग्रेसिव्ह" असणे जाणवू लागते.
फा, तुला बच्चन सोडून कोणी
फा, तुला बच्चन सोडून कोणी दिसत नाही. तू किशन कुमार वॉच पार्टी कशी केली असतीस? म्हणून लक्षात नाही आलं
rmd
rmd
'जो जीता वोही सिकंदर' या सिनेमातला 'तेरी हलकीफुलकी पप्पी पप्पा के बराबर होती है' हा डायलॉग या ओळीवरून प्रेरित असावा. >>>
हळुवार स्पर्शातील पॉवर >>> फारएण्ड फोकस्ड आहे एकदम >>> खरे म्हणजे आकाच फोकस्ड आहे एकदम.
तो काय तिरंगा आहे का, >>>
पण लग्न झाल्यावरही तो तिथेच का राहतो हे आत्ता आठवत नाही. >>> हो त्याचे कारण दिलेले नाही. पण दोघेही तेथे जाउन राहतात. दुसरे म्हणजे अलकाने त्याला लग्न करायला तार करून का बोलावून घेतले त्याचा खुलासा होत नाही.
बाय द वे मी अतिशयोक्ती म्हणून कॉमेण्ट केलेली एक गोष्ट आका खरोखरच करते यात. मागच्या पानावर हे लिहीले होते:
मला वाटले आता आका घुसून ते कपडे (कपाटातून) काढते की काय कारण ती एरव्हीही विंगेत उभी असल्यासारखी तेथेच पडद्यामागे अनेकदा उभी दाखवली आहे
फक्त एक दिवस विगो च्या आंघोळीच्या वेळी ती अलका डॉक्टरकडे गेलेली असते तर तेवढ्यात ही त्यांच्या रूम मधे घुसून कपाटातून विगोचे कपडे काढून तेथे लावून ठेवते. आता स्टॉकिंगच्या लेव्हलला जाऊ लागली आहे असे वाटू लागले. पण नंतर अलकाला मुलगा झाल्यावर अलकाने तिची एकदम "आत्या"च करून टाकली.
कोणती बायको मोलकरणीला आपल्या नवर्याचे कपडे निवडायचं काम देईल आणि आंघोळ करून बाथरूम मधून बाहेर येताना तिथे कपडे घेऊन उभे रहायला सांगेल. >>> हो ना. उगाच कपडे घेताना हळुवार स्पर्श वगैरे व्हायचा.
Pages