Submitted by रघू आचार्य on 10 September, 2023 - 00:05
एकदा हॉस्टेल वर दोन मुलं रात्री उशिरा आली. सीनियर पोरांनी विचारलं उशीर का झाला?"
त्यातला एक जण म्हणाला "शोले बघायला गेलो होतो"
पुन्हा सीनीयरने विचारलं "का ?"
दुसरा मुलगा म्हणाला " अजून पाहिलेला नाही म्हणून गेलो होतो"
तर त्या सीनीयरने उठाबशा काढायला लावल्या.
म्हणाला " शोले किती वेळा पाहिला एव्हढंच सांगायचं होतं. अजून पाहिला नाही हे सांगायला लाज वाटत नाही का ?"
तात्पर्य शोले हा असा सिनेमा आहे कि कधीही बघा, कुठूनही बघा, त्यात गुंतून जातो आपण.
असे अन्य काही हिंदी, इंग्लीश, मराठी सिनेमे असतील तर लिहा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अंदाज अपना अपना
अंदाज अपना अपना
- बालिकाबधू
- बालिकाबधू
नवीन पदार्पण केलेल्या 'रजनी' चे सुंदर काम आहे. गोडवा आहे, निरागसता. असरानी व त्याची पत्नी यांच्या संबंधांसमोर हे रजनी व सचिनचे अबोध प्रेम छान उठुन दिसते. बंगाली वातावरण निर्मिती.
- जिस देश मे गंगा बहती है
आदर्शवादी आणि सशक्त चित्रपट-कथा आहे या सिनेमाची. राज कपूर-पद्मिनी-प्राण-ललिता पवार. दरोडेखोरांचा एकंदर गेट अप त्यांचे जीवन, रहाणीमान मस्त रंगविले आहे.
- दिलीपकुमाचचा आन' नावाचा चित्रपट
नादिरा एक मस्तवाल, उद्धट राजकन्येच्या रुपात छान वाटते. यातील 'मान मेरा एहसान, अरे नादान ...' गाणे आवडते.
टॉम हँक्स चे Castaway, Saving
टॉम हँक्स चे Castaway, Saving Private Ryan. अॅनिमेशनपटांत Toy Story 1, 2, 3. Cars 1, 2, 3. Lion King
वर 'जिस देश में' चा उल्लेख झालाच आहे, तर राज कपूरचाच 'आवारा'.
कास्ट अवे +१ Forrest Gump,
कास्ट अवे +१ Forrest Gump, Captain Phillips.
Saving Private Ryan आवडतो, पण परत बघावासा वाटत नाही. Life is beautiful सुद्धा.
शेरलॉक होम्स ( रॉबर्ट डाऊनी ज्यु. चा, पहिला..लॉर्ड ब्लॅकवूडवाला)
कुंग फू पांडा 1.
अशी ही बनवाबनवी, आमच्यासारखे आम्हीच, आयत्या घरात घरोबा वगैरे सचिनचे अनेक. संपूर्ण नाही बघितले तरी अधलामधला कुठलाही भाग चालतो.
हिंदीतला अक्षयकुमारचा 'बेबी' आवडतो.
- दिलीपकुमाचचा आन' नावाचा
- दिलीपकुमाचचा आन' नावाचा चित्रपट
छान वाटते नूतन आणि त्याची जोडी.
नादिरा एक मस्तवाल, उद्धट राजकन्येच्या रुपात छान वाटते. यातील 'मान मेरा एहसान, अरे नादान ...' गाणे आवडते : +1
यातला दिलीप कुमार ही मला आवडतो. खेळकर, मिश्कील आणि कमालीचा आत्मविश्वास असलेला तरुण. Sagali गाणी प्रचंड आवडतात. निम्मी बरोबरचे होळी che गाणे, आज मेरे दिल मे कोई बासुरी bajaye, आग lagi तन मन मे... नौशाद
अजून एक जुना परत परत पाहायला आवडतो तो म्हणजे देव आनंद आणि नूतन चा तेरे घर के सामने, ekdum हलका फुलका, यातला देव तिरका नसुन सरळ आहे, आणि बोलतो ही normally
वळू ऍजे देऊळ पण नेहमी बघतो
वळू
ऍजे देऊळ पण नेहमी बघतो
सुरूवात बच्चन पासून - सलीम
सुरूवात बच्चन पासून - सलीम-जावेद अमिताभ वाले जवळजवळ सगळे पिक्चर्स. कितीही वेळा, कोणतेही सीन. दर काही महिन्यांनी आख्खे सुद्धा पुन्हा बघतो. याशिवाय - अमर अकबर अँथनी, मुकद्दर का सिकंदर, मि. नटवरलाल ई.
हिंदी मधे इतरांचे - चक दे इण्डिया, दंगल, थ्री इडियट्स, भेजा फ्राय ई. आठवेल तसे अॅड करेन.
तिरंगा, परदेस, सौदागरही बघतो अधूनमधून. पण ते वेगळ्या कारणाने.
मराठीत एकेकाळी धूमधडाकाची पारायणे केली आहेत. बनवाबनवी आवडतो पण खूप वेळा पाहिलेला नाही. पिंजराही अनेक वेळा बघितला आहे. झेंडा, सैराट.
इंग्रजीत - ओशन सिरीज, जूरासिक पार्क्/वर्ल्ड सिरीज. अजूनही इतर आहेत.
दर वेळेस पाहताना काहीतरी इंटरेस्टिंग शोध लागणे हे यातील बहुसंख्य पिक्चर्सचे वैशिष्ट्य आहे.
नितळ, आम्ही दोघी हे दोन्ही
नितळ, आम्ही दोघी हे दोन्ही मराठी चित्रपट पुन:पुन्हा बघू शकते.
बाकी नेहमीचे यशस्वी - बनवाबनवी, हिंदी - दिल है के मानता नही, हम है राही प्यार के, अंदाज अपना अपना, इ..
जुन्यांपैकी सई परांजपे, हृषीकेश मुखर्जींचे बरेचसे.
सुरूवात बच्चन पासून - सलीम
सुरूवात बच्चन पासून - सलीम-जावेद अमिताभ वाले जवळजवळ सगळे पिक्चर्स. कितीही वेळा, कोणतेही सीन. दर काही महिन्यांनी आख्खे सुद्धा पुन्हा बघतो. याशिवाय - अमर अकबर अँथनी, मुकद्दर का सिकंदर, मि. नटवरलाल ई. >> +१
तिरंगा रॉकेटसचे फ्युज साठी अनेकदा पाहून झालाय.
क्रांतिवीर सुद्धा पाहिलाय.
गाईड दहा पंधरा वर्षांपूर्वी पहिल्यांदा पाहिला. त्यानंतर अनेकदा पाहिला. प्रत्येक वेळी वेगळा वाटला.
यादों कि बारात सुद्धा असाच अलिकडे पहिल्यांदा पाहिला. नंतर खूप वेळा पाहिला.
बेबी , अंदाज अपना अपना , MI
बेबी , अंदाज अपना अपना , MI series
पुन्हा पुन्हा पाहिले जाणारे
पुन्हा पुन्हा पाहिले जाणारे पेक्षा पहायला आवडतील्/कंटाळा येणार नाही असे माझ्याकरता-
हिंदी- दिल चाहता है
दिल धडकने दो
जिंदगी ना मिलेगी दोबारा
ऋषिकेश मुखर्जींचेही मस्त वाटतात.
ईंग्लिश- यु हॅव गॉट मेल,
कास्ट अवे
टर्मिनल
डेविल वेअर्स प्राडा
फ्यु गुड मेन
आणखीन बरेच आहेत पण नावं आठवायची नाहीत पटपट.
अंदाज अपना अपना
अंदाज अपना अपना
सागर
शोले
The pursuit of happiness ..
The Godfather I
MI iii
Speed
Johny English कुठलेही
जॉनी इंग्लिश रिबोर्न भन्नाट
जॉनी इंग्लिश रिबोर्न भन्नाट पिक्चर आहे.इंग्लिश मध्ये भाषेचे खेळ
'sir, I don't think he is a 'Suzane'"'
'yes ,but you are not chinese, are you? He is 'shou-shaan' in Chinese.
यात डॅनियल कलोया ने पण भारी काम केलंय.
कानून (राजेंद्र कुमार, अशोक
कानून (राजेंद्र कुमार, अशोक कुमार), इत्तेफाक (राजेश खन्ना), तेरे घर के सामने, सी.आय.डी., हमराज (सुनील दत्त, राजकुमार)
व्हिक्टोरिया नं. २०३, खेल खेल में (ऋषी कपूर), ज्वेल थीफ, ३६ घंटे (राजकुमार), वक्त, अनामिका, कारवां,
गोलमाल, रंगबिरंगी (अमोल पालेकर, परवीन बाबी), त्रिशूल, दीवार, शोले, सिलसिला, चुपके चुपके, अंगूर, बेरहम (संजीव कुमार, शत्रुघ्न सिन्हा),
खेल (अनिल कपूर, माधुरी दीक्षित, अनुपम खेर), लम्हे, जो जीता वो सिकंदर,
थ्री इडियट्स, रंग दे बसंती, चक दे इंडिया, बाजीगर,
यादी अपूर्ण आहे
मी वारंवार व कधीही पाहू
मी वारंवार व कधीही पाहू शकणारे चित्रपट:
दिल तो पागल हैं, चांदनी, गुपचूप गुपचूप, व आयत्या घरात घरोबा
(तसेच ह्या धाग्याचा विषय नसला तरीही मी वारंवार व कधीही पाहू शकणाऱ्या मालिका: हम पांच, श्रीमान श्रीमती, खिचडी, इन्स्टंट खिचडी, व साराभाई व्हर्सेस साराभाई)
वरचे बरेच बघतो परत. Happy new
वरचे बरेच बघतो परत. Happy new year पण. अभिषेक बच्चन पार्ट Fast forward करुन.
माझ्या यादीतले अनेक चित्रपट
माझ्या यादीतले अनेक चित्रपट वर आलेच आहेत. दिसले नाहीत असे
आँधी ( यातले संवाद पाठ झाले असतील), चलती का नाम गाडी , मुगल ए आझम, होम अलोने सिरी ज, बेबीज डे आउट, मिशन इम्पॉसिबल, तीसरी मंजिल, कारवाँ , भालजींचे शिवपट - मराठी तितुका मेळवावा, मोहित्यांची मंजुळा, ब्रह्मचारी (मास्टर विनायक) , सैराटमधले , सीता और गीता, सुगंधी कट्टा ,आनंद, खोसला का घोसला, हंगामा (अक्षय खन्नासाठी), गोंधळात गोंधळ. , इजाजत ( गुलजारचे बहुतेक सगळेच चित्रपट) , बुढ्ढा मिल गया. जेव्हा केबलवर सगळी चॅनेल्स ठेवली होती तेव्हा सर्फिंग करताना यातला कोणता चित्रपट दिसला तर त्या चॅनेलवर थांबायचो आणि काही वेळ का होईना पाहायचो.
दादा कोंडकेंचे चित्रपट फार लहानपणी पाहिले आहेत. तपशिलात आठवत नाहीत. पण त्यांना रिपीट व्हॅलू असेल असं आता वाटतं.
सई परांजपेंचं आत्मकथनपर पुस्तक वाचताना त्यांचेही काही चित्रपट पुन्हा पाहता येतील असे वाटले. - चश्म-ए-बद्दूर , स्पर्श, कथा
मी वारंवार बघितलेला एकमेव
मी वारंवार बघितलेला एकमेव चित्रपट म्हणजे 'अब तक छप्पन'. माझ्या मते, प्रामाणिक पोलीस इन्स्पेक्टरची आयुष्यात झालेली कुचंबणा अतिशय प्रभावीपणे दाखवली आहे. चित्रपटातील संवाद (डायलॉग्ज) पण छान लिहिले आहेत.
देऊळ बंद (गश्मीर महाजनी आणि
देऊळ बंद (गश्मीर महाजनी आणि मोहन जोशी) अगदी दर २-३ दिवसांनी पाहू शकतो.
तसेच अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर किंवा अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे (लक्ष्या) या जोडगोळ्यांचे चित्रपट
अशी ही बनवाबनवी
अशी ही बनवाबनवी
आमच्यासारखे आम्हीच
माझा पती करोडपती
एकापेक्षा एक
लपंडाव
सवत माझी लाडकी
शेजारी शेजारी
एक डाव धोबीपछाड
वीराना
बंद दरवाजा
अंदाज अपना अपना
बादशाह
स्वदेस
ओम शांती ओम
चेन्नई एक्स्प्रेस
हॅपी न्यू यर
जाने तू या जाने ना
I hate love storys
Home alone 1 , 2 , 3
You've got mail
Harry met sally
-मौसम -आंधी मुझे जीने दो
- मौसम. मौसमची कथा फार विचित्र आहे. गुलझार यांची गाणी इतकी सुंदर आहेत.
- आँधी. भरत यांनी चांगली आठवण करुन दिली. - इन्दिरा गांधी व फिरोझ गांधी यांच्यावरती बेतलेला सिनेमा आहे असे म्हणतात ना!
- मुझे जीने दो - आहाहा - https://www.youtube.com/watch?v=lwEafnkFo7Y - रात भी है कुछ भीगी भीगी. वहिदा काय गोड दिसते. सुनिल दत्त तर आवडतोच. गाण्याचे बोल किती गोड.
तपते दिल पर यूँ गिरती है. तेरी नज़र से प्यार की शबनम.
जलते हुए जंगल पर जैसे. बरखा बरसे रुक रुक थम थम.
- चलती का नाम गाडी - या सिनेमाबद्दल काय बोलायचं
गुलाल
गुलाल
गँग्ज ऑफ वासेपूर
शिवा
सरफरोश
दिल चाहता है
हम दिल दे चुके सनम
सरफरोश, शेजारी शेजारी, सवत
सरफरोश, शेजारी शेजारी, सवत माझी लाडकीला +१
अजून एक म्हणजे प्यार तो होना ही था. अजय देवगण, काजोल, ओम पुरी.
शेजारी शेजारीमध्ये एका सीनमध्ये सोफ्यावर अशोक सराफ बसलेला असतो आणि त्याच्या बाजूला निशिगंधा वाड धपकन बसते, तेव्हा अशोक सराफ बॉलचा टप्पा पडतो तसा सोफ्यावरून उचलला जाऊन परत बसतो. हा अभिनय त्याने ऐनवेळेस केला असणार असं वाटतं कारण वर्षा उसगावकरला हसायला आलेलं स्पष्ट दिसतं. एरवी तो सीन विनोदी नसतानाही. परत परत सिनेमा बघताना लागलेला हा शोध आहे.
प्यार तो होना ही था:: हा
प्यार तो होना ही था:: हा चित्रपट ज्याच्यावर बेतला आहे (म्हणजे सीन to सीन कॉपी) तो Kevin cline आणि Meg Ryan cha फ्रेंच kiss movie माझ्या करता repeat value. बर्याच दिवसांनी आठवला आता शोधला पाहिजे. आणि त्यावरून केविन cline, jamie lee Curtis, John Cleese cha fish called Wanda सुद्धा आठवला.
पहिला छान हलका फुलका रोमँटिक आणि दुसरा कडेलोट विनोदी.
French kiss >> ओह हे माहिती
French kiss >> ओह हे माहिती नव्हतं. बघायला हवा.
भेट , वास्तुपुरुष, घो मला असला हवा, हंगामा, हलचल (अगदी सगळा नाही पण मधला बराचसा भाग मस्त आहे).
हृषिकेश मुखर्जींचे काही
हृषिकेश मुखर्जींचे काही चित्रपट - खूबसूरत, गोलमाल , चुपके चुपके (यातला अमिताभ नाही आवडत) ओमप्रकाशसाठी
मला काही वेळा संपुर्ण चित्रपट
मला काही वेळा संपुर्ण चित्रपट परत परत पहाण्यापेक्षा त्यातले काही प्रसंग परत परत पहायला आवडतात..
बाजीगर, अनाडी, जुदाई - जॉनी लिव्हरचे कॉमेडी सिन्स
वक्त (जुना - जोहराजबी वाला) - शेवटचा कोर्ट सिन ज्यात सुनिल दत्त, राजकुमार व शशिकपूर यांना त्यांचे आई वडील भेटतात.
३ इडीयट - शेवटचा सिन
आखरी रास्ता - अमिताभ आपल्याच बापाची वेष करून अनुपम खेरला फसवतो. ह्या सिन मध्ये दोघांचाही अभिनय फार छान आहे.
असे बरेच सिन्स आहेत..
झपाटलेला १, पछाडलेला, अग बाई
झपाटलेला १, पछाडलेला, अग बाई अर्रेच्या, जत्रा, गम्मत जम्मत
ICE Age - all parts
Harry Potter चे सुरवातीचे ३ भाग
Madagascar सर्व भाग
प्रभात चे बहुतेक सर्व
प्रभात चे बहुतेक सर्व
जाने भी दो यारो
व्ही शांताराम यांचा दो आखे बाराह हाथ
हृषिकेश मुखर्जींचे बहुतेक सगळे बावर्ची, आनंद, खूबसूरत, गोलमाल, चुपके चुपके
मैत्री आणि प्रवास ही मध्यवर्ती संकल्पना असलेले फरहान झोयाचे दिल चाहता है, जिंदगी ना मिलेगी दोबारा, दिल धडकने दो
अयान मुखर्जीचा 'ये जवानी है दिवानी' वगैरे
अजून एक अत्यंत आवडता सिनेमा म्हणजे आमिर नासिरुद्दीन अभिनित, जॉन मॅथ्यु मॅथन दिग्दर्शित सरफरोश
डोण्ट माईंड
फिर किसी सलीम से मत केहना की ये मुल्क उसका घर नही है
दस नही दस हजार मिलेंगे
क्या ठाकूर तुझे कितनी बार बुलाया तू आताईच नही.
मै अकेली ही बोले जा रही हू
तुम्हारे मतलब का खाना खेडा नाका मिलेगा
अपने वादेसे मुकर गये तो मै तेरी जुबान खिंच लुंगा फिर तू किसिको अपनी जान तो दे सकेगा पर जबान नही
असे त्यातले काही डायलॉग्स अधून मधून बोललेही जातात.
काल जवान पाहिला.
काल जवान पाहिला.
या विकेंडला पुन्हा जातोय..
एकाच आठवड्यात लागोपाठ दोन वेळा थिएटरमध्ये या लिस्ट मध्ये आता जवान सुद्धा ऍड झाला...
माझे या लिस्टमध्ये असलेले पिक्चर
जुरासिक पार्क
हम आपके है कौन
थ्री इडियट
दुनियादारी
जवान
Pages